नेहेमीच मला नविन कुठल्यातरी उपयोगी उत्पादनांबद्दल सुचत असते. बहुतेक सगळे विचार नवर्याच्या कानापर्यंत पोचुन विरले जातात. मी "अरे, ऐक ना मला काहीतरी सुचलय.." असं म्हणाल्यावर तो प्रचंड वैतागत असणार. पण माझ्याकडे दुसरा श्रोता नसल्याने वैतागलेला श्रोताही चालवुन घेते. पुर्वी मी कुठल्यातरी मित्रमैत्रिणींना पकडुन माझ्या कल्पना ऐकवायचे.
फार पुर्वी माझी एक कल्पना होती की बिना ड्रायव्हरची गाडी असावी. तीला रस्ता फिड केला कि ती योग्य ठिकाणी आपोआप जावी वगैरे. नंतर काही वर्षांनी किमान प्रायोगिक तत्वांवर तरी अशी गाडी तयार झाली.
अजुन एक जुनी कल्पना होती त्यात थ्रीडी प्रोजेक्शन वापरुन व्यक्तीचा हॉलोग्राम कुठेही प्रोजेक्ट करता यावा. म्हणजे मग मिटिंग वगैरे साठी प्रत्यक्ष न जाताही समोरासमोर बोलण्याचा फायदा मिळेल. (व्हि.कॉ. पेक्षा चांगल्या प्रकारे) तेव्हा खरतर थ्रीडी वगरे इतके जोरात नव्हते. पण काही वर्षांपुर्वी हाही प्रयोग सफल झालाय.
अशा अनेक कल्पना असतात. त्यांना ठराविक एक विषय असा नसतो, या कल्पना सत्यात उतरण्यासाठी जे ज्ञान, भांडवल, स्किल लागेल ते माझ्याकडे नाही याची पुर्ण जाणीव असल्याने मी पुढे काहीच करत नाही. अशा कल्पना तुमच्याकडेही असतील. इथे या धाग्यावर त्या मांडाव्या असा माझा विचार आहे.
अशाच प्रकारची काही उत्पादने असतील आणि आपल्यालाच ती माहीत नसतील तर इतरांकडुन त्याचीही माहीती मिळेल. शिवाय कधी कुणी अशा उत्नादनांसाठी खरच प्रयत्न करुन बघितले तर अगदीच उत्तम.
या माझ्या काही कल्पना -
१.
मला लहान असताना असे वाटायचे की पाणबुडे पाण्यात जाताना ऑक्सिजन सिलिंडर
घेऊन जातात. त्याऐवजी पाण्यातलाच ऑक्सिजन काढुन घेत का नाहीत. यामुळे अमर्यादित सप्लाय मिळेल. आता असे काही उपलब्ध आहे की नाही माहीत नाही.
शिवाय आता अशा विघटनाला लागणारी उर्जा वगरे बर्याच गोष्टी मधे आहेत. पण प्रयोग करायला वाव आहे असे मला वाटते
२.
वॉशिंग मशिन जी मन्युअल आणि ऑटोमॅटीक दोन्ही मोड मधे चालते. म्हणजे पाणि नसेल तेव्हा मॅन्युअल मोड मधे चालवायची. एरवी ऑटो मधे. (अशी असल्यास प्लिज सांगा)
३.
लहान मुलांचे कपडे वाळत घालायचे स्टँड मिळतात त्याला असंख्य चिमटे असतात. कपडे वाळल्यावर एक एक चिमटा काढायचा खुप कंटाळा येतो. एकाच बटनात सगळे चिमटे उघडले तर?
४.
अशा काचा ज्या पारदर्शक असतील पण सोलार पॅनेल सारख्या काम करु शकतील. याचे तर असंख्य उपयोग आहेत.
५. अशा काचा ज्या हवा फिल्टर करुन आत पाठवतील. म्हणजे धुळ येणार नाही पण हवा येईल.
६.
घराची फरशी धुण्यासाठी एक मशिन. बाहेर मिळते ते ऑफिस योग्य मोठ्ठ्या आकाराचे असते. घरासाठी छोटे सोपे हवे. अजुन एक मिळते ते भारतातल्या धुळीत चालणारे नाही असे वाटते. भारतीय वापरासाठी एक बनले पाहीजे.
(आता लिहायला गेले तर अजुन काही नीट आठवेना. जसे आठवेल , सुचेल तसे इथे टाकत जाईन)
माझा हा गुण लेकीमधेही ट्रान्सफर झालाय असे वाटतेय कारण तीही तीच्या एक एक कल्पना मला सांगत असते. त्याही खाली लिहिते. (बिचारे तीचे बाबा )
१.
