मुलांच्या दांडगाईने वागण्याबाबत इतर मुले, इतर पालक आणि शाळा ह्यांनी काय करावे?

Submitted by वेल on 25 August, 2014 - 04:33

आजच शाळेतल्या एका पालकाकडून कळले की तिच्या मुलीला (पहिलीतल्या) तिच्याच वर्गातल्या मुलाने ढकलले. ती मुलगी स्वतःच्या जागेवर बसली होती आणि हा मुलगा त्या बेंचच्या बाजूने चालला होता. त्या मुलीचे नाक फुटून रक्त आले. ती मुलगी खूप घाबरली आहे.

त्या पालकाने शाळेत तक्रार केलेली आहे. शाळा नियमानुसार काय करायचे ते ठरवेल.

पण आपल्या मुलांनी अशा मस्तीखोर मुलांसोबत कसे वागावे? त्या मुलांपासून लांब राहावे हा उपाय नाही कारण ह्या परिस्थितीत ती मुलगी त्या मुलाच्या अध्यात मध्यातही नव्हती,

आपण आपल्या मुलांना अशी परिस्थिती हाताळायला शिकवताना काय शिकवावे? शिक्षकांकडे तक्रार करणे हा एकच ऑप्शन आहे का?

मला काही उपाय सुचले ते असे -

आपल्या मुलांना stand united शिकवावे. कोणी इतर कोणाला त्रास देत असेल तर ज्याला त्रास होतोय त्याची बाजू घेऊन आपण त्या त्रस देणार्‍या मुलाला हे लगेच थांबव असे शांत पण ठाम शब्दात सांगावे ( सहा वर्षाच्या मुलाकडून खूप जास्त अपेक्षा होत असेल कदाचित पण मी हे माझ्या मुलाला प्रॅक्टिकली कसं करायचं ह्याचा डेमो दिला आहे. तो ते तसं करू शकेल की नाही माहित नाही.)

त्रास देणारा हामुलगा नेहमीच इतर मुलांना त्रास देतो त्यामुळे त्या मुलाच्या वागण्याविरुद्ध शाळेत लेखी तक्रार करावी. आणि ह्यामध्ये मुलाला काउंसेलिंग देण्याची मागणी करावी. शिवाय पुन्हा असेच होत राहिल्यास पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करण्याची धमकी द्यावी.

कृपया तुमची मते मांडा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिक्रिया पाहून असे वाटते की
काही आयडींच्या दांडगाईने वागण्याबाबत इतर आयडी, मायबोली आणी इतर आयडींचे पालक ह्यांनी काय करावे? असा एक धागा काढावा.
जोक्स अपार्ट,
इतक्या सिरीयस विषयावर सुद्धा वैयक्तिक हेवेदावे, इतर ठिकाणचे हिशोब चुकते करण्यासाठी
प्रतिसाद इ इ मस्ट आहे का?

काय मी पण !!!
(किति अवघड जात मराथि लिहण तरि खुप महत्वाचा विशय माझ्यासाथि म्हणुन आपलि विचारति आहे, तर ईथे मजा चालु आहे.)

स्वाति२ थन्क्स.

