प्रचि १
माऊंट रेनिअर! - सिअॅटलच्या स्कायलाईन वर दिसत रहाणारा, किंवा बहुतेक वेळा ढगांच्या पडद्यात गुरफटून नाहीसा होणारा, एखादा ऋषि आपली पांढरीशुभ्र दाढी सोडून तपश्चर्या करत बसल्यागत दिसणारा, पण प्रत्यक्षात आतून खवळणारा ज्वालामुखी उदरात घेऊन वावरणारा तर वरती जवळपास २५ glaciers बाळगून असणारा - १४५०० फूट उंचीचा हा पर्वत!
गेल्या विकांताला (१५,१६,१७ ऑगस्ट) माऊंट रेनिअर नॅशनल पार्क ला गेलेलो - त्याचे काही फोटोज नी वृतांत!
ऑगस्ट महिना म्हणजे पार्कात रानफुलांच्या बहरीचा काळ! रंगीबेरंगी फुलांनी बहरलेला पार्क आणि बॅकग्राऊंडवर रेनिअर म्हणजे डोळ्यांना पर्वणीच!
आजतागायत रेनिअरला कायम एक दिवसाची ट्रीप केल्ये. यावेळी मात्र घरात चालू असलेल्या कामातून जरा बदल म्हणून २ दिवस कोठेतरी जाऊ असे ठरवून सहज पार्कच्या आतलं पॅरॅडाईस इन चेक केलं - आणि आश्चर्य म्हणजे नेमकं शुक्रवार-शनिवार कोणीतरी आयत्या वेळी cancellation केल्यामुळे आम्हाला बुकिंग मिळालं. नाहीतर पार्कच्या आतल्या लॉजेस ची बुकींग्ज उन्हाळ्यात मिळणं म्हणजे महाकठीण काम!
प्रचि २ - पॅरॅडाईज इन
पार्क मधील हा एक धबधबा - नारदा फॉल्स! - हो! नारद मुनींचं नाव या धबधब्याला दिलंय! त्यांच्या नावाची इथे कुठे वर्णी लागली काय ठाऊक!
प्रचि ३
शुक्रवारी संध्याकाळी पार्क मध्ये पोहोचलो - त्या दिवशी आणि दुसर्या दिवशीही, मध्येच ढग येऊन रेनिअर साहेबांना झाकून टाकतायत आणि अचानक कोणीतरी पडदा उघडावा तसा ढगांचे आवरण बाजूला होऊन समोर महाराज प्रकट - असा लपाछपीचा खेळ चालू होता!
पॅरॅडाईज पॉईंट हा पार्क मधील सर्वांत पॉप्युलर एरिआ! हजारोंनी पर्यट्क उन्हाळ्यात या भागाला भेट देतात. पॅरॅडाईज भागात - पॅरॅडाईज व्हिजिटर सेंटर च्या परीसरात स्कायलाईन ट्रेल ही साधारण ४.५ मैलाची, रेनिअर ला मिठी मारता येईल अशी जवळ जाणारी लूप ट्रेल आहे - नितांतसुंदर! त्याला अनेक उपफाटे पण आहेत.
सकाळी १० नंतर पर्यटकांची गर्दी चालू झाली की हा ट्रेल प्रचंड बिझी होतो. पण यावेळी मात्र आम्ही शेजारीच राहिल्याने जरा लवकरच ट्रेलवर गेलो. अधे-मधे हलके-फुलके ढग उतरलेत- नजर जाईल तिथे रानफुलांची जत्रा, मध्येच दर्शन देणारा- आणि क्षणात आपल्या डोळ्यादेखत नाहीसा होणारा रेनिअर - अश्या वातावरणात सुमारे २ मैल चालल्यावर धाकट्या चिरंजीवांनी आता (अगदी) बास असे जाहीर केल्यावर मग परतलो. पुढचा ट्रेल बराच स्टीप देखील होता - तो आत्ता राहू देत असं म्हणत परतलो.
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
ट्रेलहेड पाशीच हॉटेल असल्याचा फायदा म्हण जे दुपारच्या उन्हात आणि गर्दीच्या वेळात शांतपणे रूमवर जाऊन आडवे झालो! ते संध्याकाळी ६ नंतर परत बाहेर पडलो. आता जवळ च्या मिर्टल फॉल्स ला चक्कर मारली.
प्रचि १३
स्कायलाईन ट्रेल पूर्ण झाला नाही म्हणून दुसर्या दिवशी सकाळी उठून मी आणि मोठे चिरंजीव यांनी तो ट्रेल पूर्ण करायचा ठरवला. सकाळी ७-७.१५ ला आम्ही दुसर्या बाजूने त्या ट्रेलला लागलो. काय वर्णावा तो नजारा! मैलोन मैल पसरलेली दरी, तो almighty Rainier, रानफुलांनी नटलेली वाट, सकाळची जादुई वेळ! केवळ स्वप्नात आहोत आपण असं वाटत होतं! Paradise point हे नाव सार्थ असल्याचं पटवून देणारा अनुभव!
