बर्‍यापैकी हेल्दी झटपट पिझ्झा

Submitted by अदिति on 28 October, 2014 - 23:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ मध्यम आकाराचा फ्लावर
१ वाटीभर चिझ
१ टे स्पुन इटालियन सिझनिंग
२ एग व्हाईट
मिठ
टॉपिंग्सः
हवे ते, मी लाल शिमला मिर्च, कांदा, झुकीनी वापरली.

क्रमवार पाककृती: 

फ्लॉवरचे भाजीला करतात तसे तुकडे करुन घ्या.
मिक्सर/फुड प्रोसेसर मधे (मी वायटामिक्स मधे केले) फ्लॉवर बारीक करुन घ्या. रवाळ होईल अशी.
एकीकडे ओवन ४०० डी फॅ वर प्री-हीट करायला ठेवा
फ्लॉवर पाणी न टाकता वाफेवर शिजवा.(७/८ मिनीटे)
बर्‍यापैकी गार झाल्यावर त्यात. २ अंडी व्हाईट फेटुन टाका
चिझ्झ, सिझनिंग, मीठ टाका.
हलक्या हाताने हे सगळ एकत्र मळा
पिझ्झा पॅन वर बेकींग शीट ठेवुन त्यावर सढळ हाताने तेल लावा (नाहीतर पिझा बेकिंग शीट सहीत खायची तयारी ठेवा :))
फ्लॉवरचे मिश्रण हव्यात्या आकारात गोल्/चौकोनी बेकिंग शीट वर पसरवा
४०० डि फॅ ला २० मिनीटात हा पिझ्झा बेस मस्त गोल्ड्न ब्राउन बेक होतो
इन मिन टाईम, फ्राईग पॅन मधे १/२ चमचा तेल घेउन टॉपिंग्स शिजवुन घ्या.
पिझ्झा बेस बेक झाला की बाहेर काढुन त्या वर पिझ्झा सॉस घालुन, हव असेल तर थोडे चिझ घालुन त्या वर टॉपिंग्स घाला.
परत एकदा ५/७ मिनीट बेक करा.
pizza.JPG

वाढणी/प्रमाण: 
२/३ जणांसाठी पोट्भर होतो
अधिक टिपा: 

१. फ्लॉवर च मिश्रण ड्राय होईल ह्याची काळजी घ्या
२. बेकिंग शीट्ला तेल खरच भरपुर लावा.
३. सांगितल्या शिवाय बेस कसला आहे हे कोणालाही ओळखता येत नाही त्या मुळे खाउन झाल्यावर च सांगा
४. घरातील लहान मेब्रांना सांगितले नाही तरी चालेल Happy मोठ्यांना मात्र नक्की सांगा. गिल्ट फ्री पिझा एन्जॉय करता येइल.
५. बर्‍यापैकी हेल्दी असल्यामुळे हवा तितका खाता येतो. डायट प्रुफ आहे Lol

माहितीचा स्रोत: 
नेट
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अदिति : मस्तच !
बिघडलेला ओव्हन सोडुन बाकी सर्व उपलब्ध आहे>>>सेम हिअर टुडे, एलजीचा २८ लिटरचा पाहून ठेवलाय १२६०० पासून १६२०० पर्यंत किमती दिसत आहेत सेम मॉडेलच्या....

रश्मी, विनिता, काही कल्पना नाही. करुन बघा आणि सांगा Happy पिझ्झा नेहमी बेकच केला आहे त्यामुळे सांगता येत नाहीये.

मावे नसल्याने फ्लॉवर बाहेर वाफवुन घेतला तरी चालेल ना? << हो हो अगदीच चालेल, मी रेसिपी मधेच चेन्ज करते तसा

छान प्रकार. सपाट नॉन स्टीक तवा असेल तर त्यावर होईल. एकदा बेस परतून टाकावा लागेल म्हणजे दोन्ही बाजूने ब्राऊन होईल ( व खमंग लागेल ) या बेसचा आकार आपल्याकडे कितपत मोठे उलथने आहे त्यावर ठरवा Happy

सडेतोड, दोन्हीसाठी बर्‍यापैकी.
चिझ आहे म्हणुन पुर्ण हेल्दी नाही आणि ३० मिनीट लागतात म्ह्णुन एक्दम झटपटही नाही Happy

बायडींग साठी एक ते दोन टेबलस्पून कोरडी कणीक, शिजवलेल्या फ्लॉवरमधे मिसळली तरी चालू शकेल असे वाटतेय. मला तेच करावे लागेल Happy