भारताला जर अमेरिकेसारखे प्रगत राष्ट्र व्हायचे असेल तर आधी अमेरिकेसारखी ५१ राज्ये झाली पाहिजेत.
२९ राज्यांनी काही होत नाही किमान ५२ तरी हवीतंच. तेच प्रगतीचं लक्षण आहे. न्यू जर्सी हे तर भारतीय राज्य आहेच ते फक्त भारत केंद्रशासित होण्याचा ऊशीर आहे. अशीच राज्ये युके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया देशात वेगळी काढून दिली पाहिजेत.
ईथल्या स्थानिक भारतीय लोकांचे प्रॉब्लेम अमेरिकन, ब्रिटिश, कनैडियन सरकारला कळ्त नाहीत. ते निवारण्यासाठी त्यांच्याकडे ईच्छाशक्तीही नाही. शिवाय भाषावार प्रांतरचनेनुसार न्यूजर्सी (गुजराथी), कॅनडा (पंजाबी) असे नियमाला धरूनही आहे. भारतीय लोक विदेशी सरकारला बिलियन डॉलर्सचा महसूल गोळा करून देतात पण, व्हिजा न मिळाल्याने, नोकर्यांचा दुस्काळ पडल्याने,रिसेशनमुळे आत्महत्त्या करण्याचे, परतोनी पाहण्याचे प्रमाणही मोठे आहे आणि अश्यां कुटुंबांना विदेशी सरकार पॅकेजही देत नाही. इन्फोसिस, टीसीएस सारख्या भांडवलदार कंपन्यांची त्यांच्या एम्लॉईशी अरेरावी, स्थानिक रक्तपिपासू कन्स्ल्टिंग कंपन्या, भारतीय मदरलँड मधल्या भारतीयांना आमच्या प्रती असलेला तिरस्कार, लहान सहान कामांसाठी भारतीय वकीलातीत खेटे मारून झिजणारे महागडे शूज, एनजे ट्रांझिट मधली प्रचंड गर्दी, अरे आहे का कोणी अश्या भारतीयांच्या दु:खाला वाचा फोडणरा?.
'कुठे नेऊन ठेवलाय विदेशी भारतीय माझा'
आमच्यासारख्यांना विदेशी सरकार दफ्तरी कोणी भावही देत नाहीत. तसेच बीएमएम ते इंग्लिश सत्यनारायण अशी एक युनिक संस्कृतीही आहे आमच्या ह्या विदेशातल्या भारतीय राज्यांना. दरवर्षी जगातल्या ईतर देशांमधून येणार्या लोंढ्यांनी भारतीयांच्या हक्काच्या आयटीतल्या नोकर्यांवर गदा आणायला सुरूवात केली आहे, खासकरून चायनीज, जापनीज, तर अश्या लोकांपासून आमच्या नोकर्या वाचवणारा, आमचा कैवार घेणारा एकही 'राज ठाकरे' ह्या विदेशी भूमीतल्या भारतीय राज्यांना असू नये हे फार मोठे दुर्देव आहे. ह्या राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीचा जोर वाढत आहे आणि विदेशी सरकारे व्हिजा एक्स्टेंशन रिजेक्ट करून, टॅक्स वाढवून, इंश्यूरन्स महाग करून ह्या आस्मानी संकटावर सुलतानीही लादत आहे. अंतराळात भरारी मारणार्या अंतराळवीरांचा वारसा चालवणार्यां आमची काळजी आज विदेशातल्या वा भारतातल्या कुठल्याही नेत्याला नाही.
ह्या निराशेमुळे, विदेशातल्या भारतीय राज्यांतील नागरिकांचा म्हणावा तेवढा विकास झाला नाही. त्यांची प्रगती खुंटली आहे. म्हणून पुढच्या ईलेक्षन मध्ये जी पार्टी अशी विदेशी भुमीवरची भारतीय राज्ये भारताला संलग्न करून घेण्याची घोषणा करेल त्यालाच सगळ्या विदेशी भारतीयांनी मत द्यावे ही माझी कळकळीची विनंती.
