मायबोलीचा वर्षाविहार-२००९ मावळसृष्टी येथे १९ जुलै २००९ रोजी संपन्न झाला.
या वविला खालील मायबोलीकरांची (व अर्थातच त्यातील काहींच्या कुटूंबियांची) उपस्थिती लाभली.
पुण्याहून-
yashwardhan, vegayan, atlya, utima, arun, arbhaat, devdattag, ankyno1, kmayuresh2002,
shyamali, dakshina, palli, chandanam, rajya, samir_ranade, kandapohe, himscool, Ramachandrac, aashu_D, krishnag, prabhuneyogesh, SAJIRA, sushya, aarfy, deepurza, limayeparesh
मुंबईहून-
ash_ananya, kavita.navare, pranav.kawle, ashwini_k, gharuanna, vinay_bhide, neel_ved, lalita-preeti, anand_suju, yo.rocks, reena, anandmaitri, chetnaa, Indradhanushya, kedar123, ashbaby, amruitsaya, ladaki, nandini2911, kishormundhe, kiru, amar_kulkarni, aavli, zankaar, needhapa, svalekar, amitdesai
काय काय झाले या ववित? मावळसृष्टीतल्या अरुंद रस्यावरून कशा गेल्या पुणे अन मुंबईच्या ५० सीटर बसेस? लोणावळ्यापेक्षाही उंच असलेल्या मावळसॄष्टीतल्या धबधब्याला गाठण्यासाठी पुन्हा शेकडो फुट खोल जाऊन कुणी कुणी काय काय कष्ट केले? सांस्कृतिक कार्यक्रमात कुणी काय धमाल उडवली? मुकाभिनयात कुणी मारली बाजी, अन कुणी केला अचाट नि अतर्क्य अभिनय? बसमध्ये येता-जाताना कसे कोसळले हास्याचे धबधबे, अन कशा वाहिल्या पांढर्या शाईच्या नद्या? 'मायबोली क्विझ' मध्ये कशी झाली मायबोलीकरांच्या 'ज्ञानाची' चाचणी? खान-पान कार्यक्रमात कोण ठरले सरस? सांस्कृतिक समितीने अन मायबोलीकरांनी कशी उडविली एकेमेकांची विकेट? ववि 'सुखरूप' पार पाडल्याबद्दल कसा झाला संयोजकांचा सत्कार?
प्रचंड उत्साह आणि मायबोलीकरांची विक्रमी हजेरी यासाठी हा 'ववि' लवकर विसरला जाणार नाही, यात शंकाच नाही. या धमाल सहलीत सहभागी झालेले मायबोलीकर, त्यांच्याच शब्दांतील वृत्तांत आणि त्यांच्याच खास भाषेतल्या प्रतिक्रिया लवकरच इथे येत आहेत..
तर, सावरून बसा लोकहो! सादर आहे, तुमच्याच मित्रांनी केलेल्या धमालीचा धमाल वृत्तांत..
एकंदर
एकंदर अतिशय मस्तच असा ववी झाला. अश्विनीच्या कृपेने मी छवीही केला. त्यावर काहीजण दात काढुन आम्हाला फिदीफिदी हसलेही.. वर्षाविहाराला छत्र्या घेऊन काय फिरताय म्हणुन.. पण असो.
ववीत सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्यांच्याशी आपण गप्पा मारतो, थट्टामस्करी करतो, त्यांना प्रत्यक्ष भेटायला, बोलायला मिळते. मग काहीजणांना बघुन आश्चर्य वाटते, अरे हाच का तो?? कल्पना केली त्यापेक्षा कित्ती वेगळा.... तर काहीजणांना बघुन वाटते, ह्म्म्म अगदी जसे वाटलेले तसेच निघाले हे महाशय....
साधना
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
सांस्कृती
सांस्कृतीक कार्यक्रमात राहून गेलेल्या उखाणे मुंबईकरांनी परतीच्या प्रवासात घेऊन खूप धम्माल केली... हा माझा...
जुईने भिरकावली प्रेमाची गोफण... अन इंद्रधनुष्याला घातले कायमचे वेसण....
योग्या, निरजा, आशूडी, साजिर्या सगळ्यांचे वृ छानच
हो गं
हो गं साधना ! आणि इंद्राने माझ्यासाठी क्रेन नाही आणली (कबुल करुन सुद्धा) पण धबधब्याहून वर येताना तू माझ्यासाठी क्रेनच झाली होतीस गं
***************
ॐ नमश्चण्डिकायै |
कविताचं हे
कविताचं हे वाक्य >>
एक गोष्ट पटली आयडिज वरुन किंवा, इथल्या कमेंटसवरुन बांधलेली गृहितके पार कोलमडतात (चांगल्या अर्थी) प्रत्यक्षात पटकन सुर जुळुनही जातात.
आणि अॅशबेबीचं हे वाक्य >>>
मग काहीजणांना बघुन आश्चर्य वाटते, अरे हाच का तो?? कल्पना केली त्यापेक्षा कित्ती वेगळा.... तर काहीजणांना बघुन वाटते, ह्म्म्म अगदी जसे वाटलेले तसेच निघाले हे महाशय....
