हुश्श! दमले बाई! आता तुम्हा सगळ्यांशी बोलायला मी मोकळी. बरं चहा घेणार का तुम्ही? काय बाई विचारतेय मी हे! हो म्हणालात तरी इतक्या लोकांसाठी चहा थोडीच करता येणार मला एकटीला. पण काय आहे ना की आमच्या घरी आल्या गेलेल्याला आलं घालून चहा द्यायची पद्धत आहे. देसायांनी आमचंच बघुन सवय लावून घेतली हो! पण त्यांना शोभतं चहा देणं. त्यांचा काही आमच्या एवढा मोठा गृहौद्योग नाही. त्यांना काही म्हणणार नाहीत लोकं पण आम्ही किमान बासूंदी विचारायला हवी ना लोकांना ? पण आईंनी काटकसरीच्या सवयी लावून ठेवल्यात त्यामुळे आम्ही चहाच विचारतो. आता तुम्ही माझं म्हणणं ऐकायला आलाय म्हणल्यावर तुम्हाला काही तरी द्यायला हवं पण मी फार दमलेय त्यामुळे समजून घ्या.
तुम्हाला वाटत असेल हिला दमायला काय झालं? घरात एवढ्या ७ बायका. हिला कामं तरी असतात काय? पण असं नाहीये अजिबात. आई म्हातार्या. त्यांना चष्मा लावून पेपर वाचण्याशिवाय आणि आम्हाला सतत ओरडण्याशिवाय इतर काम करवत नाहीत. आणि जान्हवीला घरात रूम्स सापडत नाहीत. तिथुन सुरुवात आहे. म्हणलं जरा सुन आली घरात आता तरी आराम मिळेल तर कसलं काय! ती डोक्यावर पडली आणि कामं (परत) माझ्या(च) गळ्यात पडली.
बर शहाणपणा हिचा काय सांगू तुम्हाला? आधी त्या ४ जणी असायच्या सोबत तर मदत व्हायची. पण या बाईने त्यांना कामाला लावून दिलं आणि सासूला ठेवलंय घरातच. सासूच्यातले गुण नाही दिसले कधी हिला ते. सुनवास सुनवास म्हणतात तो हाच हो! लोकांना वाटतं गुणाची सुन माझी. पण तोंड दाबून बुक्यांचा मार म्हणजे काय ते माझं मलाच माहीत.
आणि एवढ्या १० -१२ जणांचं काम एकटी सुन कशी करेल हे लक्षातही नाही आलं आमच्या आईंच्या. इतर वेळेला मारे 'याला समजुन घ्या, त्याला समजुन घ्या' चा गजर करत फिरत असतात. स्वतःच्या सुनेला समजुन घ्यायची वेळ आली की कुठे जाते यांची बुद्धी? पण बोलणार कोणाला? बेबीपुढे काही बोलायची सोय नाही. नुसती चोंबडी आहे ती. लग्गेच पळत जाऊन आईंना सांगेल. सरूला काही सांगावं तर अत्यानंद महाराजांच्या मठात घेऊन जाईल आणि शरयूला काही सांगायचं तर तिसरं वाक्य बोले पर्यंत ही पहिलं वाक्यच विसरून जायची. इंदू वहिनींना काय बोलणार? माझीच वाक्य मला ऐकवत बसतील नाही तर इंग्रजी मधे त्याची चिरफाड करतील.
आणि बाकीचे राहू द्यात. आमच्या यांना कळायला नको? इतके वर्ष बायकोला एकटीला सोडुन गेले आणि आता या वयात उगवलेत परत. शरयू- कांतांच तरी बरं...रोमान्स तरी करता येतो. आमचं काय??? नुसतं पदर घ्या, तोंडाला लावा आणि रडत बसा.
तुम्हाला म्हणून सांगते रात्री पदर पिळला ना की एक बादली पाणी जमा होतं. दिग्दर्शकाला म्हणाले काही नाही तर किमान साडीला स्पंज तरी बसवून दे तर म्हणतोय कपडेपटावर जास्त खर्च नाही करत मराठी मालिकांमधे आणि तसं पण म्हणे मालिकेची हिरोईन जान्हवी आहे.
ही कसली ओ हिरोईन? तिच्या आयुष्यात काय वेगळं घडत सांगा? तिची आणि श्रीची लव्हस्टोरी मग तिचं आमच्या घरात सेटल होणं मग तिने सगळं विसरणं आता परत तिची आणि श्रीची लव्हस्टोरी सुरू झालीये आता पुन्हा घरात सेटल होणे फेज सूरू आहे आणि मग पुन्हा??????
