Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43
मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.
1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप
मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?
नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?
यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.
तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नविन एसर चा आलेला आहे तो
नविन एसर चा आलेला आहे तो बघावा
नवीन मोबाइल कोणता
नवीन मोबाइल कोणता गेह्वु?
अॅन्ड्रॉइड हवा.
बजेट १५हजार.
HTC MADHE NEW ONE DUAL
HTC MADHE NEW ONE DUAL aalelaa aahe.. 16000 paryant aahe
मोटो- जी घ्या, घेऊन सहा महीने
मोटो- जी घ्या, घेऊन सहा महीने झाले असतील, no problem आणि आता किंमत देखील २००० ने कमी झालेय
एसरचा कुठलाही प्रॉडक्ट घेऊ
एसरचा कुठलाही प्रॉडक्ट घेऊ नका कपृया .....
नवीन मोबाइल कोणता
नवीन मोबाइल कोणता गेह्वु?
अॅन्ड्रॉइड हवा.
बजेट १५हजार.> Asus Zenfone ४/५
सर्व्हीस सेन्टर जवळ हवे हा एक
सर्व्हीस सेन्टर जवळ हवे हा एक क्रायटेरीया वाढवला पाहिजे खरतर.
कारण माझा एचटीसीचाच आहे जुना फोन.
माझ्याकडुन पडला.
स्क्रीन फुटली.
पण सर्व्हीस सेन्टर कॅम्पात.
मी राहतो निगडीत.
हापिस च्या वेळेत जाणे २०-२५ किमी शक्य नाही.
पिम्परीत वै असेल तर विचार करता येइल.
त्या झिओमी एमआय ३ चे फिचर भारी दिसत आहेत.
सर्व्हीस सेन्टर देहुरोडला आहे.
५ किमी.
तो कसा आहे फोन कोणी वापरलाय का?
नीधप , याच कारणासाठी मी
नीधप ,
याच कारणासाठी मी कार्बन K20+ मे महिन्यात घेतला .रुपये १७००( पावती)फक्त. इंटरनेट सोडून सर्वकाही आहे .केवळ अफलातून आहे .बैटरी १८०० ,दोन सिम ,१एमपी कैमरा ,व्हिडीओ व्हिजिए ,एफ एम रेकॉ ,कॉल रेकॉ ,साउंड रेकॉ ,२.६ इंचि स्क्रिन ,टॉच ,रेडिओ .
चांगले बैकलिट किपैड ,हिँदी सपॉर्ट .कैलिंडर इं +उ हिँदु तिथी ,तीन गजर .आणखी काय पाहिजे ?
असेपण नोकिआशाफोन मायक्रोवाले बंद करणार आहेत .त्याची आशा सोडावी .
फ्लिपकार्ट वाले "येडी घालुन
फ्लिपकार्ट वाले "येडी घालुन राह्यले काय?" (वाक्य साभार इब्लिसराव)
पाच दहा सेकंदात १५ हजार मोबाइल इकले म्हणे.
लोकांना मनी ट्रॅन्जॅक्शन्ला पण ह्येच्यापेक्षा जास्त येळ लागल की.
आसुसचे फोन चांगले वाटले फीचरवाइज.
सर्व्हीस सेन्टर बघतो.
7500rs. Paryant mobile hva
7500rs. Paryant mobile hva ahe Samsung ace nxt, Trend
ASUS
or kuthla??
झकासराव इन्टेक्स घ्या पिंपरीत
झकासराव इन्टेक्स घ्या पिंपरीत आहे सर्विस सेंटर..
सर्व्हीसची बोम्बच आहे
सर्व्हीसची बोम्बच आहे सगळ्यांची.
एम् आय ३ उत्तम आहे. सध्या तोच सगळ्यात जास्त चांगला वगैरे आहे म्हणे......
झोलो क्यू ३००० पण चांगलाय.
झोलो क्यू ३००० पण चांगलाय >>
झोलो क्यू ३००० पण चांगलाय >> हा आताच माझ्या चुलत भावानी घेतला आहे. सध्यातरी बरा वाटतोय. ६/८ महिन्यांनंतर बॅटरी बद्द्ल पहायचं. बाकी फोन सुप्परफास्ट आहे.
