संगीत समारोह ध्वनिमुद्रित करताना ध्वनिमुद्रणाचा दर्जा कसा सांभाळावा ?

Submitted by षड्जपंचम on 21 October, 2014 - 06:00

संगीत समारोह ध्वनिमुद्रित करताना ध्वनि मुद्रणाचा दर्जा कसा सांभाळावा कुणी सांगू शकेल का? मुख्यत: एखाद्या मोठ्या सभागृहात बर्याच वेळा गाणे किंवा वाद्यवादनाशिवाय इतर आवाज येतात … तसेच आवाज घुमतो आणि रेकॉर्डिंग खराब होते.

professional पद्धतीने हे कसे केले जाते तेही सांगावे ……

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गायकाच्या / कलाकाराच्या परवानगीने होत असेल तर थेट स्टेजवर माईक ठेवून करतात. पण तशी परवानगी नसेल तर करणे योग्य नव्हे.
मी जयमाला शिलेदार यांचे गायन त्यांच्या परवानगीने जून्या काळच्या कॅसेट रेकॉर्डर वर रेकॉर्ड केले होते. मी पहिल्याच रांगेत होतो. ते बरे झाले होते पण प्रेक्षकांच्या खोकल्याचे, कुजबूजीचे आवाज रेकॉर्ड झाले होते.
इव्हन लाईव्ह रेकॉर्डींगच्या सिडीज निघतात त्यातही असे आवाज येतच असतात.

स्टुडीयो मधल्या रेकॉर्डींगची सर त्याला येत नाही. पण आता नव्याने शास्त्रीय गायन वादनाच्या सिडीज बाजारात येतच नाहीत. अगदी र्‍हीदम हाऊसमधेही जून्याच सिडीज दिसत असतात.

षड्जपंचम - कार्यक्रमासाठी मिक्सर वापरत असाल ना? प्रोफेशनल रेकॉर्डिंग मधे अशा वेळी मिक्सरचा एक आउटपुट थेट रेकॉर्डिंग डिव्हाइस ला देतात (गायकालाच ते हवे असल्यास साउंड वर बसणार्‍या माणसाला सांगणे सोपे जाईल). लॅपटॉप वर असे रेकॉर्डिंग करायचे सॉफ्टवेअर मिळते आणि ते वापरायला बरेच सोपे असते. हल्ली बर्याच ठिकाणीतर व्हिडिओ रेकॉर्डिंवर नंतर असा रेकॉर्ड केलेला ऑडिओ ट्रॅक नंतर ओव्हरलॅप करतात.

शंभर हर्टझपेक्षा कमी फ्रिक्वन्सी तुमचा मायक्रोफोन घेतो का ?थोडक्यात रेकॉर्डीँगचा माईक सर्वात कमी किती फ्रि० घेणारा आहे ?

संगीत समारोह आहे म्हणजे तिथे चांगल्या प्रकारची ध्वनीवर्धन (अँप्लिफायर) यंत्रणा नक्कीच असणार...त्यांच्याशी बोलून त्यांच्या यंत्रणेतून तुम्हाला ऑडिओ आउटपुट मिळवता येईल..जे तुम्ही तुमच्या ध्वनीमुद्रण यंत्रणेच्या लाईन इनपुटमध्ये द्या...उत्तम ध्वनीमुद्रण होईल.
थेट ध्वनीमुद्रण करणार असाल तर युनिडायरेक्शनल माईक वापरा...ह्याचा गेनही जास्त असतो....गायक-वादकांच्या समोर अशा अंतरावर ठेवा की गायकाच्या गळ्यातून निघणारा लहानात लहान आवाजही तो टिपू शकेल....माईकचा गेन तुम्ही तुमच्या ध्वनीमुद्रण यंत्रणेमार्फत कमीजास्त करू शकाल.