गणपती बाप्पा मोरया!
या उपक्रमाविषयी अधिक महितीसाठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50546
प्रसंग ५ :
"तरी मी सांगत होते तुम्हाला, आपण तिचं लग्न तिच्या परस्पर ठरवून टाकायला नको. तुम्ही ऐकलं नाही माझं अजिबात" काकुळतीला येऊन शशिकलाबाई विनायकरावांना म्हणाल्या. १२ वाजता येते म्हणालेल्या अंजूचा ३ वाजले तरी पत्ता नव्हता. इतक्या वेळ वाटत बघत असलेल्या काळजीची जागा आता भितीने घेतली होती.
घराजवळच्या नाक्यावरून गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला आणि शशिकलाबाईंचा जीव उंबर्यापाशी पालथ्या घातलेल्या भांड्यात पडला. समोरून येणार्या आपल्या रूपवान मुलीला पाहून त्या स्वतःशीच म्हणाल्या, "आज हिची दृष्ट काढायलाच हवी".
अंजू घरात येताच नेहमीप्रमाणे डॅडींच्या गळ्यात न पडता आपल्या खोलीकडे पळाली आणि डॅडींच्या कपाळावर हलकीशी आश्चर्याची आणि सोबतच नाराजीचीही आठी उमटली आणि नेहमीप्रमाणे शशिकलाबाईंचा जीव घाबराघुबरा झाला. लग्नाची बातमी ऐकून लेकीचे इतके काही बिनसले आहे हे पाहून नक्कीच काही तरी भानगड असावी याचा दोघांनाही संशय आला.
"तरी मी सांगत होते तुम्हाला,
"तरी मी सांगत होते तुम्हाला, आपण तिचं लग्न तिच्या परस्पर ठरवून टाकायला नको. तुम्ही ऐकलं नाही माझं अजिबात" पुढचा सिन लिहिता लिहिता शशिकलाबाई विनायकरावांना म्हणाल्या. १२ वाजता येते म्हणालेल्या अंजूचा ३ वाजले तरी पत्ता नव्हता. इतक्या वेळ वाटत बघत असलेल्या कामवाल्या मावशी आत्ताच निघुन गेल्या होत्या.
घराजवळच्या नाक्यावरून गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला आणि शशिकलाबाईंचा हात कानावर गेला. समोरून येणार्या आपल्या रूपवान मुलीला पाहून त्या स्वतःशीच म्हणाल्या, "आज हिचा मूड बघूनपुढच्या सिरियलमधल्या हिच्या रोलची हिला कल्पना द्यायला हवी".
अंजू घरात येताच नेहमीप्रमाणे डॅडींच्या गळ्यात न पडता आपल्या खोलीकडे पळाली आणि डॅडींच्या कपाळावर हलकीशी आश्चर्याची आणि सोबतच नाराजीचीही भावना कशी दाखवायची ते त्यांना कळेना आणि नेहमीप्रमाणे शशिकलाबाईंचा चेहरा आउट ऑफ फोकस झाला. लग्नाची बातमी ऐकून लेकीचे इतके काही बिनसले आहे हे पाहून नक्कीच काही तरी नविन चित्रपट किंवा नाटकाची हिला ऑफर असावी याचा दोघांनाही संशय आला.
तरी मी सांगत होते तुम्हाला,
तरी मी सांगत होते तुम्हाला, आपण तिचं लग्न तिच्या परस्पर ठरवून टाकायला नको. तुम्ही ऐकलं नाही माझं अजिबात" वार्ताहार परिषदेत येऊन शशिकलाबाई विनायकरावांना म्हणाल्या. १२ वाजता येते म्हणालेल्या अंजूचा ३ वाजले तरी पत्ता नव्हता. इतक्या वेळ वाटत बघत असलेल्या वार्ताहरांची जागा आता संपादकांनी घेतली होती.
घराजवळच्या नाक्यावरून गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला आणि शशिकलाबाईंचा भ्रमणध्वनी वागळ्यांच्या हातावार्यांकडे गुरगुरत बघणार्या टॉमीवर पडला. समोरून येणार्या आपल्या रूपवान मुलीला पाहून त्या स्वतःशीच म्हणाल्या, "आज हिची वरात काढायलाच हवी".