मला इंटरनेट हॉट्स्पॉट साठी
मला इंटरनेट हॉट्स्पॉट साठी सस्त्यातला फोन सुचवा. ह्या फोन मध्ये मी एक नविन (३जी) सिम टाकायचे आणि मग त्या फोन मधून इंटरनेट माझ्या ल्यापटॉप व डेस्क्टॉप ला पुरवायचे अशी योजना आहे, सध्या माझ्या विंडोज फोन मधून मी हे करतोच आहे पण आता ह्या कामासाठी एक डेडिकेटेट फोन असावा असे वाटते शिवाय वे़ळप्रसंगी ब्याकअप फोन म्हणून ही कामाला येईल असा विचार आहे.
दुसरा काही पर्याय आहे का?
हल्ली बर्याच फोन मधे बॅटरी
हल्ली बर्याच फोन मधे बॅटरी detachable नसते असं वाचलंय. हे फोन्स हँग झाले तर मग काय करतांत? एक उत्सुकता म्हणुन विचारतो आहे.
हल्ली बर्याच फोन मधे बॅटरी
हल्ली बर्याच फोन मधे बॅटरी detachable नसते असं वाचलंय. हे फोन्स हँग झाले तर मग काय करतांत? > स्पेसिफिक की काँबिनेशन वापरून फोन हार्ड रिबूट करता येतो.
उदा. आयफोन मध्ये लॉक की + होम बटन १० सेकंद / अॅपल लोगो स्क्रीन वर दिसेपर्यंत केलं की फोन हार्ड रिबूट होतो.
सीम कार्ड या मेमरी कार्ड
सीम कार्ड या मेमरी कार्ड काढायचे.........
धन्यवाद योकु. असं आयफोन आणि
धन्यवाद योकु. असं आयफोन आणि ईतर सगळ्याच फोन्स मध्ये असतं कां??
सुहास जी, ३जी वरचं इंटरनेट
सुहास जी, ३जी वरचं इंटरनेट शेअर करायला आजकाल यूएसबी प्लग मिळतात. डोंगल असतं पण आपल्या साध्या ईलेक्ट्रिक प्लग मध्ये बसतं. बटण सुरू केलं की वायफाय मिळतं...
असं आयफोन आणि ईतर सगळ्याच
असं आयफोन आणि ईतर सगळ्याच फोन्स मध्ये असतं कां?? >>> बहुतेक वेळेस हो.
मी पण मोटो-जी घेतलाय. ३ आठवडे
मी पण मोटो-जी घेतलाय. ३ आठवडे झाले बहुतेक.
चांगल्या गोष्टी :
१) लेटेस्ट अँड्रॉइड
२) गोरिला ग्लास
३) मस्त डिस्प्ले, ४.७ स्क्रीनमुळे एका हातात धरुन वापरता येतो.
४) १६ GB ची इंटर्नल मेमरी मुळे हवे तितके हेवी अॅप्स वापरु शकतो
५) प्रोसेसिंग स्पीड चांगला आहे
६) कॉल वेळेस आवाज स्पष्ट येतो!
७) १३९९९/- किंमत
विशेष न आवडलेल्या गोष्टी :
१) थोडा जड आहे.
२) कॅमेरा ठीक ठाक (अर्थात हे माहितीच होते आधी )
३) क्विक लाँच / सिस्टम मेनु (वाय-फाय, ब्लूटूथ इ.) ऑन/ऑफ करताना सारखे सेटिंग्स मेनूत जावे लागते.
इतर फोन मध्ये वन्-ट्च ऑन-ऑफ करता येतात.
४) फाइल मॅनेजर नाही, त्यासाठी अॅप डाऊनलोड करावे लागते.
सध्यातरी इतकेच, अजूनपर्यंत तरी मला मायक्रोमॅक्सच् जास्त आवडलाय बघू केव्हा दुरुस्त करुन मिळतोय ते.
