हुश्श! दमले बाई! आता तुम्हा सगळ्यांशी बोलायला मी मोकळी. बरं चहा घेणार का तुम्ही? काय बाई विचारतेय मी हे! हो म्हणालात तरी इतक्या लोकांसाठी चहा थोडीच करता येणार मला एकटीला. पण काय आहे ना की आमच्या घरी आल्या गेलेल्याला आलं घालून चहा द्यायची पद्धत आहे. देसायांनी आमचंच बघुन सवय लावून घेतली हो! पण त्यांना शोभतं चहा देणं. त्यांचा काही आमच्या एवढा मोठा गृहौद्योग नाही. त्यांना काही म्हणणार नाहीत लोकं पण आम्ही किमान बासूंदी विचारायला हवी ना लोकांना ? पण आईंनी काटकसरीच्या सवयी लावून ठेवल्यात त्यामुळे आम्ही चहाच विचारतो. आता तुम्ही माझं म्हणणं ऐकायला आलाय म्हणल्यावर तुम्हाला काही तरी द्यायला हवं पण मी फार दमलेय त्यामुळे समजून घ्या.
तुम्हाला वाटत असेल हिला दमायला काय झालं? घरात एवढ्या ७ बायका. हिला कामं तरी असतात काय? पण असं नाहीये अजिबात. आई म्हातार्या. त्यांना चष्मा लावून पेपर वाचण्याशिवाय आणि आम्हाला सतत ओरडण्याशिवाय इतर काम करवत नाहीत. आणि जान्हवीला घरात रूम्स सापडत नाहीत. तिथुन सुरुवात आहे. म्हणलं जरा सुन आली घरात आता तरी आराम मिळेल तर कसलं काय! ती डोक्यावर पडली आणि कामं (परत) माझ्या(च) गळ्यात पडली.
बर शहाणपणा हिचा काय सांगू तुम्हाला? आधी त्या ४ जणी असायच्या सोबत तर मदत व्हायची. पण या बाईने त्यांना कामाला लावून दिलं आणि सासूला ठेवलंय घरातच. सासूच्यातले गुण नाही दिसले कधी हिला ते. सुनवास सुनवास म्हणतात तो हाच हो! लोकांना वाटतं गुणाची सुन माझी. पण तोंड दाबून बुक्यांचा मार म्हणजे काय ते माझं मलाच माहीत.
आणि एवढ्या १० -१२ जणांचं काम एकटी सुन कशी करेल हे लक्षातही नाही आलं आमच्या आईंच्या. इतर वेळेला मारे 'याला समजुन घ्या, त्याला समजुन घ्या' चा गजर करत फिरत असतात. स्वतःच्या सुनेला समजुन घ्यायची वेळ आली की कुठे जाते यांची बुद्धी? पण बोलणार कोणाला? बेबीपुढे काही बोलायची सोय नाही. नुसती चोंबडी आहे ती. लग्गेच पळत जाऊन आईंना सांगेल. सरूला काही सांगावं तर अत्यानंद महाराजांच्या मठात घेऊन जाईल आणि शरयूला काही सांगायचं तर तिसरं वाक्य बोले पर्यंत ही पहिलं वाक्यच विसरून जायची. इंदू वहिनींना काय बोलणार? माझीच वाक्य मला ऐकवत बसतील नाही तर इंग्रजी मधे त्याची चिरफाड करतील.
आणि बाकीचे राहू द्यात. आमच्या यांना कळायला नको? इतके वर्ष बायकोला एकटीला सोडुन गेले आणि आता या वयात उगवलेत परत. शरयू- कांतांच तरी बरं...रोमान्स तरी करता येतो. आमचं काय??? नुसतं पदर घ्या, तोंडाला लावा आणि रडत बसा.
तुम्हाला म्हणून सांगते रात्री पदर पिळला ना की एक बादली पाणी जमा होतं. दिग्दर्शकाला म्हणाले काही नाही तर किमान साडीला स्पंज तरी बसवून दे तर म्हणतोय कपडेपटावर जास्त खर्च नाही करत मराठी मालिकांमधे आणि तसं पण म्हणे मालिकेची हिरोईन जान्हवी आहे.
