पुण्यातील विसर्जन मिरवणूक - मानाचे पहिले पाच गणपती

Submitted by आशुचँप on 10 September, 2014 - 05:44

दरवर्षीप्रमाणे यंदाही मायबोलीकरांसाठी पुण्याची शान असलेल्या मानाच्या पहिल्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणूकीची क्षणचित्रे सादर करत आहे.
नेहमीप्रमाणेच थाटात झालेल्या या मिरवणूकीत यंदा प्रचंड गर्दीने उच्चांक गाठला. कित्येक वेळेस पोलिस आणि पोलिस मित्रांची तारांबळ उडाली. कित्येक ठिकाणी चेंगराचेंगरी आणि धक्काबुक्की अनुभवयाला मिळली.

सुंदर रांगोळ्यांच्या पायघड्या

कामायनीच्या विद्यार्थ्यांचे बँड पथक

पोलिसांचा चोख बंदोबस्त

आज्जींचा ओसंडून चाललेला उत्साह

कलाकारांचे पथक

सुनील अभ्यंकर

तेजस्विनी पंडीत आणि तिच्यामागे माधवी सोमण

आस्ताद काळे....हा नंतर जाम वैतागला होता. काही छायाचित्रकारांशी वाजले पण त्याचे. त्याच्या मागे अजय पुरकर

राधा ही बावरी मधला सौरभ

अहो खरंच मीच आहे सौरभ

अहो गोखले, तुम्ही अजून मेहनत घ्यायला हवी बरं का....इती हऱषिकेश जोशी Happy

नीट बांधा अजून...करकचून --- प्रसाद ओक

मराठमोळं सौंदर्य - ऋजुता देशमुख

इरसाल जावई केतन क्षीरसागर

दोस्त माझा मस्त

उंच माझा झोका मधली तेजश्री वालावलकर

जय मल्हार खंडेरायाचे पुण्याच्या महापौरांकडून कौतुक

आणि सौरभच्या वादनाचेही

मानाचा दुसरा गणपती....तांबडी जोगेश्वरी मंडळ

पावसापासून बचाव करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पालखीवर आच्छादन केले होते.

अतिगर्दीमुळे हे असे प्रकार वारंवार घडताना दिसत होते

महापौरांची फुगडी

सुह्द गोडबोले आणि आदिनाथ कोठारे

गुलालविरहीत विसर्जन मिरवणूक करण्याच्या आवाहनाला पुण्याचा राजा - गुरुजी तालिम मंडळाने दिलेला प्रतिसाद

मानाचा तिसरा - गुरुजी तालिम मंडळ

छायाचित्रकारांची कसरत

मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके

मानाचा चौथा - तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

मानाचा पाचवा - केसरी गणेशोत्सव मंडळ

वेतचर्माची प्रात्यक्षिके

भाविकांचा महापूर

केसरीवाडा सायंकाळी सव्वासातच्या सुमारास विसर्जित झाला आणि भाविक घरोघरी परतले. पण थोडक्या विश्रांतीनंतर रोषणाईचे गणपती पाहण्यासाठी पुन्हा एकदा लक्ष्मीरस्ता ओसंडून वाहू लागला.

पाय थकले होते, दमणूक झाली होती पण उत्साह कमी व्हायचे नावच घेत नव्हता आणि वाढत्या रात्रीबरोबर तो वाढतच राहीला....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

I was waiting for your thread Happy

all pics are suberb Happy

gulal rahit miravanukila dilela pratisad avadala nahi Happy

एक से एक फोटो आहेत रे आशु. तु टिपलेले क्षणही अनोखे आहेत एकदम. Happy

आणि ती छोटी कार्तिकी गायकवाड नाही, रमा माधव मधली बालकलाकार आहे. मी नाव विसरले. Sad

धन्यवाद सर्वांना....

मुग्धटली - धन्यवाद, बदल केला आहे Happy काय सुंदर दिसते ती...दृष्ट लागेल अशी

दक्षिणा - होय होय..आत्ता आठवले....तेजश्री वालावलकर बहुदा....उंच माझा झोका मधली...मी एकदंरीत कलाकारांच्या बाबतीत ढ आहे...मला बाकीच्यांची पण नावे सांगणार का...

व्वा, शेवटचे दोन मिस झाले होते. ते इथे बघायला मिळाले. मस्त आणि धन्स रे! Happy
ती नाव विसरलास ती रुजुता देशमुख आहे. आणि कार्तिकी गायकवाड नाहीये रे ती छोटी रमा म्हणजेच तेजश्री वालावलकर आहे Happy

ती गोरी तेजस्विनी पंडीत आहे. आणि तिच्याच पहिल्या फोटोत मागे सौरभची (राहिबा मधील )बहिण माधवी सोमण आहे. सौरभच्या फोटोच्या वर आहे तो आस्ताद काळे आहे (पुढचं पाऊल फेम - स्टार प्रवाह) आणि प्रसाद ओक बरोबर (दोस्त) अजय पूरकर आहे Happy

मुग्धटली - धन्यवाद, बदल केला आहे Happy काय सुंदर दिसते ती...दृष्ट लागेल अशी >>>> अनुमोदन.. चेहर्‍यात गोडवा आहे तिच्या.

