Submitted by साक्षी on 8 September, 2014 - 07:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोहोरी पूड - १ चमचा
लोणी - १ चमचा
गाजर - किसून २ मोठे चमचे
मोड आलेले कडधान्य - १ मोठा चमचा
मीठ -चवीपुरते
ब्रेड स्लाईस - १
सॉस - तोंडीलावण्यासाठी. (हवा असल्यास)
क्रमवार पाककृती:
१) अगदी थोडे पाणी घालून मोहरीची पूड फेटून घ्या.
२) ५ मिनिटांनी त्यात किसलेले गाजर आणि मोड आलेले कडधान्य, लोणी व चवीपुरते मीठ घालून नीट एकत्र करा.
३) सँड्विच ब्रेडच्या स्लाईसवर लावून घ्या.
४) हवा असल्यास टोमॅटो सॉस लावून वाढा.(सॉस न लावताही चांगले लागते.)
वाढणी/प्रमाण:
एकालाही पूरेसं नसाव.
अधिक टिपा:
१) पनीर/टोफू वगैरे बरंच काही घालता येईल.
२) मिक्स हर्ब्जही घालता येतील.
३) ब्रेड नको असल्यास ह्याच फीलींगने पोळीची गुंडाळी करता येईल.
माहितीचा स्रोत:
इंटरनेट आणि माझी फेरफार
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वेगळाच प्रकार दिसतोय. चांगलं
वेगळाच प्रकार दिसतोय. चांगलं वाटतंय.
धन्यवाद मामी! मोहरीचा नाकात
धन्यवाद मामी!
मोहरीचा नाकात जाणारा स्वाद हेच ह्याचं वेगळेपण आहे.
सगळ्यांना आवडेलच असं सांगता येत नाही.
~साक्षी
ओपन सँडविच (खरं तर त्याला
ओपन सँडविच (खरं तर त्याला सँडविच का म्हणतात माहिती नाही) हा आवडता प्रकार आहे. करून बघणार. ब्रेड तव्यावर ठेवून खालच्या बाजूने क्रिस्पी करून घेणार मात्र.
छान प्रकार... आमच्याकडे तयारच
छान प्रकार... आमच्याकडे तयारच मस्टर्ड सॉस मिळते.
मस्त. करुन बघणार.
मस्त. करुन बघणार.
मस्त दिसतंय
मस्त दिसतंय
मस्टर्ड सॉस आवडत नाही
मस्टर्ड सॉस आवडत नाही त्यामुळे त्यापेक्षा केल-पेस्तो करुन बाकी सर्व जिन्नस घालुन पहाणार. छान आहे.
जिन्नसांतला पहिलाच पदार्थ
जिन्नसांतला पहिलाच पदार्थ वाचून हा पदार्थ आपल्याला आवडणार याची खात्री पटली
फोटो छान आला आहे. करून खाऊन पाहणार नक्की.
मस्त आहे आणि सोपं आहे
मस्त आहे आणि सोपं आहे
मस्त !
मस्त !