ही वाक्य कुणीतरी संदर्भासहीत स्पष्टीकरणाला घ्या बुवा आता..
हा माझा
हा माझा स्वतःचा उखाणा
सर्फ एक्सेल वर मिळतो चमचा फ्री
स्वतःच नाव घेतो केदार वन टू थ्री
आणि हा बशीतला :
एक होता काऊ आणि एक होती चिऊ
विज्ञाच नाव घेतो डोक नका खाऊ
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
हो, हो.
हो, हो. उदाहरणांसकट स्पष्ट करा ही वाक्ये.
म्हणजे थोडक्यात, छोटा का होईना, वृत्तांत लिहा हो.
---
असं एखादं पाखरू वेल्हाळ..
ही वाक्य
ही वाक्य कुणीतरी संदर्भासहीत स्पष्टीकरणाला घ्या बुवा आता..
नक्को.... नविन बाफ उघडावा लागेल........हा अपुरा पडेल मग..
पण आयडीया तशी झक्कास आहे......
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
विज्ञाने
विज्ञाने घरातुन निघताना केदारला ऐकवलेला उखाणा
केदार तुला आहे ह्या विज्ञाची आज्ञा
मी सोडता कुण्णाशी बोलणार नाहीस
आधी कर ही प्रतिज्ञा तरच ववीला येईल ही विज्ञा
-------------------------------------------------------------------------
इतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार
कवे अगदी
कवे अगदी खर्रा उखाणा
कुठेच लक्ष नव्हतं केद्याचं, सारखं पुढे-मागेच होता
मिनू ला अनुमोदन, कवे,अॅशबेबी स्पष्टीकरण द्याच.
दिप्या.. तु
दिप्या.. तु पण घे कि उखाणा छानसा..
आधी तुम्ही
आधी तुम्ही लोक ओळखा पाहु खेळा म्हणजे तुम्हाला काय वाटल त्या वाक्यांवरुन ते लिवा. आम्ही येतोच दिवे घेऊन पडताळणी करायला
-------------------------------------------------------------------------
इतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार
का रे त्या
का रे त्या १२३ला छळताय? १ जूनला लग्न झाल्यानंतर या भाऊगर्दीत वविला आला, म्हणून स्पेशल बशी त्यालाच द्यायला हवी तुम्ही..
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..
नक्को....
नक्को.... नविन बाफ उघडावा लागेल........हा अपुरा पडेल मग.. >>> अगदी अगदी...
बाकी लोकांनी यावेळी मनापासून उखाण्याची तयारी केली होती तर.. उगीच वाया गेले.. खरंच लिहा इथे सगळ्यांनी.
विज्ञाचा उखाणा तर एकदम जोरदार आहे केदारची काय टाप कुणाशी बोलायची
या
या भाऊगर्दीत वविला आला>>>
ए, गप्पे वविला महिलांची पण उपस्थिती होती.
खरंच लिहा
खरंच लिहा इथे सगळ्यांनी.
>> सुरुवात तुझ्यापासून कर. ज्येष्ठांचा मान आधी
१ जूनला
१ जूनला लग्न झाल्यानंतर या भाऊगर्दीत वविला आला,
>> हो ना. त्यात बसमधे आनंदमैत्री, योगायोग आणि योरॉक्स याची दुखभरी गाणी. आणि आनंदसुजूचे संगीत वस्त्रहरणाचे प्रयोग
--------------
नंदिनी
--------------
याची
याची दुखभरी गाणी>>
म्हणजे चलत भविष्यकथनच एक प्रकारे.
आणि
आणि आनंदसुजूचे संगीत वस्त्रहरणाचे प्रयोग
>>> यातला 'संगीत' शब्द फार महत्त्वाचा आहे!
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..
पूनम. जर
पूनम.:हाहा:
जर अंताक्षरीचे क्ल्युज मी, अँकी आणि श्रद्धा काढले तर ज्याचे निगेतिव्ह मार्क सर्वात कमी तो जिंकेल
मी आणि अॅकीने त्यातच मधे जॉनी लिव्हरच्या एका गाण्याबद्दल मौलिक चर्चा केली होती.
--------------
नंदिनी
--------------
याची
याची दुखभरी गाणी>>
म्हणजे चलत भविष्यकथनच एक प्रकारे.
भविष्यकथन नाही, भूतकथन....
आनंदमैत्रीचा 'तु औरोंकी क्युं हो गयी.......' हा दर्दभरा टाहो भविष्यकाळसुचक नव्हता तर भूतकाळसुचक होता....