चर्चा वाचतिये. खूप महत्वाचा विषय आहे. ज्या मुलांना योग्य तसा दम न देणे, मुलेच आहेत या सबबीवर दुर्लक्ष करणे यामुळे तशीच मोठी झालेल्या मुलांचे टीनएजर झाल्यावर काय होते व त्यामुळे आपल्या मुलांना किती त्रास होतो हे नुकतेच अनुभवले आहे. आधीचे किस्से लिहित नाही कारण ते जुने आहेत . अगदी ४ महिन्यांपूर्वीच एका मुलीने माझ्या मुलाच्या भरपूर खोड्या काढल्या आणि दुर्लक्ष कर असे मीच सांगितल्याने (मोठी चूक केली मी) नाखुषीने का होईना त्याने दुर्लक्ष केले तर एक वेळ अशी आणली की तिने सरळ त्याला एकटा गाठून तू मला हात लावलास (टीन एजर आहेत ते दोघेही) असे सांगून सगळीकडे गोंधळ माजवीन अशी धमकी दिली, काही तासात (त्याच दिवशी) ती अमलात आणली. मग नवर्‍याने व मी एक मिनिटही न दवडता हा विषय मुख्याध्यापकांकडे लावून धरला. तासभर त्यांच्याशी बोलून झाल्यावर दुसर्‍या दिवशी त्या मुलीच्या आईने 'हाय' म्हणणे बंद केले व मला मेसेज मिळाला. त्यनंतर त्रासही बंद झाला. मुलांना आपण त्यांच्याबरोबर आहोत हे वाटणे अतिषय महत्वाचे. मुलांनी त्यांच्या वयाप्रमाणे खेळणे, छोट्या खोड्या काढणे वगैरे ठीक आहे पण त्यांना वेळप्रसंगी दम देणे अतिषय आवश्यक! नाहीतरे भरपूर मनस्ताप होतो. व्हिक्टीम मुलांना अकारण त्रास, अभ्यासावर परिणाम हे होते. लहान असो की मोठी, मुले आजकाल साधी राहिली नाहीत असे वाटायला लागते. सुदैवाने मुख्याध्यापकांनी मुलीला व माझ्या मुलाला बोलावून सांगितले की फक्त मुलाने मुलीलाच नाही तर मुलीनेही मुलाला 'टच करणे' अ‍ॅक्सेप्टेबल नाही. पुढे मुलीला शिक्षा वगैरे झाली.
ही चर्चा लहान वयोगटाबाबत चालू आहे पण या मुलीच्या खोड्या बाकीची मुले दुसर्‍या तिसर्‍या यत्तेपासून चालवून घेत आली आहेत त्याचे पुढे काय होऊ शकते याचे उदाहरण म्हणून दिले आहे. असेच होईल असा दावा अजिबात नाही पण एक शक्यता!

अरेरे जोरदार बुलिन्ग चालू आहे असे दिसते इकडे Sad

माझा किस्सा गमतीदार आहे. मी लहान असताना माझ्यापेक्षा मोठ्या चुलत भावंडांकडून जर मला काही त्रास देण्यात आला, तर माझी आई मलाच मारायची आणि मग रडत बसायची. Sad
पण असे झाले तरी मला आईचा कधी राग नाही आला, कारण तेव्हाही हे जाणवत होते की आईवडिलांचे एकत्र कुटुंबामधे स्थान कुठे आहे. ती त्यांची मजबुरी होती, परिस्थितीने केलेल्या बुलिन्गमुळे.

बेफिंनी तळमळीने लिहिलेले मुद्दे आगीचे चटके बसत असल्यासारखे जाणवत आहेत.
पण तरी मितान यांनी लिहिलेल्या मुद्द्यांचे महत्व कमी होत नाही.
उपाय तर नक्कीच केले पाहिजेत आणि ते सुद्धा दोन्ही बाजुंची कमीत कमी हानी होईल अशा बेताने.
दोन्ही बाजु = त्रास होणारा आणि त्रास देणारा

>>>इतके अवघड का जात आहे अनेकांना, हे मान्य करणे, की खूप अभ्यासपूर्ण रीतीने विकसित झालेले एखादे शास्त्र हे प्रत्येक आणि प्रत्येकवेळी उपायकारक असतेच असे नाही? आणि हे शास्त्र विकसित होण्याआधीच्या पिढीत मुलांच्या मनात जी 'धाक' नावाची एक भावना असे ती कुठेतरी लोप पावत चालली आहे आणि त्याला आत्ताचे समस्त पालक जबाबदार आहेत हेही स्वीकारायची लाज वाटत आहे का?

