..
सई आवडत असेल तर खालील पोलवर आपले मत नोंदवायला विसरू नका.
http://www.maayboli.com/node/50843
.................
मी बोलतो मराठी, मी वाचतो मराठी.. मी ऐकतो मराठी, मी चालतो मराठी.. अरे मी तर जगतो मराठी !
साहजिकच आहे, मी चित्रपटही बघतो मराठी ..
त्यामुळे वयात येतानाची माझी ड्रिमगर्ल एखादी मराठी हिरोईनच असणे यात नवल वाटण्यासारखे काही नव्हते. पण तरीही, तशी ती कोणी नव्हती. कदाचित ड्रिमगर्ल, स्वप्नसुंदरी, वा तरुणांच्या हृदयाची धडकन बनण्यासाठी जे मटेरीअल लागते त्याचा कुठेतरी समकालीन मराठी हिरोईनींमध्ये अभाव होता. तरीही हिंदीतल्या कुठल्याही बिपाशा वा मल्लिकावर माझ्या जिगर का तुकडा ओवाळून टाकण्याऐवजी मी वाट बघणे पसंद केले. आणि एक दिवस लवकरच "सनई चौघडे" वाजले...
तिला मी त्या आधीही पाहिले होते. कदाचित एखाद्या मालिकेत वा एखाद्या जाहीरातीत. तेव्हा आठवत नव्हते. पण "आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे" हे हिट गाणे या सिनेमातले आहे, केवळ याच उत्सुकतेपोटी बघायला घेतलेल्या चित्रपटाने मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवायचे कारण तीच होती. नॉनग्लॅमरस पेहरावात एक ग्लॅमरस भुमिका साकारायचे शिवधनुष्य त्यात तिला पेलायचे होते. ते तिने कसे काय पेलले याची समीक्षा करणे क्रिटीक्स लोकांचे फावल्या वेळातले उद्योग, पण माझ्यासाठी मात्र त्यानंतर तो सिनेमा कांदेपोहे या गाण्याच्या जोडीने सई ताम्हाणकरचा म्हणूनही लक्षात राहिला. येस्स! सई ताम्हाणकर!!
दुसरी स्मिता पाटील होणे नाही, संयत अभिनयाच्या जोडीला अदाकारीची ती उंची कोणी गाठणे नाही, पण तरीही सईमध्ये त्या दिवशी मला "नमकहलाल" मधील स्मिता पाटील दिसली. अध्येमध्ये डोकाऊन गेली. नमकहलाल हा टोटली अमिताभचा चित्रपट असूनही त्यातील स्मिता पाटील मला भावली होती. इथे तर हा मला सईचाच सिनेमा वाटला.
माझे कॉलेजचे शेवटचे वर्ष होते ते! मी तिच्या नावातही गोंधळ घालायचो! कधी सई ताम्हाणकर बोलायचो, तर कधी सई परांजपे! हसेही व्हायचे! याच कारणाने मला ती आवडते यावर कोणी विश्वास ही ठेवायचा नाही! एकाअर्थी बरेच होते ते, पण त्यानंतर ती गायबली ...
माझ्या आठवणीतून नाही पण कदाचित मराठी चित्रपटसृष्टीतून .. मधल्या काळात तिचे काय कोणते चित्रपट आले गेले हे बघायला मला गूगाळावेच लागेल, पण तसे मला करायचे नव्हते. माझ्या आठवणीतील सईच्या प्रतिमेला मला धक्का बसू द्यायचा नव्हता. तिला एखाद्या बंडल चित्रपटात दुय्यम दर्जाची भुमिका करताना मला बघायचे नव्हते. तसा एकदा योगही आला होता. तिचा एक "पिकनिक" म्हणून चित्रपट केबल टिव्हीवर लागलेला. पण त्यात माझी नेहमीची सई दिसून राहिली नाही म्हणून मी लागलीच तो चॅनेल बदलल्याचे आठवतेय ..
आमच्या पुढच्या भेटीला जवळपास चार वर्षे जावी लागली. मधल्या काळात "राडा रॉक्स" चित्रपटानिमित्त तिच्याबाबत वादग्रस्त गॉसिपिंग झाली, पण माझ्या मनाच्या एका निवांत कोपर्यात दडलेले सईचे स्थान काही त्याने हलले नाही.