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
बस मधली
बस मधली धम्माल काही औरच ! नंदिनीने अजय देवगणचा वाढदिवस साजरा केला. गाण्यांची चालीतली विडंबनं सुंदरच जमली होती. विनयने छबीदार छबी सुरु करताना हॅअॅअॅअॅ असा आवाज काढत जे काही अंग थरथरवलं की संध्या फिक्की पडली
***************
ॐ नमश्चण्डिकायै |
बसची
बसची सर्वात शेवटची सीट जादूभरी होती. तिथे परत येताना बरर्मुडाधारी महाराज प्रगटले. त्यानी दासी मिळत नसल्याने मठ काढणे कॅन्स्ल केले. नंतर शेषशायी विष्णु आणि त्याच्या डोक्याशी (बसून भुन भुन लावणारी) लक्ष्मी यानी दर्शन दिले. सर्वात शेवटी तिथे शिव पार्वती आणि मांडीवर बसलेल्या गणेशाने दर्शन दिले
बसम्धे एक हॅरी पॉटर होता. त्यासोबत चुरू चुरू बोलणारी हर्मायनी आणि अज्जिब्बात न रडणारा रॉन पण होते. (ओळखा पाहू!!!)
--------------
नंदिनी
--------------
मी तेव्हा
मी तेव्हा नसल्याने अंदाजानेच उत्तरे देते हं !
बरर्मुडाधारी महाराज = आनंदमैत्री असावा.
विष्णू लक्ष्मी = केदार विज्ञा
शिव पार्वती गणेश = नील तृप्ती ओम
हॅरी पॉटर = सानिका (कविताची कन्या)
हर्मायनी = नुपूर (घारुची कन्या)
रॉन = श्रेयस (विनयचा मुलगा)
***************
ॐ नमश्चण्डिकायै |
अश्वे, रॉन =
अश्वे,
रॉन = ओम नील चा मुलगा
शिव पार्वती गणेश = विनय मधुरा श्रेयस
बर्मुडाधारी महाराज = बहुतेक आनंद सुजु
-------------------------------------------------------------------------
इतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार
बसमधे
बसमधे माबोचे सुलेखन नसलेले दोन जुडवा (शेम टु शेम) टिशर्टस होते. कुणाचे सांगा पाहु?
घारु अण्णा आणि घारु अण्णी कायम दोन विरुद्ध टोकांना बसत होते. कारण काय? १ जुनला लग्न झालेले जोडपे कायम एकत्र दिसत होते. म्हणजे लग्ना नंतर लगेच चा ववी असा आणि बरिच वर्ष जुन झालेल्या लग्नानंतरचा ववी अण्णा अण्णींसारखा असतो काय?
-------------------------------------------------------------------------
इतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार
वर्षभर वाट
वर्षभर वाट पाहायचे दु:ख आहे बारके,
पुढच्या वविला धमाल करणार एसारके.
बसमधे
बसमधे माबोचे सुलेखन नसलेले दोन जुडवा (शेम टु शेम) टिशर्टस होते. कुणाचे सांगा पाहु?
>> आनंदसुजु आणि सतिश. मी तर सेम पिंच करा असं पण सांगितले होते. पण माझं कुणी ऐकतच नाही
--------------
नंदिनी
--------------
फारच छान
फारच छान झाला ववि
अत्तापासुनच पुढच्या वविची वाट पहातोय
************
आपला अमर.....
ववी
ववी संयोजक, सां.स. समिती चे सर्वप्रथम आभार... आणी सर्व ववीकरांचे सुद्धा..
आशु,यो,मिनु, निधप,साजिरा... ववीसारखेच तुमचे वृत्तांत पण धमाल..
मिनु आणी नंदिनीचा त्रिवार निषेध...
आशु , निधप आणी टीम माझी मॅच फिक्सींगची गिफ्ट अजुन पोचली नाही...
सर्वात धमाल केली ती धबधब्यामध्ये.. मि जास्ती भिजु शकलो नाही कारण माझा वेळ इतरांचे कपडे ,वस्तु सांभाळणे त्यांचे फोटो काढणे यातच गेला.. सुशा आणी श्यामली यानी माझा वापर कपडे वाळत घालायच्या दोरी सारखा केला होता.. अल्टीमा ने मला तिच्या बॅगेची दिवसभर रखवाली करायला लावली.. मिनु आज्जीने मला सां.स. समितीची बशिंची बॅग खाली घेउन जाणे आणी वरती परत चढवणे हे काम नेमुन दिले होते... एवढी सगळी महान कार्ये करुन मि दमलेलो असताना त्या दक्षीणाने मला मसकली या गाण्यावरती नाच करायला लावला.. अर्थात मि जे काही केले त्यामुळे आमची टीमच काय ती सोनम कपुर सुद्धा कपाळाला हात लावुन बसली असती...
पल्ली आणी माझ्या टीम मधील बाकीचे मेंबर ( यांची नावे लक्षात नाहीत क्षमस्व) .. मि आता वर्षभर नाचाची प्रॅक्टीस करुन तुम्हाला पुढच्या वर्षी बशीच काय तर कढई सुद्धा जिंकुन देईन...:)
धम्माल
धम्माल केलेली दिसतेय.
पण हे काय नाव 'वर्षा विहार' आणि त्यात एकही माबोवरची वर्षा नाही.
Pages