बेफि : मनापासुन सह्मत. हा विचार मला स्वतःच्या मुलांबद्दल देखील पडतो. की अरे आपण लहान असताना किती धाकात असायचो, आता ही मुले अजिबात म्हणजे अजिबातच का धाकात राहू शकत नाहीत ? Uhoh
मला वाटणारे एक कारण म्हणजे मानवाच्या पुढच्या पिढ्यांच्या मेंदूतच काही तरी बदल होत चालले असावेत आजुबाजुच्या बदलांना आवश्यक असे Sad

>>>थ्यांक्स, बट नो. थँक्स!<<<

यासाठी, की मी इथे लिहिलंच तर काय लिहीन ते तुमच्यासकट सगळ्यांनाच ठाऊक आहे.
मग मी टंकनश्रम कशाला घेऊ? Wink

@इब्लिस -
घ्या हो श्रम जरा . तथाकथित समुपदेशकांचे ऐकून काही पालक (फक्त ) सनदशीर मार्ग पत्करतील . आणि यात त्य्नाच्या मुलांचे भावविश्व उध्वस्त होण्याचा मोठा धोका आहेच. एखादेवेळेस शारीरिक इजा पण. त्यांना खरा आणि योग्य मार्ग दाखवा.

शीर्षकाशी संबंधित ही दुसरी सिच्युएशन.
( कमजोर मनाच्या वाचकांनी कृपया लिंकवर क्लिक करू नये )

http://www.bhaskar.com/news-hf/GUJ-SUR-8th-class-student-suicide-in-sura...

(नेक्स्ट या पर्यायावर आणखी प्रचि उपलब्ध आहेत).

शाळेबाबत नाही पण मुलाच्या दांडगाई बाबत तरी नक्की आहे Angry
माझ्या गाडीच्या आरशाची वाट लावली सोसायटीमधल्या लहान मुलांनी......काच तर फोडलीच आहे पण तो आरसा मुळापासून हलवला आहे.... त्यांच्यातला एक जण ढोला त्याच्या पेक्षा वयाने लहान असलेल्या मुलांना मारत होता उगाच आणि त्यांच्या पॅण्टला लवंगी फटाका सुतळीने बांधत होता म्हणून मी त्याला रागावले त्याचा वचपा काढल्या बिंडोकाने Angry Sad
असल्या टोणग्यांची चाईल्ड सायकॉलॉजी वगैरे मला काही कळत नाही.
सरळ समोर आले की भर सोसायटीत सणासण्ण कानफाडात ठेवून द्यायला हव्यात म्हणजे अक्कल येईल टाळक्यात!

बर या मुर्खाच्या आई वडीलांनी पण हात टेकलेत असली परिस्थीती! बोलणार तरी कोणाला?
आई वडीलांनी सरळ काही दिवस बोर्डिंग मधे नेऊन टाकायला हवं

हे एक उदाहरण! तर दुसरं- सोसायटीमधली एक मुलगी रोज येऊन आमची रांगोली पुसून जाते. मी २-३ तास घालवून काढलेली सुंदर रांगोळी काही तासांमधे अक्षरशः बोटं फिरवून पुसून टाकलेली असते.
अनेकदा या मुलीला रंगे हात पकडलंय...... पहिल्यांदा प्रेमाने विचारलं की असं का केलंस तर तेंव्हा ती सॉरी म्हणाली. पुन्हा असं काही करणार नाही म्हणाली म्हणून कौतुक करून तिला एक चॉकलेट पण दिलं. दुसर्‍या दिवशी रांगोळी नीट. तिसर्‍या दिवशी पुन्हा हिला पुसताना पकडलं आणि रागावले तर मला मारून पळून गेली. म्हणून तिच्या आईकडे गेले तर तिची आई म्हणे आमची मुलगी असं करणारच नाही Angry मुलगी स्वतः तोंडाने सांगतेय की मी पुसली तरी आई म्हणे नाहीच!!!!! Angry तिच्या आईला सांगितलं की पुन्हा हीला मी पकडलं न रांगोळी पुसताना तर सरळ दोन कानाखाली ठेवून देणार आहे. तुमच्या पर्यंत येणारच नाही हे आत्ताच सांगून ठेवतेय.तुम्ही तिला आत्ताच समजावा नाही तर माझ्याशी भांडायला यायचं नाही. यावर तिच्या आईने 'बघतेच मी कशी हात लावतेस माझ्या मुलीच्या अंगाला' असा मलाच दम भरलाय.
ही मुलगी इतकी विधवंसक आहे की आमची रांगोळी पुसते. शेजारांच्या घराबाहेर ठेवलेल्या चपलांचे बंद तोडुन टाकते (नाही तर चपला कचरापेटीत फेकून येते) सणावारांना घराला लावलेले हार तोडुन टाकते. लोकांच्या दारावर थुंकुन जाते Uhoh गाडीचे सीट कव्हरवर ब्लेड मारते.
लक्ष्मी पुजनानिमित्त मी दारासमोर रांगोळीत लक्ष्मी काढलेली. ती काढायला मला ४ तास लागले Sad
२ तासात येऊन पहाते तर रांगोळी पुसलेली. शेजारी रहाणार्‍या एका छोट्या मुलीने (मनीने) सांगितलं की 'त्या' मुलीनेच पुसली रांगोळी आणि तिने ते पाहीलं म्हणून आम्हाला कळालं. आता आम्ही त्या मुलीला पकडलं आणि विचारलं तूच पुसलीस ना? मनीने सांगितलंय आम्हाला. त्यावर ते एहो म्हणाली. आम्ही सगळे (शेजार पाजारचे मिळून) तिच्या आईकडे गेलो. इतके लोकं एकत्र बघुन तिची आई गडबडली आणि तिने आमच्या समोर या कार्टीला विचारलं तू रांगोळी पुसलीस का तर सरळ या मुलीने पलटी मारली आणि नाही म्हणाली. मग तिच्या आईने आम्हाला हकलून दिलं.
काल मनीच्या आईने सांगितलं की हिने मनीला भयंकर मारलं आणि ओचकारलंय. त्यामुळे मनी इतकी गांगरलीये की ती आजारीच पडलीये Sad

