प्रचि १
माऊंट रेनिअर! - सिअॅटलच्या स्कायलाईन वर दिसत रहाणारा, किंवा बहुतेक वेळा ढगांच्या पडद्यात गुरफटून नाहीसा होणारा, एखादा ऋषि आपली पांढरीशुभ्र दाढी सोडून तपश्चर्या करत बसल्यागत दिसणारा, पण प्रत्यक्षात आतून खवळणारा ज्वालामुखी उदरात घेऊन वावरणारा तर वरती जवळपास २५ glaciers बाळगून असणारा - १४५०० फूट उंचीचा हा पर्वत!
गेल्या विकांताला (१५,१६,१७ ऑगस्ट) माऊंट रेनिअर नॅशनल पार्क ला गेलेलो - त्याचे काही फोटोज नी वृतांत!
ऑगस्ट महिना म्हणजे पार्कात रानफुलांच्या बहरीचा काळ! रंगीबेरंगी फुलांनी बहरलेला पार्क आणि बॅकग्राऊंडवर रेनिअर म्हणजे डोळ्यांना पर्वणीच!
आजतागायत रेनिअरला कायम एक दिवसाची ट्रीप केल्ये. यावेळी मात्र घरात चालू असलेल्या कामातून जरा बदल म्हणून २ दिवस कोठेतरी जाऊ असे ठरवून सहज पार्कच्या आतलं पॅरॅडाईस इन चेक केलं - आणि आश्चर्य म्हणजे नेमकं शुक्रवार-शनिवार कोणीतरी आयत्या वेळी cancellation केल्यामुळे आम्हाला बुकिंग मिळालं. नाहीतर पार्कच्या आतल्या लॉजेस ची बुकींग्ज उन्हाळ्यात मिळणं म्हणजे महाकठीण काम!
प्रचि २ - पॅरॅडाईज इन
पार्क मधील हा एक धबधबा - नारदा फॉल्स! - हो! नारद मुनींचं नाव या धबधब्याला दिलंय! त्यांच्या नावाची इथे कुठे वर्णी लागली काय ठाऊक!
प्रचि ३
शुक्रवारी संध्याकाळी पार्क मध्ये पोहोचलो - त्या दिवशी आणि दुसर्या दिवशीही, मध्येच ढग येऊन रेनिअर साहेबांना झाकून टाकतायत आणि अचानक कोणीतरी पडदा उघडावा तसा ढगांचे आवरण बाजूला होऊन समोर महाराज प्रकट - असा लपाछपीचा खेळ चालू होता!
पॅरॅडाईज पॉईंट हा पार्क मधील सर्वांत पॉप्युलर एरिआ! हजारोंनी पर्यट्क उन्हाळ्यात या भागाला भेट देतात. पॅरॅडाईज भागात - पॅरॅडाईज व्हिजिटर सेंटर च्या परीसरात स्कायलाईन ट्रेल ही साधारण ४.५ मैलाची, रेनिअर ला मिठी मारता येईल अशी जवळ जाणारी लूप ट्रेल आहे - नितांतसुंदर! त्याला अनेक उपफाटे पण आहेत.
सकाळी १० नंतर पर्यटकांची गर्दी चालू झाली की हा ट्रेल प्रचंड बिझी होतो. पण यावेळी मात्र आम्ही शेजारीच राहिल्याने जरा लवकरच ट्रेलवर गेलो. अधे-मधे हलके-फुलके ढग उतरलेत- नजर जाईल तिथे रानफुलांची जत्रा, मध्येच दर्शन देणारा- आणि क्षणात आपल्या डोळ्यादेखत नाहीसा होणारा रेनिअर - अश्या वातावरणात सुमारे २ मैल चालल्यावर धाकट्या चिरंजीवांनी आता (अगदी) बास असे जाहीर केल्यावर मग परतलो. पुढचा ट्रेल बराच स्टीप देखील होता - तो आत्ता राहू देत असं म्हणत परतलो.
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
ट्रेलहेड पाशीच हॉटेल असल्याचा फायदा म्हण जे दुपारच्या उन्हात आणि गर्दीच्या वेळात शांतपणे रूमवर जाऊन आडवे झालो! ते संध्याकाळी ६ नंतर परत बाहेर पडलो. आता जवळ च्या मिर्टल फॉल्स ला चक्कर मारली.
प्रचि १३
स्कायलाईन ट्रेल पूर्ण झाला नाही म्हणून दुसर्या दिवशी सकाळी उठून मी आणि मोठे चिरंजीव यांनी तो ट्रेल पूर्ण करायचा ठरवला. सकाळी ७-७.१५ ला आम्ही दुसर्या बाजूने त्या ट्रेलला लागलो. काय वर्णावा तो नजारा! मैलोन मैल पसरलेली दरी, तो almighty Rainier, रानफुलांनी नटलेली वाट, सकाळची जादुई वेळ! केवळ स्वप्नात आहोत आपण असं वाटत होतं! Paradise point हे नाव सार्थ असल्याचं पटवून देणारा अनुभव!
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६ - Paradise Inn and Paradise Visitor Center - seen from the trail
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
ट्रेलवरून परतेपर्यंत ऊन आणि गर्दी फारच वाढली होती. दुपारी जेऊन आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो तर पॅरॅडाईसला यायला गाड्यांची मैल भर रांग लागलेली!
