अंबाडीची भाकरी

Submitted by हर्ट on 27 August, 2014 - 11:46

अंबाडीचे नाव काढता काहीजणांचे दात आंबत असावेत इतकी आंबट असते अंबाडी. पण भाकरीच्या पिठात मिसळून अंबाडीची भाकरी खाताना ह्या भाजीचा आंबटपणा जिभेला हवाहवासा वाटतो.

ह्या भाकरीची पाककृती लिहिण्यापुर्वी एक चित्र पाहूया ह्या भाजीचे आणि हे चित्र नेटवरुन घेतलेले आहे. नेटला धन्यवाद.

plant.jpg

आता कृती:

साहित्य: अंबाडीची भाजी, तिखट हिरव्या मिरच्या, मीठ, जिरे

१) अंबाडीछी पाने निवडून धुवून घ्या:

gongurapappucopyrightedimage1.jpg

२) मंद आचेवर एका पातेल्यात पाणी उकळयाला ठेवा आणि पाणी कोमट झाल की मगच ही निवडलेली पाने पाण्यात सोडा. पानी झिजली की ती तळाशी बसतात आणि पानांचा रंग आणखी गडद दिसायला लागतो. पाण्याला एक शेवाळी झाक यायला लागते. की समजून घ्यायचे आता आच बंद करायची.

३) ताव्यावर तेलात हिरव्या मिरच्या आणि जिरे अरत परत कराव्यात आणि मिरच्यातील बिया बाहेर येतील पण तव्यावरच राहतील ह्याची काळजी घ्यावी. हे करताना तेल वा एखादी बी डोळ्यात उडणार नाही ह्याचीही काळजी घ्यावी. जिरे सहसा मोहरीसारखे उडत नाही. हे सर्व करुन झाले की ह्या मिरच्या पोळपाटावर किंवा पाट्यावर रगडून घ्याव्यात.

३ ला दुसरा पर्यायः

३) भाजी शिजवतानाच त्यात मिरच्या घालायच्या. दोन्ही एकत्र मऊ शिजतात. आणि मग भाकरीचे पिठ मळवताना पिठाशी मस्त एकजीव देखील होतात.

४) ज्वारीच्या पिठामधे आधी चमचाभर मिठ घालायचे. अंबाडीच्या भाकरीला जरा जास्तच मिठ लागत. मिठ कमी घातली की हवी तशी चव येत नाही भाकरीला. पिठामधे एक खळ करुन पातेल्यातील ऊन ऊन पाणी थोडे थोडे सोडायचे आणि सराट्यानी पिठ, पाणी आणि भाजी एकत्रित एकजीव करुन हाताला गार पाणी लावून समांतर पसरवून घ्यावे. एकदमच खूप पाणी टाकले की पिठाचा उंडा पातळ होऊ शकतो. तेंव्हा थोडे थोडे घालून त्याला एकजीव करत राहावे.

एकजीव झालेला भाकरीचा उंडा असा दिसतो:
Ambadi01.jpg

५) आता एक मेणकापड घेऊन ते पोळपाटावर ठेवून भाकरी थापावी:

Ambadi05.jpg

६) ताव्यावर भाकरी टाकण्यापुर्वी भाकरी थापतानाच तावा चुलीवर ठेवावा. तापलेल्या ताव्यावर अलगद हाताने भाकरी टाकावी.

Ambadi07.jpg

७) भाकरी दोन्हीबाजूनी कडेपर्यंत खरपूस भाजून शेकून घ्यावी:

Ambadi09.jpgAmbadi13.jpg

ही झाली अंबाडीच्या भाकरीची कृती. ह्यामधे तुम्ही बदल करु शकता. जसे की थालीपिठाप्रमाणे ह्यात इतर साहित्य घालू शकता. किंवा हिवाळ्याचे दिस असतील तर तिळ घालू शकता. तेल कडेकडेला सोडून भाकरीची पोळी करु शकता. जशी तुमची चव. .तसे तुमचे बदल!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आंबाडीची भाजी आणि ज्वारीची भाकरी प्रचंड आवडते. पण अशी भाजी घालून केलेली भाकरी कधी खाल्ली नव्हती. ही साध्या भाकरीसारखी फुगत नाही का शेकताना?

माधवजी ह्या भाकरीला पापुद्रा सुटतो पण ही माझी पहिली भाकरी होती आणि मी चांगल्या जमलेल्या भाकरीचा फोटो नाही घेऊ शकलो.

मामी, हो पाणी लावतात भाकरीला पण मी पहिल्या भाकरीला पाणी नाही लावले.

सर्वांचे खूप खूप आभार.

मी नेहमी भाजी भाकरी करते. आणि उरलेल्या भाजीची अशी भाकरी. मस्त २ वेळेस खात येते एक्च पदार्थ वेगवेगळ्या चवीत Happy

छानच.
पण का कोण जाणे ही भाकरी(मस्त पापुद्रा/पोपडा किंवा भाजताना टम्म फुगलेली) वाटत नाही. ठेपला, थालीपीठ कॅटॅगिरीतला प्रकार असावा असा बनवलाय तुम्ही.

बी.. माझ्या अत्यंत आवडीची आहे ही भाकरी.. आंबाडी बाजारात असे पर्यंत घती आठवड्यातुन एकदा तरी होतेच...
आंबाडीची भाकरी आणि लसणाची चटणी... आ हा हा!

अंबाडीला रोसेले म्हणतात इंग्रजीत.
इथे कानडीत पुंडी पल्ल्या म्हणतात.
सोमवारी, अमावस्येला आणि सणाला करत नाहीत.
बाजूला तेलंगणात घोंगुरा म्हणतात.
आंध्रा पद्धतीने मस्तं लागते याची चटणी किंवा लोणचं.

आम्ही इथे कणभरही तेल न घालता तूरडाळ घालून पुंडीपल्ल्या करतो.
अप्रतिम लागते.

बी, धन्यवाद. अशी भाकरी नक्की करून बघेन.

दिनेशदा, हो आईच्या हातच्या भाकर्‍या मोठ्या असतात आणि ती हातावरच करते हे विषेश.

पातुरकर, मी अकोल्याचा. तुझे नाव आणि लेखनशैली आणि माहिती वाचून चटकन लक्षात आले तू वर्‍हाडातली आहेस म्हणून.

बी, आईचा हात तो आईचा हात रे.. त्या चवीची आठवण कायम असते मनात.
हि कला अगदी आजकालच्या मुलींना पण अवगत असते. माझ्या सगळ्या मावस / मामेबहिणी हातावरच्या भाकर्‍या करतात. त्याची चव न्यारीच.

काही मायबोलीकरणीपण करतात आणि मी खाल्ल्याही आहेत त्यांच्या हातच्या !

आमच्या काॅलनीत राहणार्या काकु खामगावच्या आहेत त्यांनी सांगितली होती पण उन्हाल्यात मिलत नसल्यामुले करायची राहिली अन विस्मरणात गेली त्यात भरपूर लसूण सांगितला होता. सधया भाजी मिलतेय नक्की करुन पाहीन.

Pages