Submitted by सायु on 17 October, 2014 - 03:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१/२ की. मटकी
लवंग ६ ते ७
मीठ अंदाजे
तेल मोहन आणि तळण्यासाठी.
क्रमवार पाककृती:
मटकी ची शेव खुपच खमंग लागते.. यी दिवाळीत जरा वेगळा प्रकार म्हणुन नक्की करुन बघा!
तर, १/२ की मटकी निवडुन गिरणी वरुन दळुन आणावी..
त्यात ६ ते ७ लवंगा मिक्सर मधुन बारिक गिरवुन त्याची पुड घाला.(पुड चाळणीने चाळुन घ्या)
मिठ आणि मोहन अंदाजाने घाला.. नेहमी शेवे साठी भिजवतो तसेच भिजवुनतुम्हाला हवी त्या (बारिक, जाड) साच्यातुन काढुन मंद आचेवर तळा.. थंड झाली की बंद डब्यात भरुन ठेवा...
अधिक टिपा:
लवंगीचे प्रमाण आपल्या आवडी नुसार कमी जास्त करता येतं, हळद घालु नका..
एकदा करुन पहा... खुप रुचकर प्रकार आहे... लहान मुलांना पण खुप आवडते..
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटो मात्र १ . २ दिवसानी...
फोटो मात्र १ . २ दिवसानी...
अरे वा छान ग सायली. मिक्सरवर
अरे वा छान ग सायली.
मिक्सरवर वाटली तर चालेल का मटकी? अर्धा किलो आमच्याकाडे गिरणीत नाही दळून मिळत.
एकदाच खाल्ला होता हा प्रकार,
एकदाच खाल्ला होता हा प्रकार, छान कुरकुरीत लागतो. पण मला वाटतं त्यात मटकीची डाळ वापरली होती.
मिक्सरवर वाटली तर चालेल का
मिक्सरवर वाटली तर चालेल का मटकी? अर्धा किलो आमच्याकाडे गिरणीत नाही दळून मिळत.
>>
+११११११११
जागूतै, बहुदा आपल्याला चाळून बिळून घेत बसावं लागेल मग ते भरड
जागू रीया - एक किलो दलून
जागू रीया - एक किलो दलून आणावी व दोघींनी वाटून घ्यावी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गुजरातेत ह्याच्या कुरकुरीत पुर्या करतात.. लग्न कार्यात तर ड्रमभर करतात . ह्या पुर्या फार छान लागतात तशीच ही शेव लागेल, ते तुझ्याकडेच खाल्ल्यावर सांगेन
आपल्याकडे मटकीचा उसळ, मिसळ व
आपल्याकडे मटकीचा उसळ, मिसळ व वडाभातातले वडे यापेक्षा फार वापर होत नाही. मटकीचा खाकरा पण छान होतो.
धन्यवाद सगळ्याचे... जागु
धन्यवाद सगळ्याचे...:)
जागु गिरणी मधुन दळुनच आण, मिक्सर चा प्रयोग मी केला नाहीये ग... मंजु ताईची कल्पना पण मस्तच आहे..:)
पुर्या आणि खाकरा खरच छानच लागतो... मंजु ताई आपल्याकडे (नागपूरला) जामनगरी आणि भावनगरी मधे मीळतो
मटकीचा खाकरा....
मंजूतै, आम्ही दोघी
मंजूतै, आम्ही दोघी दूऊऊऊऊऊऊऊऊओर दूऊऊऊऊऊऊऊर रहातो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
जागुतै कडून पिठ आणायला जाण्यापेक्षा तेवढ्या वेळात आणि पैश्यात मी सायलीकडे जाऊन शेव खाऊन येईन
रिया आणि मंजु ताई... मोस्ट
रिया आणि मंजु ताई... मोस्ट वेलकम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेव संपले नसतील तर एक फोटो
शेव संपले नसतील तर एक फोटो डकवा ना इथे प्लीज.
बी... शेव केलीच नाहीये अजुन
बी... शेव केलीच नाहीये अजुन
म्हणुन तर लिहिलय की फोटो १, २ दिवसात.... ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मग अगदी स्टेप स्टेप फोटो
मग अगदी स्टेप स्टेप फोटो काढून ठेव आणि नंतर फोटो टाक.
येस सर...
येस सर...:)
धन्स मॅम
धन्स मॅम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या माहेरी आमच्या पटेल
माझ्या माहेरी आमच्या पटेल काकुन्च्या कडे याच्या पुर्या खाल्ल्यात. एकदम झक्कास लागतात. त्यानी तीळ ओवा घातलाच होता त्यात.
