जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग त्या आजारी पडलेल्या आदित्यसाठी "ऑफिशियल" आदित्य कासावीस झालेला त्याचे काय झाले? तो बरा होउन निघुन गेला का?

ती मेघना कधी डिस्टर्ब नसते ते सांग ....>>>> हो ना खरंय..

आदित्य कासावीस झालेला त्याचे काय झाले? तो बरा होउन निघुन गेला का?>>>>> तो आधीच हॉस्पिटलमधून निघून गेलाय. मेघना आदित्यचा सुखाचा संसार बघून Happy

हायला, हि सुद्धा सिरियल चालू आहे?

रेशीमगाठी जुळल्या मग आता काय डोंबल चाललय ह्या सिरियलीत?

जरा म्हणून चांगल्या सिरियली दाखवत नाहीत झी वाले. एखादी विनोदी वगैरे तर मुळीच नाही. वैताग नुसता.

आदे ची एक्झिट जवळ आली.

मेदे सारखं त्याला विचारत्ये - तू मला सोडून नाही ना जाणार ? सुजाण प्रेक्षकांनी बरोब्बर ओळखलं असेलं की तो सोडून जाणार.

मला तर रोज तो बाहेर निघाला की वाटतं आता होणार अपघात Sad

>>मला तर रोज तो बाहेर निघाला की वाटतं आता होणार अपघात <<
Rofl

हो, मी जेव्हा एक भाग पाहिलेला कधीतरी मागच्या आठवड्यात... ती बाहेर सोडायला येते.. तो तोंडलीची भाजी घेवून जात नाही. तेव्हाच वाटलेले की आज हा येणार नाही. ...

स्टोरी अशी असेल बहुधा पुढे,

आदे जाणार, बॉडी नाही मिळणार. मग आन येणार. देसाई लग्न ठरवणार मेदेच आनशी. मग आदे उपटणार.

वरती चिपोका एकदम पुतणीची बाजू घ्यायला आलेले दिसताहेत <<<<हा हा हा...

खरे तर 'चिपो' कायम रडत असते.. ती कधीतरी हसताना दिसली (आणि गावची) म्हणून आणंद.. Proud

बऱ्याच दिवसांनी आजचा भाग पहिला..उदय टिकेकर काय भारी काम करतात! इतकी वर्षं आडमुठेपणा करणाऱ्या माणसाला आपल्या चुकांची जाणीव होताना दाखवणं परफेक्ट जमलंय! आवडलंच एकदम! त्या मेघनाची आई पण खूप सुरेख काम करतात!
बाकी त्या शेजारच्या काकू किती भोचक आहेत Lol

भोचक तर सगळेच आहेत, एकमेकांच्या आयुष्यात सारखेच व्यत्यय आणतायत....

त्या मेघनाची आई पण खूप सुरेख काम करतात!>>>>>>>>>>>>>>. सुरुवाती पासुन त्यांच्या चेहर्यावर एकच भाव असतो...रडतानाही आणि हसतानाही... Rofl

अने Rofl

नाहीतर काय...उगाच नाही ते बाबाजी वेडे झालेत?? बायको रडी आणि पोरगी मंद....माणुस वेडा नाही होईल तर काय???

आता मालिका खर्‍या अर्थाने संपली बहुतेक....... शिव्या घालायलासुध्दा , मी सोडल्यास कुत्रं देखील येत नाही...

हाताला काय झालय...एक वेळ आदे चा हात मोडला असता तर समजूशकले असते,मेदेचा ढाई किलो क हात झोपेत मेदेचा हातावर पडला असेल असा अंदाज तरि लावता आल असत....
काहीही बकवास चालु आहे.जमल्यास त्या अर्चो ला कुठेतरी थोडे दिवस पाठवा आता...ती अजून ताई सासुबाई चा भूमिकेतुन बाहेरच पडली नाहिये

डोळे आल्यावर काय काळजी घ्यावी यावर नाना नानींची विशेष टिप्पणी दाखवायची म्हणून आणले असतील डोळे मेघना आणि अर्चूला. साड्या तरी आणायच्या, दिवाळी बघून.

आशूडी Biggrin

Pages