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६ - Paradise Inn and Paradise Visitor Center - seen from the trail
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
ट्रेलवरून परतेपर्यंत ऊन आणि गर्दी फारच वाढली होती. दुपारी जेऊन आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो तर पॅरॅडाईसला यायला गाड्यांची मैल भर रांग लागलेली!
परतताना मध्ये ह्या reflection lake ला भेट दिली. पण रेनिअर साहेब तोपर्यत परत ढगांचं आवरण चढवून बसलेले. त्यामुळे त्यांचं reflection काही लेक मध्ये दिसलं नाही.
प्रचि २१
======================================================
सप्टेंबर २०१५ ला रेनिअर फॉल ट्रीप केली. पानगळीचे रंग अगदी बहरात आहेत रेनिअर परिसरात. त्याची फोटोरूपी झलक :
खुप सुरेख.... व्वा!
खुप सुरेख.... व्वा!
माऊंट रेनिअरला यंदा फॉल ट्रीप
माऊंट रेनिअरला यंदा फॉल ट्रीप केली. त्याचे फोटोज टाकले आहेत!
वॉव! काय सुरेख रंग दिसत आहेत
वॉव! काय सुरेख रंग दिसत आहेत .. आणि मस्त पावसाळी वातावरण ..
छान आहेत रंग (आणि आधीचे फोटो
छान आहेत रंग (आणि आधीचे फोटो पण)
अशक्य आहे हे. मस्ट गो. सहीच
अशक्य आहे हे. मस्ट गो. सहीच रायगड
भारी ३ आठवड्यापूर्वी हायकिंग
भारी
३ आठवड्यापूर्वी हायकिंग केलं तेव्हा नुकते नुकते कलर्स येत होते.
या विकेंडला परत जायलाच हवं
मस्त कलर चेंज. वरून चौथा खूपच
मस्त कलर चेंज. वरून चौथा खूपच आवडला.
रायगड - मस्त वृत्तांत आहे आणि
रायगड - मस्त वृत्तांत आहे आणि प्रचि तर एकदम खास. फॉल कलर्स पूर्वकिनारीच चांगले दिसतात असा भ्रम होता माझा. आपलं Pacific NW पण भारी कलर्स दाखवतंय की.
काय सुरेख रंग आहेत. मस्त फोटो
काय सुरेख रंग आहेत. मस्त फोटो आले आहेत, रायगड.
वाह! किती मस्त कलर चेंज..
वाह! किती मस्त कलर चेंज.. अरिन आणि रोहन पण चित्रातलेच वाटतायत
धन्स लोकहो! अमितव, रार - या
धन्स लोकहो! अमितव, रार - या या, रेनिअरला या...आणि तिथून थोडे नॉर्थाला पण या म्हणजे एकाच ट्रीपमध्ये रेनिअर आणि रायगड दोन्ही होतील
अद्भुत! अप्रतिम फोटो आणि
अद्भुत!
अप्रतिम फोटो आणि वर्णन.
अद्भुत! अप्रतिम फोटो आणि
अद्भुत!
अप्रतिम फोटो आणि वर्णन.
एकाच ट्रीपमध्ये रेनिअर आणि
एकाच ट्रीपमध्ये रेनिअर आणि रायगड दोन्ही होतील >>> ही धमाल आयडिया आहे.
छान फोटो आणि वर्णनही.. आम्ही
छान फोटो आणि वर्णनही.. आम्ही पण रेनियरला गेलो होतो. त्याविषयी लिहीनच . फोटो.. लेखात टाकायचं टेक्निक नीट जमलं नाही अजुन.. पुढच्या लेखापासून जमवेन..
छान फोटो आणि वर्णनही.. आम्ही
छान फोटो आणि वर्णनही.. आम्ही पण रेनियरला गेलो होतो. त्याविषयी लिहीनच . फोटो.. लेखात टाकायचं टेक्निक नीट जमलं नाही अजुन.. पुढच्या लेखापासून जमवेन..
वॉव, मस्त आहे. आता जावच लागेल
वॉव, मस्त आहे. आता जावच लागेल
फॉल फोटोज मस्त...
आमचं माऊंट रिनियर
आमचं माऊंट रिनियर
src="/files/u1426/20220611_140851.jpg" width="1200" height="900" alt="20220611_140851.jpg" />
छान
छान लेख, सगळे फोटो पण मस्त आहेत.
सगळेच फोटो मस्त आहेत.
सगळेच फोटो मस्त आहेत.
सुंदर !
सुंदर !
सर्व च फोटो आहाहा
सर्व च फोटो आहाहा
Pages