गुगल पुरस्कृत उपक्रमात मायबोलीचा सहभाग
जगातल्या बहुसंख्य प्रगत देशात इंटरनेवरचं स्त्रियांचं प्रमाण ५०/५० (किंवा जवळपास आहे). पण भारतात मात्र हे प्रमाण ३०% पेक्षा कमी आहे. जास्तीत जास्त भारतीय स्त्रियांनी इंटरनेटचा वापर करावा, त्यांना सुरवातीला येणार्या अडचणी दूर करता याव्यात म्हणून गुगल या कंपनीनं hwgo.com (Helping Women Get Online) हा सार्वजनिक हिताचा एक खूप चांगला उपक्रम सुरु केला आहे. इंटरनेटबद्दलची माहीती आणि महत्व सोप्या भाषेत सांगणं, इंटरनेटवरचा महिलांंना उपयुक्त वाटेल असा मजकूर दाखवणं, प्रत्यक्ष फोनवरून मदत करणं (Handholding) असं या उपक्रमाचं स्वरूप आहे.
भारतीय महिलांसाठी हा उपक्रम असल्याने, साहजिकच वेगवेगळ्या स्थानिक भारतीय भाषेत मजकूर असणं आवश्यक आहेच. मायबोली या उपक्रमात सहयोगी म्हणून अधिकृतरित्या सामील झाली आहे. मायबोलीवरच्या वेगवेगळ्या उपयुक्त मजकुराचे दुवे (लिंक्स) , या माध्यमाद्वारे जास्त महिलांपर्यंत पोहोचतील आणि इंटरनेटवरचा त्यांचा वावर अधिक उपयोगी आणि आनंददायी ठरेल अशी अपेक्षा आहे.
अर्थातच कुठले लेख यात दाखवले जातील हे गुगल आणि मायबोली यांच्या एकत्र संपादकीय प्रक्रीयेतून ठरेल. मायबोलीवरच्या लेखकांना जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही आणखी एक संधी आहे. मायबोलीच्या गुगलप्लस पानावरच्या चाहत्यांची संख्या सध्या १,५०,००० हून अधिक आहे.
या उपक्रमाचे संयोजन गेल्या काही महिन्यांपासून सुरु होते. परंतू अधिकृत कराराबाबतच्या सगळ्या गोष्टींची पूर्तता होईपर्यंत गुगलच्या नियमांनुसार गोपनीयता ठेवणे आवश्यक होते. फक्त कायदेशीर गोष्टींसाठीच नव्हे तर "आधी केले, मग सांगितले" हे मायबोलीचे धोरण असल्यानेही सगळे पूर्ण होईपर्यंत आपण जाहीर करणार नव्हतो.
ज्या मायबोलीकरांनी ही गोपनीयतेची काळजी घेऊन, त्यांचे लेख वापरण्याची परवानगी दिली त्यांचे खूप आभार. आता यापुढच्या आवृत्यांमधे पूर्ण मोकळेपणाने अधिक मायबोलीकरांच्या लेखनाचा वापर करता येईल.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मायबोलीची निवड केल्याबद्दल आणि नंतर सगळ्या प्रक्रियेतून जात असताना केलेल्या मदतीबद्दल गुगलच्या अधिकारी दिप्ती आचार्य आणि शेफाली अरोरा यांचे मनापासून आभार.
मायबोलीने यापूर्वी अनेक सेवाभावी उपक्रमात भाग घेतला आहे. आपल्या देशाचा इंटरनेटचा नकाशा , सकारात्मकरित्या बदलवण्याचं सामर्थ्य असणार्या या उपक्रमात, मायबोलीचाही खारीचा वाटा आहे ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
अभिनंदन
अभिनंदन
अरे वा! मस्तच की
अरे वा! मस्तच की
अभिनंदन!!!
अभिनंदन!!!
मायबोलीचे अभिनंदन !!!
मायबोलीचे अभिनंदन !!!
मस्त! अभिनन्दन.
मस्त! अभिनन्दन.
अभिनंदन ..
अभिनंदन ..
मस्तच!! अभिनंदन
मस्तच!! अभिनंदन
मस्तं. अभिनंदन. माझी
मस्तं.
अभिनंदन.
माझी वंध्यत्वाची सिरीज तुम्हाला वापरायची असेल तर माझ्या आय डी च्या नावाने वापरू शकता.
अरे वा!! अभिनंदन.
अरे वा!! अभिनंदन.
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन व शुभेच्छा! मदत
अभिनंदन व शुभेच्छा!
मदत लागल्यास सांगा.
अभिनंदन व शुभेच्छा!
अभिनंदन व शुभेच्छा!
अभिनंदन!!!
अभिनंदन!!!
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन
अभिनंदन
अतिशय अभिमानास्पद कार्य आहे
अतिशय अभिमानास्पद कार्य आहे हे. मायबोली झिंदाबाद!
अभिनंदन!
अभिनंदन!
खूपच स्तुत्य उपक्रम - अनेक
खूपच स्तुत्य उपक्रम - अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन.
वा! अभिनंदन!
वा!
अभिनंदन!
अभिनंदन
अभिनंदन
अरे वा, अभिनंदन. मायबोली
अरे वा, अभिनंदन. मायबोली रॉक्स !!
मस्तच.. अभिनंदन.. गर्व आहे मी
मस्तच.. अभिनंदन.. गर्व आहे मी मायबोलीकर असण्याचा....
ओह ग्रेट ! अभिनंदन सर्वांचेच
ओह ग्रेट ! अभिनंदन सर्वांचेच
अभिनंदन! गर्व आहे मी
अभिनंदन!
गर्व आहे मी मायबोलीकर असण्याचा.... >>+१
मस्त..
मस्त..
गर्व आहे मी मायबोलीकर
गर्व आहे मी मायबोलीकर असण्याचा....>>> अभिमान!!!!
अभिनंदन, मायबोली टीम!!!
अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन.
अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन.
अभिनंदन
अभिनंदन
अरे वा.. छानच !
अरे वा.. छानच !
Pages