"या दगडातून काहीतरी करून दे बरं मला वायर वापरून!"
डिसेंबरमधे शूटच्या दरम्यान नदीकाठच्या लोकेशनवर एक दगड दाखवत आमचा डिओपी संजय मेमाणे म्हणाला. दगड होता अगदी गणपतीबाप्पाची आठवण करून देणारा.
वायर रॅप हे तंत्र मी कोणे एके काळी 'सॅन्टा फे ऑपेरा'मध्ये काम करताना शिकले. गेली एक-दोन वर्षे तारा वळवून विविध प्रकारचे दागिने बनवण्याचे माझे प्रयोग चालू आहेत. कामानिमित्ताने जंगल, नदी फिरत असताना विविध आकार, रंग, पोताचे दगड गोळा करणे हा चाळा पहिल्यापासून होताच. या अश्या दगडांना वेगवेगळ्या प्रकारे तारांमधे गुंडाळून त्यातून कलाकृती, कलात्मक दागिने बनवणे यावर गेले काही महिने माझा भर आहे. मी बनवलेल्या काही वस्तू, काही दागिने संजयने नुकतेच बघितले होते. ते त्याला आवडले होते, त्यामुळे तो गणपतीच्या आकाराचा दगड मिळाल्यावर लगेच घरात ठेवायला त्या दगडाचे तारा वापरून मी काहीतरी करून द्यावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली.
दगडाला त्याचा आकार, रंग, रूप हे सगळं नैसर्गिकरीत्या प्राप्त होतं. जिथे तो दगड सापडला असेल तिथल्या वातावरणाचा, भौगोलिक परिस्थितीचा परिपाक म्हणून कुठलाही दगड तयार होतो. मी गोळा केलेले सगळे दगड कोकण-गोव्यातल्या नदीकाठचे. एकेक दगड हाताळताना, त्याचे रूप बघताना, त्याचा पोत अनुभवताना जाणवतं की हा एकेक दगड म्हणजे नदीच्या वाहण्याची कहाणी आहे! अश्या दगडांना तारांनी बांधून वस्तू तयार करणे म्हणजे नदीच्या वाहण्याच्या कहाणीला सजवून मांडणे. त्यामुळे सजावट ही फक्त कहाणीला उठाव देणारी हवी.
या सगळ्याला हा गणपतीच्या आकाराचा दगडही अपवाद नव्हता. त्या आकाराचे 'गणपती'पण महत्वाचे, ते दिसले पाहिजे. पण गणपतीचा आकार हा तारांनी दाखवायचा नाही अन्यथा या दगडाच्या गणपतीपणाला काहीच अर्थ नाही. त्यामुळे गणपतीला एखाद्या बेसवर बसवायचे आणि बाजूने मखर करायचे हे ठरले.
बेससाठी तांब्याची १८ गेजची तार घेऊन स्पायरल करून एक चकती तयार केली. पितळ्याच्या २१ गेजच्या तारा घेऊन त्याच्या पाकळ्या तयार केल्या. त्या पाकळ्यांच्या दांड्यांची जुडी बांधली आणि पाकळ्या सर्व दिशांना सूर्यकिरणासारख्या मुडपल्या. हा झाला पाया. या पाकळ्या आता सर्व बाजूंनी वजनाला बॅलन्स करणार. या जुडीच्या वरती तांब्याची चकती बसवली. हे झाले बाप्पांचे बसण्यासाठीचे स्टूल. सिंहासनाच्या पायाशी पाकळ्यांच्या दांड्यांच्यामधे तांब्याच्या २२ गेजच्या तारेने विणून घेतले. याच्यामुळे पाया जास्त स्टेबल झाला.
