https://www.youtube.com/watch?v=--NVuWvS81k
नाक्यावरच्या सिग्नलला स्कूटर लागलेली आहे. स्कूटरवर दोन स्मार्ट आणि मॉडर्न मुली बसलेल्या आहेत. पाठीमागून एक बाईक येते. स्कूटीवरच्या तरुण बाईकांना बघून पाठीमागेच थांबते. बाईकवर दोन छपरी कॅटेगरीत मोडणारे युवक बसलेले असतात. त्यातील मागे बसलेला तरुण बसल्याबसल्या बोर झाल्याने सवयीप्रमाणेच आपले मनोरंजन शोधत त्या पोरींची छेड काढायला सुरुवात करतो ...
ए नाम क्या है तेरा ? हां नाम क्या है तेरा ??? अरे नाम तो बोल अपना.. नाऽऽऽम नाऽम ...
इथे आपण (प्रत्यक्ष आयुष्यात बघ्याची भुमिका घेणारे) विचार करतो, इग्नोर मारावे या प्रकाराला की त्या मुलीच्या मदतीला धावून त्या रोडरोमिओला धडा शिकवावा.. पण इतक्यात, स्कूटीवरचीच मुलगी उठते आणि टॅंग टॅ ढॅंग.. टॅडा.. बॅकग्राऊंड म्युजिकचा आसरा घेत, त्या मवाल्याच्या अगदी समोर उभी राहते. नजरे झुका के नाही, शरम आके नाही, तर ताठ मानेने आणि त्यालाच उलट पुकारते ..
नाम क्या है तेरा ? ए हेल्लो नाम क्या है तेरा ??? नाऽऽऽम ... अरे नाम बोल!
मग काय मवाली वरमतो, घाबरतो. कसाबसा आपले नाव पुटपुटतो ....... सलीम!
लगेच हि बया, " सलीऽऽऽऽऽम ............ मै अनारकली..! काय विसरल्यास आपल्याला .." म्हणत सिग्नललाच त्याची पार हवा पंक्चर करून टाकते. कसाबसा सॉरी बोलत तो सटकतो आणि ....
टॅंग टॅ ढॅंग.. टॅडा.. पुन्हा बॅकग्राऊंड म्युजिकचा आसरा घेत मालिकेचे नाव झळकते! ".. रुंजी .." आमची रुंजी काहीही करू शकते.... (पटकन माय नेम इझ खान आठवला ना. आय कॅन रीपेअर अॅनिथिंग!) असो, हे बघून आपण मात्र, "वाह! कसे त्या मवाल्याचे डोके ठिकाणावर आणले" म्हणत इम्प्रेस होतो. कारण नेहमीच्या आयुष्यात न दिसणारे एक पात्र. खरे तर हे दुर्दैवच जे हे पात्र आपल्याला लार्जर दॅन लाईफ वाटावे. पण जी आहे ती वस्तुस्थिती आहे आणि ती बदलावी अशी सुप्त इच्छा कुठेतरी आपल्या प्रत्येकाच्या मनात दडली आहे. म्हणूनच हा प्रोमो बघून आपण सर्वच वयोगटातले महिला-पुरुष ईम्प्रेस होतो आणि हि मालिका जमल्यास बघायची ठरवून मोकळे होतो.
पण हे बघून सहजच मला एका लग्नाची दुसरी (का तिसरी?) गोष्ट आठवली. ज्यात त्या स्पृहा जोशीची एंट्री सुद्धा अशीच डॅशिंग रुबाबात आणि स्कूटीवरून झाली होती. फिल्मी वकीलाच्या पेश्याला साजेशी तडफदार वृत्ती अन बाणा दाखवला गेला होता. शक्यतो मी मराठी मालिका नाईलाजाने एकाच घरात राहायचे असल्याने आणि पळून जायचा पर्याय नसल्याने नजरेस पडतात तितक्याच आणि तेवढ्याच बघतो. पण यातील स्पृहाची एंट्री पाहता हि थोडीफार आपणा तरुणवर्गाला भुरळ घालण्यासारखी बनवली आहे या विचारांत काही भाग पाहिले होते. पण कसचे काय, शेवटी ते डेली सोपच हाय! एकदा सोप म्हणजे साबण म्हटले की सुरुवातीला मळ काढून झाल्यावर झाल्यावर ते डोळ्यातून पाणी काढायचे काम चोख बजावणारच. काही भागांतच त्या तडफदार वकील बाईंचे मुळूमुळू रडण्यार्या कोकीळ बाईत रुपांतर झाले. त्यानंतर जेव्हा केव्हा अधूनमधून ती नजरेस पडायची तेव्हा मालिकेतील सारे सेंटीमेंटस तारून न्यायचे ओझे हिच्याच खांद्यावर आहेत असे भासायचे. प्रॉब्लेम बिचार्या त्या उमेश कामतच्या आयुष्यात त्याच्या घटस्फोटीत पालकांमुळे होते पण हिच नेहमी सदादुखी दिसायची. पहिल्या भागाने दाखवलेले हटकेपणाचे बावीस कॅरेट गाजर पार पिचकले होते. जणू काही सुरुवातीला दाखवलेले तिचे रूप तिचे व्यक्तीमत्व नसून त्या प्रसंगाची गरज म्हणून होते. तो रंगतदार प्रसंग पार पडला आणि ताबडतोब तिला रोनाधोना कॅटेगरीत आणून बसवले. जणू काही आपल्या मालिकांमध्ये अश्या दाखवण्याला पर्याय नाही किंवा रडूबाईगिरी दाखवल्याशिवाय रोजचा टारगेट ऑडियन्स खेचताच येणार नाही.
