मुलांच्या दांडगाईने वागण्याबाबत इतर मुले, इतर पालक आणि शाळा ह्यांनी काय करावे?

Submitted by वेल on 25 August, 2014 - 04:33

आजच शाळेतल्या एका पालकाकडून कळले की तिच्या मुलीला (पहिलीतल्या) तिच्याच वर्गातल्या मुलाने ढकलले. ती मुलगी स्वतःच्या जागेवर बसली होती आणि हा मुलगा त्या बेंचच्या बाजूने चालला होता. त्या मुलीचे नाक फुटून रक्त आले. ती मुलगी खूप घाबरली आहे.

त्या पालकाने शाळेत तक्रार केलेली आहे. शाळा नियमानुसार काय करायचे ते ठरवेल.

पण आपल्या मुलांनी अशा मस्तीखोर मुलांसोबत कसे वागावे? त्या मुलांपासून लांब राहावे हा उपाय नाही कारण ह्या परिस्थितीत ती मुलगी त्या मुलाच्या अध्यात मध्यातही नव्हती,

आपण आपल्या मुलांना अशी परिस्थिती हाताळायला शिकवताना काय शिकवावे? शिक्षकांकडे तक्रार करणे हा एकच ऑप्शन आहे का?

मला काही उपाय सुचले ते असे -

आपल्या मुलांना stand united शिकवावे. कोणी इतर कोणाला त्रास देत असेल तर ज्याला त्रास होतोय त्याची बाजू घेऊन आपण त्या त्रस देणार्‍या मुलाला हे लगेच थांबव असे शांत पण ठाम शब्दात सांगावे ( सहा वर्षाच्या मुलाकडून खूप जास्त अपेक्षा होत असेल कदाचित पण मी हे माझ्या मुलाला प्रॅक्टिकली कसं करायचं ह्याचा डेमो दिला आहे. तो ते तसं करू शकेल की नाही माहित नाही.)

त्रास देणारा हामुलगा नेहमीच इतर मुलांना त्रास देतो त्यामुळे त्या मुलाच्या वागण्याविरुद्ध शाळेत लेखी तक्रार करावी. आणि ह्यामध्ये मुलाला काउंसेलिंग देण्याची मागणी करावी. शिवाय पुन्हा असेच होत राहिल्यास पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करण्याची धमकी द्यावी.

कृपया तुमची मते मांडा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यात रिया यांनी तिला चॉकलेट दिले हे खास बोल्ड केलेले, म्हणजे त्यांचा "अरे मी हिला चॉकलेट दिले तरीही ऐकली नाही म्हणजे काय" असा साधारण मुद्दा वा पवित्रा आहे. पण इथेच तर चुकतेय असे नाही वाटत. लहान मुलांना इतक्या सहज गृहीत धरणे चूकच नाही का. कि एक चॉकलेट म्हणजे समजावून सांगायची परीसीमा झाली? त्यात त्या मुलीला चॉकलेटची फार आवड आणि ते दिल्यावर ती शहाण्यासारखी वागते हे ही गृहीतकच ना...>>>ऑ!

रिया,

सर्व प्रथम मान्य आहे की तुझी चिडचिड / त्रागा रास्त आहे, त्या मुलीवर संस्कार करायचे काम तुझे नाही, पण शांतपणे जरा वेगळा विचार करून बघणार का.

एकदा त्या रांगोळी पुसणार्‍या मुलीला बरोबर घेऊन रांगोळी काढशील? फक्त एकदाच, म्हणजे,तसे एकदाच घडायला प्रयत्न अनेक करावे लागतील पण एकदा तरी रांगोळी काढच.....

माहीत आहे तुझ्याकडे वेळ नाही, पण अर्धातास तरी देशील का, त्यात काढून होईल इतकीच रांगोळी काढ हवी तर

करके देखो

फार फार तर काय होईल ती तशीच वागेल जशी आत्ता वागत आहे.

