१) आवडत्या स्वादाचे खाकरे- २
२) प्रत्येकी एक लाल टोमॅटो, काकडी, कांदा
३) अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
४) पुदिना चटणी, चिंचेची चटणी
५) सजावटीसाठी चिरलेला अननस- ऐच्छिक
१) टोमॅटो, काकडी, कांदा, कोथिंबीर चिरून घ्या
२) दोन्ही खाकर्यांचा चुरा करा.
३) पुदिना-कोथिंबीर-लसूण अशी एक आणि चिंच-खजूर-गूळ अशा चटण्या मिक्सरवर करून घ्या.
४) अननसाचे बारिक काप करून घ्या.
एका बाऊलमध्ये आधी खाकर्याचा चुरा घाला.
त्यावर टो-का-कां घाला
चटण्या घाला
मिसळा
वरून चिरलेली कोथिंबीर आणि अननस शिवरा.
(गाजर, बीट, पालक असे हमखास पौष्टिक पदार्थ नसूनही पौष्टिक असलेली) झटपट आणि पौष्टिक खाकरा भेळ तय्यार!
सजावटीसाठी आणखी एक किंवा दोन आख्खे खाकरे घ्या आणि त्यावर ही भेळ सर्व्ह करा. अधिक स्पष्टतेसाठी फोटो बघा
१) एरवी चुरमुर्यांच्या भेळेत अनिवार्य असलेले फरसाण या भेळेत मुळीच लागत नाही.
२) खाकर्याचा चुरा स्वादिष्ट असतो. डायटप्रेमी लोकांचा आवडता पदार्थ खाकरा असल्यामुळे आणि त्यात भरीस कच्चे पदार्थही असल्यामुळे ही भेळ स्वादिष्टही आहे आणि पौष्टिकही.
३) घरात साधारणपणे उपलब्ध असलेले पदार्थ असल्यामुळे मूड आला की झटपट करता येते.
४) चटण्यांमुळे खाकरा ओलसर होतो. त्यामुळे कोरडी लागत नाही वा तोठराही बसत नाही वा ठसकाही लागत नाही.
५) अननस, डाळिबांचे दाणे, मोड आलेले मूग वा इतर कडधान्य घालून या पदार्थाची शोभा आणि पोषणमूल्य वाढवू शकता. मनाप्रमाणे व्हेरिएशन्सही करता येतील. त्या दृष्टीने ही पाककृती गुणी आहे
संयोजकांसाठी खास टिपा:
१) यात एकच प्रोसेस्ड पदार्थ आहे- खाकरा
२) दोन्ही चटण्या फक्त मिक्सरचा वापर करून केलेल्या आहेत.
३) फोटोमधला सॉस (म्हणजे दुसरा प्रोसेस्ड पदार्थ) हा केवळ सजावटीसाठी आहे. तो पाककृतीसाठी मुळीच गरजेचा नाही. पाककृतीमध्ये वापरलेलाही नाहीये.
व्वा १ झकास डाएट भेळ !
व्वा १ झकास डाएट भेळ !
पौर्णिमा, मस्त फोटो.
पौर्णिमा, मस्त फोटो.
फोटो टेम्प्टिंग दिसतोय. छान.
फोटो टेम्प्टिंग दिसतोय. छान.
छान !
छान !
मस्त !
मस्त !
मस्त दिसतोय फोटो
मस्त दिसतोय फोटो
फोटो मस्तच.. पदार्थ नक्कीच
फोटो मस्तच.. पदार्थ नक्कीच करुन बघणार.. खाकरे आणले तर जातात आणि ते संपत नाहीत पटकन.. त्याचे काय करायचे त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे..
झक्कास. एकदम तोंपासु
झक्कास. एकदम तोंपासु
छानच
छानच
फोटो मस्तच.........तोपांसु..
फोटो मस्तच.........तोपांसु..
>>चिंच-खजूर-गूळ अशा चटण्या
>>चिंच-खजूर-गूळ अशा चटण्या मिक्सरवर करून घ्या.>> एरवी चिंच, खजूर कुकरला वाफवून घेतात. ह्यात तसं करायचं नाही का?
लागणारे जिन्नस: १) आवडत्या
लागणारे जिन्नस: १) आवडत्या स्वादाचे खाकरे- २
क्रमवार पाककृती: २) चारपैकी दोन खाकरे घ्या आणि त्यांचा चुरा करा.
एका बाऊलमध्ये आधी खाकर्याचा चुरा घाला.
साहित्यातून कृतीत जाईतो खाकर्यांचे दोनाचे चार झाले का? उरलेल्या दोघांना कृतीत काहीव स्थान नाही का? पण फोटोत पुन्हा मिरवायला आलेत का?.![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
जाते थे जापान पह्युंच गए चीन?
की माझीच वाचण्यात चूक होतेय?
साहित्यात बाचिहिमी चालेल.
अहा.....मस्त
अहा.....मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा वा! झक्कास पाकृ . एकदम
वा वा! झक्कास पाकृ . एकदम पौष्टक आहे आणि सोपीही
पौतै , मला लवकरच झब्बू देता येईल अशी पाकृ दिलि आहेस.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सायो, या वेळी मी चिंचेची चटणी
सायो, या वेळी मी चिंचेची चटणी न शिजवता केली आहे, कारण स्पर्धेचे नियम!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चिंच भिजवली, कोळ काढला. खजूर बिया काढून भिजवला. अंदाजे गूळ मिक्स केला. सगळं काही मिक्सरमधून काढलं. धने पूड, तिखट, मीठ चवीनुसार घातले.
मयेकर! दोनाचे चार झाले (किंवा उलट) की लगेच चीनचे जापान कसे होईल?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बदल करते आहे.
तरीही, दिवा दाखवून लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!
ज्यांना रेसिपी आवडली आहे आणि त्यांनी तसे आवर्जून लिहिले आहे, त्या सर्वांचे आभार
नक्की करून बघा.. इट्स यम्मी.
आज संध्याकाळच्या खाण्याला
आज संध्याकाळच्या खाण्याला केली. चिंचेच्याचटणी ऐवजी रेडीमेड भेलपुरी सॉस मिळतो तो घातला.
घरात होतेच म्हणून मूठभर डाळिंबाच दाणे पण टाकले. (आपण स्पर्धेत नसल्यानं) शेव पण घातली. मस्त लागलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो तोंपासु
फोटो तोंपासु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो जबरदस्त आहे!
फोटो जबरदस्त आहे! तोंपासु!!
अननस घालण्याची कल्पना लई भारी आहे.
मस्त दिसतेय.
मस्त दिसतेय.
तोंपासु
तोंपासु
काल सानिकाच्या भोंडल्याला ही
काल सानिकाच्या भोंडल्याला ही भेळ केली. त्यात डाळिंब्म दाणे, शेव असा भरणा पण केला. बच्चे तो बच्चे बच्चोंकी मा भी खूष हो गई. एकदम हिट्ट मेन्यु झाला
सोबत तू, मंजूडी आणि अजूनपण कोणी कोणी दिल्येत त्या सगळ्या पद्धतींना ब्लेंड करत मध्यममार्ग काढत ड्रायफ्रूट लाडू पण केले होते. ते ही हिट्टं झाले
कशाला शिजायची बात रॉक्स एकदम
क्या बात है! मस्त. आवर्जून
क्या बात है! मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवर्जून कळवल्याबद्दल थँक्स कविता