>>>सुहास जी, ३जी वरचं इंटरनेट
>>>सुहास जी, ३जी वरचं इंटरनेट शेअर करायला आजकाल यूएसबी प्लग मिळतात. डोंगल असतं पण आपल्या साध्या ईलेक्ट्रिक प्लग मध्ये बसतं. बटण सुरू केलं की वायफाय मिळतं...<<<
योकु जी धन्यवाद, पण याचे नक्की नाव काय (सर्च करायला काय लिहायचे) , कोणता ब्रान्ड ?
टाटा फोटॉन आहे. लोकल काही
टाटा फोटॉन आहे.
लोकल काही असतील.
मात्र यात एक अडचण अशी की पॉवर कट असेल तर हे बंद!
हे पहा
हे पहा http://www.snapdeal.com/product/tplink-portable-battery-powered-3g4g/640545
गुगल केल्यावर ह्ये सापडले:
गुगल केल्यावर ह्ये सापडले: Huawei E8221s-1 3G Data Card (Black) रु 1699/-
रिव्ह्यूज बरे आहेत.
MI 3 दुप्पट गोष्टी देतो
MI 3 दुप्पट गोष्टी देतो म्हणून उड्या पडताहेत .इतरांना किंमती कमी कराव्या लागल्या .आता मि३ ची लबाडी उघडकीस आली .तुमची फोनमधली माहिती चोरताहेत .कबूलपण केले .पुढे काय ?
बरेचसे अॅप्स देखिल खाजगी
बरेचसे अॅप्स देखिल खाजगी माहिती चोरी करतांत.
XOLO HIVE चा रिव्ह्यु कसा
XOLO HIVE चा रिव्ह्यु कसा आहे? Octacore processor आहे. किंमत पण १३९९९/- पण बॅटरी कमी आहे mAh.
काय करावे?
बरोब्बर साडेतीन महिन्यापुर्वी
बरोब्बर साडेतीन महिन्यापुर्वी नोकिया एक्स बद्दल (वाईट) रेविव दिला होता. तेंव्हापासून आणखी दोन-चार लिटर रक्त आटलं आहे. बकवास फ्ल्याश नसलेला क्यामेरा, अवजड, स्लो वगैरे ठिक आहे हो (साडेसात हजारात काय काय येणार) पण सॉफ्टवेअर मध्ये बग्ज आहेत. परवा एक महत्वाचा फोन येणार होता म्हणून साडेदहा पर्यंत बिन अंघोळीचा बसलो होतो. शेवटी कंटाळून आंघोळीला गेल्यावर फोन वाजला. घाईघाईत टॉवेल गुंडाळून बाहेर आलो. फोनला हात लावेपर्यंत फोन वाजत होता. उचल्ण्याच्या आधिच कट झाला. पटकन क्वालब्याक करावा म्हणून हिस्टरीत जाउन बघतो तर च्यायला नव्हताच!
आता एक ठरवलंय, च्यामारी फोन घ्यायचा तर किमान वीस-पंचवीस हजाराचाच. क्वालिटी आणि पैश्याचा संबंध असतोच.
क्वालिटी आणि पैश्याचा संबंध
क्वालिटी आणि पैश्याचा संबंध असतोच. अरेरे
अॅग्री.....
अगदी कामचलाऊ कामासाठी लागत असेल तरच चालू वस्तू घ्यावी
micromax A190 canvas HD plus
micromax A190 canvas HD plus कसा आहे? कोणी सांगेल काय?
पॅनासोनिकचे हँडसेट्स कसे
पॅनासोनिकचे हँडसेट्स कसे आहेत? किंमत आणि सुविधा पहाता बरे वाटतायत, कोणाला अनुभव आहे का?
फोन बाजारात आले की पहिल्या च
फोन बाजारात आले की पहिल्या च दिवशी रिव्युवाल्यांकडे मॉडेल येते आणि आपल्याला अगोदरच सावध करतात ."Why you shouldn't buy nokia x series phones " हा रिव्यु आला होता .अगदी स्वस्तातला चांगला लुमिआ ५२० ,५२५ आणि ६३० आहे म्हणतात .फ्लैश आणि फ्रंट कैमरा नसूनही .चांगल्या कंपन्या सडके बटाटे विकतात कधीकधी .नोकिआने E63 ,E6 मध्ये १गिगा ह प्रसेसर टाकला असता तरी खूप झाले असते .