पण...... पण एखादे वेळी ती वेगळ्या रितीने वागेलही... कोणी सांगावे

रांगोळी काढताना कशी कारागिरी / चिकाटी लागते हे तिला कळल्यावर फरक पडेलही तिच्या वागण्यात.

बाकी तुला वाटते तसे दोन थोबाडीत देऊनही बघू शकतेस,

एखादे वेळेस तुला घाबरून सुधारेलही ती मुलगी....

नाहीच सुधारली, तर...... फारात फार काय होईल, गाडीच्या काचा तोडण्यात लिंगनिरपेक्षता येण्याची शक्यता वाढेल.

लोकांचे वागणे आपल्या हातात नसते पण आपण कसे वागावे हे तर आपल्याच हातात असते ना!

तुझा मूळ हेतू साध्य कशाने होईल (पक्षी - इथे तुझी रांगोळी पुसली न जाणे) यासाठी जे योग्य वाटते तेच करशील.

बघ विचार करून मी काय म्हणतोय ते.....मला खात्री आहे तुला हे जमेल Happy

कोकणस्थ, येस्स कठीण आहे, बच्चे संभालना कोई बच्चो का खेल नही. पण कंस आधी सोडवून घेतले तर समीकरणाची उकल सोपीही आहे.
इथे वर कोणीतरी जावे त्याच्या वंशा म्हणीचा वापर केला आहे पण लहान मुलांच्या वंशाला जाऊन किंवा त्यांच्या द्रुष्टीकोनातून विचार आपण खरेच करतो का?
ड्रिमगर्ल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये अटेंशन सीकर हा शब्द वापरला पण याचा अर्थ मग ती आता सुधारणारच नाहीत असे नाही ना. उलट इथे आपण कंस सोडवला आहे. आता यावर उपाय शोधा. त्यांच्या चुकीच्या वर्तनाला अटेंशन न देता त्यांच्या कडून काही चांगल्या गोष्टी घडवून त्यातून आमचे तुझ्याकडे लक्ष गेले बघ असे भासवून द्या.

अहो कठीण आहे म्हणजे इतकं स्पष्टीकरण देऊनही तुम्ही तीच टेप लावताय म्हणून म्हटलं कठीण आहे तुम्हाला एक्स्प्लेन करणं Lol

चालुद्या.

लोकांचे वागणे आपल्या हातात नसते पण आपण कसे वागावे हे तर आपल्याच हातात असते ना!
>>>

हर्पेन छान समजूतदार पोस्ट, हे एक वाक्य आवडले म्हणून कोट केले, पण यात जरा अजून जोडावेसे वाटते.
(बहुतेक) न्यूटनचा नियम - अ‍ॅक्शन आणि ईक्वल रिअ‍ॅकशनचा. हे आपल्या वागण्यालाही लागू होतेच की.

म्हणजे एण्ड ऑफ द डे लोक कसे वागतील हे त्यांच्याच हातात असले तरी दिवसाच्या सुरुवातीला (किंवा दिवसभर) आपण त्यांच्याशी कसे वागलो हे मॅटर करतेच.
शुअरली इथे अ‍ॅक्शन इज नॉट इक्वल टू रीअ‍ॅक्शन पण आपली अ‍ॅक्शन इन्फ्लुअन्स तर करतेच की.
तळटीप - हे लहान मुलांसाठीच नाही तर सर्वांशीच वागताना लागू.

कोकणस्थ, आपल्या कठीण आहेचा अर्थ मला समजलेला पण प्रत्येक पोस्ट सकारात्मक घ्यायची माझी चिकाटी दांडगी आहे. असो, माझीही १०-१२ मिनिटे उरलीत आता, आवरायला हवे Happy

.

मला तर ती विध्वंसक मुले आणि त्यांचे उद्दाम पालक ह्यांच्यापेक्षा इथल्यांना लेक्चर देणारेच अधिक घातक वाटू लागले आहेत
>>>
सहमत.
सल्ले पाहुन अस वाटायला लागलय ती विध्वंसक मुले आणि त्यांचे उद्दाम पालक योग्य आहेत बाकिचे लोकच चुकीचे आहेत...