आता बाप्पांना त्यावर बसवायचे तर टेकायला काहीतरी हवे आणि बाप्पा स्टुलावरून हलू नयेत म्हणून त्यांना धरून ठेवणारेही काहीतरी हवे. ते तांब्याच्या १८ गेजच्या तारेतून तयार केले. पण ते तयार करताना एकही तार बाप्पांच्या पुढून क्रॉस होणार नाही आणि गणपतीचा आकार झाकणार नाही ही काळजी घेतली. इथे बाप्पांनी माझी परिक्षा घेतली. विविध पद्धतीने तारा बांधून बघितल्या पण बाप्पा काही स्थिर बसायला तयार नाहीत. काही करा स्टुलावरून उडी मारणे चालूच.
अजून तारा वापरल्या, जास्त गुंडाळले तर पक्के बसणार पण मग गणपतीपण हरवून जाणार... अश्या काहीतरी खोड्यात अडकले होते. कला तुम्हाला आयुष्याविषयी बरंच काही शिकवून जाते ती अशी वगैरे फिलॉसॉफीही सुचत होती त्या दरम्यान. पण उडी कशी थांबवायची? बाप्पा कसे जागेवर रहातील? ते काही समजत नव्हते. सगळं गुंडाळून बाजूला ठेवून दिलं आणि जरा वेळ घेऊन नव्याने विचार करावा, केलेलं काम जाऊ देत, अजून काही वेगळी कल्पना लढवूया असे ठरवले.
'सगळ्या गोष्टींची वेळ यावी लागते' हे एक वारंवार वापरून गुळगुळीत झालेलं वाक्य इथेही खरं ठरलं. तब्बल दीड महिन्यांनी गुंडाळून ठेवलेले बाप्पा आणि त्यांचं अर्धवट झालेलं सिंहासन बाहेर काढलं. केलेलं सगळं खारीज वगैरे करण्यापूर्वी एक शेवटचा प्रयत्न म्हणून आधीच्याच टेक्निकने बाप्पांना बांधून घालायचा प्रयत्न केला आणि काय आश्चर्य बाप्पा शहाण्या मुलासारखे एका जागी बसले. एक महत्वाचे काम झाले होते. अडकलेलं काहीतरी सुटून पुढे वाहतं व्हावं तसं काहीतरी वाटलं मला.
मग मागची प्रभावळ करायला घेतली. पायामधे असलेल्या पाकळ्यांच्या सारखेच काहीतरी करायचे ठरवले कारण खूप वेगळं काही केलं तर पूर्ण डिझाइनचा तोलच ढळला असता. पाकळ्यांचा पिसारा तयार करून बाप्पांच्या मागे बसवला. नंतर त्या पाकळ्यांच्या मधे मधे तांब्याच्या २२ गेज तारेने विणून घेतले.
वायर रॅप टेक्निकमधे केलेली वस्तू जरी एकाच बाजूने बघायची असली तरी मागची बाजू दृष्टीस पडली तर ती सुबकच दिसली पाहिजे या नियमाला फार महत्व असते. त्यामुळे पिसारा बसवल्यानंतर मागच्या बाजूनेही तारा विणून सगळे जोडकाम वगैरे झाकून टाकले.
मग बाप्पांच्या सिंहासनाला गादी बनवली. तिच्या चारी बाजूंनी तारेने धावदोरा घातला आणि पाटाच्या कोपर्यांना फुलं बसवावी तसे त्या तारांचे छोटे स्पायरल्स बसवले.
अश्या तर्हेने बाप्पा पूर्ण तयार होऊन आता आपल्या योग्य स्थळी जाण्यास सिद्ध झाले.
- नीधप
गणपती बापा मोरया!
गणपती बापा मोरया!
वा, अतिशय सुरेख झालंय हे
वा, अतिशय सुरेख झालंय हे नीरजा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर. मस्त प्रकार आहे हा.
सुंदर.
मस्त प्रकार आहे हा. याच्यावर एक लेख लिहीच.
नीधप, अतिशय सुंदर. खूप आवडले.
नीधप, अतिशय सुंदर. खूप आवडले.
वॉव, सुंदर.
वॉव, सुंदर.
Superb! Faararch sundar
Superb!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Faararch sundar disatay
अतिशय कल्पक वायरवर्क...
