मायबोलीचा वर्षाविहार-२००९ मावळसृष्टी येथे १९ जुलै २००९ रोजी संपन्न झाला.
या वविला खालील मायबोलीकरांची (व अर्थातच त्यातील काहींच्या कुटूंबियांची) उपस्थिती लाभली.
पुण्याहून-
yashwardhan, vegayan, atlya, utima, arun, arbhaat, devdattag, ankyno1, kmayuresh2002,
shyamali, dakshina, palli, chandanam, rajya, samir_ranade, kandapohe, himscool, Ramachandrac, aashu_D, krishnag, prabhuneyogesh, SAJIRA, sushya, aarfy, deepurza, limayeparesh
मुंबईहून-
ash_ananya, kavita.navare, pranav.kawle, ashwini_k, gharuanna, vinay_bhide, neel_ved, lalita-preeti, anand_suju, yo.rocks, reena, anandmaitri, chetnaa, Indradhanushya, kedar123, ashbaby, amruitsaya, ladaki, nandini2911, kishormundhe, kiru, amar_kulkarni, aavli, zankaar, needhapa, svalekar, amitdesai
काय काय झाले या ववित? मावळसृष्टीतल्या अरुंद रस्यावरून कशा गेल्या पुणे अन मुंबईच्या ५० सीटर बसेस? लोणावळ्यापेक्षाही उंच असलेल्या मावळसॄष्टीतल्या धबधब्याला गाठण्यासाठी पुन्हा शेकडो फुट खोल जाऊन कुणी कुणी काय काय कष्ट केले? सांस्कृतिक कार्यक्रमात कुणी काय धमाल उडवली? मुकाभिनयात कुणी मारली बाजी, अन कुणी केला अचाट नि अतर्क्य अभिनय? बसमध्ये येता-जाताना कसे कोसळले हास्याचे धबधबे, अन कशा वाहिल्या पांढर्या शाईच्या नद्या? 'मायबोली क्विझ' मध्ये कशी झाली मायबोलीकरांच्या 'ज्ञानाची' चाचणी? खान-पान कार्यक्रमात कोण ठरले सरस? सांस्कृतिक समितीने अन मायबोलीकरांनी कशी उडविली एकेमेकांची विकेट? ववि 'सुखरूप' पार पाडल्याबद्दल कसा झाला संयोजकांचा सत्कार?
प्रचंड उत्साह आणि मायबोलीकरांची विक्रमी हजेरी यासाठी हा 'ववि' लवकर विसरला जाणार नाही, यात शंकाच नाही. या धमाल सहलीत सहभागी झालेले मायबोलीकर, त्यांच्याच शब्दांतील वृत्तांत आणि त्यांच्याच खास भाषेतल्या प्रतिक्रिया लवकरच इथे येत आहेत..
तर, सावरून बसा लोकहो! सादर आहे, तुमच्याच मित्रांनी केलेल्या धमालीचा धमाल वृत्तांत..
अंगांवर
अंगांवर चार थेंब मी तुझ्या अंगावर टाकतो,चार थेंब तू माझ्या अंगावर टाक>>>
नक्की ज्युमाच असेल ती.
धबधब्याखालच्या उत्साही तमाम माबोकरांना लवकर चला, वेळ होतोय, पाण्यातनं बाहेर निघा इ. ओरडेस्तोवर माझा पार घसा बसून गेला.
अरे, मुंबईकर लोकहो, लिहा की पटापटा. हिम्या म्हणतो तसा, कमीत कमी पहिल्यांदा आलेल्यांनी तरी. आशूने तिच्या पहिल्या वविचा वृ टाकलाय पहिलाच. तिला झब्बू म्हणून तरी टाका.
---
असं एखादं पाखरू वेल्हाळ..
मंजू, सगळे
मंजू, सगळे वेळेवर आले गं. नीरजाचा पाय मात्र आज दुखत असेल कारण काल ३-४ दा बस च्या हिसक्यांनी मी तिच्या पायांवर पडले होते.
***************
ॐ नमश्चण्डिकायै |
साजिर्या,
साजिर्या, साफ चूक..
अश्विनीने उत्तर दिलेच आहे की वरती. केदार आणि केदारीण!
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
नी तुच का
नी तुच का ती?
ज्युमाच
ज्युमाच असेल ती. >> अरे ज्युमा ने मि.ज्युमाला कॅमेरा,तिचे जर्कीन,मोबाइल सांभाळायला उभा केला होता त्याला काही भिजू नाही दिलं शेवटपर्यंत
केश्वीनीला बक्षिस केदारा
--------------------------------------------
कैसे मुझे तुम मिल गयी .......