काय करावं कळेना झालंय Sad

त्या मुलीच्या घराबाहेर दारावर हेच करायचे.
तिच्या आईबापाला अक्कल येत नाही जोवर तोवर हेच करत रहायचे. विचारलं तर सांगायचं जे तुमच्या मुलीने दुसर्‍यांच्या घरी केलेले चालते तेच आम्ही करतोय बोंबलू नका. तुमच्या मुलीला कंट्रोल करायची हिंमत नसेल अंगात तर आमच्या वाट्याला जाऊ नका. काय करतील ते बिंडोक आईबाप?

त्या मुलीने हे करताना रंगे हाथ पकडणे (व्हिडिओ कॅमेर्‍यात वगैरे) अत्यंत गरजेचे.

त्या मनीच्या आईला काय झालंय आणि? आपल्या मुलीला मारलंय तर त्या मुलीच्या आईबापाकडे जायला नको?

अगं त्या मुलीच्या दाराला हार वगैरे काहीहीहीही नसते. त्यामुळे काय करणार?
या हुशार बाईने आम्हाला उपाय सांगितलेला 'एवढीच रांगोळी पुसतात म्हणून मनःस्ताप करून घ्यायची गरजच काय? नकाच ना काढत जाऊ तुम्ही दारापुढे रांगोळ्या :अओ:... आम्ही घरात साधं रोपही लावलेलं नाही. म्हणजे कोणी पानं तोडली म्हणून त्रागा करायला नको...नसते लाड करायचे आणि मग ओरडत बसायचं मुलं नुकसान करतात म्हणुन'
आम्ही दोन्ही कर जोडून खाली अलो.
मनीच्या आईला हिने विचारलेय की तुम्हाला काय माहीत आमच्या मुलीने तिला मारलंय? पुरावा आहे का? तुमची मुलगी खोटं बोलत असेल.
आणि मनीच इतकी भयंकर घाबरलीये की ती अजिबात त्या मुलीशी किंवा घरच्यांशी हिच्या घरातल्या कोणाला बोलू देत नाहीये. ६-७ वर्षाची मुलगी गं Sad तिला तिची आई समजावतेय की तू घाबरू नकोस आपण तिला शिक्षा करू आम्ही आहोत ना तुझ्यापाशी. तरीही मनी नक्कोच म्हणतेय. पुन्हा तुम्ही शिक्षा केल्यावर तिने मला मारलं तर म्हणुन.
मनीने घराबाहेर पडणं सोडून दिलंय Sad
हे म्हणलं तर फार साधं प्रकरण आहे, म्हणलं तर फार भयंकर.... कदाचित मनी काही दिवसांई विसरून परत खेळायला ही लागेल तिच्याशी पण तसं नाही झालं तर मात्र परिणाम फार बेक्कार होतील Sad