आणि मग एक दिवस जिथे तिथे चोहीकडे सईचे फोटो झळकायला लागले...
येस्स! तेच ते फेमस लाल बिकीनीतले फोटो! चित्रपट - नो एंट्री पुढे धोका आहे!
त्या लालभडक बिकिनीमध्येही ती कुठेही वल्गर वाटत नव्हती आणि म्हणूनच चित्रपटाचे प्रमोशन करायला ते फोटो फिरत होते. माझ्यामते हे जे काही कसब आहे ते हिंदीतील कतरिना कैफ या नटीलाच जमून जावे. पण त्या चित्रपटातील तिची भुमिकाही कदाचित कतरीनासारखीच शोभेची बाहुली म्हणून असावी. कारण त्या चित्रपटाचे पुढे काय झाले ते मला समजले नाही. सईसाठी म्हणून तो बघायचा होता, प्रदर्शित व्हायच्या आधीच मित्रांनाही त्या द्रुष्टीने पटवून झाले होते. पण काही चित्रपट पहिल्या प्रयोगालाच किंवा त्या आधीच पडतात तसेच काहीसे त्याचे झाले. एक टुक्कार(?) चित्रपट न बघितल्याची खंत अशी कधी राहिली नाही, पण आठवणीत राहिला तो तिचा लाल बिकिनीतला फोटो, जो अगदी आजही "ग्लॅमरस मराठी हिरोईनचा मापदंड" म्हणून व्हॉटसअॅप सारख्या सोशल साईटसवर फिरत असतो.
अजूनही सई हि माझी सर्वात आवडती नटी होती, पण तरीही तिला "माझी ड्रिमगर्ल" हे पद देण्यास काहीतरी कमी पडतेय असे मला वाटत होते. आणि मग एके दिवशी रिक्षा सिग्नलला थांबलेली असताना एका चित्रपटाच्या पोस्टरवर नजर पडली. आधीही त्या चित्रपटाबद्दल मित्रांकडून ऐकले होते. हा कट्ट्यावरच्या यारीदोस्तीचा आणि त्यांच्यातील दुनियादारीचा चित्रपट आहे म्हणत जायचा प्लानही ठरला होता. सई त्यात आहे हे सुद्धा ऐकून माहीत होते पण तरीही हुरहुर अशी लागली नव्हती, जी तो पोस्टर बघून लागली. दुनियादारीच्या त्या पोस्टरवर मला सई नाही तर बॉबीमधील डिंपल कपाडिया दिसत होती. येस्स! हिच तर आहे माझी ड्रिमगर्ल! माझ्या ईतर कोणत्याही मित्राने तिच्यावर आपला हक्क सांगायच्या आधीच मी माझा रुमाल तिथे टाकला होता.
पहिल्या दिवसाचा पहिलाच शो मला बघायचा होता, पण सर्व मित्रांना जमवण्याच्या दुनियादारीत तिसर्या आठवड्यातच तो योग आला. मधले दिवस कसे गेले याची तुम्ही कल्पनाच करू शकता. पण मराठी चित्रपट तिसर्या आठवड्यात म्हणजे थिएटर पार रिकामे असेल आणि "मै, सई और दुनियादारी" म्हणत निवांत चित्रपटाचा आनंद घेता येईल या माझ्या कल्पनाविलासाला तडा गेला जेव्हा तिकिटबारीलाच हाऊसफुल्लच्या बोर्डाला मिरवताना पाहिले. थिएटरच्या बाहेर सईचा आणि चित्रपटातील इतर कलाकारांचा भलामोठा किंग साईज पोस्टर लावला होता. त्याबरोबर फोटो काढून घेण्यासाठी जी झुंबड उडाली होती ती पाहता ओठांवर स्माईल, मनात इर्ष्या आणि डोक्यात राग एकाच वेळी दाटून येणे अनुभवत होतो. भावना संमिश्र होत्या खर्या पण आपापल्या जागा राखून होत्या.
