स्टॅन्ड मिक्सर म्हणजे भारतात ज्याला "मिक्सर" म्हणतात तो नव्हे. नावाप्रमाणे याचे काम फक्त 'मिक्स' करणे असते. कणीक मळणे, केक -कुकीज करत असाल तर त्याची मिश्रणे, फ्रॉस्टिन्ग, ताक घुसळणे इ. कामे यात छान होतात. या यंत्राच्या कणीक मळण्यातल्या कौशल्यामुळे याला 'गृहिणीमित्र' ही पदवी द्यावी वाटते पण बदलत्या काळानुसार आपण याला 'स्वयंपाकघरातील सहकारी' किंवा 'किचन-मित्र' म्हणूया.
फूड प्रोसेसरमध्येही कणीक मळता येते, पण साफ करायला कटकटीचे आहे.
यात बरीच मॉडेल्स आहेत पण Kitchen Aid 'Artisan' चे ३२५ वॅटचे ५ क्वार्टचे मॉडेल पुरेसे होते.
http://www1.macys.com/catalog/product/index.ognc?ID=77589&CategoryID=31665
सेलमध्ये २५०-२३० पर्यंत मिळते कधीकधी.
बर्याच दुसर्या अॅटॅचमेन्टसही मिळतात, पण त्या गरजेनुसार घ्याव्यात. सोबत येणार्या तीन पुरेश्या आहेत.
यात बाकी कंपन्याही असतील पण फूड प्रोसेसर किंवा मिक्सर यासारख्या उपकरणांसाठी Kitchen Aid हा डोळे झाकून घेण्याचा ब्रॅन्ड आहे.
ट्ण्या , देशात मिळतो उसगावात
ट्ण्या , देशात मिळतो उसगावात चालणारा मिक्सर. आई बाबांच्या सामानात जागा असेल तर आणायला सांग. प्रितीचा मिक्सर चांगला आहे. सुमित हल्ली मिळत नाही.
पुण्याला पासोड्या विठोबाच्या
पुण्याला पासोड्या विठोबाच्या देवळाजवळ बरीच इलेक्ट्रीकची दुकानं आहेत. तिथे स्टेप अप व स्टेप डाऊन असे दोन्ही ट्रान्सफॉर्मर मिळतात. भारतीय पद्धतीच्या कुकींगसाठी( उदा. चट्णीचा गोळा, मेदुवड्यासाठीचं पीठ, वाटली डाळ ) इ. साठीची कन्सिसटन्सी सुमीतमधे(च) मिळते.
नविन धागा उघडायचा कंटाळा
नविन धागा उघडायचा कंटाळा म्हणुन इथे लिहिते.
कोणी वेट ग्राईंडर वापरला आहे का?
माहेर आणि तत्सम मासिकातल्या अय्यर वेट ग्राईंडरच्या जाहिराती वाचुन आई माझ्या मागे लागलीय आपण घ्यायचा का म्हणुन.
मला तसेही मिक्सर धार्जिणे नाहीत, कितीही चांगला घेतला तरी माझ्या हातुन तो खराबच होतो. म्हणुन म्हटले हा साडेपाच हजारापर्यंत किंमत असलेला ग्राईंडर घेण्यापुर्वी ज्यांनी कोणी वापरला असेल त्यांना विचारावे. माझे वाटण घाटण फारसे नसते कारण मुळात माझा मिक्सर बारीक वाटत नाही. वाटणारा असेल तर मग इडली डोसे इ. पदार्थ नियमीत वाटायला माझी काहीच हरकत नाही. सध्या ही पिठे रेडिमेड आणते.
परवा शेवटी अनेक वर्षांच्या
परवा शेवटी अनेक वर्षांच्या विचार-प्रतिक्षेनंतर घेतला हा मिक्सर. काल बनाना ब्रेड केला - पण बटर चे फ्लेक्स राहिले...तळाशीही बटर चिकटून राहिलेलं बटर फेटायला ती फ्लॅट ब्लेड अॅटॅचमेंटच वापरायची ना? काय करायला हवं बटर नीट फेटलं जायला?
