भारतीय न्यायव्यवस्थेची सध्याची स्थिति आणि अवस्था पाहता मन विषण्ण होते. संजय दत्त सारख्या राष्ट्रद्रोही गुंडाला शिक्षा व्हायला तब्बल 20 वर्षे लागली . या कालावधीत त्याने दोषी असूनही भरपूर पैसा कमावला आणि मौजमजा केली . सलमान खान देखील एकापेक्षा अधिक प्रकरणात दोषी असूनही 20 वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगाबाहेर आहे, आणि रग्गड पैसा कमवून "मज्जानु लाईफ " जगतो आहे. उद्या पैशाचा वापर करून ,साक्षीदार फोडून तो कदाचित निर्दोष ही सुटेल किंवा अतिशय मामुली शिक्षा होईलही ! पण त्यामुळे "न्याय"होईल असे वाटते का?
सध्याची न्यायव्यवस्था ही एक सर्कस किंवा पैशाचा खेळ बनली असून धनदांडग्यांच्या पैशाने ,सुस्त अन भ्रष्ट नोकरशाहीमुलळे आणि वेळखाऊ न्यायव्यवस्थे मुळे सामान्य मनुष्य या सर्कस मधला एक हतबल जोकर आहे ,असे मनोमन वाटून जाते.
यावर काही उपाय असू शकतो का?
पुराण काळात किंवा इतिहास काळात काही दाखले सापडतात . धर्मराजाने न्याय करताना तत्कालीन वर्णव्यवस्थे नुसार एकाच गुन्ह्यासाठी ब्राह्मण , क्षत्रीय ,वैश्य व शूद्र यांना वेगवेगळी शिक्षा दिली होती. आजच्या बदललेल्या सामाजिक परिस्थिथीत "आर्थिक उत्पन्न " या निकषावर आधारित न्यायव्यवस्था लागू करावी का?
उदाहरणार्थ -सलमानच्या खटल्यात गेल्या 20 वर्षापासून झालेला सरकारी खर्च ,कायद्यातीळ पळवाटा शोधून /साक्षीदार फोडून /वकिली काव्यांचा वापर करून ,कोर्टबाजीत आणि न्यायाप्रक्रियेत खर्च झालेला प्रचंड पैसा /वेळ आणि मनुष्यबळ ह्याचा विचार करता इतक्या वर्षांनंतर देखील फुटपाथ वर मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसाना काही नुकसान भरपाई मिळेल याची काडीचीही शाश्वती नाही. म्हणजे शेवटी त्यांना "न्याय"मिळणार नाहीच !
Justice delayed is justice denied ह्याचा विचार करता अशा प्रकरणात सलमान सारख्या गुंडाला त्याच वेळी (20 वर्षापूर्वी) अनावश्यक कोर्टबाजी टाळून जबर रकमेचा दंड (सुमारे 50 कोटी रुपये )आणि 1ते 3 वर्षाची कैद अशी शिक्षा दिली गेली असती (किंवा आताही दिली गेली )तर थोडाफार तरी "न्याय"होईल. कारण दंडाच्या रकमेतील अर्धी रक्कम मृतांच्या वारसाना आणि अर्धी रक्कम सरकारजमा करावी . आणि भविष्यातही आर्थिक निकषांवर शिक्षा देण्याच्या पद्धतीचा अवलंब करून न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार समूळ उपटून काढावा.
अर्थात प्रत्येक व्यवस्थेत काही फायदे /तोटे असतातच! या व्यवस्थेतही काही धोके असू शकतील . पण तरीही अशा प्रकरणात "न्याय"प्रस्थापित करण्याचा हा एक उपाय असू शकतो , असे माझे वैयक्तिक व प्रामाणिक मत आहे... चर्चा अपेक्षित !
साभार -: उडन खटोला . (पूर्वानुमतीने पुनर्प्रकाशित .)
व्यवस्था कशीहि असली तरी लोकच
व्यवस्था कशीहि असली तरी लोकच जर अतिस्वार्थी, अप्रामाणिक, असतील तर ते गैरफायदा करून घेण्याचा काही ना काही मार्ग शोधून काढतीलच.
शिवाय आप पर भावना, काही ना काही कारणाने दुसर्याचा द्वेष करणारा, कुठल्याहि व्यवस्थेतून निरपराधी माणसाला सुद्धा शिक्षा होईल असे करू शकतो.
सर्वच जण संत झाले तर अन्याय होणारच नाही आणि हे अशक्य.
तेंव्हा फक्त एकच निकष - जास्तीत जास्त लोक प्रामाणिक, नि:स्वार्थी झाले तरच व्यवस्था टिकेल नि उपयोगी पडेल नाहीतर व्यवस्था बदलून उपयोग नाही.
>> आणि भविष्यातही आर्थिक
>> आणि भविष्यातही आर्थिक निकषांवर शिक्षा देण्याच्या पद्धतीचा अवलंब करून न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार समूळ उपटून काढावा <<
छान. म्हणजे माझ्या ऐपतीप्रमाणे गुन्हा करायला मी मोकळा...
