पुण्यातील विसर्जन मिरवणूक - मानाचे पहिले पाच गणपती

Submitted by आशुचँप on 10 September, 2014 - 05:44

दरवर्षीप्रमाणे यंदाही मायबोलीकरांसाठी पुण्याची शान असलेल्या मानाच्या पहिल्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणूकीची क्षणचित्रे सादर करत आहे.
नेहमीप्रमाणेच थाटात झालेल्या या मिरवणूकीत यंदा प्रचंड गर्दीने उच्चांक गाठला. कित्येक वेळेस पोलिस आणि पोलिस मित्रांची तारांबळ उडाली. कित्येक ठिकाणी चेंगराचेंगरी आणि धक्काबुक्की अनुभवयाला मिळली.

सुंदर रांगोळ्यांच्या पायघड्या

कामायनीच्या विद्यार्थ्यांचे बँड पथक

पोलिसांचा चोख बंदोबस्त

आज्जींचा ओसंडून चाललेला उत्साह

कलाकारांचे पथक

सुनील अभ्यंकर

तेजस्विनी पंडीत आणि तिच्यामागे माधवी सोमण

आस्ताद काळे....हा नंतर जाम वैतागला होता. काही छायाचित्रकारांशी वाजले पण त्याचे. त्याच्या मागे अजय पुरकर

राधा ही बावरी मधला सौरभ

अहो खरंच मीच आहे सौरभ

अहो गोखले, तुम्ही अजून मेहनत घ्यायला हवी बरं का....इती हऱषिकेश जोशी Happy

नीट बांधा अजून...करकचून --- प्रसाद ओक

मराठमोळं सौंदर्य - ऋजुता देशमुख

इरसाल जावई केतन क्षीरसागर

दोस्त माझा मस्त

उंच माझा झोका मधली तेजश्री वालावलकर

जय मल्हार खंडेरायाचे पुण्याच्या महापौरांकडून कौतुक

आणि सौरभच्या वादनाचेही

मानाचा दुसरा गणपती....तांबडी जोगेश्वरी मंडळ

पावसापासून बचाव करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पालखीवर आच्छादन केले होते.

अतिगर्दीमुळे हे असे प्रकार वारंवार घडताना दिसत होते

महापौरांची फुगडी

सुह्द गोडबोले आणि आदिनाथ कोठारे

गुलालविरहीत विसर्जन मिरवणूक करण्याच्या आवाहनाला पुण्याचा राजा - गुरुजी तालिम मंडळाने दिलेला प्रतिसाद

मानाचा तिसरा - गुरुजी तालिम मंडळ

छायाचित्रकारांची कसरत

मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके

मानाचा चौथा - तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

मानाचा पाचवा - केसरी गणेशोत्सव मंडळ

वेतचर्माची प्रात्यक्षिके

भाविकांचा महापूर

केसरीवाडा सायंकाळी सव्वासातच्या सुमारास विसर्जित झाला आणि भाविक घरोघरी परतले. पण थोडक्या विश्रांतीनंतर रोषणाईचे गणपती पाहण्यासाठी पुन्हा एकदा लक्ष्मीरस्ता ओसंडून वाहू लागला.

पाय थकले होते, दमणूक झाली होती पण उत्साह कमी व्हायचे नावच घेत नव्हता आणि वाढत्या रात्रीबरोबर तो वाढतच राहीला....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद ...

सिमा आणि शुभांगी - पिकासा बॅन आहे का तुमच्या इथे...कारण सगळे फोटो पिकासा वापरून टाकलेत.

आशुचाम्प, मीच तिच्या सिरीयल पाहत नाही. सध्या गंध फुलांचा गेला सांगून ह्या इ टीव्हीवरच्या सिरीयलमध्ये ती आरोही ह्या नायिकेची आई आहे 'सुलभा कुलकर्णी', सर्फिंग करताना तिचा शॉट चालू असेल तरच मी बघते, एरवी ती सिरीयल सहनशक्तीच्या पलीकडे आहे माझ्या. -- हा हा हा लय भारी Happy

दक्षिणा - माहितीबद्दल धन्यवाद Happy

हो ना आधीची 'राधा हि बावरी' ही सिरीयलपण माझ्या सहनशक्तीच्या बाहेरची होती. 'पितृऋण' ह्या चित्रपटात पण ती होती आणि तिचे प्रीमियरमधले फोटो मी इथेच बघितले होते बहुतेक 'हर्पेन' यांनी ते फोटो टाकले होते.

खरच सुंदर्..अप्रतिम्..ऑफीसम्ध्ये बाकीच्यांना मेल केले तर चालेल का?

फोटो बघताना अन्गावर काटा आला अन डोळ्यात पाणी ............
प्रचन्ड जीवन्त फोटो आहेत सगळे....
>>>>
माझ्यापण डोळ्यात पाणी येत..नक्की का बर?सकाळपासुन माबो वर जिथे जिथे गणपतीचे फोटो पाहीले तेव्हा तेव्हा...

शोभा, मल्लीनाथ, मामी, इंद्रा, सिमा, चंचल...

धन्यवाद सर्वांना

फोटो बघताना अन्गावर काटा आला अन डोळ्यात पाणी ............
प्रचन्ड जीवन्त फोटो आहेत सगळे....

वाहवा...सगळ्या कष्टांचे चिज झाले...फारच सुंदर प्रतिसाद...

ऑफीसम्ध्ये बाकीच्यांना मेल केले तर चालेल का?