मी घेतलेत लुमीआ ६३० अन ६२०,
मी घेतलेत लुमीआ ६३० अन ६२०, दोनही फोन्स मस्तच आहेत. एक भाऊ ५२० वापरतोय त्याचा ही रिव्ह्यू मस्तच आहे. हे सगळे १०/१२ के च्या आत बाहेर आहेत.
मोबाईल मधे काय बघावे लिहितो..
मोबाईल मधे काय बघावे लिहितो..
उदयन कुठे लिहिता ?लिंक द्या
उदयन कुठे लिहिता ?लिंक द्या वाचत जाईन
आज एका कलीगचा Asus च सेलफोन
आज एका कलीगचा Asus च सेलफोन पाहिला.मस्त हलका आहे.बहुतेक Zenfone 5 8GB A500CG हे मॉडेल असावे.
वर रंगासेठने लिहिल्याप्रमाणे
१)अँड्रॉइडAndroid (4.3) Upgradable To: v4.4.2 (KitKat)
२) गोरिला ग्लास
३) मस्त डिस्प्ले, ५.स्क्रीन
४) ८ GB ची इंटर्नल मेमरी
५) प्रोसेसिंग स्पीड चांगला आहे
६) १०,०००/- किंमत
Asusचा सेलफोन घ्यावा का? आधी मोटो जी ठरवले होते.
माझं मत मोटो जी ला,
माझं मत मोटो जी ला, केव्हाही...
आसुसचा कुठलाही प्रॉडक्ट घेऊ
आसुसचा कुठलाही प्रॉडक्ट घेऊ नका कपृया...
अॅसेसरीज आणि सर्विसिनंगचे लै वांधे आहेत...
सर्व्हिस सेन्टर सापडतच नाही...
गॅजेट रिपेरला ठेऊन घेतात आणि मग सुरू होते तारीखपे तारीख.....
रॉबीनहूड , योकु, धन्यवाद!
रॉबीनहूड , योकु,
धन्यवाद!
गॅजेट रिपेरला ठेऊन घेतात आणि
गॅजेट रिपेरला ठेऊन घेतात आणि मग सुरू होते तारीखपे तारीख.....>>>> माझ्या ओळखिचे ३ लोक, ३ मायक्रोमॅक्स घेतले एकत्र. ६-७ महिण्यांपुर्वी. याच महिण्यात बंद पडलेत. मग सर्वीस सेंटर मध्ये जाणे झाले. एक महिना लागेल असे सांगितले. पण तेथे अजुन २ लोक भांडत होते, ज्यांचा मोबाइल २-३ महिने त्यांच्याकडेच होता. एकंदरीत सर्व्हिसच्या नावे टोटल ..... एकाने दुरुस्तिला दिला, बाको दोघांनी तो विकला आणि दुसरा घेतला . पण सर्विस एकदम भिकार दर्जाची होती.
सर्विस सेन्टरची डोकेदुखी या
सर्विस सेन्टरची डोकेदुखी या विषया वर एक सदाहरित बीबी चालू शकेल.....
टिसॉटचे घड्याळ घेतले रु८०००/- एकदा तेटेबलवरून पडले . चालतेय पण त्याच्या आकड्याच्या जागेवर च्या दोन पितळी तुकडे निघाले व ते डायलवर घरंगळत असतात व काट्यात अडकतात आणि काटे थाम्बतात. ते फक्त दोन्ही चिकटवायचे आहेत. पण बांद्र्याला कुठल्या गल्लीत त्यांचे सर्विस सेन्टर आहे म्हणे तिथेच ते करून मिळेल.
तसेच त्याचा लेदर बेल्ट काढून मेटल स्ट्रॅप लावायचा आहे तेही बांद्यालाच !
हाईट म्हणजे त्याचा सेल सम्पला म्हणून एफ सी रोडच्या पंडोलकडे दिले तर त्यानी ते आठ दिवसानी सेल टाकून दिले का तर ते काम त्यांच्या एम जी रोडवरच्या दुकानातच होते( सेल टाकण्याचे काम )आणि ते तिकडे पाठवावे लागते !