अगोदरचा शो संपताच मला सर्वात पहिले आत शिरायचे होते कारण सईची एंट्री मला चुकवायची नव्हती. पण पुनश्च एका लेटलतीफ मित्रासाठी दुनियादारी करत थांबावे लागल्याने तो अनर्थ घडलाच. आत गेलो तर अंकुश चौधरीच्या एंट्रीचा सीन चालू झाला होता आणि पब्लिक टाळ्या मारत होते. मी सुद्धा त्यात थोडाफार सामील झालो, पण तरीही मला माझी खरी उर्जा राखून ठेवायची होती ती सईच्या एंट्रीला एक कचकचून शिट्टी वाजवायला, पण.......
पण ती आली, तिला पाहिले आणि पाहतच राहिलो... तोंड उघडले ते उघडेच राहिले.. शिट्टी राहिली बाजूला, श्वासापुरती हवा आत शिरली अन श्वास रोखूनच राहिला!
टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात.. यापेक्षा समर्पक शब्द नसावेत.. नक्कीच गीतकाराला सईवर चित्रित झालेले ते द्रुष्य बघूनच हे शब्द सुचले असावेत हे मी खात्रीने सांगतो!
अगदी पोस्टरवर पाहिलेले तशीच ती माझ्यासमोर सारे दृष्टीपटल व्यापून टाकणार्या कॅनव्हासवर पसरली होती! सिंपल मे डिंपल! त्यानंतर पुढचा पुर्ण सिनेमा सईसाठीच बघितला गेला. अगदी स्वताला स्वप्नीलच्या जागी ठेऊन बघितला गेला. व्हिल्लन साई झालेल्या जितेंद्र जोशीबरोबर तिला बघताना अक्षरशा राग येत होता. जेव्हा ती श्रेयसला, "माझा बच्चू आहेस तू" असे म्हणाली तेव्हा एक मोरपीस माझ्या गालांवरून फिरले होते. शेवटी स्वप्निल तिला पुळचटासारखा सोडून जात होता तेव्हा त्याचाही एवढा राग आला होता.. असे वाटले उठून त्याला सांगावे अबे जा ना, भाड मध्ये गेली तुझी दुनियादारी, आता भांड त्या दुनियेशी आणि मिळव "आपल्या सईला" परत....
स्वताला स्वप्निलच्या जागी बघणे मला सोपे गेले कारण तसा तो देखील माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. शेवटी तो मरतो तेव्हा मला वाईट वाटले नाही. का माहीत नाही पण तेव्हा मी त्या श्रेयसच्या भुमिकेतून बाहेर आलो आणि ऋन्मेष बनून सईला धीर देऊ लागलो, काही हरकत नाही सई मी आहे अजून... त्या शेवटच्या म्हातारपणाच्या द्रुष्यात सुद्धा सई इतकी तजेलेदार आणि सुंदर दिसत होती की लेडी देवानंदच जणू.. किंवा रेखानंतर खूबसुरत तीच!
चित्रपट संपवून बाहेर आलो तेव्हा माझ्या डोक्यात नुसती टिकटिक वाजत होती.. पाऊस पडत नव्हता तरी अंग ओलेचिंब झाल्यासारखे वाटत होते.. राहून राहून ओठांवर याच ओळी येत होत्या.... नाही जरी "सई" तरी.. भिजले अंग, पाण्याने .. सोचू तुम्हे पलभर भी, बरसे सावन जोमाने .. माझी अवस्था माझ्या मित्रांनी नेमकी हेरली, आणि त्याच दिवशी या ऋन्मेषला एक नवीन नाव पडले... ए रिशी पकूऽऽर ..!!
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
सई !
स ई .. दोन अक्षरे..
आणि तिच्याबद्दल आता माझे दोन शब्द!