रोज मरे त्याला कोण रडे असे म्हणतात खरे, पण या मालिकेतल्या बायका रोज रडतात तरी लोक बघायला मरतात. म्हणूनच मनात विचार आला, आमची रुंजी काहीही करू शकतेय म्हटलेय खरे, पण एकदा अशी सुरुवात करवून प्रेक्षकवर्ग खेचला की मग तिच्या लाईफमध्ये एखादे प्रेमप्रकरण आणि पर्यायाने सासर घुसवून सीन क्रिएट केल्यावर ती रोनेधोने व्यतिरीक्त आणखी काहीही करू शकणार नाही.. किंवा काही केलेच तर ते सासू नणंदेच्या कारस्थानांना उत्तर देण्यापलीकडे नसावे.. तरीही मालिकेला शुभेच्छा! माझा अंदाज कितपत खरा ठरतोय हे बघण्यास उत्सुक! चुकला तर आनंदच! वर उल्लेखलेला प्रोमोज आपण खाली दिलेल्या लिंक वर बघू शकता.
https://www.youtube.com/watch?v=--NVuWvS81k
तळटीप - मी स्वता हि मालिका बघणार की नाही हे आता आमच्या घरचे बघणार की नाही यावरच ठरेल. मात्र आमच्या मातोश्री हा ट्रेलर आवडीने बघत असल्याने आमच्या घरात रुंजी रुजायची शक्यता अमाप आहे!
आभारी आहे,
ऋन्मेऽऽष
का ही ही nonsense
का ही ही nonsense
एक्झॅक्टली !
एक्झॅक्टली !
चांगले लिहितोस रे! एकदा सोप
चांगले लिहितोस रे!
एकदा सोप म्हणजे साबण म्हटले की सुरुवातीला मळ काढून झाल्यावर झाल्यावर ते डोळ्यातून पाणी काढायचे काम चोख बजावणारच. सारखी वाक्ये विशेष चमकदार
धन्यवाद हर्पेन, अशी
धन्यवाद हर्पेन, अशी कॉम्प्लिमेंट देणारे आपण दुसरे... पहिली माझी गर्लफ्रेंड (फक्त सोबतीला सतराशे साठ उपदेश
)
ऋन्मेऽऽष, मला वाटल कि नवीन
ऋन्मेऽऽष, मला वाटल कि नवीन मालिकेच्या चर्चेचा धागा आहे मधेच ती संपलेली ए ल ती गो बद्दल कशाला लिहिलेस, सर्वाना माहित आहे कि मालिका नंतर नंतर अगदी बघवत नाहीत इतक्या कंटाळवाण्या होतात. तुज्या लेखाची सुरुवात इतकी छान असते पण नंतर फ़ूउस्स्स्स्स
please dont mind पण खरच तुज्या सर्व लेखांच्या बाबतीत माझा हाच अनुभव आहे.
प्रीतीऽऽ, आय डोण्ट हॅव माईण्ड
प्रीतीऽऽ,
आय डोण्ट हॅव माईण्ड
तुर्तास तुम्ही वाचता आणि पुर्वार्धाला छान म्हणता हेच खूप आहे माझ्यासाठी ..
पण तुमच्या प्रामाणिक प्रतिसादामुळे मला टारगेट मिळाले आहे की येस्स यांना आवडेल असा टॉप टू बॉटम छान लेख देऊ शकलो तर मी मायबोलीवर व्यतीत करत असलेल्या वेळेला अर्थ आहे, नाहीतर हा माझा आयडी सुद्धा व्यर्थ आहे!