मला तर ती विध्वंसक मुले आणि त्यांचे उद्दाम पालक ह्यांच्यापेक्षा इथल्यांना लेक्चर देणारेच अधिक घातक वाटू लागले आहेत.
>>>>>>>>

बँग ऑन बेफिकीर !!!!!!

इथे आपण सर्व मोठया लोकांना चर्चेत आलेले विरोधी मत लेक्चर वाटते तर एकदा मुलांच्या मानसिकतेतून विचार करा, त्यांना आपण करत असलेले उपदेश असेच लेक्चर जर का वाटले तर ते वैतागत नसतील. याचाच अर्थ आपण "साम" किंवा समजावणे ज्याला म्हणतो त्याची पद्धत जर का चुकत असेल तर पर्यायाने ते आणखी बिथरत नसतील ???

सल्ले पाहुन अस वाटायला लागलय ती विध्वंसक मुले आणि त्यांचे उद्दाम पालक योग्य आहेत बाकिचे लोकच चुकीचे आहेत...
>>>>

हे वाक्य मात्र चुकीचे आहे.
ती मुले आणि पालक चुकीचेच आहेत. आपण फक्त त्यांच्याशी योग्य मार्गाने डिल कसे करावे यावर चर्चा करतोय Happy

इथे वर कोणीतरी जावे त्याच्या वंशा म्हणीचा वापर केला आहे पण लहान मुलांच्या वंशाला जाऊन किंवा त्यांच्या द्रुष्टीकोनातून विचार आपण खरेच करतो का?>>>> बाबाजी, बाबाजी. ते मीच म्हणले, पण लहान मुलान्च्या वन्शात जा असे नाही म्हणले तर ज्याला त्रास होतो ( रिया सारखे ) त्यान्च्या जागी आपण असतो तर काय केले असते असे लिहीलेय. म्हणजे लहान मुलान्च्या नव्हे तर रियाच्या जागी /वन्शी जावे.

ऋन्मेष, ऋषी कपूर बनण्यापेक्षा जितेन्द्र, धर्मेन्द्र किन्वा अक्षय कुमार बन रे बाबा. नुसतेच गुडी गुडी स्वेटर घालुन बर्फात बागडु नये.

हे वाक्य मात्र चुकीचे आहे.
ती मुले आणि पालक चुकीचेच आहेत. आपण फक्त त्यांच्याशी योग्य मार्गाने डिल कसे करावे यावर चर्चा करतोय
>>
चुकीच्या माणसांबरोबर योग्य मार्गाने डिल??
सांगावे जरा एखादी...

अरे मी हिला चॉकलेट दिले तरीही ऐकली नाही म्हणजे काय" असा साधारण मुद्दा वा पवित्रा आहे.
>>
धन्यवाद! मलाच नव्हतं माहीत की हा मुद्दा आहे माझ्या या वाक्याचा Uhoh