ह्या विषयाबद्दल तुमची मते खेळीमेळीने व्यक्त करावीत. ऊगीच भारतीय विरुद्ध अभारतीय असा वाद घालू नये. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा हातावेगळा झाला की हाच मुद्दा ऐरणीवर आणायचा आहे.
अबकी बार विदेशी भारतीय नेता की सरकार!!!
(No subject)
दंडकारण्यातील बजरंगा भलत्याच
दंडकारण्यातील बजरंगा भलत्याच अपेक्षा करू नको
ह्या राज्यातील राश्ट्रीय
ह्या राज्यातील
राश्ट्रीय पदार्थ : दीपचे फ्रोजन सामोसे
राजधानी : आपरो अॅडिसन
मिनिस्टर फॉर इमोशनल सिक्युरीटी: करणभाई जोहर
लेख नि अमांचा प्रतिसाद ..
लेख नि अमांचा प्रतिसाद ..
जय सिरीक्रिस्ना .. अगदी
जय सिरीक्रिस्ना .. अगदी अगदी...
शिवाय मोलाकरणीला पगार कमी दिला की म्यानहटनात स्ट्रीप सर्च नाही की, ओक (ट्री) रस्त्यावर वडापाव खात भलतीकडून गाडी घातल्यावर अदेशी माणसांचे लुक्स नाही (असंही लक्ष कोण देतंय). .. ब्लडी विदेसी.
आवजू
छे छे! उलट तुम्ही तिथे जाऊन
छे छे! उलट तुम्ही तिथे जाऊन तिथल्या अमेरिकन भावाभावांमध्ये काडया घालायच्या म्हणजे अमेरिकेचेच वेगळं इस्ट कोस्ट, वेगळं वेस्ट कोस्ट वेगळा मिडवेस्ट वेगळं साऊथ-वेस्ट असे तुकडे पाडण्यासाठी तेच लोक आपापसात भांडत बसतील. तरच तुम्ही (शहेन) शाह!
हॅरे रॅमा , हॅरे ख्रिष्ना....
हॅरे रॅमा , हॅरे ख्रिष्ना....
माझ्या पुण्यातल्या फ्लॅट ला
माझ्या पुण्यातल्या फ्लॅट ला अमेरिकेनी आपले एक्कावन्नावे राज्य मानावे म्हणुन मी कीती नवस बोललो आहे. कोणी पावतच नाही
भारतातल्या प्रत्येक
भारतातल्या प्रत्येक राज्यासाठी विदेशात एक वेगळे राज्य केले पाहिजे खरे
गुजरात्यांसाठी अमेरिकीचा पूर्व किनारा
तेलगुंसाठी अमेरिकेचा पश्चिम किनारा
पंजाब्यांसाठी कॅनडा
गोवेकरांसाठी ब्राझील
केरळींसाठी दुबई
तमिळांसाठी सिंगापूर
कोकणकरांसाठी कॅरेबियन
बंगाल्यांसाठी कम्युनिस्ट चायना
हरियानासाठी ईराण
युपी बिहारींसाठी क्युबा व्हिएतनाम
काश्मिरिंसाठी वरती आईसलँड किंवा ऊत्तर ध्रुवाजवळ कुठेतरी (त्यांना एवढा त्रास आहे की खुषीने जातील ऊत्तर ध्रुवाजवळ)
राजस्थानींसाठी सहारा वाळवंटात कुठेतरी
आसाम मणिपूर मिझोराम वगैरे नॉर्थईस्ट राज्यांसाठी फिलिपिन्स कोरिया जापान
दिल्लीसाठी युके
विभाजनवादी, फुटिरतावादी आणि वेगळ्या मुस्लिम स्टेट्साठी आग्रह धरणार्यांना आहे ईस्रायल
आणि
महाराष्ट्रीयांसाठी स्वित्झर्लँड
आणि हो
मायबोलीवरच्यांचा भांडकुदळपणा बघता त्यांच्यासाठी गाझापट्टीजवळ कुठेतरी एक वेगळे राज्य तयार केले पाहिजे.