(बहुदा ते सेल बनवत असावेत ताजा ताजा....)
मोटो जी उत्तम आहे आमच्या
मोटो जी उत्तम आहे आमच्या मुलानी कुठल्याशा वेब मन्डई तून घेतला आहे
घडयाळाबद्दल सांगतो .आतले मशीन
घडयाळाबद्दल सांगतो .आतले मशीन (मूवमेंट म्हणतात) ची एक दोन मॉडेल प्रत्येक कंपनी वापरते .ते प्लास्टिक केस अथवा मागच्या बाजूने झाकण असणाऱ्या साध्या केसमध्ये असले की ते कोणीही उघडून सेल टाकू /बदलू शकतो .महागड्या घडयाळाची केस (वॉटरप्रुफ होण्यासाठी ,घाम जाऊ नये यासाठी)काचेकडून उघडते आणि हे काम काही सर्विस सेंटर्समध्येच होते .
वेळ पाहण्यासाठी साधे केसचे घड़याळ घ्यावे आणि उरलेल्या रकमेत एखादे चकाचक ब्रेसलिट घ्यावे म्हणजे डोकेदुखी कमी होते .
मोबाईल घेताना काय काय बघावे
मोबाईल घेताना काय काय बघावे :-
सर्वप्रथम "रॅम" बघुन घ्यावी किती आहे.. बरेच कंपन्यांची मोबाईल्स ड्युअल कोअर, क्वाड कोर असे चांगले प्रोसेसर याची मार्केटींग जास्त करते परंतु त्या क्वाडकोर प्रोसेसर असलेल्या मोबाईल ला रॅम कितीची लावली आहे हे मात्र सांगत नाही उदा. Micromax A093 Canvas Fire .. यात क्वाडकोर १.३ प्रोसेसर आहे तसेच अँड्रोईड ४.४ देखील आहे परंतु रॅम मात्र 512 MB RAM आणि इंटरनल मेमरी अवघी 4 GB आहे.
अश्या मोबाईल चा स्पीड काय असेल कल्पना करा.. तुम्ही प्रोसेसर रॉल्स रॉईस चा घेतला आहे परंतु त्यात स्पेशल पेट्रोल टाकण्यापेक्षा " घासलेट / रॉकेल " टाकल्यास किती पळेल ? ५१२एमबी रॅम मधे काहीच दम नाही उलट क्वाडकोर सारखा ४ कोअर असलेला प्रोसेसर लावल्याने रॅम वर जास्तच दबाव येतो.. फोन गरम होणे. टचस्क्रिन बरोबर काम न करणे अॅप्लिकेशन मधेच बंद होणे.. मोबाईल सारखा हँग होने असे प्रोब्लेम चालु होतात.. प्रमाणात प्रोसेसर असल्यास त्या प्रमानात रॅम देखील आवश्यक असते.. हा झोल मोबाईल फोन वाले करतात... स्वस्त स्वस्त म्हणुन फोन सांगायचे परंतु त्यात रॅम नावाचा जीवच अत्यल्प टाकायचा.
ड्युअल कोर = ५१२एम्बी रॅम , १जीबी रॅम
क्वाड कोर = १जीबी रॅम, १.५जीबी रॅम, २जीबी रॅम
ऑक्टा कोर (८ कोअर) = २जीबी रॅम ते ३जीबी रॅम
हे बघुनच घ्यावे तरच तुमच्या फोन परफॉर्मंन्स चांगला देईल.. त्याच बरोबर इंटरनल मेमरी देखील बघुन घ्यावे. आजकाल बरेच अॅप्लिकेशन हे १जीबी पेक्षा जास्त जागा घेतात उदा. व्हॉट्सप सारखे अॅप्लिकेशन सुरुवातीला २२ एमबी असते परंतु जसजसे चॅटींग वाढत जाते आपण फोटो / व्हिडीओ डाउनलोड अपलोड करायला लागतो तेव्हा त्याचे एमबी वाढत जातात .. अश्यावेळेला यावर उपाय म्हणुन मोबाईल फोन कंम्पुटरला जोडुन मेमरी कार्ड मधला व्हॉट्सप च्या फोल्डर मधे जाउन मीडीया फोल्डर मधे ते फोटो आणि व्हिडीओ जमा झालेले असतात ते काढुन टाकायचे अथवा पेनड्राईव्ह मधे कॉपी करुन ठेवायचे आणि व्हॉट्सप मधले डिलिट करुन टाकायचे. म्हणजे व्हॉटसप चे प्रेशर कमी होते आणि थोडा फास्ट चालतो.