मी?
मी? नवपरीणित जोडपे?
दक्षे ताप आलाय का?
मी एकटीच आले होते आणि माझं लग्न होऊन ७ वर्षं होऊन गेली..
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
नी, अगं
नी, अगं उशीरा आलेली तूच का ती? असं विचारतेय दक्षिणा .......
मी तो प्रश्न असाच सर्वांसाठी विचारला होता
नवपरिणीत जोडपी होती ना बरीच मुंबईच्या बसमध्ये... म्हणून
जल्ला मी
जल्ला मी लिवलाय ना वरती, सही पण ठोकलेय कि एक ओळीचा वृ. म्हणुन. ती सहीच वाचा "रिड बिटवीन द" स्टाईलने वृ. म्हणुन हा.का.ना.का.
-------------------------------------------------------------------------
इतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार
अंगांवर
अंगांवर चार थेंब मी तुझ्या अंगावर टाकतो,चार थेंब तू माझ्या अंगावर टाक>>>
जोडप्याचे माहीत नाही पण एक तिडपे होते तिथे. (आपल्या मेंबरांच्या (वरची दीप्याची सुचना कॉपी) कळपातील नव्हते. ) फक्त ते तिरपे होऊन बरेच काही थेंब उडवत होते व खिदळत होते.
नी उशिरा
नी उशिरा आलेली तुच का ती असं विचारलंय.
तुला खूप झोप आलिये बहुधा..
कांदापोहे>>
कांदापोहे>>> अगदी अगदी त्या तिडप्यांच्यामुळे मी, पल्ली,चंदना बच्चु कंपनीला घेऊन लवकर वरती परत गेलो. (हे तेच तिपडे म्हणतोयस ना माबोबाहेरचे)
-------------------------------------------------------------------------
इतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार
.
.
फक्त ते
फक्त ते तिरपे होऊन बरेच काही थेंब उडवत होते व खिदळत होते.<<
हो ते भयाण होते.. आणी तिरपे होऊन नाही तर साधारण आडवे होऊन नानाविध कृत्ये करत होते
मंजे, ही ही ही..
दक्स, लिहिल्यावर कळले.. पण ट** उशीरा येणारी मीच असेन असं का वाटलं तुला?
उशीरा आली ती बस. आणि उशीरा येण्याची शक्यता दाट असलेली मुलगीही वेळेवर आली होती. ती मी नव्हे. ती रिना.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
इतक्या
इतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार
आशु खुप छान लिहिलाहेस व्रु..
हो खरंय
हो खरंय खरंय.. दक्षी पण ना.. जोरात उरडून त्यांना दचकवलं आणि बाकिच्यांना जी मजा बघायला मिळाली असती त्या मजेला सगळे मुकले..
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
धमाल आली
धमाल आली ववि ला...
खूप मस्त वाटलं
पण आजारपणामुळे पाण्यात खेळता आलं नाही, आणि वेफर्स आणि बाकरवड्या हादडता आल्या नाहीत याची मात्र जबरदस्त खंत वाटतेय...
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!
नी डे, अगं
नी डे, अगं काय करू? माझे डोळेच हलेनात त्यांच्यावरून...
वर आणि त्या माणसाची मजाल पाहीलीस? दोघी दोघींना घेऊन बसला होता..
अरे पांशा...
अरे पांशा... पांशा... ट्रक... टँकर.. काय पाहिजे ते घेऊन या....
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"
नी डे?? दी
नी डे??
दी ऐकलं होतं पण डे? शोभा डे च्या चालीवर नामकरण केलंस की काय माझं?
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
अरे पांशा...
अरे पांशा... पांशा... ट्रक... टँकर.. काय पाहिजे ते घेऊन या....>>>> ते गेलं धबधब्यात वाहून
दक्स, आम्ही ते भयानक दृष्य पाहून पुढे सटकलो.
***************
ॐ नमश्चण्डिकायै |
ते गेलं
ते गेलं धबधब्यात वाहून >> अच्छा.. म्हणूनच एका बाजूने धबधब्याचे पाणी पांढरे शुभ्र आणि दुसर्या बाजुने चहा होता काय........
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"
नको तिथं
नको तिथं जास्त लक्ष दिलं आणि हवं तिथं नाही दिलं तर धबधब्यात सटकणारच ना!