सईला मी माझी ड्रिमगर्ल म्हटले की ओघाने तिच्या सौंदर्याबद्दल हक्काने बोलणे आलेच. तिची शरीरयष्टी आणि हेल्दी फिगर पाहता ते मला विद्या बालन वा सोनाक्षी सिन्हाच्या पठडीतील वाटते. तथाकथित सौंदर्याच्या निकषात आणि फिगरच्या मोजमापात बसत नसूनही आकर्षक.. निव्वळ आकर्षक नव्हे तर सोबत अपील करणारे, खुणावणारे. तिच्या किंचित चौकोनी / षटकोनी चेहर्यातील वेगळेपण न जाणवते तर नवलच. त्या चौकटीला साजेसेच असे टपोरे डोळे. दातांची कमान उलगडत होणार्या खळखळाटातही हातचे राखून केलेले हास्य. तिच्या केसांच्या कुरळेपणात अडकण्याच्या भितीने त्याबद्दल लिहायचे टाळतो. मधुबाला आणि माधुरी यांनाच सौंदर्याचा बेंचमार्क मानणार्यांना कदाचित तिचे सौंदर्य मानवणार नाही, पण व्हू केअर्स!
सईसारखी हिरोईन मराठी चित्रपटसृष्टीत या आधी झाली नसल्यामुळे तिची तुलना हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींशी करायचा मोह आवरत नाही. मग ते तिचे सौंदर्य असो वा अभिनय. तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीकडे नजर टाकल्यास मला ती बरेचदा कंगना राणावत सारखी वाटते. कंगना हिंदीमध्ये ज्या पठडीतले सिनेमे करते ते मराठीत सईचे देखील हक्काचे क्षेत्र आहे, बनू शकते. अर्थात गरज आहे तसे धाडसी सिनेमे मराठीत बनण्याची. पण तरीही मला वाटते सईमध्ये मराठी चित्रपटसृष्टीची प्रियांका चोप्रा बनण्याची क्षमता आहे. तिच्याप्रमाणेच नायिकाप्रधान सिनेमा एकहाती खेचण्याची क्षमता आहे. मल्टीस्टारर चित्रपटांमध्येही ती ज्या फ्रेममध्ये असते तेव्हा त्या चौकटीच्या कडेला उभे राहूनही बरेचदा ती प्रेक्षकांचा फोकस स्वतावर खेचून घेते. हो, तिच्यावर थोडीफार गॉसिपिंग होते, पण ते करावे अशी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये तीच आहे आणि हेच तिला मराठीतील लेडी शाहरूख खान बनवून जाणार आहे. यू कॅन हेट हर, यू कॅन लव हर, बट यू कॅन नॉट इग्नोर हर .. पण इथेही तेच.. कंगना ते प्रियांका, व्हाया कतरीना, हा प्रवास करण्यासाठी तिला मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांची देखील साथ मिळायला हवी आणि इन्शाल्लाह एक ना एक दिवस ते नक्की होईल, बोलो आमीन !
आभारी आहे,
ऋन्मेऽऽष उर्फ रिशी पकूऽऽर !
(लेख क्रमांक १)
आवड आपली आपली, दुसर काय ?
आवड आपली आपली, दुसर काय ?
फोटो आवडला . बाकी इग्नोरस्त्र
फोटो आवडला . बाकी इग्नोरस्त्र सॉरी
ऋन्मेऽऽष ...मला पण ...खूप
ऋन्मेऽऽष ...मला पण ...खूप आवडते सई......
मागे कोणी तरी तिला गट्टाणी म्हंटलं होतं... शब्द जाम आवडला होता...
फोटो आवडला . बाकी इग्नोरस्त्र
फोटो आवडला . बाकी इग्नोरस्त्र सॉरी >>>> अगदी
अरेरे!
अरेरे!
रच्याकने , (लेख क्रमांक १) हे
रच्याकने , (लेख क्रमांक १) हे आत्ता पाहिलं . ही पण लेखमालिकाकहोणार का?
सहज उत्सुक्ता म्हणून विचारलं , राग नसावा .
बेफी हल्ली दिसत नाहीत .
आबासाहेब, आवड आपली आपली, दुसर
आबासाहेब,
आवड आपली आपली, दुसर काय ?
>>>>>>>
अगदी अगदी, मी सुद्धा शुद्ध मांसाहारी असल्याने मलाही पोळी साजूक तुपातलीपेक्षा म्हावर्याचा नाद आधी लागतो.
स्वस्ति, स्नेहनिल
>>>>>>>
कमाल फोटोचीच आहे खरी, तो आवडला तर वेगळे वाचायची गरज नाही, ते शब्दांत उतरवणे मलाच काय जे.के.रोलिंग बाईंनाही शक्य होऊ नये इतके ते अदभूत आहे.