आता बघु कोणत्या मोबाईल मधे काय काय खोट आहे..
सर्वप्रथम सोनी या ब्रँड चे मोबाईल घेउ .... सोनीचे मोबाईल नावा प्रमाणेच महागडे आनि थोडेफार पांढरे हत्ती या प्रकारात मोडणारे आहे. सोनीचा ५ इंच स्क्रिन आणि सॅमसंग चा ५ इंच स्क्रिन यांच्या साईजमधे जमिन आस्मान चा फरक आहे.. सोनीचा स्क्रिन हा आयताकृती जास्त असल्याने तो स्लिम आणि लांब वाटतो जास्तितजास्त डिस्ल्पेची जागा असल्याने त्याचा स्क्रिन आटोपशीर वाटतो याच्या उलट सॅमसंग चा स्क्रिन रुंदीला जास्त असल्याने भलामोठ वाटतो.. सोनीचा स्क्रिन हा गोरील्ला ग्लास नसल्यान त्यावर ओरखडे पडु शकतात (?) बर्याच मोबाईलचे स्क्रिन हे गोरील्ल्ला ग्लास चे नसल्याने Shatter proof glass या प्रकाराचे असल्याने त्यावर ओरखडे पडतात तेव्हा मोबाईल घेताना हे आधी बघुन घ्या... तसेच चार्जिंग करताना याप्रकारची ग्लास बरीच गरम होते... इतकी की कधी कधी चटका देखील बसतो.. त्यामुळे फोन घेताना हे बघुन घ्या...
सोनीच्या मोबाईल मधे अॅप्लिकेशन मेमरीकार्ड मधे ट्रांस्फर करायची सोय नाही आहे.. ही सर्वात मोठी खोट सोनीच्या मोबाईलमधे आहे बर्याच मोडेल्स मधे अॅप्लिकेशन्स मेमरीकार्ड मधे मुव्ह करण्याची सुविधा नाही आहे त्यामुळे सगळी अॅप्लिकेशन्स ही इंटरनल मेमरी मधे साचुन राहतात अर्थात इंटर्नल मेमरी चांगलीच मोठी दिल्याने (८ ते १६ जीबी) त्यामुळे इतका काही फरक पडत नाही. पण ८जीबी वाल्या मोबाईल मधे जागेची कमतरता भासते काही वेळाने.. सोनीच्या मोबाईल मधे इतर अॅप्लिकेशन वरुन घेतले फोटो, व्हिडीओ उदा सॉफ्टवेअर डाटा केबल , सुपर बिम, अश्या अॅप्लिकेशन वापरुन डाउनलोड फोटो अल्बम मधे दिसत नाहीत.. त्यासाठी मोबाईल स्विच ऑफ करावा लागतो .. परत चालु केल्यावर आपल्याला ते फोटो अथवा व्हिडीओ दिसु लागतात.
चांगल्या गोष्टींमधे सोनीचा सगळाच फोन येउ शकतो.. कॅमेराची क्वालीटी वर्ल्डक्लास दर्जाची असल्याने फोटो चांगले येतात .. सोनीचा १९२०*१०८० रेझोल्युशन स्क्रिन हा कोणत्याही इतर मोबाईलच्या स्क्रिन च्या दर्जा पेक्षा प्रचंड प्रचंड चांगला आहे. इतकी क्लिअर क्वालिटी आहे.. सोनीच्या मोबाईल मधे एचडी चित्रपट चालु करुन बघा आणि तोच एचडी चित्रपट सॅमसंग इ मोबाईल मधे बघा... लगेच फरक लक्षात येईल.