हर्पेन,
एकदा त्या रांगोळी पुसणार्‍या मुलीला बरोबर घेऊन रांगोळी काढशील? फक्त एकदाच, म्हणजे,तसे एकदाच घडायला प्रयत्न अनेक करावे लागतील पण एकदा तरी रांगोळी काढच.....
>>
मला नाही वाटत मला हे जमेल. कारण कसं आहे ना की फक्त त्या लहान मुलीमधे प्रॉब्लेम असता ना की ती हट्टी आहे किंवा ती ऐकत नाही वगैरे तर मी हा उपाय करूनही पाहिला असता. पण जिथे तिला घरच्यांची फूस मिळतेय. आपण एखाद्याला मारलं तर ती मुलगी घाबरून घरी बसतेय. आपले पालक आलेल्यांना हकलून देतायेत हे सगळं अनुभवताना ती मुलगी माझ्यासोबत रांगोळी काढायला बसेल किंवा अगदी बसलीच तरी बदलेल याबाबत मला शंका आहे.
आमच्या सोसायटीमधे अनेक लहान मुलं आहेत. त्यातली बरीच मुलं अगदी थांबून रांगोळी बघुन जातात. माझ्याशी गप्पा मारत बसतात. एवढा गोतावळा माझ्या जवळ बसलेला बघुनही ती मुलगी थांबत नाही किंवा आसपासही फिरकत नाही.
ही मुलगी लहान होती तेंव्हा (म्हणजे ४ वर्षांपुर्वी) मला जॉब लागला नव्हता म्हणून वेळ होता तेंव्हा मी या पिल्लांना घेऊन गाणी गोष्टी सांगत बसायचे तेंव्हा तीही यायची. हे सांगायचा उद्देश हा की या मुलीसाठी 'प्रियादी' अगदीच नवीन नाही. असं नाही की अचानक कोणी तरी नवी व्यक्ती आपल्याला सांगतेय की बाबा रांगोळी पूसू नकोस...पण एक गोष्ट लक्षात घ्या की हे मुलगी भयंकर डांबरट आहे.
रांगोळी पुसू नये म्हणून मी तिला जवळ घेऊन बसेनही. तिने इतरांच्या झाडाची पाने तोडू नयेत म्हणुन कोणी तरी तिला घेऊन झाडं लावायला बसावं का?
चपला तोडू नयेत म्हणून चपला बनवायला शिकवावं का?
हार तोडू नये म्हणून हार बनवायला शिकवत बसावं का?
आणि दारावर थुंकून जाऊ नये म्हणुन तिला घेऊन दारं धुत बसावं का?

सॉरी पण खरच लोकांकडे एवढा वेळ नसतो. मुळात जिच्या या वागण्याला आई वडीलांची फूस आहे तिला आम्ही काय सुधरवणार?

यांचं घर सगळ्यात वरच्या मजल्यावर आहे. ही मुलगी सरळ खाली खेळणारी मुलं बघुन त्यांच्या डोक्यात घरातल्या वस्तू फेकून मारते. यावर तिची आई काय बाई आमची सोनू करत हसत बसते Uhoh

हिला आम्ही वळण लावायला जायचो आणि हीची आई आम्हाला पळता भुई थोडी करून ठेवायची. त्यापेक्षा नक्कोच!

वर ज्या मनीचा उल्लेख केलाय ती हिच्याच वयाची आहे. आणि दोघींमधे जमिन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे तर मी आणखी कन्फ्युज होते ही अशी कशी निपजलीये म्हणून Uhoh

बाबाजी, बाबाजी.
>>>
ऋन्मेष, ऋषी कपूर बनण्यापेक्षा जितेन्द्र, धर्मेन्द्र किन्वा अक्षय कुमार बन रे बाबा. नुसतेच गुडी गुडी स्वेटर घालुन बर्फात बागडु नये.
>>
रश्मी Rofl
तूने मेरा मूड ठिक कर दिया Lol
नाही तर या ऋन्मेष पायी जाऊन मी त्या कार्टीला आजच्या आज दोन धपाटे घातले असते खरचं Lol

आता आशूडीच्या सल्ल्यावर काम सूरू करते Happy
टाटा!

ऋन्मेष, ऋषी कपूर बनण्यापेक्षा जितेन्द्र, धर्मेन्द्र किन्वा अक्षय कुमार बन रे बाबा. नुसतेच गुडी गुडी स्वेटर घालुन बर्फात बागडु नये.>>>> रश्मीताई ऋषी कपूर नाही पण ऋन्मेषचे सल्ले बघता मला तर जिस देशमें गंगा बहती है मधील राज कपुरची आठवण आली.