या मुलांच्या आई वडीलांना आधी धरून मारायला हवं Angry

त्या पहिल्या प्रसंगातल्या मुलाची तर मलाच भिती बसलीये.
आधी त्याने माझ्या आईच्या गाडीचं पाय ठेवायचं स्टॅण्ड असतं ते दगड मारून तोडून टाकलं, मग माझ्या सायकलच्या टाअरला ब्लेड मारलंय . आज आता माझ्या गाडीचा आरसा तोडलाय. आता बाबांच्या गाडीला आणि चारचाकीला काही करू नये याची भितीच Sad त्याची रितसर सगळ्यांसमोर माफी (?) मागत नाही तोवर तो सोडणार नाहीये आम्हाला Sad
बरं हे सगळं करताना आम्ही त्याला रंगेहात पकडलेलं नाही. आजुबाजुच्यांनी एक दोनदा त्याला तसं करताना बघितलंय आणि आम्हाला सांगितलंय त्यामुळे त्याला डायरेक्ट काही बोलता ही येईना Sad

.

.

नाही पण मी म्हणते मुलांना स्वतःच्या घरी काय हवं ते करावं पण दुसर्‍याच्या घरी नीट वागावं, दुसर्‍याच्या वस्तूंना हात लावू नये वगैरे सारख्या लहान गोष्ती शिकवायला काय होतं या मुर्ख आई वडीलांना.

मला चांगलं आठवतंय की मी लहानपणी ५वी ६वी मधे असताना एका मुलीचं नॉन डस्टचं खोडरबर हरवलं होतं म्हणून तिची आई माझ्या आईशी भांडायला आलेली.
त्यावर माझ्या आईने त्या काकुंना सांगितलेलं की आमची प्रिया स्वतः नवं रबर विकत घेऊन तिला आणुन देईल.
त्यानंतर माझ्या आईने मला घरातली भांडी घासायला लावलेली आणि म नवं रबर आणायला ५ रुपये दिले होते.
तेंव्हापासून 'लोकांच्या गोष्टी नीट वापराव्यात' हे डोक्यात इतकं पक्क्क्क्क्कं बसलंय ना!!!!

माझ्या मैत्रीणी म्हणतात तुझं हे सगळं मतं वगैरे बघून वाटतंय तुझ्या मुलांचं काही खरं नाहीये एकंदरच Uhoh
मलाच कळत नाही माझं खरचं चुकतंय का?

अशा कार्ट्यान्चे मोबाईलवर फोटो काढावेत आणी सकाळ सारख्या पेपरला पाठवुन द्यावेत नावासकट. तरच ह्यान्चे आईबाप सुधारतील.:राग: चार लोकात छीथु होईल तेव्हा कळेल त्याना. रिया तुझ्या भावाला नाहीतर एखाद्या कलीगला हे फोटो लाम्बुन काढायला सान्ग, म्हणजे तुझा पण काही सम्बन्ध रहाणार नाही आणी तुला कोणी बोलु शकणार नाही. पेपरवाल्याना नाव गुप्त ठेवण्याची विनन्ती करा.

रश्मी, मला वाटतं आई वडिलांची दोन्ही उदाहरणात चुक आहे. मुलांना शिक्षा देऊन उपयोग काय?
मुलगा ऐकत नाही तर बोर्डिंगला का नाही टाकत? जरा दूर राहिला तर कदाचित अक्कल येईल Sad
मुलीच्या बाबतीत मात्र पुर्ण चूक आईवडीलांचीच आहे. तिला वळण लावलं असतं तर हे असले प्रकार झाले नसते Sad
पालकांवर करवाई करता येईल का?
मुळात त्यांचे गुन्हे फार काही मोठे दिसत नाहीत Sad पण आपल्याला होणारा त्रास फार मोठाच असतो Sad
रांगोळी पुसणं हा काही वाढवायचा इश्शु नाही मान्य आहे पण इतकं कष्टाने केलेलं काम कोणा एक मुर्ख व्यक्ती मुळे वाया जात असेल तर त्रास होतोच ना? Sad

