एक मोठी काकडी, ढोबळ्या मिरच्या (लाल, पिवळ्या, हिरव्या), गाजर, पत्ता कोबी,क्रिम चीझ, दही, मिर्याची पुड, पुदिना,कोथिंबीर, मीठ
दोन चमचे क्रिम ची़झ आणि चमचा-दिड चमचा दही एकत्र एका भांड्यात मिक्स करायचं. त्यात वाटलेला पुदिना-कोथिंबीर आणि मीठ, मिर्याची पुड मिक्स करायची.
हे मिश्रण शक्य असल्यास एखाद्या पायपिंग बॅगमध्ये घालून फ्रिजमध्ये ठेवायचे.
काकडी सोलाण्याने सोलून घ्यायची. आम्ही नेहेमी काकडी सोलताना एक आड एक सालाची स्ट्रीप ठेवून डिझाइन करतो. हवं असल्यास तसं करायचं. नाहीतर पुर्ण सोलली तरी चालेल किंवा नाही सोलली तरीही चालेल. (हे फक्त कृतीमधल्या पायर्या वाढवण्यासाठी लिहिलंय. :फिदी:)
सोललेल्या काकडीचे मोठ्या मोठ्या जाड चकत्या करायच्या. एका काकडीच्या ४ किंवा ५.
आता या चकत्यांमधला गर सुरीने /स्कूपने काढून त्यांना आतून पोकळ करायचे. दही-चीझचं मिश्रण पायपिंग बॅगेत भरलं नसेल तर त्यात हा गरपण घालता येईल. मी विसरले होते म्हणून नुसताच खाऊन टाकला. काकडीतला गर काढताना खालच्या बाजूला थोडा गर राहिल असं बघावं.
उरलेल्या भाज्या लांबट चिरून घ्याव्यात. दही-चीझचं मिश्रण पायपिंग बॅगेत भरल्यानंतरही भांड्याला चमच्याला लागलेलं असतं. ते निपटून काढून या भाज्यांमध्ये हलक्या हाताने मिक्स करावं.
एका प्लेटमध्ये या सगळ्या भाज्या ठेवून त्यावर काकड्या ठेवाव्यात. काकड्यांमध्ये दही-चीझचं मिश्रण भरावं.
सजवायची खूप इच्छा असेल तर याला वरून पुदिन्याचं पान, मिरची किंवा इतर जे काही घरात असेल त्यानी सजवावं.
फ्रिझमध्ये मस्त थंड करून हे गारेगार सलाड खायला छान लागतं.
हा प्रकार थोड्या वेगळ्या प्रकारे मैत्रिणीकडे खाल्ला होता. तिने काकडीमध्ये फ्लेवर्ड मेयो घातलं होतं. आणि तिला गणेशोत्सवासाठी रेसेपी बनवायची नसल्याने तिने खालच्या सलाडमध्ये वाफवलेल्या बीन्स, कॉर्नचे दाणे घातले होते. भाजलेले तीळ पण घातले होते.
माझ्याकडे मेयो नसल्याने आधी घट्ट दही /चक्का वापरून ही पाककृती करणार होते. पण चक्क्यासाठी दही बांधून ठेवणं जमलं नाही.अनायसे घरात ब्रिटानिया क्रिम चीझ होतं म्हणून ते वापरायचं ठरवलं. ते खूप घट्ट असल्याने आणि थोडी आंबूस चव हवी होती म्हणून त्यात दही मिक्स केलं.
माझा लेक अजिबात मिरची खात नसल्याने यात फक्त मिर्याची पुड घातली आहे. पण यामध्ये वाटलेली हिरवी मिरची किंवा चिली फ्लेक्स छान लागतिल. झालंच तर एखादी लसणाची पाकळी (मला घालायची होती, पण विसरले. :)) पण छान लागेल. पिझ्झा सिझनिंग असेल तर ते पण घालता येईल.