अंजू घरात येताच नेहमीप्रमाणे डॅडींच्या गळ्यात न पडता आपल्या खोलीकडे पळाली आणि डॅडींच्या कपाळावर हलकीशी आश्चर्याची आणि सोबतच नाराजीचीही हेडलाईन उमटली आणि नेहमीप्रमाणे शशिकलाबाईंचा कमर्शियल ब्रेक झाला. लग्नाची बातमी ऐकून लेकीचे इतके काही बिनसले आहे हे पाहून नक्कीच काही तरी ब्रेकिंग न्युज असावी याचा दोघांनाही संशय आला.
दोन्ही मस्त !
दोन्ही मस्त !
"तरी मी सांगत होते तुम्हाला,
"तरी मी सांगत होते तुम्हाला, आपण तिचं लग्न तिच्या परस्पर ठरवून टाकायला नको. तुम्ही ऐकलं नाही माझं अजिबात " चिडक्या स्वरात शशिकलाबाई विनायकरावांना म्हणाल्या. १२ वाजता येते म्हणालेल्या अंजूचा ३ वाजले तरी पत्ता नव्हता. इतक्या वेळ वाट बघत येरझार्या घालणार्या शशिकलाबाई फेसबुक समोर बसल्या.
घराजवळच्या नाक्यावरून गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला आणि शशिकलाबाईंचा फेसबुक समोर असलेला फेस फेसबुकात बुडाला. समोरून येणार्या आपल्या रूपवान मुलीला पाहून त्या स्वतःशीच म्हणाल्या, " बरं झालं बाई आज हिने आज फेसबुकावरचा प्रोफाईल फोटो बदलला.
अंजू घरात येताच नेहमीप्रमाणे डॅडींच्या गळ्यात न पडता आपल्या खोलीकडे पळाली आणि डॅडींच्या कपाळावर हलकीशी आश्चर्याची आणि सोबतच आनंदाची झाक आली आणि नेहमीप्रमाणे शशिकलाबाईंच्या फेसला फेस आला. लग्नाची बातमी ऐकून लेकीचे इतके काही बिनसले आहे हे पाहून नक्कीच काही तरी फे(फि)स्कटलं असावं याचा दोघांनाही संशय आला.
"तरी मी सांगत होते तुम्हाला,
"तरी मी सांगत होते तुम्हाला, आपण तिचं लग्न तिच्या परस्पर ठरवून टाकायला नको. तुम्ही ऐकलं नाही माझं अजिबात" तिरिमिरीत येऊन शशिकलाबाई विनायकरावांना म्हणाल्या. १२ वाजता येते म्हणालेल्या अंजूचा ३ वाजले तरी पत्ता नव्हता. इतक्या वेळ वाटत बघत असलेल्या संयमाची जागा आता संतापाने घेतली होती.
घराजवळच्या नाक्यावरून गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला आणि शशिकलाबाईंचा जीव कोल्ड स्टोरेजमधल्या कोंबडीसारखा थंड पडला. समोरून येणार्या आपल्या रूपवान मुलीला पाहून त्या स्वतःशीच म्हणाल्या, "आज हिच्या कानाखालीच वाजवायला हवी".
अंजू घरात येताच नेहमीप्रमाणे डॅडींच्या गळ्यात न पडता आपल्या खोलीकडे पळाली आणि डॅडींच्या कपाळावर हलकीशी आश्चर्याची आणि सोबतच नाराजीचीही स्मायली उमटली आणि नेहमीप्रमाणे शशिकलाबाईंचे स्माइलच गायब झाले. लग्नाची बातमी ऐकून लेकीचे इतके काही बिनसले आहे हे पाहून नक्कीच काही तरी गळपाटलं असावं याचा दोघांनाही संशय आला.
तरी मी सांगत होते तुम्हाला,
तरी मी सांगत होते तुम्हाला, आपण तिचं लग्न तिच्या परस्पर ठरवून टाकायला नको. तुम्ही ऐकलं नाही माझं अजिबात"असं व्हॉट्सॅपवर शशिकलाबाई विनायकरावांना म्हणाल्या. १२ वाजता येते म्हणालेल्या अंजूचा ३ वाजले तरी पत्ता नव्हता. इतक्या वेळ 'वेटिंग फॉर बच्चा,वरीड' या फेसबुक स्टेटसची जागा आता 'टेन्शन'ने घेतली होती..