मला ठोस उपाय हवाय की या सगळ्याचा बंदोबस्त होईल.
त्या मुलाबद्दल मी सोसायती मिटिंगमधे विषय मांडणार आहे. आणि त्या मुलीला पुढच्या वेळेला मी चांगलीच ठोकणार आहे. आणि तिची आई भांडायला आली तर सरळ निर्लज्जपणे पुरवा काय असं विचारणार आहे.
त्या मुलीवर जो परिणाम होईचाय तो होऊ देत Angry

तीन चार वेळा सांगूनही आई ऐकत नसेल तर मोठ्या अक्षरात सोसायटी बोर्डवर नोटीस लाव. या मुलांपासून सावधान टाईप. व ते काय काय करतात, त्यांच्या घरी सांगितल्यावर काय झाले ते ही साध्या शब्दात साळसूदपणे ! एक त्रस्त रहिवासी नावाने लिही. बदनामीला नक्कीच असे लोक घाबरतात. तरीही काही फरक पडला नाही तर त्याच नोटीशीत वरील तक्रारीबद्दल चर्चा म्हणून मीटींग अरेंज कर. let it happen face to face.

हम्म्म ! हे ठिक वाटतेय Happy
आजच नोटीसबोर्डसाठी प्रिंटआऊट काढुन नेते Happy
थँक्स! मला किती हलकं वाटतंय आता Proud शनिवार पासून नुसती चिड चिड झालेली Happy

रीया,

एक जालीम उपाय आहे. थोडा धोकादायकही आहे. पण मात्रा कडक लागू पडते.

ती नतद्रष्ट मुलगी आहे ना तिला तिच्या आईबापांसमोर कानफटात मारायची. त्या मुलीला अक्कल आली पाहिजे की तिचे आईबाप जरी तिला सहन करत असले तरी लोकं करत नाहीत.

या उपायाचा एक जबरदस्त फायदा म्हणजे सोसायटीतील इतर वांड कार्टी रीयादीदीला वचकून राहतील. धोका असा की तिचे आईबाप पोलिसांत तक्रार करू शकतात. माझ्या वडिलांनी अनेक दशकांपूर्वी एका नगरसेवकाच्या व्रात्य मुलावर हा उपाय केला होता. तो प्रचंड यशस्वी झाला.

आ.न.,
-गा.पै.

काही मुले खोडकर असतात पण त्यांच्या खोड्या निरूपद्रवी असतात पण काही मुले मात्र खरंच विध्वंसक असतात. माझ्या मुलाच्या पाळणाघरातील एक मुलगा खूप उपद्रवी आहे. त्याच्या आईला तसं अज्जीबात वाटत नाही. त्यामुळे त्याला संध्याकाळी गार्डनमध्ये खेळायला घेऊन जात नाहीत तर त्याची आई दमदाटी करते माझ्या मुलाला अशी सावत्र वागणूक का देता. बेबी सिटरने स्पष्ट सांगितले. तुमचा मुलगा आहे अति आग्गाऊ! त्याने कोणाला पाडले किंवा तो स्वतः पडला तर जबाबदारी घेणार आहात का? आम्हाला आणखी सहा मुलांकडेही पाहायचं असतं. त्या मुलाला माझ्या मुलाच्या बर्थ डे ला इन्व्हाईट करायला फोन केलेला तर अतिशय उर्मटपणे त्याच्या आईने विचारलेले ओके कबतक फ्री करेंगे उसको? तब सोचूंगी भेजना है के नही. मी शॉक!! मुलाचा बर्थडे केक आणून कॉफी टेबलवर सेट करेपर्यंत या मुलाने उडी मारून हात मारला. म्हणाला मलाच पहीला केक टेस्ट करायचा होता. त्याची आई बेबी सिटरला सांगत होती की आम्हाला यायला उशीर होतो तोपर्यंत त्याचे क्राफ्ट प्रोजेक्टस करून ठेवत जा. तिने सांगितले हे माझं काम नाही. पेरेंटस म्हणून पैसे देण्याव्यतिरिक्त तुम्ही काही करणार की नाही. आई वडील हल्ली मुलांना ओव्हर प्रोटेक्ट करतात. मुलाची चूक मान्य करणे निदान त्याला त्याचं चुकतंय हे समजून सांगणे आवश्यक असते हेच बर्‍याच पालकांना समजत नाही.