सायली कृती मस्त आहे, पण पटेल काकुनी त्यात थोडी मठाची डाळ पण घालायला सान्गीतली होती. म्हणजे किलोला आतपाव वगैरे. माझ्या मैत्रिणीला त्यच्या पुर्या पण खायला दिल्या. त्या खाऊन तिच्या अन्गात सुगरण शिरली. ती लगेच उड्या मारत बाजारात गेली. मटकी दळुन आणली पण जेव्हा तिखट मीठ ओवा वगैरे घातले तेव्हा पीठ चिकट चिकट होत गेले. घाल पाणी, घाल पीठ असा प्रयोग झाला. पुर्या झाल्या की नाही हे तिने सान्गीतले नाही. पण तिला नन्तर कळले की मटकी आणी मठ धुवुन सुकवुन मग पीठ करायचे असते.
तर कहाणी सम्पली आता पुण्यात गेले की कान्ताबेनला हाका मारुन बघते. माझी जाण्याची वेळ आणी कान्ताबेनची दुकान बन्द करायची वेळ नेहेमीच एकच असते.:फिदी:
शेव मात्र सुरेख लागते. नासिकला खाल्ली होती. दुकान बन्द पडले ते आता. घरगुती होते.:अरेरे:
रश्मी छान लिहितेस ग! माझ्या
रश्मी छान लिहितेस ग!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या माहेरी आमचा शेजार म्हणजे, पटेल, शाहा आणि मेहता असाच होता.. त्यामुळे गुजराथी लोकांवर माझ जास्त प्रेम... खुप प्रेमळ आणि गोड स्वभावाची लोकं असतात ही.. माझ्या सगळ्या मैत्रीणी गुजराथी आणि मारवाडीच होत्या.. त्यामुळे त्यांचे सगळे पदार्थे आपोआपच आवडायला लागलेत...आणि त्यांना आपले मराठमोळे म्हणजे पातळभाजी, कढी, वडा, पुरण वगैरे.... सगळ्या निपुण आहेत महाराष्ट्रीयन थाळीत.. मी त्यांच्या सोबत गरबा खेळायची आणि त्या आमच्या कडे हळदी कुंकाला नऊवारी आणि नथ वगैरे घालायच्या... मस्त दिवस होते ते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शिवाय माझे काका २५ वर्षापासुन साबरमतीला असतात, त्यामुळे लहान पणी दर उन्हाळ्यात गुजराथ मधेच...(सॉरी अवांतर लिहिल्या बद्द्ल)
(सॉरी अवांतर लिहिल्या
(सॉरी अवांतर लिहिल्या बद्द्ल)>> अवा.न्तर नाहि हे! छान आहे क्रुती, मठाच्या पुर्या छान होतात.म्हणजे गहु दळताना त्यात मठ घालुन दळायचे मग घट्ट भिजवुन पुर्या करायच्या..कडक होतात, छान राहतात.
प्रमाण माहित नाही!
धन्यवाद प्राजक्ता..
धन्यवाद प्राजक्ता..:)
मटकी नुसतीच भाजून दळायचीय की
मटकी नुसतीच भाजून दळायचीय की धुवून सुकवून भाजून मग दळायचीय?
लवकर सांगा.
भाजायची पण नाही आणि धुवायची
भाजायची पण नाही आणि धुवायची पण नाही. नुसतीच निवडुन दळुन आणा.
बघते. आज रात्री करते आणि
बघते.
आज रात्री करते आणि सांगते कशी झाली ते.
नक्की करुन बघा आणि फोटो
नक्की करुन बघा आणि फोटो टाकायला विसरु नका...:)
मटकीचे तयार पीठ मिळते का?
मटकीचे तयार पीठ मिळते का?
बहुतेक नाही. म्हणजे मी तरी
बहुतेक नाही. म्हणजे मी तरी अजुन नाही पाहिलय...
छान रेसिपी मटकीचे तयार पीठ
छान रेसिपी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मटकीचे तयार पीठ मिळते का?>> चितळेंची तयार मटकी शेव मिळते.मस्त असते ती
त्या खाऊन तिच्या अन्गात सुगरण
त्या खाऊन तिच्या अन्गात सुगरण शिरली. >>> हाहाहा
मठाची डाळ म्हणजे काय?
मठाची डाळ म्हणजे काय?
कधी खाल्ली नाही मटकीची शेव.
कधी खाल्ली नाही मटकीची शेव. मठ म्हणजे मसूर असावेत.
मठ म्हणजेच मटकी ना? सायली तु
मठ म्हणजेच मटकी ना? सायली तु आख्खई मटकी घेतेस की त्याची डाळ? रश्मी म्हणते तशी चिकट होते का?
मठ म्हणजेच मटकी ना>>>> मीही
मठ म्हणजेच मटकी ना>>>> मीही अजूनपर्यंत तेच समजत होते.
Pages