घराजवळच्या नाक्यावरून गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला आणि शशिकलाबाईंचा स्मार्टफोन नेमका हँग झाला. समोरून येणार्या आपल्या रूपवान मुलीला पाहून त्या स्वतःशीच म्हणाल्या, "आजच हिच्या या नव्या पर्समध्येसुद्धा जीपीएस चिप बसवायला हवी".
अंजू घरात येताच नेहमीप्रमाणे डॅडींच्या गळ्यात न पडता आपल्या खोलीकडे पळाली आणि डॅडींच्या कपाळावर हलकीशी आश्चर्याची आणि सोबतच नाराजीचीही स्मायली उमटली आणि नेहमीप्रमाणे शशिकलाबाईंचा फोन डेड झाला. लग्नाची बातमी ऐकून लेकीचे इतके काही बिनसले आहे हे पाहून नक्कीच काही तरी ऑपरेटिंग सिस्टमचा लोचा असावा याचा दोघांनाही संशय आला.
"तरी मी सांगत होते तुम्हाला,
"तरी मी सांगत होते तुम्हाला, आपण तिचं लग्न तिच्या परस्पर ठरवून टाकायला नको. तुम्ही ऐकलं नाही माझं अजिबात" हेलपाटत येऊन शशिकलाबाई विनायकरावांना म्हणाल्या. १२ वाजता येते म्हणालेल्या अंजूचा ३ वाजले तरी पत्ता नव्हता. इतक्या वेळ वाटत बघत असलेल्या पाण्याची जागा आता टकीलाने घेतली होती.
घराजवळच्या नाक्यावरून गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला आणि शशिकलाबाईंचा जीव टकीलाच्या ग्लासात पडला. समोरून येणार्या आपल्या रूपवान मुलीला पाहून त्या स्वतःशीच म्हणाल्या, "आज विचारतेच मायबोलीवर, ह्या मुलीचे करायचे काय?".
अंजू घरात येताच नेहमीप्रमाणे डॅडींच्या गळ्यात न पडता आपल्या खोलीकडे पळाली आणि डॅडींच्या कपाळावर हलकीशी आश्चर्याची आणि सोबतच खुनशी हास्याची लहर उमटली आणि नेहमीप्रमाणे शशिकलाबाईंचा जीव घाबराघुबरा झाला. लग्नाची बातमी ऐकून लेकीचे इतके काही बिनसले आहे हे पाहून नक्कीच काही तरी लफडंअसावं याचा दोघांनाही संशय आला.
सगळेच
सगळेच
आम्ही काय बॉलीवूडचं झाड सोडत
आम्ही काय बॉलीवूडचं झाड सोडत नाही!!!
"तरी मी सांगत होते तुम्हाला, आपण तिचं लग्न तिच्या परस्पर ठरवून टाकायला नको. तुम्ही ऐकलं नाही माझं अजिबात" बॉबी देओलसारखा चेहरा करून येऊन शशिकलाबाई विनायकरावांना म्हणाल्या. १२ वाजता येते म्हणालेल्या अंजूचा ३ वाजले तरी पत्ता नव्हता. इतक्या वेळ वाटत बघत असलेल्या फरदीन खानची जागा झायेद खानने घेतली.
घराजवळच्या नाक्यावरून गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला आणि शशिकलाबाईंचा जीव दबंगमधल्या सलमान खानच्या शर्टसारखा पडला. समोरून येणार्या आपल्या रूपवान मुलीला पाहून त्या स्वतःशीच म्हणाल्या, "आज अगदी प्रिया राजवंशसारखी दिसतेय, हिच्यावरून नवीन निश्चल उतर वावा लागेल. ".
अंजू घरात येताच नेहमीप्रमाणे डॅडींच्या गळ्यात न पडता आपल्या खोलीकडे पळाली आणि डॅडींच्या कपाळावर हलकीशी आश्चर्याची आणि सोबतच नाराजीचीही संजय दत्त उमटला आणि नेहमीप्रमाणे शशिकलाबाईंचा जीव भारत भूषण झाला. लग्नाची बातमी ऐकून लेकीचे इतके काही बिनसले आहे हे पाहून नक्कीच काही तरी चोप्रा-खान असावी याचा दोघांनाही संशय आला.
सगळेच एक सो एक .
सगळेच एक सो एक .
सगळेच सही लिहीतायत
सगळेच सही लिहीतायत