मटकी ची शेव (फोटो सहित)

Submitted by सायु on 17 October, 2014 - 03:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१/२ की. मटकी
लवंग ६ ते ७
मीठ अंदाजे
तेल मोहन आणि तळण्यासाठी.

क्रमवार पाककृती: 

मटकी ची शेव खुपच खमंग लागते.. यी दिवाळीत जरा वेगळा प्रकार म्हणुन नक्की करुन बघा!

तर, १/२ की मटकी निवडुन गिरणी वरुन दळुन आणावी..
त्यात ६ ते ७ लवंगा मिक्सर मधुन बारिक गिरवुन त्याची पुड घाला.(पुड चाळणीने चाळुन घ्या)
मिठ आणि मोहन अंदाजाने घाला.. नेहमी शेवे साठी भिजवतो तसेच भिजवुनतुम्हाला हवी त्या (बारिक, जाड) साच्यातुन काढुन मंद आचेवर तळा.. थंड झाली की बंद डब्यात भरुन ठेवा...

अधिक टिपा: 

लवंगीचे प्रमाण आपल्या आवडी नुसार कमी जास्त करता येतं, हळद घालु नका..
एकदा करुन पहा... खुप रुचकर प्रकार आहे... लहान मुलांना पण खुप आवडते..

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायली, काल केली ही शेव.
काय मस्तं चव आलीय.
नुसतं लवंग आणि मीठ घालून एखादा पदार्थं इतका रुचकर बनू शकतो हे पहिल्यांदाच पाहिलं.
मटकीचा हा उपयोग माहितीच नव्हता.
फोटो अपलोड करता येत नाहीयेत.
शेवेचा कलर ब्राऊन आलाय. असाच येतो ना?
या रेसिपीबद्दल अनेकानेक धन्यवाद!

सगळ्यांचे धन्यवाद...
साती करुन पाहिलस खुप आनंद झाला..शेव जास्त ब्राउन नको. मी फोटो टाकते आहे आज.

स्वाती करुन पाहायला हतकत नाहीये...केल्यावर आम्हाला पण सांग कशी झाली ते...
हो मामी.. अगदी बरोबर..

इंदोरला पण स्पेशली बनवतात. आमच्याकडॅ बडीशेप, लवंग आणी पादेलोण घालतात.
खाताना ह्या शेवेवर बार्र्रीक्क्क्क्क चिरलेला कांदा, कोथैंबीर. मग एक कप गरम चहा. स्वर्गात जायचा अवकाश. Happy

हे घ्या फोटो... शनिवारी घरी गेली तेव्हा आईनी शेव करुन डब्यात भरुन ठेवली होती... पण लकीली पीठ ठेवल होत,तुम्हा सगळ्यांना फोटो दाखवायचे होते म्हणुन एका उभ्या पेल्याची शेव परत केली...

m0.jpgm1.jpgm2.jpgm3.jpgm4.jpg

सायली मस्त, छान आहे.

माझी आई बडोद्याची असल्याने मठाच्या पुऱ्या आमच्याकडे बऱ्याचदा व्हायच्या. हल्लीच काही वर्षे नाही झाल्यात.

मी आईला विचारले की आपण 'मठिया' कसे करायचो.

मटकीची डाळ बाजारात मिळते, ती दळून आणून त्याच्या पुर्‍या करायचो. पुर्‍या लाटल्यावर लगेच तळायच्या नाहीत थोडा वेळ वाळवायच्या(पंख्याखाली) मग तळायच्या.

मटकी आणि मठ हे वेगवेगळे आहेत काय? वरच्या काही प्रतिसादांवरुन तसे वाटतेय.

मलाही आवडेल मटकीची शेव करायला. करुन पाहिन. माझ्याकडे जाते आहे त्यामुळॅ पाव अर्धा किलो दळायची चिंता नाही Happy

रेसिपी वाचली होती, चांगला, नवीन प्रकार वाटला पण करण्याचा अजिबात विचार नव्हता... पण सातीने केल्याचे व छान झाल्याचे वाचून अंगात अन्नपूर्णा संचारली अन करुनच सोडली ती ....आपली शेव हो .....मटकीची Happy छान कुरकुरीत झाली... image_11.jpg

सगळ्याचे धन्यवाद..
मंजु ताई केलीस आणि आवडली पण ना! छान.. फोटो पण मस्त.
अन्जु ताई धन्यवाद. उलगडा केलात.. आणि 'मठिया' ची पा. कृ. सांगीतल्या बद्द्ल

अंजू - मला आठवतंच नव्हत त्या पुर्यांना 'मठीया' म्हणतात ते. माझे काका (हयात नाही) अहमदाबादला स्थायीक झाले. चुलतभावाच्या लग्नात ड्रमभर केल्या होत्या. एकतर ठेवायला खूप जागा लागते अन समोर ठेवल्या की खावाश्याच वाटतात ... कंट्रोल करना मुश्कील ......

साती- मला कित्ती आनंद झाला .... काय सांगू .... शाबासकी मिलाल्या च्या आनंदाची डीग्री वयानुरुप वाढत जाते का?

अहो, आम्ही मंजूताईंच्या रेसिप्या वाचून बर्याच पाकृ शिकतो, कधीतरी त्यांनी आपल्यापासून प्रेरणा घेतली की आनंद होतोच ना!
Happy

Pages