माझ्या लग्नाच्या वेळची गोष्ट! आम्ही माझ्या साड्यांची खरेदी करायला गेलो होतो. तिथे एक आई आपल्या साडेतीन चार वर्षांच्या मुलाला आणि बहुदा बहीण्/नणंदेला घेऊन आली होती. तो मुलगा तिथल्या काचेवर हातातला दगड आपटत बसला होता. मग पाण्याचा ग्लास फेकून दिला. तेथील कर्मचार्‍यांनी हलकेच दटावलेही. आई मात्र हसत साड्या बघण्यात गर्क. मग साहेबांनी मोर्चा इतर ग्राहकांकडे वळवला. त्यांना मारत सुटला. मला दोनदा मारल्यावर मी वैतागले आणि त्याच्या आईला सांगितलं जरा लक्ष द्या मुलाकडे. तर ती बडबडतच सुटली काय गं तुला मूलच होणार नाहीये का? लहान आहे ना तो?? तुच जरा समजून घे त्याला. मी म्हटलं माझं मूल इतकं आगाऊ नक्कीच नसेल, त्याने केलाच खोडकरपणा तर मी त्याला नीट समजावून सांगेन पण माझ्या मुलामुळे दुसर्‍यांना त्रास होणार नाही याची काळजी नक्कीच घेईन. आणि लहान आहे म्हणून आत्ताच समजावून सांगायचं. मोठा असता तर समजवण्याच्या भानगडीतच पडले नसते.

मला असं वाटतं की प्रत्येक शाळांमध्ये मुलांबरोबरच पालकांचंही समुपदेशन करण्याचा इव्हेंट असावा कंपल्सरी प्रत्येक पॅरेंट मीट ला आणि प्रत्येक पालकांनी (शक्यतो दोन्ही) त्याला हजर असलंच पाहीजे काहीही फुटकळ कारणे न देता. महीन्यातून एक्/दोन सेशन अटेंड करणं फार अवघड नसावं.

बापरे! एकेक किस्से आणि उपाय !

अवांतर - त्या खोडकर मुलांना माहीत असेल का इथे मायबोलीवर त्यांच्याविरुद्ध प्लॅन चालू आहेत Happy

आमच्याइथे शेजार्‍यांची रांगोळी पुसणार्‍या बाळीला तिच्याच आईने रांगोळी काढायला अन दररोज स्वतःच्या दारासमोर काढायला शिकवलं. तेव्हापासुन ही बाळी कोणाचीच रांगोळी पुसत नाही अन दुसरं कोणी पुसत असेल तर त्यालाही हटकते

मोठ्या अक्षरात सोसायटी बोर्डवर नोटीस लाव. या मुलांपासून सावधान टाईप. व ते काय काय करतात, त्यांच्या घरी सांगितल्यावर काय झाले ते ही साध्या शब्दात साळसूदपणे ! एक त्रस्त रहिवासी नावाने लिही. बदनामीला नक्कीच असे लोक घाबरतात.