असो! मी नाही बाई काही बोलत. श्री साठी ती सायलीच बरी होती. किमान श्रीला घेऊन घरा बाहेर तरी गेली असती. ही काही आम्हाला सोडत नाही. जाते येते जाते येते. आणि श्रीला तर काही अक्कलच नाही. एकतर ही अशी बायको केलीये. किमान आईला आईपणाचा मान तरी द्यावा. माझा मुलगा माझ्या घरात सगळ्यांना आई म्हणतो???
कधी कधी तो म्हणतो ना की 'माझं माझ्या आयांवर फार्प्रेम आहे' तेंव्हा तर मला भितीच वाटते की तो जन्मला तेंव्हा तिथे असलेल्या आया बद्दल बोलतोय की काय हा पण सध्या तरी विग्नेश्वर कृपेने माझ्या प्रेमात फक्त ५ च वाटेकरी आहेत.
प्रेमाचं राहू द्या पण आई म्हणुन मला द्यायची काही किंमत ही देत नाही हा. बाहेर जायचं तर बेबी वन्सना विचारून जातो. त्या बेबी वन्स परवा जान्हवी बद्दल बोलताना म्हणे 'लग्न झालेल्या मुलीने किती दिवस माहेरी रहायचं?' मी वाकडा डोळा करुन पाहिलं ही त्यांच्याकडे पण डोळ्याला लावलेल्या पदरामुळे दिसलं नसावं ते कोणाला. हां तर मी काय सांगत होते हा आमचा श्री... बाहेर जाणार तर बेबी आई ला सांगून, अफेअर बद्दल सांगणार शरयू आईला, बाकी सगळं सांगणार आई आजीला, जान्हवीसाठी केलेली चोरी सांगणार सरू आईला, सतत आवतीभवती फिरणार जान्हवी आईच्या आय मिन जान्हवीच्या ! सख्ख्या आईची काही कदर नाही कार्ट्याला. एक मिनिट कधी माझ्या कडे यावं काही दुखतं खुपतं का बघावं.. पण कशाचं काय... त्या शशिकला बाईंचं नशिब तरी थोर हो! किमान सावत्र पोरगी घरात कामं करते, पैसे देते, प्रेम करते, सगळं ऐकते. त्यांनी हिच्यासाठी टकला आपटे बघितला तरी जान्हवी काही म्हणाली नाही. आणि आमचं कार्ट! आम्ही बघितलेली सोन्यासारखी मुलगी न बघताच दुसरी घेऊन आला. आला ते आला ती पण ही अशी.... एखाद्या भागात तिला ५ वेळा 'काहीही हं श्री' म्हणायला लावलं तर पुर्ण मालिकाच त्यात संपवून टाकेल ही!
आता मात्र मी ठरवलंय खुप सहन केला अन्याय. काल देसायांच्या घरात मेघनाच्या आईने जे काही केलं ते पाहून मीही ठरवलंय की अन्याय सहन नाही करणार.
आता यांना सांगते घरात नोकर-चाकर आणा. आणि तुमच्या अमेरिकेतल्या मुलीला भारतात बोलवा. तिला अर्चू कडे ट्रेनिंग घ्यायला पाठवते आणि मी प्रांजलच्या आईकडे जाते ट्रेनिंग घ्यायला. त्याचं काय आहे ना की घरात नोकर ठेवले तरी त्यांच्याकडुन कामं करुन घेता यायला हवीत ना.
पण पुन्हा एक प्रॉब्लेम आहे. आमच्या श्रीने त्यांना सखू आई आणि शांता आई करुन टाकलं आणि पुन्हा सगळी कामं मलाच करावी लागली तर???????????????????
ओ मामा, जान्हवी आमची नाहीये
ओ मामा, जान्हवी आमची नाहीये
बाकी नर्मदा बाई बिचार्याच आहेत हो
नीट वाचा त्यांचा कोतबो
सांगा एकही अक्षर खोटं आहे का?
ह्या सगळ्या कोतबोंचे धागे
ह्या सगळ्या कोतबोंचे धागे होसुमी च्या फेसबुक पेजवर दिले का कुणी ? ( कोतबो चा फुलफॉर्म सांगायला विसरु नका )
त्या त्या गोखल्यांच्या खर्या प्रोफाईल्सनाही टॅग करा त्यात म्हणजे नक्कीच वाचले जातील
कोतबो चा फुलफॉर्म सांगायला
कोतबो चा फुलफॉर्म सांगायला विसरु नका
>>
मी आत्ता हेच लिहिणार होते तेवढ्यात तू पोस्ट एडिट केलीस
रीया....तू म्हणतेस...."...