धन्यवाद
धन्यवाद
तुज्या लेखाची सुरुवात इतकी
तुज्या लेखाची सुरुवात इतकी छान असते पण नंतर फ़ूउस्स्स्स्स >>>
५ लेख लिहिल्यावर त्यांची फक्त सुरुवात घेउन एक संपुर्ण लेख बनवा.
विनित दवे, भारी आयडीया आहे ..
विनित दवे, भारी आयडीया आहे ..
आज सोमवार, रोजचा एक प्रमाणे शुक्रवार पर्यंत ५ लेख, पण ते प्रकाशित न करता शनिवारी तुमची टेकनिक वापरून पोस्टतो.
अवांतर - रुंजी १० ऑक्टोबरला येतेय. वाहिनी स्टार प्रवाह. दुसरा प्रोमो पण येऊ घातलाय, पण त्यात पैल्याईतकी मजा नाही.
त्या रुंजी चा नवरा विग वापरतो
त्या रुंजी चा नवरा विग वापरतो का? इतक्या कमी वयात यांचे केस कसे गळतात ...हेअर एकस्तेन्सन वापरले आहे बहुदा पुढील कपाळ (टक्कल) झाकण्यासाठी. हिरोइन चे केस पण तसेच वाटतात. :):):)
अरे वा नवीन वाचक आपण बघता ती
अरे वा नवीन वाचक आपण बघता ती सिरीअल, छळ आहे ना..
बाकी केसांचा मुद्दा येस, मला तर ते दोघे लूकवरून नवराबायको कमी आणि बहीणभाऊ जास्त वाटतात..
ऋन्मेषजी मी हि सेरिअल पाहत
ऋन्मेषजी मी हि सेरिअल पाहत नाही. पण माबो वर चाललेल्या चर्चेत सहभागी व्हावे यासाठी कधीतरी मराठी वाहिनींवर फेरफटका मारते. का कोणास ठावूक पण मी कोणे एकेकाळी मराठी सेरिअल भक़्त असल्यामुळे (हल्ली कोणतीही सेरिअल पाहत नाही) एखाद्या सेरिअल मध्ये काय चालू आहे व काय घडून गेले असेल हे एखादा एपिसोड बघून लगेचच कळते. नाही मजा येत त्या रस हीन मालिका बघून उघीच डोक्याला शोर्ट कोण लावून घेईल.
रुंजी बद्दल वाचायला मिळत नाही
रुंजी बद्दल वाचायला मिळत नाही .........येथे कोण फिरकत नाही वाटते. खुद्द धागाकर्ते सुद्धा
नविन वाचक, आमच्याकडे बघितली
नविन वाचक,
आमच्याकडे बघितली जाते ती मालिका, कालपरवाच वॅलेंटाईन डे सुद्धा साजरा झाला मस्त त्यात.. कायतर म्हणे सरप्राईज पिकनिक.. तरी फार लोक्स ती मालिका बघत नाही हे चांगलेच आहे, खास करून माझी ग'फ्रेंड वा तिच्या मैत्रीणी बघत नाही हे चांगले आहे. अन्यथा त्यातील वॅलेंटाईन डे सेलिब्रेशन्स अन रोमांटीक द्रुश्ये बघून इथे अपेक्षा वाढून नको त्या मागण्या सुरू झाल्या असत्या ..
ए अरे बास की. सारखं सारखं
ए अरे बास की. सारखं सारखं गर्ल्फ्रेंड गर्ल्फ्रेंड गर्ल्फ्रेंड. जाम पकायला होतय आता.
ओके, आता भारत विश्वचषकातील
ओके, आता भारत विश्वचषकातील पुढचा सामना जिंकेपर्यंत नो ग'फ्रेंड
अरे वर्ल्ड कप को तो बक्ष दो.
अरे वर्ल्ड कप को तो बक्ष दो. प्लीज त्याबाबतीत काहीही बोलु नकोस. हवे तर रोज गफे गफे कर. पण भारत जिंकेल हा जाम सेंसेटीव्ह सब्जेक्ट आहे तेव्हा त्याच्याशी रीलेटेड नको काही बोलुस.
अहो माझे बालपण आणि
अहो माझे बालपण आणि आतापर्यंतचे तरुणपण क्रिकेट खेळत, वाचत आणि बघत गेलेय, त्यावर मला बोलायची बंदी तर अशक्यच! उलट अश्या पैजा आणि अटी सामने बघायला आणखी एक हेतू देतात, मॅच बघणे आणखी एंजॉयेबल करतात म्हणून ते वरचे विधान केले.
तुम नही मानोगे
तुम नही मानोगे
रुंजीत कॅमेरा प्रकरण चाललय
रुंजीत कॅमेरा प्रकरण चाललय काय आहे ते आणि ती तिची चुलत सासू तिला का बर घराबाहेर घालवत आहे.