राजकारणातले व्यापारी

Submitted by उदयन.. on 8 September, 2014 - 09:18

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/aap-releases-a-sting-video...

दिल्लीमधल्या सरकारचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी भाजपाने सरळ सरळ आमदार विकत घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे असे आप पक्षाने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मधुन दिसुन येत आहे ज्या पक्षाला जनतेने विश्वास ठेवुन बहुमत दिले तो पक्ष दिल्लीत परत निवडणुका न घेता सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न जोडतोड करुन करत आहेत .. अरे रे रे काय वाईट दिवस आले आहे भाजपावर ?????????

भाजपाचे नेते शेरसिंग डागर यांनी आप पक्षाचे दिनेश मोहनिया यांना ४ करोड ची ऑफर केली होती त्याच्याबरोबर असलेल्या एक दोन जणांना देखील १०-२० लाखचे आमिष दाखवण्यात आले ( ही माहीती आशुतोष यांनी डिबेट मधे दिली आहे) . ही ऑफर त्यंना डागरयांनी त्यांच्या घरी बोलवुन दिली होती..

सध्या भाजपाने त्यांना कारणदाखवा नोटीस दिलेली आहे.. तर काही अतिउत्साही भाजपाचे नेते स्वतःच्या नेत्याचे काळे कारणाम्यावर बोलायचे सोड्न नेहमी प्रमाने शेखचिल्लीसारखे बहुमत , काँग्रेसचे जुने सरकार इत्यादी वर फालतु मुक्ताफळे उडवत बसले आहे ,, काही नेते तर घरी का गेले म्हणुन बोलत आहेत ?

डागर तर सांगत आहे की आप वाले स्वतःहुन आले आमच्याकडे त्यांचे प्रोब्लेम घेउन .....अहो डागरजी ते स्वतःउन आले तर तुम्हाला पैसे द्यायची काय गरज आहे..? Biggrin

एका कार्यक्रमात भाजपाच्या सरकारचे पंतप्रधान मोदी स्वतः पाठ थोपटताना " मी व्यापारी आहे खरेदी विक्री आमच्या रक्तातच आहे" असे म्हणत होते....

त्याचा प्रत्यय आज आला म्हणायचा...... स्वतःचे सरकार बनत नसेल तर आमदाराचे खरेदी विक्रि करुन बनवायचे याच करीता का भाजपाचे लोक निवडणुकांना नाही म्हणत होते ? बंगारु लक्ष्मण स्टिंग ऑपरेशन नंतरचे भाजपाला मिळालेला मोठा झटका आहे ..

कोण खरे कोण खोटे हे तर काही दिवसांनंतर झाकण्याचा प्रयत्न होईलच. पण सध्या भाजपाचा मुखवटा आप ने ओरबाडुन फाडलेला दिसुन येत आहे.. Happy

मै व्यापारी हुं.. Biggrin

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बावरे हो गये क्या ?

असे म्हटलेला तो भगव्या बाबा हल्ली कुठे दिसत नाही.

उदयन तुमचा लेखाचा विषय चुकला. कॉंग्रेसच एखाद भ्रष्टाचार प्रकरण ह्याबद्दल बीबी असता तर देशाचे वाटोळ कस होत आहे, हे सरकार कस कुचकामी आहे असे राग आवळले गेले असते. परंतु भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षावर तुम्ही टीका करत आहात त्यामुळे सहनही होत नाही नि सांगताही येत नाही अशी बर्याच जणांची तुम्ही अवस्था केलीत.

बेफी तुम्ही अँडमिन नाही आहात आणि मायबोलीचे पोलीसपद देखील तुम्हाला दिलेले नाही तेव्हा असले सल्ले तुमच्या कंपूच्चाच लोकांच्या धाग्यांवर आधी द्या.....

उगाच खुसपट काढण्याचा प्रकार कृपया करु नये.