रीया....तू म्हणतेस...."... नीट वाचा त्यांचा कोतबो.... सांगा एकही अक्षर खोटं आहे का?...."
सगळा नको....एकच वाचतो....आणि त्याची चिरफ़ाड करतो .... बघ.
घरात एवढ्या ७ बायका. हिला कामं तरी असतात काय? ~ काही काम नसते.
आई म्हातार्या. त्यांना चष्मा लावून पेपर वाचण्याशिवाय आणि आम्हाला सतत ओरडण्याशिवाय इतर काम करवत नाहीत. ..... खोटे. आईआजी कधीही ह्या सुनांना ओरडत नाहीत. बेबीसह सर्वांना समजावित असतात.
जान्हवीला घरात रूम्स सापडत नाहीत. .... हो, नाही सापडत. त्यात तिची काय चूक ? दाखवा ना तुम्ही तिचा हात धरून एकदा तरी.
ती डोक्यावर पडली आणि कामं (परत) माझ्या(च) गळ्यात पडली. ~ खोटे. जान्हवी स्वत: म्हणत आहे मी काम करते, मला काम सांगा....तुम्ही मध्ये येऊ नका. ते तर नाहीच, उलट तिलाच ओरडत राहातात ह्या बाया.
सासूला ठेवलंय घरातच. सासूच्यातले गुण नाही दिसले कधी हिला ते. ~ कोणते गुण ? डोळ्याला पदर लावून बसायचे दिवसभर ? ह्याला गुण म्हणतात ? कमाल आहे रीया तुझी.
लोकांना वाटतं गुणाची सुन माझी. पण तोंड दाबून बुक्यांचा मार म्हणजे काय ते माझं मलाच माहीत. ~ माहीत आहे तर भोगा ना ! रडता कशाला. तुमचा पोरगाच कधी अकांऊंटंट तर कधी शिपाई म्हणून तिच्या मागे लागत होता....ती बिचारी कंटाळून गेली होती. किती खोटे बोलत होता तो. काही आहे कल्पना तुझ्या नर्मदाबाईना ?
स्वतःच्या सुनेला समजुन घ्यायची वेळ आली की कुठे जाते यांची बुद्धी? ~ खोटे. त्यांची बुद्धी काढता, खरं तर त्या आहेत म्हणून तुमची सहाजणींची मोट बांधू शकल्या त्या....त्या नसत्या तर बो-याच वाजला असता गोखले गृह उद्योगाचा.
पण बोलणार कोणाला? बेबीपुढे काही बोलायची सोय नाही. नुसती चोंबडी आहे ती. ~ हे मात्र खरे आहे. फुल्ल मार्क्स.
बाकीचे राहू द्यात. आमच्या यांना कळायला नको? इतके वर्ष बायकोला एकटीला सोडुन गेले आणि आता या वयात उगवलेत परत. ~ खोटे. ते आले नाहीत, त्याना आणले गेले. नको असेल तर सांगा ना त्याना जावा अमेरिकेला परत म्हणून.....आहे हिम्मत नर्मदाबाईंची ? बरे गेले असतील बायकोला एकटीला सोडून....त्याचा जाब विचारा ना....आल्याआल्या मनोभावे पूजा करायला पुढे धावला होता ना तुम्हीच, नर्मदाबाई ?
शरयू- कांतांच तरी बरं...रोमान्स तरी करता येतो. आमचं काय??? नुसतं पदर घ्या, तोंडाला लावा आणि रडत बसा. ~ रडा. कोण अडवणार तुम्हाला ? पण त्या रडारडीला आमच्या जान्हवीला जबाबदार धरू नका ना.
ओ मामा मी काही त्यांची सून
ओ मामा
मी काही त्यांची सून नाही (दैवदयेने) मी कय सांगू त्यांच्यातले गुण?
रच्याकने या निमित्ताने एक गोष्ट कळाली की तुम्ही अजुनही मालिका बघता

तिकडे का लिहित नाही मग? अं? अं?
तू गोखल्यांची सून नाहीस हे
तू गोखल्यांची सून नाहीस हे मान्य....पण त्यांच्याच भावकीतील असल्याने जानूला टोचण्या मारतेस ना, नर्मदाबाईची बाजू घेऊन.
रिया .. भारी लिहलयसं..