तेजस्विनी पंडीत...येस्स...ती पण काय अप्रतिम सुंदर दिसते नथ घातल्यावर....तीचे किमान पन्नास एक फोटो काढले आहेत.

तेजस्विनी पंडित आहे एक फोटो.

इरसाल जावई 'केतन क्षीरसागर'

प्रसाद ओकबरोबर अजय पुरकर आहे.

तेजस्विनीच्या फोटोखाली आस्ताद काळे आणि अजय पुरकर आहेत.

कलावंत पथक लिहिलंय त्याच्या खालच्या फोटोतले एका लग्नाची दुसरी आणि तिसरी गोष्ट दोन्हीमध्ये होते. नाव नाही माहिती.

त्याच्याखाली तेजस्विनी पंडित आणि तिच्यामागे माधवी सोमण आहे.

मस्तच ! पुण्याच्या मानाच्या गणपतींचे फोटो बघून मस्त वाटलं. धन्यवाद.

रच्याकने - अजुनपर्यंत आशुचँप म्हणजे अमानवीय धागा असं समीकरण होतं माझ्या मनात, या धाग्यामुळे ते नाहीसं झालं.

अप्रतीम फोटो. धन्यवाद आशुचॅम्प. सगळ्यान्चे फोटो आणी अविर्भाव मस्त. त्या ईरसाल जावयाचे खरे नाव कळेल का? ( जावई विकत घेणे मधला)

रात्र रात्र जागवणारे दिवस आठवले.

गोखलेंना फारच फूटेज मिळालय की... त्याच्या पर्यंत लिंक पोचवायलाच पाहिजे...

आशु जबरी फोटो रे सगळेच...

एक से बढकर एक. झकास...
मी तुमच्या फोटोंची मनापासुन वाट पहात होते. हे सगळं एकदातरी अनुभवायचं आहे ते कधी जमेल ते माहित नाही पण तो पर्यंत हे फोटो पाहुन खुप समाधान मिळते Happy

धन्यवाद सर्वांना....

माधवी सोमण माझी सख्खी भाची आहे. - अरे वा...झकासच...कुठल्या सिरियलमध्ये असते ती...(मी खरंच ढ आहे)

आशिका - धन्यवाद...ते समीकरण राहू द्या तसेच...फारच लोकप्रिय धागा झाला होता. पण विसर्जन मिरवणूकांचे फोटो टाकण्याचे हे माझे सलग पाचवे वर्ष..गेल्या वर्षी माबोच्या मुख्यपानावर धाग्याला स्थान मिळाले होते. अजूनही आहे तो तिथेच...
फक्त माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी सगळे प्रचि काढून टाकले होते. यंदाही कटाक्षाने लहान मुला-मुलींचे फोटो प्रसिद्ध करण्याचा मोह टाळला आहे. जय मल्हारवाल्याचा फोटो वृत्तपत्रातही आला असल्याने त्याचा फोटो टाकला. पण त्याबाबत कोणाला अाक्षेेप असेल तर मी उडवू शकेन. काहीच अडचण नाही.

अग हो अन्जू. तो हिरो नाहीये मालिकेचा, पण त्या प्रान्जल च्या मोठ्या बहिणीचा नवरा दाखवलाय तो, म्हणजे जावईच की. धन्यवाद, अग मला नाव आठवेना.:स्मित:

पण विसर्जन मिरवणूकांचे फोटो टाकण्याचे हे माझे सलग पाचवे वर्ष>>> हो पण माझे हे मायबोलीवरचे पहिलेच वर्ष आहे ना म्हणून मला नव्हते माहित.

पुन्हा एकदा प्र.चि. साठी धन्यवाद.

पुण्याच्या गणपतींच्या रोषणाईचे आहेत का फोटो? ते ही बघायला आवडतील.

आशुचाम्प, मीच तिच्या सिरीयल पाहत नाही. सध्या गंध फुलांचा गेला सांगून ह्या इ टीव्हीवरच्या सिरीयलमध्ये ती आरोही ह्या नायिकेची आई आहे 'सुलभा कुलकर्णी', सर्फिंग करताना तिचा शॉट चालू असेल तरच मी बघते, एरवी ती सिरीयल सहनशक्तीच्या पलीकडे आहे माझ्या.

रश्मी मी ती सिरीयल एखादे वेळेसच बघितली आहे त्यामुळे मला माहितीच नाही त्यात हा आहे.

Pages