परतताना मध्ये ह्या reflection lake ला भेट दिली. पण रेनिअर साहेब तोपर्यत परत ढगांचं आवरण चढवून बसलेले. त्यामुळे त्यांचं reflection काही लेक मध्ये दिसलं नाही.
प्रचि २१
======================================================
सप्टेंबर २०१५ ला रेनिअर फॉल ट्रीप केली. पानगळीचे रंग अगदी बहरात आहेत रेनिअर परिसरात. त्याची फोटोरूपी झलक :
कातील फोटो आहेत. तूम्ही कधी
कातील फोटो आहेत. तूम्ही कधी गेला होता ते लिहा.
कसले झक्कास फोटो आलेत.
कसले झक्कास फोटो आलेत. डोळ्याचं पारणं फिटलं. .
एखादा ऋषि आपली पांढरीशुभ्र दाढी सोडून तपश्चर्या करत बसल्यागत दिसणारा >>> अगदी यथार्थ वर्णन!
सिअॅटलमध्ये फिरताना सतत पुढेमागे हा गंभीरपणे वावरत असतो. आणि ढगांची टोपी तर असतेच असते बरेचदा.
देखणे प्रचि आहेत सगळे!!
देखणे प्रचि आहेत सगळे!! सुंदर!!
अहाहा! मस्त आहेत सगळे फोटो!
अहाहा! मस्त आहेत सगळे फोटो!
मस्तच... क्या बात है !!
मस्तच... क्या बात है !!
मस्त आहेत सगळे फोटो. आम्ही पण
मस्त आहेत सगळे फोटो. आम्ही पण ह्या वर्षी गेलो होतो अर्थात १ दिवसाचीच ट्रीप केली त्यामुळे फक्त नरदा फॉलस ट्रेल तेवढी करायला जमली आणि पूर्ण दिवस ढगाळ हवा आणि पाउस त्यामुळे रेनियर नाहीच दिसला. पण पुन्हा जाउ तेव्हा नक्की जास्ती दिवस जाणार.
माझ्यासाठी स्वप्ननगरी !
माझ्यासाठी स्वप्ननगरी !
खल्लास प्रकार आहे. शेवटचे
खल्लास प्रकार आहे. शेवटचे रेफ्लेक्शन बघाय्ला मिळायला हवे होते तुम्हाला. तो एक अविस्मरणीय प्रकार असतो. पाण्यावर थोडेसे तरंग असले तर एकदम व्हॉन गॉफ effect मिळतो.
सुंदर फोटो. खुप वर्षे झालीत
सुंदर फोटो. खुप वर्षे झालीत जाऊन. पुन्हा जावेसे वाटले.
माईण्ड ब्लोईंग ............
माईण्ड ब्लोईंग ............ शब्द गोठले !!!!!!!!
सुंदर फोटो!
सुंदर फोटो!
अप्रतिम. दुसरा शब्द नाही.
अप्रतिम. दुसरा शब्द नाही.
मस्त जागा आणि फोटो.
मस्त जागा आणि फोटो.
खरोखरच नितांत सुंदर .. तडक
खरोखरच नितांत सुंदर .. तडक उठून जावंसं वाटत आहे ..
जळवलस रायगड! आय मिस रेनियर!
जळवलस रायगड! आय मिस रेनियर!
अप्रतिम फोटो ! खूपच सुंदर आहे
अप्रतिम फोटो ! खूपच सुंदर आहे . आम्ही ५-६ वर्षांपूर्वी गेलो होतो .
काहीच्या काही, अशक्य भारी
काहीच्या काही, अशक्य भारी फोटो आहेत हे! मस्तच
मस्त! फोटो खूप छानेत.
मस्त! फोटो खूप छानेत.
प्रचि २४ मध्ये चिमणी आहे का?
प्रचि २४ मध्ये चिमणी आहे का? एकदम गुटगुटीत आहे ..
मस्त!! सुंदर सगळेच फोटु....
मस्त!! सुंदर सगळेच फोटु....
मस्त फोटो. आम्ही मे मध्ये
मस्त फोटो. आम्ही मे मध्ये गेलेलो त्याची आठवण झाली. Huckleberry jam आणला की नाही? मी नेहमी घेऊन येते.
Reflection lake बघण्यासाठी परत एकदा जाच! It's worth it
सुंदर फोटोज! !
सुंदर फोटोज! !
अशक्य सुंदर!!
अशक्य सुंदर!!
अतिशय सुंदर. दहाव्या फोटोतला
अतिशय सुंदर.
दहाव्या फोटोतला स्पॉट कसला मस्त आहे! समोर बर्फ आणि त्या पल्याड धबधबा.
सुंदर
सुंदर
सर्वांना धन्यवाद! असामी,
सर्वांना धन्यवाद!
असामी, मकु, आधी अनेकदा रेनिअर ला गेलोय तेव्हा reflection lake मध्ये रेनिअर चे reflection , त्याचे फोटोज - झालंय! गेल्या वर्षी mount बेकर च्या reflection चा Van Gogh effect चा फोटो पण मिळाला!
मस्त आहेत सगळे फोटो. हे बघून
मस्त आहेत सगळे फोटो. हे बघून एकदम उठून इथे हाइकला जावे असे वाटतेय.
स्वप्ननगरीच दिस्ते आहे ही ...
स्वप्ननगरीच दिस्ते आहे ही ...
अप्रतिम फोटो - खूपच आवडले ..
सुंदर!
सुंदर!
एकदम झकास !!
एकदम झकास !!
Pages