काढायचेच असल्यास आडून नाही समोरून करावे

बेफी,

हे लोक हे असले धागे काढुनही निर्धास्त आहेत. कारण त्यांना अ‍ॅडमिन कडुन अभय आहे.

तुम्ही तर इतके धागे काढतात कढा कशावर तेव्हा वाटत नाही का
आता एक धागा तुमच्या पक्षाच्या निर्लज्जपणा वर निघाला तर हायतौबा माजली तुमच्या गोटात Biggrin

उदयन.. | 8 September, 2014 - 21:10 नवीन

बेफी तुम्ही अँडमिन नाही आहात आणि मायबोलीचे पोलीसपद देखील तुम्हाला दिलेले नाही तेव्हा असले सल्ले तुमच्या कंपूच्चाच लोकांच्या धाग्यांवर आधी द्या.....<<<

१. मी अ‍ॅडमीनच्या शैलीत काहीही लिहिलेले नाही व तसे करण्याची माझी हिम्मतही नाही.

२. मायबोलीवर पोलिसपद अस्तित्त्वातच नाही आहे त्यामुळे कोणीच येथे पोलिस असू शकत नाही.

३. मी जे म्हणालो आहे तो सल्ला नसून विनंती आहे.

४. माझा कोणताही कंपू नाही. मी ज्या पक्षाच्या बाजूने बोलतो त्या पक्षाच्या बाजूने बोलणारे इतर सर्व आणि मी अश्या लोकांचा एक कंपू आहे हा गैरसमज आहे.

हे मा शे पो

४. माझा कोणताही कंपू नाही. मी ज्या पक्षाच्या बाजूने बोलतो त्या पक्षाच्या बाजूने बोलणारे इतर सर्व आणि मी अश्या लोकांचा एक कंपू आहे हा गैरसमज आहे.
<<
बेफिंची प्रचारक म्हणून नोंद घेतली होती म्हणे तिकडे? Wink

<भ्रष्टाचारच्या बाबतीत कॉग्रेस आणि भा. ज.पा. मधे काहीही अंतर नाही. एकाला झाकवा दुसरयाला काढावा..>
हे इब्लिस यांचे दुसरया एका बा.फ. वर लिहीलेले विचार चिंत्य आहेत.

झारखंड मुक्ती मोर्च्याच्या शिबू सोरेनानी कॉंग्रेस वरील प्रेमापोटी नरसिंह राव ना वाचवला होता नाही का?

बाकी बाफ वरच्या विषयावर बोलायची हिंमत नाही आहे तुमच्यात
काळे तोंड घेऊन फिरू नका आता
नाही तुमच्यात दम आणि चालले सरकार बनवायला

>>नाही तुमच्यात दम आणि चालले सरकार बनवायला <<
नाहि तुमच्यात (संख्या)बळ आणि चालले विरोधी पक्षनेते बनायला - असं म्हणायचं आहे का? Happy

विकत घेणे कोणी चालू केले
अध्यक्ष पकडला गेला आता चमचे पण पकडले गेले

तरी वर तोंड निर्लज्ज नेत्यांची Biggrin

हमाम मे सब नंगे है अशी काहीशी हिंदी म्हण आहे ना, त्यानुसार राजकारणात सारेच चोर असतात, जे संत असतात ते अल्पमतात गेल्याने टिकत नाहीत.

त्यामुळे कोणत्याही पक्षाचा समर्थक / कार्यकर्ता बनण्यापेक्षा मतदार राजा बनून राहायचे. गुप्त मतदान करायचे आणि जो कोणी चुकेल त्याला हक्काने शिव्या घालायच्या. Proud

तेच जर तुम्ही एखाद्या पक्षाचे समर्थक असाल तर मग स्वताच्या मनाला पटत नसतानाही अश्या चुकीच्या गोष्टींचे सुद्धा समर्थन करायची लाचार वेळ येते.

तुर्तास इतकेच, शुभरात्री Happy

Pages