>>>>>>>

कुत्र्यांपासून सावधान टाईप वाटतेय.
अर्थात असे करणे चूक की बरोबर यावर मत नोंदवायचे नाही.
पण .. बदनामीला नक्कीच असे लोक घाबरतात .. हे यामागचे गृहीतक चुकले तर लेणेचे देणे पडू शकते. आणि त्या केसमध्ये मग आपणही कोणत्या बदनामीला घाबरत नाही याची तयारी ठेवली पाहिजे. Happy

गापै, बाकीची वांड मुलं रियादिदीला वचकून राहतील की नाही ते माहीत नाही.
पण मी स्वतः तिच्या आईला वचकून आहे. भयानक बाई आहे ती Sad समोरच्याला मारायला मागे पुढे बघणार नाही. त्यामुळे तिच्या आई समोर नाही पण तिची आई नसताना ही मला रंगे हात सापडली तर मात्र मी तिला धुवुन काढणार आहे आणि तिच्याच आईला वर तोंड करून विचारणार आहे की पुरावा काय की मी मारलं? तुमची मुलगी खोटं बोलत असेल.

तो जो मुलगा आहे त्याला मी ओरडले त्याने माझ्या गाडीची वाट लावली. त्याला मात्र मी खरच घाबरलेय आता त्याला सॉरी म्हणून टाकावं का या विचारात आहे मी. कारण माझ्या आईच्या गाडीचं नुकसान, मग माझ्या सायकलचं नुकसान आणि आता माझ्या दसर्‍यादिवशी आणलेल्या नव्या कोर्‍या गाडीचं नुकसान......
बाकी काही असो पण आर्थिक नुकसान परवडत नाही खरच Sad
त्याला सॉरी म्हणल्याशिवाय तो शांत बसणारच नाहीये Sad

प्रिती, अगं आपल्याला किती कामं असतात अगं.... घर नोकरी , नोकरी घर, अभ्यास ही कसरत झेपेना तिथे हे सगळं करायला वेळ कोणाला आहे. आणि हे लोकं इतके भयंकर आहेत की सहज तो कचरा दुसर्‍याच्या दारात लोटतील आणि म्हणतील आम्ही नाही टाकला Uhoh परत त्या दुसर्‍या घरातल्यांचा गैरसमज होईचा ती गोष्ट वेगळी.

मिटींग मधे बोलून बघते काही होतंय का ते. तिथेही वाद होतीलच म्हणा आणि मग त्रास आणखी वाढेल Sad पण उपाय नाही

चिमुरी, चांगला उपाय आहे. जर त्या बाळाची आई शिकवत नसेल तर ज्यांची रांगोळी पुसली जाते अश्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत या कार्यासाठी पुढे यायला हवे.

बहुतांश अश्या खोडकर मुलांमध्ये अशी मानसिकता असते, आमच्या कामाची गोष्ट नाही तर त्यातून आम्ही इतरांनाही आनंद उचलू देणार नाही. त्यांना अश्या गोष्टींमध्ये आनंद घेण्यास उद्युक्त केले तर परिस्थिती बदलू शकते.

तसेच काही मुलांमध्ये एक इगो असतो, आणि तो त्या त्या वयापुरता असतो, जरा नमते घेऊन तो सुखावून दिला तरी ते शांत होतात वा आपले चांगले भिडू सुद्धा बनू शकतात.

डिस्ट्रक्टीव्ह माईंडला नेस्तनाबूत करण्यापेक्षा त्यांला कन्स्ट्रक्टिव कसे बनवता येईल हे आधी बघणे उत्तम. खास करून लहान मुलांच्या बाबतीत तर नक्कीच कारण हा त्यांच्या जडणघडणीचा काळ असतो आणि ते बदलासाठी फ्लेक्सिबल असतात.

चिमुरी, चांगला उपाय आहे. जर त्या बाळाची आई शिकवत नसेल तर ज्यांची रांगोळी पुसली जाते अश्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत या कार्यासाठी पुढे यायला हवे.
>>
नक्कीच!
घेऊन जाता का अशा गोड बाळाला एखाद्या दिवस घरी?
नाही म्हणजे आमच्याकडे वेळ नाहीये अशा फालतू कामांसाठी. त्यांच्या आई वडीलांना अक्कल आणि वळण नाहीये म्हणून आम्ही आमचा वेळ वाया घालवून ( हो असल्या कार्ट्यांसाठी काहीही करणं हे वेळ वाया घालवणंच आहे) त्यांना वळण लावायला. त्यापेक्षा एक मुस्काडात देणं मला जास्त सोप्पं आणि योग्य वाटतं.

Pages