हरकत काहीच नाहीये. पण मी मुद्दामच हे फोटो प्रताधिकारमुक्त ठेवलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी आपापल्या जबाबदारीवर फोटो वापरावेत. याचा दुरुपयोग करू नये किंवा कुणी स्वतच्या नावावर खपवू नयेत अशीच कळकळीची इच्छा आहे.

हो गेल्या वर्षी जास्त मजा आली होती. यंदा लाईटपण भिकार होता. कितीतरी फोटो खराब स्काय मुळे वाया गेले. आणि गर्दी काय मरणाची होती. वाट लागली पार

अरे आशु तुझ्या सारखा पत्रकार असलेला माणूस असे म्हणायला लागल्यावर सामान्यांनी काय करायचे.. त्यांना तर फोटो काढताच येणार नाहीत की मग...

गुरुजी तालीमच्या लोकांना एकदाच काय तो दणका दिला पाहिजे पोलिसांनी गुलाल उडवतात त्या संदर्भात. त्याच्या शिवाय सुधरायचे नाहीत ते..
पहिले दोन गणपती अजिबात गुलाल न उधळता जातात आणि तिसरा गणपती आला की सगळा रस्ता लाल करुन टाकतात..
आणि वर गणपती चौकात प्रचंड वेळ घालवतात तो वेगळाच..

अरे पत्रकारपण हाडामासांचाच असतो...त्याच्या पायावर कुणी पाय दिला की त्याला पण दुखतेच ना. मला तर च्यायला त्या शिवगर्जनामधल्या एकाची टिपरी बसली टण्णदिशी डोक्यावर...थोडक्यात डोळा आणि चष्मा वाचला...तरी मी जितका अंग चोरून जाता येईल तितका जात होते. पण हे लोक आजूबाजूला काय बघतच नाहीत.

गुरुजी तालीमच्या लोकांना एकदाच काय तो दणका दिला पाहिजे पोलिसांनी गुलाल उडवतात त्या संदर्भात. त्याच्या शिवाय सुधरायचे नाहीत ते..
पहिले दोन गणपती अजिबात गुलाल न उधळता जातात आणि तिसरा गणपती आला की सगळा रस्ता लाल करुन टाकतात..
आणि वर गणपती चौकात प्रचंड वेळ घालवतात तो वेगळाच..

अगदी अगदी...आणि वर पुन्हा म्हणतात की आमचा गुलाल चांगल्या दर्जाचा असतो. काही अंशी खरे आहे...कॅमेरा वाचवायला मी झटदिशी पाठमोरा वळलो आणि सगळी कॅमेरा बॅग गुलालाने माखून निघाली. ती झटकतोय तोवर अजून गुलाल आला अंगावर...पण चिकटून बसला नाही आणि रॅशेस पण नव्हते.

तरीही गुलाल बंद व्हायला हवा हे मात्र नक्की. पण या मंडळाचे बहुंताश पदाधिकारी मात्तबर आहेत वर अनेक पत्रकारही त्यांच्या मंडळात आहेत. त्यामुळे कुणीच विरोधात बोलत नाहीत.

शिवगर्जनामधल्या एकाची टिपरी बसली टण्णदिशी डोक्यावर...थोडक्यात डोळा आणि चष्मा वाचला...>>>>>>>>नशीब! तू हेल्मेट घालूनच फ़िरत जा. Happy

क्या बात है, आशु!!!!

निव्वळ अप्रतिम

सगळेच फोटो एक से बढकर एक आणि crystal clear. Happy

रच्याकने, हा धागा मायबोली गणेशोत्सव २०१४ मध्येसुद्धा अ‍ॅड कर ना. Happy

बेलबाग चौकात राडा असतोच पण.. प्रत्येक चौकात राडा असतो... मधल्या पॅच मध्ये जरा रिकामी जागा मिळते...

यंदा ढोलताशा पथकांनी पण बर्‍याच गोष्टी नीट पाळल्या नाहीत म्हणे... चाळीस ढोल अपेक्षित असताना ८० ढोल होते कितीतरी पथकात.. यंदा तर कुत्र्याच्या छत्र्यांसारखी ढोलपथकं नवीन आली आहेत... एका ओळीत तीन ढोल जर असतील तर बर्‍यापैकी मॅनेज होऊ शकेल गर्दी पण ते पाळतच नाहीत.. आणि मग वाजवायला जागा मिळावी म्हणून गर्दीला मागे ढकलले की नुसती झुंबड उडते... रात्री दोन वेळा हा अनुभव आला.. घराच्या भिंतीपाशी असणारे तर चिरडलेच जातात अश्यावेळेस..

वाह ..अप्रतिम फोटो!!
सगळेच फोटो एकापेक्षा एक सुंदर आलेत .. २-३ दिवस मिस करतंच आहे ही मिरवणुक
धन्यवाद आशुचँप Happy

प्रचन्ड जीवन्त फोटो आहेत सगळे....>> +१
मलाही प्रत्यक्ष बघायचंय कधीतरी पण गर्दी, चिरडाचिरडी वगैरेच्या भितीमुळे कधी गेले नाहिये Sad

खूप छान फोटो...आपल्या पुण्याचा गणपती १९७२ सालानन्तर पाहिला नाही. अगदी समाधान झाले.

वाह!! सुंदर आलेत फोटोज , अगदी सर्वच्यासर्व!!!

एव्हढ्या गर्दीत कसली चेंगराचेंगरी होत असेल.. इथे एक ही फोटो हाताला धक्का न लागू देता काढणे म्हंजे चांगलीच कसरत केली असशील तू .. ग्रेट जॉब!!!

Pages