संयोजक, मला पाककृती लिहिताना
संयोजक, मला पाककृती लिहिताना सारखे एरर मेसेज येत होते. मायबोली गणेशोत्सव २०१४ चा टॅग त्यामूळे द्यायचा राहिलाय.
थोड्यावेळानी संपादन करून देईन टॅग.
सही... फोटो.. ?
सही... फोटो.. ?
मायबोली गणेशोत्सव २०१४ चा टॅग
मायबोली गणेशोत्सव २०१४ चा टॅग त्यामूळे द्यायचा राहिलाय>> ही एरर मलाही सारखी सारखी येत होती.
अॅडमिन, प्लिज लूक इंटू ऑल दिज् मॅटर्स!
फोटो?
फोटो?
आला बघा फोटो. ती एरर मात्र
आला बघा फोटो.
ती एरर मात्र सारखी येतेय. प्लिज त्या टॅगचं कसं करायचं सांगा. माझी सिस्टिम हँग व्हायला लागली होती.
मस्त्त्त्त्त्त दिसतंय एररचं
मस्त्त्त्त्त्त दिसतंय
एररचं काय करायचंते बघावं लागेल
अल्पना , मलाही मगाशी ती एरर येत होती. अॅड्मिन येईपर्यंत इथुन हे कॉपी कर आणि तिकडे टॅग मधे जाऊन पेस्ट कर.
एकदाच येईल एरर मग
माझ्यामते तो टेक्ट बॉक्स आपल्याला सजेस्ट करतो ना टॅग्स तेंव्हा हा प्रॉब्लेम येतोय.
हे पेस्ट कर -
आता कशाला शिजायची बात,मायबोली गणेशोत्सव २०१४
अल्पना, फोटो मस्तच
अल्पना, फोटो मस्तच
आहा..सुंदरच दिसतेय डिश
आहा..सुंदरच दिसतेय डिश
छान दिसतंय.
छान दिसतंय.
मस्त दिसतेय डिश
मस्त दिसतेय डिश
मस्तं आहे.
मस्तं आहे.
मस्त पदार्थ, मस्त फोटो.. याला
मस्त पदार्थ, मस्त फोटो.. याला Tzatziki असे काहीतरी नाव द्यायचे ना ! ( ते असेच असते )
मस्त दिसतंय
मस्त दिसतंय
मस्त आहे पार्टीसाठी. घरीच
मस्त आहे पार्टीसाठी. घरीच खायच असेल तर सरळ काकडीच्या चकत्या डिप बरोबर खाता येतील
मस्त दिसतंय सॅलड
मस्त दिसतंय सॅलड
वॉव !!! एकदम कुssssssssल आहे
वॉव !!!
एकदम कुssssssssल आहे ग . मस्त मस्त मस्त
शेवटचा फोटो एकदम जबरी आहे. डॉकलिटी सुप्पर आहे तुझी . पटकन एक ऊचलून तोंडात टाकवस वाटतय
तुसी ग्रेट हो . ( आल बघ मला पंजाबी )
मस्तय हे...!
मस्तय हे...!
मस्त. हे चीप्सबरोबर डिप्स
मस्त. हे चीप्सबरोबर डिप्स म्हणूनही खाता येईल.
अल्पना, छानच दिसतय आणि
अल्पना, छानच दिसतय आणि चवीलाही मस्त लागत असेल.
मस्त दिसतंय एकदम! स्टार्टर
मस्त दिसतंय एकदम!
स्टार्टर म्हणून थंडगार खायला एकदम मस्त लागेल.
क्रिम चीज अमूलचं वापरलंस का?
ब्रिटानियाचं वापरलं. मला
ब्रिटानियाचं वापरलं.
मला अमूलचं कोणतंच चीझ तितकंसं आवडत नाही. ब्रिटानियाचं जास्त आवडतं.
ओके! लक्षात ठेवेन.
ओके! लक्षात ठेवेन.
मस्त आहेत स्टार्टर म्हणुन.
मस्त आहेत स्टार्टर म्हणुन. डिझायनर काकड्या छान दिसताहेत.
भारीच !
भारीच !