रिया .. भारी लिहलयसं..
सगळ्यांनी कोतबो यअ सिरियलमधली
सगळ्यांनी कोतबो यअ सिरियलमधली पात्रं घेऊनच लिहिलाय. त्या जानीचं पात्र कुण्णी घेतलं नाही,. म्हणजे ती ढोलीच कारणीभूत आहे सगळ्यांना दु:खी करण्यासाठी.
दक्षिणाणाणाणा...... ती ढोली
दक्षिणाणाणाणा...... ती ढोली अजिबात नाही.
....आणि जानी काय ? लिहीना
....आणि जानी काय ? लिहीना शुद्ध "जान्हवी"....किती सुंदर काव्यात्मक नाव आहे, पोरीचे.
दक्षुतै + १ तीला कसला कोतबो
दक्षुतै + १
तीला कसला कोतबो असणार?
(मामा का नाही लिहिलात तुम्ही तिचा कोतबो? दिली होती ना संधी संयोजकांनी?)
मामा तुम्ही काय तिचं वकिलपत्र
मामा तुम्ही काय तिचं वकिलपत्र घेतलंय काय?
अग्गो दक्षे....मै काय कू उसका
अग्गो दक्षे....मै काय कू उसका वकीलपत्र लूंगा....भाची आहे ना ती...मग मामा बाजू घेणारच ना.
रीया....कोतबो प्रकार जाहीर केला गेला होता त्यावेळी माझ्या मागे दवाखाना ड्युटी लागली होती....सैरभैरच झालो होतो तो संपूर्ण आठवडा. तुला तर माहीतच आहे अशा विषयांवर काही लिहायचे तर मनही तसेच आनंदी प्रसन्न असायला हवे.....मग तर मी तुमचेच सारे लिखाण वाचत बसलो....
रिया, मस्त लिहिलय.त्यात तू
रिया, मस्त लिहिलय.त्यात तू आणि अशोक., यांची जुगलबंदी झकास!
आमच्या घरी आल्या गेलेल्याला
आमच्या घरी आल्या गेलेल्याला आलं घालून चहा द्यायची पद्धत आहे.<<<<
मी वाचलं ....चहा पाजवून घालवून देण्याची पद्धत आहे .....
अशोक मामा, लिहाच तुम्ही एकदा
अशोक मामा, लिहाच तुम्ही एकदा तुमच्या लाडक्या जान्हवीसाठी कोतबो! तुमच्या सगळ्या भाच्यांची मागणी/विनंती समजा, पण लिहा!
तुम्ही प्रतिसाद द्यायचे बंद झाल्यापासुन त्या बाफवर काही मज्जा येत नाही. जवळपास बंदच झाला आहे तो बाफ.
आम्ही सगळ्या भाच्या जान्हवीचा कोतबो वाचायला आतुर आहोत.
हे हे हे रीया, मस्तच लिहिलंय
हे हे हे रीया, मस्तच लिहिलंय तुम्ही. संयोजकांच्या भूमिकेतून तुम्ही मला नर्मदाबाईंचं कोतबो लिहायला सुचवलं होतं, पण तिला असं काय कोतबो असणार असंच मला वाटलं. तेव्हा नर्मदाआईची व्यथा तुम्हाला अगदी मनापासून कळलीय हे नक्की. तसंच कोतबोसाठी ही अगदी पर्फेक्ट व्यक्तिरेखा आहे की जी कोणाच्या खिजगणतीतही नसावी.
फक्त हे वाचता वाचता सुचलेलं थोडं : बाकीच्या आईंना डबलडेकर नावं आहेत बघा : आईआजी, मोठीआई, छोटीआई (बेबीआई आणि सरूआईला श्री नक्की काय म्हणतो ते आठवत नाहीए) पण जन्मदात्रीला मात्र सिंगल डेकर.
तसंच बाकीच्यांना मार्गी लावल्यावर नर्मदाबाईच एकट्या राहिल्या होत्या. तर त्यांच्या टाइमपाससाठी रोज गजरा आणून देणारा नवरा परत आला, तर या श्रीचं तोंड त्याला पाहून फुगलं. तो फुगा त्यालाच अद्दल घडली (जान्हवीची ती सुप्रसिद्ध मेमरी चिप पडल्यामुळे) तेव्हाच फुटला.
स्पर्धेसाठी नाही म्हणून , नाही तर माझं मत याच लेखाला असतं.
वरच्या दोन पॅरॅग्राफचं श्रेयही मालिकेपेक्षा तुमच्याच लेखनाला.