अतिशय कल्पक वायरवर्क... मनोरंजक लिखाण..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विविध पद्धतीने तारा बांधून बघितल्या पण बाप्पा काही स्थिर बसायला तयार नाहीत. काही करा स्टुलावरून उडी मारणे चालूच.>>
कला तुम्हाला आयुष्याविषयी बरंच काही शिकवून जाते ती अशी वगैरे फिलॉसॉफीही सुचत होती त्या दरम्यान. >>
नीधप, अतिशय सुंदर. खूप आवडले.
नीधप, अतिशय सुंदर. खूप आवडले.
अमेझींग. तारा विणायचं अतिशय
अमेझींग. तारा विणायचं अतिशय भारी कसब आहे तुझ्या हातात. बाप्पा खुप खुश झाले असतील![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
_/\_ हा बाप्पाला, अन _/\_ हा
_/\_ हा बाप्पाला, अन _/\_ हा तुला
नी खूपच छान इनोव्हेटिव्
नी खूपच छान
इनोव्हेटिव्
wow नी! सुंदर आणि सुबक आसन
wow नी! सुंदर आणि सुबक आसन आणि बाप्पाही मस्त!
नीरजा, अतिशय सुरेख झालंय हे
नीरजा, अतिशय सुरेख झालंय हे काम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जय गणेश. महान आहेस नी तु.
जय गणेश. महान आहेस नी तु. प्रचंड सुंदर झालाय बाप्पा. व त्याचे ते स्टुल तर क्युट. थेट वेताचे स्टुल असते तसे आठवले. मस्त वीणले / गुंफले आहेस.
लव्हली अॅन्ड क्रिएटिव्ह!
लव्हली अॅन्ड क्रिएटिव्ह!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>> प्रत्येक दगड नदीच्या वाहण्याची कहाणी असतो<<< सुंदर वाक्य
मस्तच आहे हे! पुढील
मस्तच आहे हे! पुढील कलाकृतीसाठी शुभेच्छा..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फेबु वर काही दागिन्यांचे फोटोज पाहिले होते. पण पूर्ण कलाकृती आज पाहायला मिळाली.
एभाप्र - ही तार सलगच वापरली आहे की आवश्यकतेनुसार कापलेली आहे?
सुरेख काम झालंय.
सुरेख काम झालंय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फारच मस्त आहे हे. कीप ईट अप.
फारच मस्त आहे हे. कीप ईट अप.
अतिशय सुरेख जमलंय
अतिशय सुरेख जमलंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे हे
मस्त आहे हे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आसन, आणि लेखनही !
छान आसन, आणि लेखनही !
सुरेख! सुरेख!! किती मेहनतीचं
सुरेख! सुरेख!! किती मेहनतीचं आणि कलात्मकतेचं काम आहे हे! इथे शेअर केल्याबद्दल थँक्स.
अतिशय सुंदर. खूप
अतिशय सुंदर. खूप आवडले.............
मस्त...
मस्त...
मस्त झालंय
मस्त झालंय
फार फार मस्त... तुझं वर्णन
फार फार मस्त...
तुझं वर्णन वाचत असताना डायरेक्ट शेवटचा फोटो बघायचा मोह आवरुन ठेवला....
आणि सगळं वाचुन झाल्यावर शेवटचा फोटो पाहताना तुझी सगळी मेहेनत आणि कल्पकता जाणवली...
खुपच सुरेख
सुरेख-सुंदर कलाकृती, लेखनही
सुरेख-सुंदर कलाकृती, लेखनही खूप आवडले.
नीधप, भारी कारागिरी! मागची
नीधप, भारी कारागिरी!
मागची प्रभावळ विशेष लक्षवेधक झालीय. पायापण सुरेख.
नीधप, खूपच सुंदर बाप्पा आणि
नीधप, खूपच सुंदर बाप्पा आणि तुमची कला सुद्धा.
सो क्रिएटिव्ह !!! किती
सो क्रिएटिव्ह !!!
किती मेहनतीचं आणि कलात्मकतेचं काम आहे >> +१
Pages