चंद्रमोहन शर्मा कालच्या आणि आजच्या क्राईम रिपोर्ट मधे झळकतो आहे त्याच्या कृष्ण कृत्यांच्या यादीमुळे. हिचकॉक ला लाजवेल असा हा प्लॅन केवळ बायकोला सोडुन गर्लफ्रेंड मिळावी इतकाच नव्हता तर बायकोला पोटगी द्यायला लागु नये. पहिल्या बायकोला अनुकंपा तत्वावर आपल्या कंपनीत नोकरी मिळावी. कंपनीकडुन विम्याची रक्कम मिळावी यासाठी त्याने एका माणसाला कारमध्ये ठेऊन ती पेटवुन दिली.
गेले तीन महिने पोलीसांच्या दृष्टिने चंद्रमोहनचा अपघाती मृत्यु ही केस बंद झाली असेल. एफआय आर आणि पोलीस तपास याच्या आधारे इन्शुरन्स कंपनी सुध्दा पैसे देण्याच्या तयारीत असेल आणि चंद्रमोहनच्या कंपनीने त्याच्या पत्नीला नोकरी देण्याची प्रोसेस सुरु केली असेल.
चंद्र्मोहनने आपली कार पेटवुन त्यात एका भलत्याच माणसाला बसवुन दिल्लीहुन बेंगलोरचा रस्ता पकडला तेव्हा त्याच्या गर्ल फ्रेंडला माहित नव्हते ही तो जिवंत आहे. जेव्हा काही दिवसाने चंद्र्मोहनने तिच्याशी संपर्क करुन तिला जेव्हा बेंगलोरला नेले तेव्हा ही केस दुसर्या पध्दतीने रिओपन झाली. तिच्या घरच्यांनी तिच्या गायब होण्याची केस दिल्लीत नोंदवली.
इथपर्यंत या दोघांच ठीक चालल होत. चंद्रमोहनने आपल नाव संतोष शर्मा ठेऊन त्याप्रमाणे नविन कागदपत्रे बनवुन नविन नोकरी शोधण्यात यश मिळवल होत. त्याची गर्लफ्रेंड मिसींगची केस बंद व्हायच्या उद्देशाने त्याने तिच्या घरच्यांना फोन करुन ती तिरुपती बालाजीला दिसल्याची सुचना स्वतःच्या मोबाईलवरुन दिली. या फोनचे लोकेशन जेव्हा हाच फोन पुन्हा आला तेव्हा पोलीसांनी शोधले आणि ते बेंगलोर सापडले. या ठिकाणाचा शोध घेतल्यानंतर जेव्हा फोन सोबत नोंदलेल्या फोटोच्या आधाराने पोलिसांनी त्याच्या कंपनीतील फुटेज पाहिले तेव्हा संतोष शर्मा सापडला. जेव्हा दिल्ली पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन आणखी चौकशी केली तेव्हा त्याच्या हातावर गोंदलेले चंद्र्मोहन हे नाव दिसले आणि त्यावरुन हा सगळा उलगडा झाला.
त्याचा मेव्हणा या कटात सामिल होता कि नव्हता याच उलगडा होईल. कदाचित बायको सुध्दा सामिल असल्याचे सापडेल पण इन्शुरन्स कंपन्या व तपास करणारे पोलिस अधिकारी मात्र या केस नंतर खास करुन जळुन मृत पावलेल्यांची खात्री करण्यासाठी नविन पध्दती शोधाव्या लागतील.
नोकरी देणार्यांना सुध्दा जर आधार कार्ड सारख्या कार्डचा उपयुक्त वापर करण्याची संधी मिळाल्यास हे गुन्हे सहज शोधता येतील. पोलीस खात्याला हा जळुन मृत झालेल्या माणसाचा तपास संपवताना त्याच्या आधार कार्डाला / वोटर्स कार्ड वा अन्य फोटो आयडेंटी कार्ड्स गोठवले आले असते तर चंद्रमोहनला नविन सीम कार्ड मिळु शकले नसते.
वोटर्स कार्ड किंवा आधार कार्ड याच्या आधाराने ज्या गोष्टी मिळतात ती कार्डस लगेचच गोठवता येण्याची तरतुद आता व्हायला हवी. याच बरोबर ह्या कार्डांच्या आधारावर जेव्हा बँक अकाउंट ओपन होते किंवा सीम कार्ड मिळते तेव्हा व्हेरीफिकेशन मधे एखाद्या साईटवर याची माहिती ताबडतोब उपलब्ध झाल्यास असे गुन्हे थांबवुन गुन्हेगार आयता हातात सापडेल.
एखादा माणुस गुन्हे करुन शिक्षा भोगत असताना त्याचे वोटर कार्ड , आधार कार्ड , ड्रायव्हींग लायसन्स ताबडतोब निलंबीत होण्याची गरज सुध्दा आहे.
आपल्या देशात अनेक कार्ड असताना आधार कार्डचा शुभारंभ केला गेला. हीच कार्ड तपासायची पध्दत आणि गोठवण्याची पध्दत मात्र सुरु आहे किंवा नाही याबाबत काही माहिती उपलब्ध्द नाही.