रायगड, बटर रुम टें ला होतं
रायगड, बटर रुम टें ला होतं का?
हो गं, ४-५ तास आधी फ्रिजमधून
हो गं, ४-५ तास आधी फ्रिजमधून बाहेर काढून ठेवलेलं!
फु नेटवर बटरने सुरूवात करून
फु नेटवर बटरने सुरूवात करून मग साखर्/अंडी असं काहीतरी क्रमवार बराच वेळ फिरवून मग dry ingredients टाकतात अस. वाटतं. त्यांच्या साइटवर एखादा आयना गार्टनचा व्हिडीओ पाहून बघा
रायगड अगदी छोटासा केक केला
रायगड अगदी छोटासा केक केला होता का. या मिक्सर मधे निदान आमटीच्या आकाराच्या २ वाट्या एवढे सामान लागते फेटायला, खूप कमी सामान असेल तर तळाशी तसेच रहाते आणि वरचे मिक्स केले जाते. मी कणीक मळते यात, अगदी २/३ पोळ्यांची इतकी कमी कणीक नाही मळली जात यात. किमान ६/७ पोळ्यांची मळावी लागते
नाही गं - एक आख्खी बटर स्टिक
नाही गं - एक आख्खी बटर स्टिक होती..असो...परत ट्राय करेन. पण आज कणिक भिजवली - मेथी चिरून घातलेली - ऑसम झाली - ३ मिनीटात!
अरे वा, रायगड.
अरे वा, रायगड.
कोणी वेट ग्राईंडर वापरला आहे
कोणी वेट ग्राईंडर वापरला आहे का?<<< मी वापरतेय. इडली डोसा गुंडपंगल्याच्या पीठासाठी एकदम बेस्ट. आठवड्यतून एकदा तरी हे पदार्थ होत असतील तर घ्यायला हरकत नाही.
मी फायनली लोलाचा लाडका स्टँड
मी फायनली लोलाचा लाडका स्टँड मिक्सर घ्यायचं ठरवलं आहे.
विकेंड ला कॉस्ट्कोत गेले पण तिथे लाल रंगाचा नाही मिळाला, आता ऑनलाइन ऑर्डर करीन. सध्या कोल्स मध्ये ४.५ क्वार्ट्चा क्लासिक २०% डिस्काउंट मुले $१९९ आहे, कॉस्टकोत पण तीच किंमत आहे.
किचन एड ची किम्मत ४२००० रु ?
किचन एड ची किम्मत ४२००० रु ? ::अओ:
घेतला मी हा स्टँड मिक्सर.
घेतला मी हा स्टँड मिक्सर. चिरलेला पालक घालून पराठ्याची कणिक मळली. मस्त मौ मळली गेली.
शंकरपाळ्यांचं पीठ पण छान मळलं जातं असं ऐकलं आहे. भोपळ घारग्यांचही पीठ मळलं जायला काहीच हरकत नाही मग.
मी खुष आहे खरेदीवर. रायगड, तू परत बनाना ब्रेड वगैरे ट्राय केलस का?
शूम्पी, आता ब्रेड , पिझ्झा
शूम्पी, आता ब्रेड , पिझ्झा डो, होम मेड पास्ता असे पण करुन पहा .
कोणी वेट ग्राईंडर वापरला आहे का? >> साधनाचा हा प्रश्न पाहिलाच नव्हता. मी अल्ट्राचा वेट ग्राईंडर १३- १४ वर्षे वापरते आहे. इडली, डोसे, मेदूवडे, अप्पे, उत्तपे, पेसरट्टू, अडै यांची पीठं मस्त होतात . भारतात कानांकडे जवळपास प्रत्येक घरात एक तरी आहेच. काही घरात एक लहान आणि एक मोठ्ठा असं पण आहे. चुलत, मावस, आते बहिणी, भावजया पण रेग्युलरली वापरतात. खोबर्याचं वाटण सुद्धा क्व्वांटिटी पुरेशी असली तर अगदी गंध होतं म्हणे
मी हा कधीच घेतला. बेकींग
मी हा कधीच घेतला. बेकींग संबधीत सगळं करण्यासाठी एकदम सोयीस्कर.