दक्षिणा, तुला नक्की राग कशाचा आला होता? ते आपल्यात जलक्रीडा करत होते याचा की तो कन्हैया २-२ गोपींना घेऊन बसला होता याचा की त्या गोपींना कन्हैयासोबत खेळता आलं आणि तुला नुसतंच पाहावं लागलं याचा?
आशु
आशु
_____________________________
जिंदगी की असली उडान बाकी है अभी, अपने इरादों का इम्तिहान बाकी है अभी I
अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन , आगे सारा आसमान बाकी है अभी II
अच्छा..
अच्छा.. म्हणूनच एका बाजूने धबधब्याचे पाणी पांढरे शुभ्र आणि दुसर्या बाजुने चहा होता काय........>>> तू नाही पाहिलंस ते दृष्य? मला मसाला चहाचा वास आल्या आल्याच मी पुढे पळून गेले. त्यामुळे मी फकस्त धब्धब्याचे शुभ्र पाणी व त्यात धमाल करणारे माझे मुंबई पुण्याचे मित्र मैत्रिणीच पाहिले
***************
ॐ नमश्चण्डिकायै |
.
.
अरेरे! काय
अरेरे! काय ही टंचाई? >> बरोबर, प्रभुणे तय्यारच होते तिथे.. श्या दुर्लक्षच झालं नाही त्यांचं
--------------------------------------------
कैसे मुझे तुम मिल गयी .......
'नेमेची
'नेमेची येतो मग पावसाळा!
असे आपण म्हणतो पण हा पावसाळा येण्याची आपण अगदी आतुरतेने वाट पहात असतो!
मायबोलीकर तर अगदी चातका सारखी वाट पहात असतात!
वर्षा विहार सहल असते ना! खुप सारे मायबोलीकर दिवसभर एकत्र भेटणे ही पर्वणी म्हणजे कुंभमेळाच जणू!
तर यंदा ह्या कुंभमेळ्याचा कुंभ मावळसृष्टीला १९ जुलैला ठेवण्यात आला. पावसाने पहिला महीना अंत पाहिल्यावर
जुलै च्या दुसर्या आठवड्यात त्या इन्द्रदेवाला बहुतेक दया आली आणि वरूणाला त्याने आदेश दिला "बाबारे जा त्या! मायबोलीकरांची निराशा नको करूस!"
आणि मुंबई पाठोपाठ पुण्यालाही जलाधारांनी सुखावले आणि वविच्या हालचालीना जोर चढला! सगळी नांवे जमविता करता संयोजकांनी अथक परिश्रम घेतले आणि १९ च्या पाहाटे मुंबापुरी तर प्रात:समयी पुण्याहून मावळसृष्टीकडे रथ निघायचे ठरले!
मी देखिल शनिवारी लवकर झोपून लवकर उठण्याच्या मनो निश्चय केला आणि सहाय्यार्थ भ्रमणध्वनी वर 'घनश्याम सुंदराचा' गजर पण लावला ठिक ६ वाजताचा! आर्थात गरज नव्हती. कारण पहाटे जाग आली जरा लवकर तशी झोपच येईना न जानो झोप लागली आणि गजर नाही ऐकू आला तर!
पण ५.५५ लाच भ्रमणध्वनी खणखणला आणि त्यातून 'घनश्याम...' ऐवजी 'जय जय महाराष्ट्र माझा' हे बोल खणाणले!
पहातो तर त्यावर 'आनंद केळकर' असे नांव झळकले! अस्मादिकांचा विश्वास बसेना! वाटले मुंबईकर रात्रीच निघाले की काय?
फोन उचलताच भारदस्त आवाज आदळला "मी मुलुंडला पोहोचलोय तुम्ही कुठे थांबला आहात?" मी बिचकतच म्हटले अजून अंथरुणातच आहे…......
क्रमशः
-------------------------------------------------------------
'ज्याला कलाकार नाही बनता येत तो टीकाकार बनतो'
दिप्या ..
दिप्या .. :D....हळू बोल रे ...
_____________________________
जिंदगी की असली उडान बाकी है अभी, अपने इरादों का इम्तिहान बाकी है अभी I
अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन , आगे सारा आसमान बाकी है अभी II
मी बिचकतच
मी बिचकतच म्हटले अजून अंथरुणातच आहे…...... >>>किशोर
दिप्या
दिप्या सहि जब्बाब
Pages