'डॉ. प्रकाश बाबा आमटे, द रियल हिरो'
एक उत्कट हळवां अनुभव…
ज्यांच्या नावातच ' प्रकाश ' आहे , त्यांना पाहतानां ' आपण कोठे आहोत ', याची होणारी जाणीव बहुदा आपल्या प्रत्येकालाच परत शून्यावर नेवून ठेवते.
'आपल्याला नक्की काय हवयं ' किंवा ' आपण आयुष्यात नक्की काय करतोय ', अशा एक ना अनेक प्रश्नांनी अंतर्मुख करायला लावणारी हि एक वास्तव कलाकृती.
' माणुसकी ', 'त्याग ', 'समर्पण ', 'नि :स्वार्थता ', 'व्रत ' यासारख्या आपल्या ओळखीच्याच शब्दांचे इथे सापडलेले नवीन अर्थ, जे कदाचित आजवर आपण अनुभवलेच नाहीत …
' इतक्या विरक्तीने राहूनही एवढं श्रीमंत बनता येतं ', या विचाराने उध्वस्थ करणारी जाणीव …
प्रत्येक नातं इतकं सुंदर जगता येतं … एक मुलगा म्हणून, मित्र म्हणून, डॉक्टर म्हणून, नवरा म्हणून, वडील म्हणून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 'एक माणूस ' म्हणून …
हा ' प्रकाश ' इतका तेजस्वी आहे कि त्याची सावलीसुधा तितक्याचं खंबीरपणे, विश्वासाने, त्याला साथ देऊ शकली.
चेहर् यावर नेहमीच ' मंद ' स्मित ठेवून काट्यातून चालतं , त्या रानांत रामाबरोबर सीतेसारखी राहू शकली आणि म्हणूनच आनंद कशात आहे , खरं तर 'आनंदच काय आहे ' याचं उत्तर फक्त तिलाच मिळालं …
४० वर्षांची हि इतकी निरागस सोबतं , कदाचित या नितळ प्रेमानेच हेमलकसा भरून पावलय …
हि स्वप्नवतं वाटणारी गोष्ट पाहत असतानां वाटतं , हि गोष्ट संपूच नये आणि ती संपते, अशा वळणावर जिथे आपण जागे होतो, आतून …. या आतल्या अंधारातून त्याच्या प्रकाशात !!!
आमटे परिवाराला साष्टांग
आमटे परिवाराला साष्टांग दंडवत.!
छान लिहीलयं. ऩ़क्की पहाणार.
खूप छान लिहीलयं!! ' आपण कोठे
खूप छान लिहीलयं!!
' आपण कोठे आहोत ', याची होणारी जाणीव बहुदा आपल्या प्रत्येकालाच परत शून्यावर नेवून ठेवते >> मस्त
surekh lihile aahe...
surekh lihile aahe...
चित्रपट बघणारच.
चित्रपट बघणारच. त्यांच्याबद्दल बरेच लेखन वाचलंय.. पण त्यात वर्णन केल्यापेक्षा ते मोठे आणि त्यांचे व्रत खडतर आहे, ते जाणवते.
अप्रतिम चित्रपट
अप्रतिम चित्रपट *************
मन्त्रमुग्ध ३ तास.....
ग्रेट ***********
एक धागा ओलरेडी आहे
एक धागा ओलरेडी आहे ना?
http://www.maayboli.com/node/51200
छान लिहिलयं, चित्रपट नक्कीच
छान लिहिलयं, चित्रपट नक्कीच पाहणार.
छान लिहिलय. हा सिनेमा नक्की
छान लिहिलय. हा सिनेमा नक्की बघणार आहे.
छान लिहिलय.विदाउट स्पॉयलर
छान लिहिलय.विदाउट स्पॉयलर .कमीत कमी एक आठवडा स्पॉयलर्स टाकु नका त्याने रसभंग होतो नव्याने चित्रपट पाहणारयांचा.
खरेच बघा सर्वांनी ...... हे
खरेच बघा सर्वांनी ...... हे मी अजूनही न बघताही महिन्याभरापूर्वीपासून सर्वांना सांगतोय.
मी .... मी तर बघणारच
छान लिहिलेय .. मनात विचारांचे तरंग हा चित्रपट उठवतो हेच यातून कळते .. अजून चार-चौदा लेख या चित्रपटावर वा त्या निमित्ताने लिहिले गेले तरी फारसे नवल वाटणार नाही.
अवांतर - एक प्रश्न - हा चित्रपट ईतर भाषांमध्ये निघाला आहे का? किमान देशभरात तरी सर्वांपर्यत पोहोचण्याची गरज!
प्रकाश बा आमटे , प्रत्यक्ष
प्रकाश बा आमटे , प्रत्यक्ष पाहिल्याचे समाधान आज मिळाले.
विकासाच्या गप्पा मारणार्यांना आणि सोसेल तेवढेच सोशल वर्क करणार्याना हे सही सही चपराक आहे..
संपुर्ण टीम चे खरच अभिनंदन आणि पुढच्या पिढीसाठी अमुल्य असा ठेवा दिल्याबद्दल आभार
धन्यवाद !!!
धन्यवाद !!!
बघितला बघितला आजच बघितला.
बघितला बघितला आजच बघितला. कौतुक करायला शब्दच नाहीत. अतिशय सुरेख सिनेमा