कोणीतरी म्हणालं रोजची पोळ्यांची कणिक ही चांगली मळली जाते. मी पुर्यांची कणिक भिजवण्यासाठी वापरून बघितला. हाताने भिजवते तेव्हा माझ्याकडून पाणी जरा हमखास जास्त पडतं. पुर्यांसाठी हवी तशी घट्ट भिजवली जात नाही. पण मिक्सर वापरूनही त्यात सुधारणा नाहीच झाली. कणिक सैल च झाली. तेव्हा आपला हात जगन्नाथ त्यासाठी
प्रॉब्लेम पाण्याचा आहे,
प्रॉब्लेम पाण्याचा आहे, जगन्नाथाचा नाही.
चिरलेला पालक घालून पराठ्याची
चिरलेला पालक घालून पराठ्याची कणिक मळली. मस्त मौ मळली गेली. >> किती पराठे केलेस शूम्पी ? मला रोजच्यासाठी अशा लहान गोष्टींकरता स्टँड मिक्सर वापरायचा कंटाळा येतो. त्यापेक्षा पटकन हाताने मळली जाते कणीक आणि मग गोष्टी साफ पण कराव्या लागत नाहीत फार
वरती लिहील्याप्रमाणे "ताक घुसळणे " करून बघायला पाहिजे .. हे कोणी केले आहे का ? आणि कुठले ब्लेड / पाते वापरले होते ?
हो, मी नेहेमीच बनाना ब्रेड
हो, मी नेहेमीच बनाना ब्रेड बनवते हा मिक्सर वापरून. कणिक तर यातच भिजवते, पोळ्यांची वा पराठ्याची.
माझ्या हातांना अज्जिबात पटकन
माझ्या हातांना अज्जिबात पटकन वगैरे कणिक मळता येत नाही धनि.. मला फार त्रास होतो कणिक भिजवणे ह्या कामाचा. भांडी धुवायला माणूस आहे
शूम्पी
शूम्पी
आम्ही उद्घाटनाकरता कुकीज करून झाल्या. एंजल फूड केक करायचा प्लॅन आहे. पण त्याला खुप कुटाणे आहेत त्यामुळे सगळेच मागे पडले आहे. आता असे वाटते की साधा बनाना ब्रेड वगैरे करावे किंवा पराट्याची कणीक भिजवून घ्यावी
अर्रे कुकीज ची आयड्या मस्त
अर्रे कुकीज ची आयड्या मस्त आहे. करतेच रविवारी. एंजल केक बंडल हां, उगाच भुसभुशीत, त्यापेक्षा छान पाउंड केक करा आणि मला घेउन या
पाउंड केक करा >> तेच करतो आता
पाउंड केक करा >> तेच करतो आता
आणि आता सगळे लोक खायला इकडेच या 
एंजल केक हेल्दी असतो ना?
एंजल केक हेल्दी असतो ना?
>> प्रॉब्लेम पाण्याचा आहे, जगन्नाथाचा नाही
हो ना. म्हणून तर वाटलं स्टँड मिक्सर तारून नेईल तर तसं काही झालं नाही. त्यामुळे आता जगन्नाथ च तारणारा!
किचनएड चा स्टँड मिक्सर आजच्या
किचनएड चा स्टँड मिक्सर आजच्या दिवशी अॅमॅझॉन च्या डेली डील वार आहे KitchenAid KL26M1XER Professional 6-Qt. Bowl-Lift Stand Mixer $२२९ फक्त
थँक्सगिव्हींगला किचनेड
थँक्सगिव्हींगला किचनेड आर्टिझन घेतला. कोल्समधून. १२७$
फार फार उपयोगी आहे. आधी का नाही घेतला म्हणून कोसतेय स्वत:ला...
Pages