ही कसली ओ हिरोईन? तिच्या आयुष्यात काय वेगळं घडत सांगा? तिची आणि श्रीची लव्हस्टोरी मग तिचं आमच्या घरात सेटल होणं मग तिने सगळं विसरणं आता परत तिची आणि श्रीची लव्हस्टोरी सुरू झालीये आता पुन्हा घरात सेटल होणे फेज सूरू आहे आणि मग पुन्हा??????
असो! मी नाही बाई काही बोलत. श्री साठी ती सायलीच बरी होती. किमान श्रीला घेऊन घरा बाहेर तरी गेली असती. ही काही आम्हाला सोडत नाही. जाते येते जाते येते. आणि श्रीला तर काही अक्कलच नाही. एकतर ही अशी बायको केलीये. किमान आईला आईपणाचा मान तरी द्यावा. माझा मुलगा माझ्या घरात सगळ्यांना आई म्हणतो???
कधी कधी तो म्हणतो ना की 'माझं माझ्या आयांवर फार्प्रेम आहे' तेंव्हा तर मला भितीच वाटते की तो जन्मला तेंव्हा तिथे असलेल्या आया बद्दल बोलतोय की काय हा पण सध्या तरी विग्नेश्वर कृपेने माझ्या प्रेमात फक्त ५ च वाटेकरी आहेत.
प्रेमाचं राहू द्या पण आई म्हणुन मला द्यायची काही किंमत ही देत नाही हा. बाहेर जायचं तर बेबी वन्सना विचारून जातो. त्या बेबी वन्स परवा जान्हवी बद्दल बोलताना म्हणे 'लग्न झालेल्या मुलीने किती दिवस माहेरी रहायचं?' मी वाकडा डोळा करुन पाहिलं ही त्यांच्याकडे पण डोळ्याला लावलेल्या पदरामुळे दिसलं नसावं ते कोणाला. हां तर मी काय सांगत होते हा आमचा श्री... बाहेर जाणार तर बेबी आई ला सांगून, अफेअर बद्दल सांगणार शरयू आईला, बाकी सगळं सांगणार आई आजीला, जान्हवीसाठी केलेली चोरी सांगणार सरू आईला, सतत आवतीभवती फिरणार जान्हवी आईच्या आय मिन जान्हवीच्या ! सख्ख्या आईची काही कदर नाही कार्ट्याला. एक मिनिट कधी माझ्या कडे यावं काही दुखतं खुपतं का बघावं.. पण कशाचं काय... त्या शशिकला बाईंचं नशिब तरी थोर हो! किमान सावत्र पोरगी घरात कामं करते, पैसे देते, प्रेम करते, सगळं ऐकते. त्यांनी हिच्यासाठी टकला आपटे बघितला तरी जान्हवी काही म्हणाली नाही. आणि आमचं कार्ट! आम्ही बघितलेली सोन्यासारखी मुलगी न बघताच दुसरी घेऊन आला. आला ते आला ती पण ही अशी.... एखाद्या भागात तिला ५ वेळा 'काहीही हं श्री' म्हणायला लावलं तर पुर्ण मालिकाच त्यात संपवून टाकेल ही!
आता मात्र मी ठरवलंय खुप सहन केला अन्याय. काल देसायांच्या घरात मेघनाच्या आईने जे काही केलं ते पाहून मीही ठरवलंय की अन्याय सहन नाही करणार.
आता यांना सांगते घरात नोकर-चाकर आणा. आणि तुमच्या अमेरिकेतल्या मुलीला भारतात बोलवा. तिला अर्चू कडे ट्रेनिंग घ्यायला पाठवते आणि मी प्रांजलच्या आईकडे जाते ट्रेनिंग घ्यायला. त्याचं काय आहे ना की घरात नोकर ठेवले तरी त्यांच्याकडुन कामं करुन घेता यायला हवीत ना.