रश्मीताई ऋषी कपूर नाही पण ऋन्मेषचे सल्ले बघता मला तर जिस देशमें गंगा बहती है मधील राज कपुरची आठवण आली.
>>>
अहो तो स्वतःला ऋषी पकूर म्हणजे दुनियादारीतला श्रेयस म्हणवतो म्हणुन ते तसं आहे Wink

चुकीच्या माणसांबरोबर योग्य मार्गाने डिल??
सांगावे जरा एखादी...
>>>>>
ऑफिस सुटलेय, रात्री किंवा उद्या सांगतो. पण मला वाटते आपण माझ्या वाक्याचा अर्थ काढायचा चुकला आहात. बहुधा दुर्जनांबरोबर सज्जन बनून कसे वागावे वगैरे अर्थ आपण काढला आहे.

रश्मी,
अहो, मी रिया वा तत्सम लोकांच्या वंशात कधी गेलोच नाही का, किंवा माझ्या आसपास दंगा घालणारी मुलीच नाही का, किंवा मी मुंबईतील सर्वात सुसंस्कृत आणि समजूतदार कॉलनीत राहतो का...

मी सर्व उपाय वापरून सक्सेसफुल करून झालेत म्हणून आत्मविश्वासाने लिहितोय..
तरी घरून वा उद्या वेळ मिळाल्यास अनुभव सुद्धा नक्की मांडेन.. तुर्तास बाई बाई Happy

नाही तर या ऋन्मेष पायी जाऊन मी त्या कार्टीला आजच्या आज दोन धपाटे घातले असते खरचं
>>>>

रिया मॅडम जाता जाता,
एका मुलीची साधारण चूक (रांगोळी पुसणे वगैरे) आहे तिला बिचारीला आपण मारू शकता म्हणून दोन धपाटे घालणे वगैरे...
आणि एका मुलाची तुलनेत नक्कीच मोठी चूक (गाडीची मोडतोड करून आर्थिक नुकसान) तो आणखी विध्वंसक होऊ शकतो म्हणून घाबरून त्याला धपाटे न घालता मांडवली करत मामला निपटवणे.

बघा यावर विचार करा, मग सावकाश बोलूच,
अर्थात आपली इच्छा असल्यास च Happy

मी सर्व उपाय वापरून सक्सेसफुल करून झालेत म्हणून आत्मविश्वासाने लिहितोय..
तरी घरून वा उद्या वेळ मिळाल्यास अनुभव सुद्धा नक्की मांडेन.. तुर्तास बाई बाई
>>>
एकदम ऑलराऊंडर बाई...असो भेटु उद्या...

जाउ द्या फक्त आपापल्या मुलांना वळण लावा. एकाचे बघुन दुसरे सुधरतील अशी अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे

ज्यांना गुंडगीरी शक्य आहे त्यांनी त्या मुलांना आणी वेळ पडली तर त्यांच्या आईबापांना असे ठोकुन काढावे की एक महीना घराच्या बाहेर पडता येणार नाही.

क्रुन्मेश - तू रिया आणी इतरांना चावी द्यायचा प्रयन्त करत असलास तर ठीक आहे. पण तसे नसले तर तुझ्या सोसायटीत पण अशीच पोरे असावित आणि त्यांनी तुझ्या गाडीची पार वाट लावावी असा माझा शाप आहे.