किती झाले आता एकूण स्टेट्स ?
देशाबाहेर कशाला जायच ? लहान
देशाबाहेर कशाला जायच ? लहान लहान राज्ये बनविण्यासाठी भाजप तयारच आहे.
भारताची ५१ राज्ये बनविण्यास कितीसा वेळ लागेल ?
पण ५१ राज्ये संप्प्नतेचे प्रतिक हे नक्की करा.
भारताची ५१ राज्ये बनविण्यास
भारताची ५१ राज्ये बनविण्यास कितीसा वेळ लागेल ?
पण ५१ राज्ये संप्प्नतेचे प्रतिक हे नक्की करा
>>>>>>
@निचं - हे माझ्यासाठी आहे काय?
मी माझ्या फ्लॅट ला "अमेरिकेचे" एक्कवन्नवे राज्य बनवा असे म्हणले होते.
भारताची ५१ काय ५१० राज्य बनली तरी फार काय चांगले होणार नाही.
गुजराथ्यांसाठी युगांडा,
गुजराथ्यांसाठी युगांडा, केनया, साऊथ आफ्रिका... व मराठी लोकांसाठी नायजेरिया / ओमान, बिहारी लोकांसाठी मॉरिशियस... यांना वगळल्याबद्दल णिषेढ !
चंद्र व मंगळ इथंही सहज आठ
चंद्र व मंगळ इथंही सहज आठ -दहा आपलीं राज्यं होतीलच !!
आधिच मर्कट, त्यात सुटिचे
आधिच मर्कट, त्यात सुटिचे सकाळीच मद्य प्यायला!
पण आज तर ड्राय डे आहे
पण आज तर ड्राय डे आहे
पण असे केल्यास एक लोचा होईल,
पण असे केल्यास एक लोचा होईल, तेथील विदेशी लोक मग अल्पसंख्यांक म्हणून गणले जातील आणि सोयी-सवलती पुन्हा तेच मिळवतील.
रॉबीनहूड: आम्हाला जर्मनीमधे
रॉबीनहूड: आम्हाला जर्मनीमधे ISCON फेस्टिवल पाहायला मिळाला होता, त्यात जर्मन लोक "हरे रामा हरे कृष्णा " म्हणून नाचत होते.
जमीन खोदून प्रत्येक राज्याला
जमीन खोदून प्रत्येक राज्याला समांतर राज्ये निर्मीण्याचे नवनिर्माण केले पाहिजे.
असली समांतर राज्ये साधारणपणे प्रूथ्वीच्या गाभ्यापर्यंत निर्माण केली जावू शकतात. गाभा वितळवून त्याचा उपयोग उर्जा निर्मीतीसाठी केला जावू शकतो. त्यानंतर तेथून एक लांब टनेल टाकून दुसर्या देशातील आपापल्या राज्यांत आंतरराज्यराष्ट्रीय रेल्वे चालू केली जावू शकते.
(No subject)
पाषाणभेद, कसली पाताळयंत्री
पाषाणभेद,
कसली पाताळयंत्री योजना बनवली आहे.
त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला पाताळमंत्री बोलू शकतो.
तसेही वर धरतीवर सारे वाचाळ मंत्री आहेतच.
............... ओके मला एक
............... ओके मला एक प्रतिक्रिया द्यायची आहे............................ नाही मला फक्त हसूच येतय ..................................... :D:P:D
(No subject)
पाषाणभेद, कसली पाताळयंत्री
पाषाणभेद,
कसली पाताळयंत्री योजना बनवली आहे.
@ टोच्या, @निचं - हे
@ टोच्या, @निचं - हे माझ्यासाठी आहे काय? नक्कीच नाही. मी आपल वाक्य वाचल नव्हत
जबरी पाताळयंत्री योजना >>>
जबरी
पाताळयंत्री योजना >>>
अमा - तुमच्या तीन्ही कॅटेगरीज धमाल आहेत.
छान
छान