मागे एक मॅग्नेटीक ब्लॉक्स वापरुन ट्रेन सदृश्य काहीतरी केलं आणि मला येऊन म्हणाली हा व्हॅक्युम क्लिनर आहे. तो घरभर स्वतःच फिरतो आणि कचरा काढतो. भरला की कचर्याच्या डब्यात टाकतो आणि बॅटरी संपली की चार्ज होतो. ( असा मार्केट मधे आहे हे तीला माहीत नाही अजुन)
२.
एक बोट सदृश्य काहीतरी केल आणि म्हणाली ही पाणबुडी आहे ती पाण्यात बुडते, पाण्यावर तरंगते आणि मग हवे असेल तेव्हा उडते पण. ऑल इन वन.
३.
अजुन एक बोट बनलीये, जी बोट त्सुनामी आली तरीसुद्धा बुडत नाही. त्यावर तरंगते.
तुमच्याही कल्पना इथे येऊद्यात. न जाणो कुणाला प्रयोगासाठी, कुणाला नविन उद्योग सुरु करण्यासाठी उपयोगी येतील.
अगदी स्थानिक पातळीवर काच,
अगदी स्थानिक पातळीवर काच, टिन, कागद यांचे किफायतशीर रिसायकलींग करता आले तर.
सध्या या सर्वासाठी भरपूर वीज, पाणी लागते. त्यातूनही फार कमी टक्केवारीचे रिसायकलींग होते.
असे किफायतशीर रिसायकलींग झाले तर कॉलनी पातळीवरच हे करता येईल. परत त्याच कारणासाठी वापरता येण्याजोग्या वस्तूच बनाव्यात असे नाही. रोड डिव्हायडर्स, फर्निचर, शाळेतली बाके असे काही बनले तरी चालू शकेल.
दिनेशदा धन्स, वाटीवर वाटी,
दिनेशदा धन्स,![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
वाटीवर वाटी, मॅन्युअली ऑपरेटेड (?), म्हणजे फारसे महागडे नसावे, पुढच्या ईंक्रिमेटला घ्यायला हरकत नसावी
गोक्षुरादी गुग्गुळ आणि बस्ती .. या दोन्ही पोस्ट सेव करून ठेवतो.. गेले सहा आठ महिने किडनीस्टोन शांत आहे, पण इन्शाल्लाह लवकरच लागेल .. त्यामुळे यासाठी दिनेशदा आणि विनिता स्पेशल धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बादवे, बस्ती म्हणजे नक्की काय? गूगाळून कुठे मिळेल माहीती ??
(इथे अवांतर होत असेल पण प्लीज क्षमस्व)
ऋन्मेऽऽष, 'अवांतर होत असेल'
ऋन्मेऽऽष,
'अवांतर होत असेल' नाही अवांतरच आहे. तुमची किडनीस्टोन , आयुर्वेदिक उपचार आणि तत्सम पोस्ट / प्रश्न इथुन काढुन आरोग्य विभागात टाका. इथे फक्त नाविन्यपूर्ण उत्पादनांच्या संबंधित चर्चा आणि कल्पना राहु द्या.
भारतात ही अशी उत्पादनं खूप
भारतात ही अशी उत्पादनं खूप खपतील. मोकाट कुत्र्यांमुळे बंपर मार्केट आहे. खरंच कुणीतरी तयार करण्याचा, विकण्याचा विचार करा.
Ultrasonic Dog Repeller
Dog Dazer II Ultrasonic Dog Deterrent
मध्यंतरी १ जानेवारीच्या
मध्यंतरी १ जानेवारीच्या लोकसत्ता पुरवणीत अश्या नाविन्यपुर्ण आणि प्रत्यक्षात आणलेल्या काही उत्पादनांची माहिती होती.
"गरज ही शोधाची जननी " हे तिथल्या उपकरणांवरुन कळत होतं, पण छान वाटलं की गरीब आणि गरजु व्यक्ती स्वत।च्या कल्पनाशक्तिचा किती सुंदर उपयोग करतात. त्यामानाने आपल्या इथल्या चर्चा ह्या अजुन आळसा कडे नेणार असे दिसते.
महानगरातला कचरा वॉर्ड
महानगरातला कचरा वॉर्ड लेव्हललाच जागच्या जागी विघटन करण्याचे मोबाईल संयंत्र.
Pages