अवघड आहेत एकेक किस्से!
मला वाटते बेसिक मे लोचा आहे आपल्याकडे. पाल्याच्या सार्वजनिक वर्तनाची जबाबदारी पालकांची असते हे कुणीच मान्य करत नाही आहे.
मी अमेरिकेत राहते त्यामुळे तिथे राहणार्‍यांवर कमेन्ट करायचा हक्क नाही हे कळते. पण इथे हे एन्फोर्स कसे केले जाते ते सांगावेसे वाटते.
शाळेत अथवा डे केअर मधे मुलाने इतरांना कोणत्याही प्रकारे त्रास होईल असे वर्तन केल्यास परिणाम ठराविक असतात.
* प्रथम टीच्रर्स किंवा केअरगिव्हर्स मुलाला समज देणे इ. करतात. तरी वर्तन तसेच राहिल्यास घरी ईमेल/ फोन ने कळवले जाते. तसेच आधी वर्गातच वेगळे बसवणे, सुपरवायजर च्या किंवा स्कूल काउन्सेलर च्या ऑफिस मधे बसवणे, पालकांना फोन जाणे आणि मधली सुट्टी मिस होणे (डबा काउन्सेलर ऑफिस मधे खाणे) , मग प्रिन्सिपल ऑफीस मधे जाणे , प्रिन्न्सिपल ने पालकांना बोलावून घेणे , इन स्कूल सस्पेन्शन, तरी पुन्हा तसा प्रकार घडल्यास ताबडतोब पालकांना फोन करून मुलाला शाळेतून अर्ध्या तासाच्या आत घेऊन जायलाही सांगू शकतात. आणि वर अजून १ किंबा २ दिवस शाळेतून सस्पेन्शन हे सर्व टप्प्या टप्प्याने केले जाते. या सगळ्या प्रोसेस मधे ठराविक लिमिट पुढे मुलाला इन्सल्टिंग वगैरे बोलले जात नाही, अंगाला हात लावणे तर दूरच!
मुख्य म्हणजे या दरम्यान पालकांना सतत लेखी आणि फोन द्वारा नोटिसेस मिळतात. मुलाला गरज लागल्यास काउन्सेलर कडे घेऊन जाणे बिहेव्हियर इश्यूज असल्यास निदान करून उपचार करायला लावणे हे शाळा करायला लावते. तिथे तुम्हाला दुसरा ऑप्शनच नसतो !
तुमच्या मुलामुळे इतरांचे शिक्षण , सुरक्षितता धोक्यात येणे हे खपवून घेतले जात नाही. आता मुलाला घरी घेऊन जाणे, प्रिन्सिपल ने बोलावणे, १-२ दिवस घरी ठेवणे ही नाही म्हटले तरी पालकांना शिक्षा ठरतेच. कामे , नोकर्‍या सोडून हे सर्व करावेच लागते! शिवाय आमच्या मुलाने असे केलेच नसेल तुम्ही खोटे बोलताय असे म्हणाय्चा हक्क नसतो. शाळेचे ऑथोरिटीज जे सांग्तात ते ऐकून घ्यावेच लागते. त्यांना निर्णय घेण्याची ऑथोरिटी असते. त्याबद्दल तक्रार असल्यास थ्रु प्रॉपर चॅनल तक्रार नोंदवावी लागते. तो असे म्हणाला ती तसे म्हणाली असली बेसलेस अर्ग्युमेन्ट ग्राह्य धरली जात नाहीत !
तरी मुलाचे वागणे नाहीच बदलले आणि पालकांना त्यबद्दल काही अ‍ॅक्शन घ्यायचे नसेल तर "ही शाळा तुमच्यासाठी नाही" असे सांगण्यात येऊन शाळा मुलाला काढू शकते. मग तुम्ही स्पेशल नीड्स किड्स स्कूल मधे घाला, किंवा दुसर्‍या प्रायव्हेट स्कूलला घाला - पण दुसर्‍या ठिकाणी पण हे असेच नियम आणि अशीच प्रोसिजर असल्याने मुलाचे वागने बदल्त नाही तोवर पालकांची अक्षरशः कोंडी होते. नाहीतर होम स्कूलिंग करा! मग आले एका तरी पालकांचे घरी बसणे !!
एरव्ही शाळेबाहेर समाजात रिया म्हणते तसे काही केल्यास ते मालमत्तेची नासधून ( वॅन्डालिझम) म्हणून ट्रीट केले जाते. तिथे पुन्हा तसेच, शेजारी पोलिसात तक्रार करू शकतात ( शेजारी स्वतः मुलाला फार तर समजावून सांगतात, न ऐकल्यास मारणे तर राहोच पण दुसर्‍याच्या मुलाच्या अंगाला हात लावणे, अपमानास्पद बोलणे हे पूर्णपणे आउट ऑफ क्वेस्चन असते ) आणि पोलिस पण या तक्रारीची १००% वेळा दखल घेतात. तुम्ही (पालकांनी) योग्य ती अ‍ॅक्शन घ्यावीच लागते !
विशेष्तः दुसर्‍याच्या प्रोपर्टीची कितीही लहान असली तरी नासधूस चालवून घेतली जात नाही. तुमच्या नावावर क्रिमिनल मिसडिमिनर लागू शकते. असले चार्जेस आप्ल्या रेकॉर्ड वर कुणीही अ‍ॅफोर्ड करू शकत नाही कारण तुमच्या बॅकग्राउअंड चेक वर ते दिसते! उदा. तुम्ही जॉब ला अप्प्लाय करताय . तिथे असले काही बॅकग्राउंड चेक मधे दिसले तर जॉब मिळणे अवघड होऊन बसते!
** थोडक्यात काय तर पालकांना या मॅटर कडे लक्ष देणे ही पहिली प्रायॉरिटी होऊन बसते, तोवर नेहमीचे ऑफीस इ. रेग्युलर लाइफ इ. पण शक्य होत नाही! अशा प्रकारे एन्फोर्स केल्यास आप्ल्या पोरांना कन्ट्रोल करण्यावाचून प्र्यायच नसतो !