पण पुन्हा एक प्रॉब्लेम आहे. आमच्या श्रीने त्यांना सखू आई आणि शांता आई करुन टाकलं आणि पुन्हा सगळी कामं मलाच करावी लागली तर???????????????????
शरयू- कांतांच तरी
शरयू- कांतांच तरी बरं...रोमान्स तरी करता येतो. आमचं काय??? नुसतं पदर घ्या, तोंडाला लावा आणि रडत बसा.>>>
एक नंबर लिहिलयंस रिया. मी
एक नंबर लिहिलयंस रिया. मी फारसे भाग नाही पाहिलेत या मालिकेचे. पण जेवढे पाहिलेत त्यावरून मलाही नर्मदाबाईंचे पात्र सगळ्यात दयनीय वाटले.
तंतोतंत पटले तू लिहिलेले.
रीया, जबरी आहे
रीया, जबरी आहे
मामांचे जान्हवी बद्दल चे
मामांचे जान्हवी बद्दल चे प्रतिसाद तिला पाठवायलाच हवेत. शशांक केतकर शिवाय अजून कुणी तरी आपले फॅन आहे हे कळल्यावर ती नक्कीच खूश होईल.
कदाचीत आच्छर्यचकीत पण.
ओये सामी....अगं सार्या
ओये सामी....अगं सार्या डोंबिवलीतील तमाम जनता जान्हवीचे फॅन्स आहेत.....तुम्हालाच ती कशी काय आवडत नाही....तेच कळेनासे झाल्येय मला.....देव करो आणि तुमचे तिच्याविषयीचे मत बदलो. चांगली पोरगी आहे.
मामा, कोणी सांगितलं
मामा, कोणी सांगितलं डोंबिवलीकर जनता जान्हवीची फॅन आहे? काहीही हा मामा.
वन अँड ओन्लि फॅन जान्हवीचे कोल्हापुरचे 'श्री. अशोकमामा पाटील'.
डोंबिवलीकर जनता जान्हवीची फॅन
डोंबिवलीकर जनता जान्हवीची फॅन आहे >> माझ्या ओळखीची तमाम डोंबिवलीकर जनता तिच्या नावाने खडे फोडत असते असलं पात्रं आहे म्हणून!
स्पार्टा सॉलिड,
स्पार्टा सॉलिड, डोंबिवलीकरांची बाजू नीट मांडल्याबद्दल धन्यवाद.
धमाल लिहिलंय! अशोक मामांनी
धमाल लिहिलंय! अशोक मामांनी हिरीरीने जान्हवीचं वकीलपत्र घेतल्याने प्रतिसाद वाचायला अजून मजा आली !
रीया, आता ठो धाग्यावर पण एन्ट्री दे!
माझ्या ओळखीची तमाम डोंबिवलीकर
माझ्या ओळखीची तमाम डोंबिवलीकर जनता तिच्या नावाने खडे फोडत असते असलं पात्रं आहे म्हणून! > +१ त्या बावळट ढोल जान्हवीची आमच्या डोंबिवलीची तमाम जनता वगैरे अजिबात फॅन नाही.
मस्त लिखाण
मस्त लिखाण
हाहाहा सॉलिड लिहिला
हाहाहा सॉलिड लिहिला आहे
तुम्हाला म्हणून सांगते रात्री पदर पिळला ना की एक बादली पाणी जमा होतं. दिग्दर्शकाला म्हणाले काही नाही तर किमान साडीला स्पंज तरी बसवून दे >>> हे तर फार आवडल
पण जान्हवी खरोखर बारीक झालीय
पण जान्हवी खरोखर बारीक झालीय बिच्चारी !!>>>>>>>>>. कुठुन??? आणि ती आधी बरी तरी दिसायची ...विसरल्या पासुन कॉन्स्टिपेशन झाल्यासारखा चेहरा करुन असते....नो डाउट, ती गोंधळलेली दाखवणे स्वाभविक आहे.. पण तीचा तो ग्रेट अभिनय अती होतोय.... मी त्या सहा आयांपैकी कोणीही असते तरी इरिटेट झालेच असते....