<सख्या आईची काही कदर नाही>
<सख्या आईची काही कदर नाही> इथे सख्ख्या हवं.
भरतदादा एकतर आहो जाहो नको
भरतदादा


म्हणून त्या त्याबद्दलचा कोतबो मांडत नाहीयेत 

एकतर आहो जाहो नको आणि मी आत्ता पर्यंत तुमच्या एंट्रीसाठी थांबले होते. मला वाटलं लिहाल तुम्ही
थँक्यू
माझ्याही लक्षात तो मुद्दा आला होता की बाकिच्यांना हा डबल नावाने बोलवतो पण मावशी आणि आत्या ही आई विरहीत नावं असल्याने नर्मदा बाईंना जरा बरं वाटतंय बहुदा
स्पर्धेसाठी नाही म्हणून , नाही तर माझं मत याच लेखाला असतं. >> याच्याबद्दल तर कित्येक थँक्स
बाकीही सगळ्याच प्रतिसाददात्यांचे आभार

मला खर तर टॉम अॅण्ड जेरी मधल्या टॉमबद्दल ही लिहायचं होतं पण नर्मदाबाई जास्त केविलवाण्या वाटल्याने त्यांना चूज केलं
"...नर्मदाबाई जास्त
"...नर्मदाबाई जास्त केविलवाण्या वाटल्याने त्यांना चूज केलं...."
~ काय हे रीया ? त्या तुला कधी केविलवाण्या दिसल्या ? मस्त हसतखिदळत तर असतात इंदू आणि बेबीसमवेत. फक्त जान्हवी समोर आली की त्यांचा चेहरा बिनपाण्याच्या गावात मुक्कामाला गेल्यासारखा होतो.
सारिका....थॅन्क्स पोरी. पण जान्हवीसारख्या मुलीची कोतबो बाजू मुलीनेच मांडणे योग्य असे मला वाटत राहिल्याने मी वाट पाहात होतो तिच्यावर तुमच्यापैकीच कुणीतरी लिहिल.
रीयाने लिहिले....पण कुणावर ?
रिया मस्त लिहील आहेस. मामा का
रिया मस्त लिहील आहेस.
मामा का चिडलेत इतके?
मामा एका भाचीची बाजु घेण्यासाठी तुम्ही इतक्यासगळ्या भाच्यांशी भांडताहात?? :))
अरेरे. बिचार्या नर्मदाबाई
अरेरे. बिचार्या नर्मदाबाई (त्यांचं नमू असं शॉर्ट्फॉर्मीकरण नाही झालं का?) त्यांच्या दु:खाला , वेदनेला , व्यथेला रीयांनी वाचा फोडली तरी पाषाणहृदयी प्रेक्षकांपर्यंत काही ती व्यथा पोचत नाही. :दिवा::
मस्तं लिहिलंय..
मस्तं लिहिलंय..
(No subject)
मस्तच रिया
मस्तच रिया
रिया सॉलिड लिहिलंयस. मी
रिया सॉलिड लिहिलंयस. मी मालिका बघायची कधीच बंद केली पण हे आवडलं मला.
मामा मामा. एवढं जान्हवीप्रेम उतू जातंय तर लिहाच आता कोतबो. सारिकाला मम.
हाय रिया, मी नाही बघत ही
हाय रिया,
मी नाही बघत ही सिरीयल... पण हा कोतबो वाचायला मजा आली... फारच घुसमट होतीय त्या बिचार्या नर्मदेची.....
सामी +१.....;)
रिया भारीय ग ! पण जान्हवी
रिया भारीय ग !
पण जान्हवी खरोखर बारीक झालीय बिच्चारी !!
मला आवडले खूप. मामा का एवढे
मला आवडले खूप.:फिदी: मामा का एवढे भडकले? मलाही नर्मदाबाईन्ची दया आली. जानु तरी तरुण आहे, येईल परत भानावर. नर्मदाबाईना मुलाचे लग्न झाल्यावर नवरा पहायला मिळाला, जानुला ती सन्धी कधीच मिळणार नाही.(ठेन्गा.:फिदी:)
रीया.... वाच जरा अगदी मन
रीया....
वाच जरा अगदी मन लावून वरील सुप्रिया जाधव यांचे जान्हवीबद्दलचे मत....जे सत्य सांगतेच....आणि पुन्हा एकदा डोळे दाखवून घे तू आणि दक्षिणा...निदान जान्हवीसाठी तरी.
Pages