स्वस्ति,
(लेख क्रमांक १) हे आत्ता पाहिलं . ही पण लेखमालिकाकहोणार का? >>>>>>>>>>>> असेच काही नाही, तरतूद करून ठेवली.
बेफी हल्ली दिसत नाहीत .>>>>>
रिया, अरेरे! कारेरे?
तशीच ती ... दृष्टीपटल व्यापून
तशीच ती ... दृष्टीपटल व्यापून टाकणार्या कॅनव्हासवर पसरली होती! >> हे एवढंच एकदम पटलं..!
देवा!!!!
देवा!!!!
ऋन्मेऽऽष , कधी दुनियादारीच्या
ऋन्मेऽऽष , कधी दुनियादारीच्या धाग्याला भेट दिलीये का हो तुम्ही?
इश्श, लिंक प्लीज अवांतर -
इश्श, लिंक प्लीज
अवांतर - माझ्यासाठी दुनियादारी म्हणजे सई, पण याचा अर्थ सई म्हणजे दुनियादारी नाही
स्नू,
ऋन्मेऽऽष ...मला पण ...खूप आवडते सई......
>>>>>>
मस्तच,
अन्यथा बहुतांशवेळा मी पाहिलेय की स्त्रियांमध्ये ती न आवडण्याचे (किंवा तसे दाखवण्याचे) प्रमाण जास्त आहे. आणि कारणे द्या म्हटले की काहीही न पटण्यासारखी देतात.
इशा, अधिक माहिती साठी वॉअ वर
इशा, अधिक माहिती साठी वॉअ वर पिंग कर
त्या लालभडक बिकिनीमध्येही ती
त्या लालभडक बिकिनीमध्येही ती कुठेही वल्गर वाटत नव्हती आणि म्हणूनच चित्रपटाचे प्रमोशन करायला ते फोटो फिरत होते. माझ्यामते हे जे काही कसब आहे ते हिंदीतील कतरिना कैफ या नटीलाच जमून जावे.>>>>>
धन्य धन्य तुमची.
बघवत नव्हती हो ती त्या बिकीनी मधे. आणि कतरीना बरोबर कुठे तुलना करताय?
सई ताम्हणकर मधे तुम्हाला
सई ताम्हणकर मधे तुम्हाला स्मिता पाटील दिसली हे वाचून तुमच्याबद्दलचा आदर वाढीस लागलेला आहे.
(No subject)
धन्य धन्य तुमची. बघवत नव्हती
धन्य धन्य तुमची.
बघवत नव्हती हो ती त्या बिकीनी मधे. आणि कतरीना बरोबर कुठे तुलना करताय?>>>>>>>>येकदम बरुबर.
कुठे कतरीनाची सिन्हकटी आणी कुठे सईची कमरासाईज कटी.....
हो ना, अंग झाकण्याची पद्धत
हो ना, अंग झाकण्याची पद्धत किंवा झाकली मूठ ही म्हण का सुरू झाली असेल हे त्या सीन मुळे लख्ख कळालं.
मराठीतच आवडायला पाहीजे तर
मराठीतच आवडायला पाहीजे तर मुक्ता बर्वे हजारपटीने चांगली आहे की. आता बिकीनी मधे नाहीये म्हणा. पण बिकीनीच जर पाहायची असेल तर भाषा न बघितलेली बरी.
बाकी
आवड आपली आपली +१
सई ताम्हणकर मधे तुम्हाला
सई ताम्हणकर मधे तुम्हाला स्मिता पाटील दिसली हे वाचून तुमच्याबद्दलचा आदर वाढीस लागलेला आहे. <+१
कुठे कतरीनाची सिन्हकटी आणी कुठे सईची कमरासाईज कटी<<<<+१
मुक्ता बर्वे हजारपटीने चांगली <<<< अरे बाप रे.. 'आपली आवड'
काहीही हा ( जान्हवी ईश्टाईल)
काहीही हा ( जान्हवी ईश्टाईल)
ऋन्मेऽऽष तुमचा हा लेख तुमच्या
ऋन्मेऽऽष
तुमचा हा लेख तुमच्या सईने स्वतः तिच्या ट्विटरवर " रिट्वीट ' केलाय..