थँक्स लोकहो जिज्ञासा, मला
थँक्स लोकहो
जिज्ञासा, मला फार इच्छा होती पण आता जाऊ देत

तुझ्यासाठी एखाद्या उतार्यावर ट्राय मारेन
अनू, मी ६ सासवांपैकी एक असते तर एक थोबाडीत ठेवून दिली असती तिच्या
मामा, कसे ना तुम्ही? आम्ही रोज तुमची प्रेमाने चौकशी करतो तर आमच्याशी त्या ढोली साठी भांडताय. ती विचारते का प्रेमाने तुम्हाला कधी काही?
अगं रीया....मैने तुमच्याशी
अगं रीया....मैने तुमच्याशी कब्बी भांड्या नै उसके खातीर. बिचारीला तुम्ही एकटीला टाकले आहे, त्याचे वाईट वाटते...."ढोली ढोली" म्हणून तुम्ही उलट तिला दिवसेदिवस बारीक करीत चालला आहात. प्रेमाने सर्वांसाठी सकाळी उठून नाष्टा करीत असताना ती इंदू तिच्यावर करवादली....शाबू वाया घालविले म्हणून......अरेच्या, वाया जातील कसे? करून टाका ना त्याचीही खिचडी....."सायंकाळी तू जेवण कर..." असे तिला न सांगताच तिची वाट बघत ह्या पंचकन्या खुर्च्यावर रेलून बसल्या आहेत....आणि एका शब्दानेही हीला सूचना नाही....वेळाने आली, तेही नवर्याने कॉफीला नेले म्हणून....तर ह्या सार्या रुसल्या चिडल्या आणि उपाशी जाऊन झोपल्या......ह्याला काही अर्थ आहे का ?
छळा...पण त्याला काही शिस्त तरी द्या.
त्या मंद आहेत्च पण हीही ढोली
त्या मंद आहेत्च पण हीही ढोली आणि रडकी आहे
हे देवा....काय करावे ह्या
हे देवा....काय करावे ह्या रीयाचे ???
सायंकाळी तू जेवण कर..." असे
सायंकाळी तू जेवण कर..." असे तिला न सांगताच तिची वाट बघत ह्या पंचकन्या खुर्च्यावर रेलून बसल्या आहेत....आणि एका शब्दानेही हीला सूचना नाही....वेळाने आली, तेही नवर्याने कॉफीला नेले म्हणून....तर ह्या सार्या रुसल्या चिडल्या आणि उपाशी जाऊन झोपल्या......ह्याला काही अर्थ आहे का ?>>>>> हो, हा प्रसन्ग मला पण अजीबात आवडला नव्हता. टुणटुण/ मनोरमा/ गुड्डी मारुती साईज बेबीने उगाच थयथयाट केला.:राग:
आधी मला वाटले की ते मजेत चालले आहे, नन्तर कळले की खरच आहे ते. आई आजी पण बेबीला समजावताना म्हणाल्या की बेबी तुझा तुझ्या रागावर कन्ट्रोल नाहीये हे सगळ्याना माहीत आहे.
अरेच्च्या! रागावर कन्ट्रोल नाही याचे कौतुक? असो, प्रतीसाद फार लाम्बला.:फिदी:
व्वा...व्वा.....रश्मी.... थॅन
व्वा...व्वा.....रश्मी....
थॅन्क्स....चला, निदान एका मुलीने तरी आमच्या जान्हवीची बाजू घेतली....किमान हे तरी सुख आहेच.....
[ आता रीया फणफणत येईलच म्हणा....रश्मीचे मुद्दे खोडून टाकायला...]
हे रियु खुपच छान लिहलय्स
हे रियु
खुपच छान लिहलय्स
जाते येते जाते येते.<<<
जाते येते जाते येते.<<<
Pages