Maitreyi - systems in us are much better than in india, coz we dont hv such systems we hv to hv such reactions.

Waiting for that day when indian systems will be this good

.

अमेरिकेत सिस्टिम वगैरे चांगली आहे हे खरं पण इथे मुलाला राग आला, तो गेला शाळेत/कॉलेजमध्ये आणि आला दिसेल त्याला गोळ्या घालून (किंवा मग शेवटी स्वतःला गोळया घालून घेतल्या) असं(ही) होतं. गन कंट्रोलची मागणी होते पण आजकाल ही मुलं सुर्‍या घेऊन भोसकतात वगैरे. त्यांना गनच हवी असं नाही. मुळात ही वृत्ती सुधारेल कधी हा प्रश्न आहे.
एका वे.व्हर्जिनियातल्या गावात दोन षोडशवर्षिय मुलींनी मिळून आपल्या तिसर्‍या मैत्रिणीची हत्या केली तिला भोसकून किचनमधल्या सुर्‍यांनी. का तर म्हणे ती आम्हाला आवडत नव्हती. आता दोघी जेलमध्ये आहेत. त्यातली एक गुन्हेगार मुलगी सी.एस.आय. नामक क्राईम शोची फॅन होती.
एक कॅलीमध्ये सुर्‍याने भोसकून व गोळ्या घालून मुलामुलींना ठार मारणारा मुलगा होता त्यावर मानसोपचार सुरु होते. पण त्याच्यावर उपचार करणार्‍यालाही कळलं नाही हा असली स्टेप घेईल आणि त्या उपचारांचा काही फायदाही झाला नाही.

इथे मुलाला राग आला, तो गेला शाळेत/कॉलेजमध्ये आणि आला दिसेल त्याला गोळ्या घालून (किंवा मग शेवटी स्वतःला गोळया घालून घेतल्या) असं(ही) होतं. >>> कुणी तरी हे लिहील असे वाटलेच होते Happy पण असे माथेफिरू मंडळी कुठेही अपवादाने असतातच. उगीच उठून प्रत्येक शाळेत या घटना घडत नसतात. सगळेच काही सूत नसतात हे खरे . इथे कायद्याने लोकांना गन बाळगता येते . तिथे भारतात गन नसेल सहजी मिळत पण अशी माथेफिरू मुले तिथेही असतातच की, तिथे अ‍ॅसिड फेकतात, जाळतात, सुरीने भोसकतात !! त्यामुळे कधीतरी होणारे गोळीबार वगैरे घटना आणि रोजच्या आयुष्यातली शिस्त आणि सामाजिक बांधिलकी याची सरमिसळ नको !

Pages