अँड यु शुड थँक मी फॉर दॅट..
आणि हो तुमची परवानगी न घेता थेट तिच्या पर्यंत हा लेख पोहचवल्या बद्दल मला माफ ही करा!! प्लिज!!
त्या लालभडक बिकिनीमध्येही ती
त्या लालभडक बिकिनीमध्येही ती कुठेही वल्गर वाटत नव्हती >>> लोल
गोष्टी, माझी आवड मुक्ता
गोष्टी, माझी आवड मुक्ता नाहीये पण ती सई पेक्श्या बरीये इतपतच माझी आवड आहे
ऋन्मेऽऽष तुमचा हा लेख तुमच्या
ऋन्मेऽऽष
तुमचा हा लेख तुमच्या सईने स्वतः तिच्या ट्विटरवर " रिट्वीट ' केलाय..
>>>>>>>>>
सफरचंद, प्लीज हे खरे असेल तर याची लिंक मिळेल का?
प्लीज प्लीज प्लीज !!!!!!
आणि हो, हे खरे असेल तर लाखो करोडो धन्यवाद हे वेगळे सांगायला नको.
राहिला प्रश्न परवानगीचा, तर माझ्या मनातले मी इथे उतरवले याचाच अर्थ मी जगासमोर माझे मन मोकळे केले, मग जग हे मायबोलीपुरतेच तर मर्यादीत नाही ना ..
सर्व सकारात्मक प्रतिसाद धन्यवाद,
आणि ईतर प्रतिसाद, जरा फुरसत मिळताच सर्वांच्या शंका दूर करतो
सईईईईईईई.......ती कुठल्या
सईईईईईईई.......ती कुठल्या साईड ने बरी दिसते हे तरी कळु द्या...चेहरा बोक्या सारखा , डोळे खुप जवळ बटाटे/गट्टाणे , फिगर बद्दल न बोल्लेलं बरं, अॅक्टींग तर जाउच देत.......कपड्यांबाबत ( फॅशन ) बद्दल ही बोंब... फक्त रिव्हिलिंग कपडे घालुन जर आपण हॉट दिसतोय असा (काही ) मराठी तारकां मधे गैरसमज असेल.....तर अशा चॉईस ला ----^----- .... त्या मानाने ती अमृता खानवीलकर कितीही घमेंडी असली तरी ती कोणतेही कपडे चांगले कॅरी करते अस आपलं मला वाटतं.... ( कारण ती मेंटेन आहे अजुनपर्यंत तरी )
तिच्या ट्विटरला फॉलो नाही करत
तिच्या ट्विटरला फॉलो नाही करत तर कसला सख्खा फॅन तिचा! फॉलो करत असतास तर लिंक कशाला मागितली असतीस? छ्ह्या हल्ली फॅन सुद्धा मिलावटभरे आहेत :(:);)
हाहाहाहा
हाहाहाहा
सीमंतिनी, मी ट्विटर या
सीमंतिनी,
मी ट्विटर या प्रकारालाच फॉलो करत नाही.
सई ताम्हणकर मधे तुम्हाला
सई ताम्हणकर मधे तुम्हाला स्मिता पाटील दिसली हे वाचून तुमच्याबद्दलचा आदर वाढीस लागलेला आहे.
>>>>>>>
गण्याभाऊ, पुर्ण पॅरा वाचा ना तो. स्मिता पाटील यांच्या अभिनय आणि अदाकारीची तुलना कोणाशीच नाही हे या पामराने कबूल करऊन चुकलेय. तिचा फक्त नमकहलाल, बी स्पेसिफिक, फक्त नमकहलाल या चित्रपटातील ल्लूक शी तुलना राखलीय
@ सई ताम्हाणकर वर्सेस मुक्ता
@ सई ताम्हाणकर वर्सेस मुक्ता बर्वे
मित्रांनो, आणि मैत्रीणींनो, जर मी चुकत नसेल तर आपण इथे ड्रिमगर्ल या सदराअंतर्गत बोलत आहोत तर दिसणे जास्त मॅटर करते नाही.
बाकी अभिनयाचा विचार करता मुक्ताबाई बर्वे मला फार्फ्रार आवडतात
Pages