हेडिंगवरुन वाटल कि पोलिसी
हेडिंगवरुन वाटल कि पोलिसी चातुर्य कथा असेल. २४ तास हे चॅनेलवाले आता दळण दळून बारीक पीठ काढतील. टेण्शन घेऊ नये .
नितीन्चंद्र असे हजारो गुन्हे
नितीन्चंद्र असे हजारो गुन्हे घडत असतात. पण चन्द्रमोहनांच्या गुन्ह्याचा धागा बनला ह्याला कारण त्यांची पत्नी आप ह्या पक्षात कार्यरत आहे नि आप वर बर्याच जणांचा राग आहे कारण त्यामुळे दिल्लीत भाजपला सर्वाधिक जागा मिळवूनही हात चोळीत बसावे लागले.
मी जे काही लिहले ते कुणी निट
मी जे काही लिहले ते कुणी निट वाचले असे वाटत नाही.
शर्मा जरी भाजपचा कार्यकर्ता असता तरी लिहले असते कारण ही गुन्ह्यांची मालिका भयानक आहे.
शर्माचा गुन्हा आणि तपास पोलीस चातुर्यामुळे लागला नसुन त्याच्या चुकीमुळे लागला आहे.
हा तपास लवकर लागावा या साठी काय उपाययोजना असावी याबाबत ते होते.
Love, Sex, Dhokha: 'Dead' AAP
Love, Sex, Dhokha: 'Dead' AAP activist Chandra Mohan Sharma's dramatic tale
On May 3, 2014 AAP convenor Arvind Kejriwal came out in support of a 'dead' RTI activist Chandra Mohan Sharma and slammed the police for its laxity in the case. Sharma was found dead in a car in Greater Noida on May 1, 2014.
हा चंद्रमोहन ३ मे ला कारच्या आगीत मेला त्यावेळी केजरीवालनी पोलिसांना धारेवर धरल होत, तोच चंद्रमोहन
बेंगलुरु मध्ये पोलिसांच्या हाती आला.
ह्या प्रकरणामुळे काही प्रश्न पडतात,
१. आआप अॅक्टीविस्ट ह्यांचे बॅकग्राऊंड चेक केल असेल ?
२. दुसर्याला जाब विचारणारे अॅक्टीविस्ट स्वता किती धुतल्या तांदळासारखे असतात ?
३. स्वताला दुसरा जन्म देण्यासाठी तिसर्याच एकाला मारुन टाकणे ह्याना कसे काय जमते.
कुंती आणि ५ पांडवानी
कुंती आणि ५ पांडवानी लाक्षागृहात सहा निष्पाप आदिवासीना जाळुन मारलं होतं.
जय हिंदुत्व
नितीनचंद्र , १००००००००००००%
नितीनचंद्र ,
१००००००००००००% अनुमोदन !!
आधार कार्ड योजना १००% फसलेली आहे, ईतका अफाट खर्च करुन जारी केलेल्या आधार कार्डवर मेमरी चिप नाही, जर मेमरी चीप नाही म्हणजे कोणतीही माहीती ह्या कार्ड द्वारे मिळणार नाही. अजुनही मोबाईल फोन सिम
साठी आधारकार्डची कॉपी देणे आवश्यक नाही. दुसरी कोणतीही ओळखपत्राची कॉपी दिली तरीही चालते.
आताश्या जगभरात बर्याच देशात असे कार्ड सक्तीचे झालेले आहे आणि सर्व व्यवहार अश्या कार्डच्या द्वारेच होत असतात, त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला दोन वेगवेगळी नावे धारण करता येत नाहीत.
हि खरी केस ना ! खुप
हि खरी केस ना ! खुप वर्षांपुर्वी असे एक नाटक दूरदर्शनवर बघितले होते. शिवाजी साटम, प्रिया तेंडूलकर, किशोरी शहाणे, अनंत जोग असे नावाजलेले कलाकार होते त्यात.
कुंती आणि ५ पांडवानी
कुंती आणि ५ पांडवानी लाक्षागृहात सहा निष्पाप आदिवासीना जाळुन मारलं होतं.
जय हिंदुत्व
इथे हिंदुत्वाचा संबंध काय ? मी हिदुत्वाचा पुरस्कर्ता आहे म्हणुन ?
संमि, काय झाल ? लेंड्या
संमि,
काय झाल ? लेंड्या तोंडात गेल्या का ?
आपच्या कार्यकर्त्याने केलेला
आपच्या कार्यकर्त्याने केलेला पराक्रम तुम्हाला अद्वितीय वाटतो.
पण तुमच्या हिंदु हिरोंनी आणि त्यांच्या मातोश्रींनी हा पराक्रम पूर्वीच केलेला आहे. हिंदुत्वाचा उल्लेख करण्यामागे फक्त त्या इतिहासाला उजाळा देणं इतकाच उद्देश होता.