सलमान खानवर दारू पिऊन गाडी
सलमान खानवर दारू पिऊन गाडी चालविणे या शिवाय वेगळा गुन्हा लागू नये.
फुटपाथवर नागरिक झोपतात याचा गुन्हा तिथल्या महानगरपालिकेवर लागला पाहिजे. सार्वजनिक जागेचा कुणी खाजगी जागा म्हणून गैरवापर करत नाही ना हे पाहण्याचे काम त्यांचे आहे.
आणि माणसांना फुटपाथवर झोपायची वेळ यावी याचा गुन्हा देशाच्या सरकारवर लागला पाहिजे.
>>>धर्मराजाने न्याय
>>>धर्मराजाने न्याय करताना<<<
हा तोच धर्मराज का? ज्याच्या धाकट्या भावाने जिंकून आणलेल्या स्त्रीला आईच्या आज्ञेखातर 'नाईलाजास्तव' स्वतःसकट इतर सर्व सख्ख्या भावांच्या पत्नीचे पद बहाल करून मग तिला एखाद्या कमोडिटीप्रमाणे द्यूतातही लावले आणि चुलत भावंडांनी तिचे वस्त्रहरण सुरू केल्यावर मान खाली घातली?
ह्या धर्मराजाचा आदर्श ठेवायचा असेल तर सलमान आणि 'संजूबाबांची' मंदिरे उभारायला हवीत!
ऑ! बेफिकिर ? 'धर्म' बदलताय
ऑ! बेफिकिर ? 'धर्म' बदलताय की काय?
<<<छान. म्हणजे माझ्या
<<<छान. म्हणजे माझ्या ऐपतीप्रमाणे गुन्हा करायला मी मोकळा...>>>
मला वाटते की तुम्ही नेमका उलटा अर्थ घेतलाय. ज्याची ऐपत जास्त, ज्याचे अधिकार जास्त .. त्याला जास्त शिक्षा असा न्याय असला पाहिजे.
ज्याची ऐपत जास्त, त्याचे
ज्याची ऐपत जास्त, त्याचे अधिकार जास्त ..>>>>>>>> ईतरांचे माहीत नाही पण निदान भारतात ईनडायरेक्टली असाच न्याय असतो
बेफि, त्यांनी धर्मराजाचे
बेफि, त्यांनी धर्मराजाचे उदाहरण वेगळ्या मुद्द्याबाबत दिले आहे. भावनाओं को समझो !
विशेष सुचना :- रामराज्य
विशेष सुचना :-
रामराज्य महाभारत करुन आलेले आहे. आता सर्वत्र धर्मराज यांचे राज्य असणार आहे
महेश, >> त्यांनी धर्मराजाचे
महेश,
>> त्यांनी धर्मराजाचे उदाहरण वेगळ्या मुद्द्याबाबत दिले आहे.
सहमत. असाच न्याय आजच्या संसदीय लोकशाहीस लावून नेहरूंना व आंबेडकरांना दूषणे द्यावी का? हीच ती घटनेतली संसदीय लोकशाही का जिच्या निवडणुकांत भ्रष्टाचार होतो?
युधिष्ठिराचा त्या वर्तनाचा राजकर्तव्याशी थेट संबंध नाही.
आ.न.,
-गा.पै.
सलमान खानवर दारू पिऊन गाडी
सलमान खानवर दारू पिऊन गाडी चालविणे या शिवाय वेगळा गुन्हा लागू नये.
फुटपाथवर नागरिक झोपतात याचा गुन्हा तिथल्या महानगरपालिकेवर लागला पाहिजे. सार्वजनिक जागेचा कुणी खाजगी जागा म्हणून गैरवापर करत नाही ना हे पाहण्याचे काम त्यांचे आहे.
आणि माणसांना फुटपाथवर झोपायची वेळ यावी याचा गुन्हा देशाच्या सरकारवर लागला पाहिजे.
>> by this rule even Aishwrya rai should be made co-accused ,as her inability to accept his marriage proposal compelled heart-broken Salman to indulge in heavy drinking which inturn resulted in accident.
Like
Like
itha like la click kasa
itha like la click kasa karayacha ?
magshi marathi type hot hot hota ata na hi hot
दुकानराव, माबोवर लाईक वगैरे
दुकानराव, माबोवर लाईक वगैरे भानगड नाहीये. हे चेपु/थोपु (फेसबुक) नाही आहे लाईक करायला.
दुकानराव. लघुरुप
दुकानराव.
लघुरुप आवडले.
दुकान्या, तुला स्मायली जमली कारे
धन्यवाद लगो, हे कसे सुभानराव
धन्यवाद लगो, हे कसे सुभानराव सारखे वाटते ना
आभारी आहे स्वामीजी माझा लेख
आभारी आहे स्वामीजी माझा लेख इथे प्रकाशित केल्याबाबत
सर्व प्रतिसादकांचेही आभार