बाकिच्यांबद्दल थोड्यावेळेत
इतरांनीही त्यांच्या माहीती असलेल्या मोबाईल बद्दल सांगावे
लिनोवा :- अत्यंत ३र्ड क्लास दर्जाचा मोबाईल कसा असावा याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे लिनोवाचे फोन. भिक्कार स्क्रिन , अतिशय वाईट मोडेल्स त्यात आतील आयकोन्स देखील वैतागवाडीच.. स्क्रिनलॉक काढताना अक्षरशः झाडु मारल्यासारखा हात मारावा लागतो . कॅमेरा माशाअल्ला सुभानाल्ला... याच दर्जाचे आहेत.. खर तर लिनोवा वाले कशाला लॅपटॉप सोडुन मोबाईल मधे आले याचाच प्रश्न मला नेहमी पडतो... यात एक आयटम असा आहे की डोकेच चक्रावुन जाते... जर तुम्ही Uday असे नाव जर फोनबुक मधे ठेवले आणि शोधताना uday टाईप केले तर ते नावच सापडत नाही...... तुम्हाला uday मधला U हा मोठाच लिहावा लागतो अन्यथा तुम्हाला नाव मॅन्युअली शोधावे लागते .. हा पहिल्यांदाच असला प्रकार मी मोबाईल मधे बघितला आहे..
स्क्रॅच लवकर येतात यांच्यामोबाईल वर.. सोनी सारखा जास्त तापत नाही मात्र. बहुतेक स्क्रिन रेझोल्युशन कमी असल्याने देखील असु शकते .... बाकी मी हा फोन शत्रुला देखील रेफर करनार नाही
उदयन.. मस्त माहिती
उदयन..
मस्त माहिती दिलीत.
मोबाईलमध्ये मेमरीकार्ड स्लॉट नसेल तर इंटरनल मेमरी किमान १६जीबी असणे गरजेचे आहे.
अँड्रोईड/विंडोज/आयओएस किंवा इतर कुठलीही ओएस असली तरी किमान २-४जीबी जागा ओएस साठीच लागते. नंतरच्या अपडेट्स साठी आणखी जागा लागते. आजकाल बहुतेक सर्व नविन ओएस मध्ये अॅप्लिकेशन आणि गेम्स मेमरीकार्डवर टाकायची/ट्रांस्फर करायची सोय बंद केली आहे.
पुर्वीच्या जुन्या नोकियाच्या सिम्बियन फोनमध्ये हि सुविधा ऊपलब्ध होती. त्यामुळे आता मेमरीकार्डचा ऊपयोग फक्त डेटा (फोटो / गाणी / व्हिडीओ) ठेवण्यासाठीच होतो.
बरेचसे गेम्स एक जीबी पेक्षा कमी रॅम असेल तर भयानक स्लो होतात.
उदयन कृपया ही आणि इतर माहिती
उदयन कृपया ही आणि इतर माहिती एका वेगळ्या धाग्यात टाकणार का ?खुप उपयोगी आणि पटकन मिळेल .मी आपला टेकरेडार डॉट कॉम ,गोगि डॉट इन ,टाईम्स ऑफ इंडिआ डॉट कॉम/टेक्नॉलजीआणि अबाउट डॉट कॉम वाचतो .
फाईल मनेजरचे पेटंट नोकिआकडेच आहे किंबहुना सर्व पेटंटस राईटस वगळून फक्त मोबाईल बिजनेस त्यांनी विकला आहे .नवीन विंडोझ ८.१ मध्ये एप्स मेमरी कार्डावरूनही वापरता येतील असे लुमिआ ५३० (रु ७३००)आणि ६३० (रु १०५००)या ८.१वर चालणाऱ्या फोनच्या स्पेसि०मध्ये लिहिले आहे .
नवीन विंडोझ ८.१ मध्ये एप्स
नवीन विंडोझ ८.१ मध्ये एप्स मेमरी कार्डावरूनही वापरता येतील असे लुमिआ ५३० (रु ७३००)आणि ६३० (रु १०५००)या ८.१वर चालणाऱ्या फोनच्या स्पेसि०मध्ये लिहिले आहे >> नोकिया ६२० आणि विंडोझ ८.१ आहे, पण whatsapp अपग्रेड करताना मेमरी कार्ड वर असेल तर एरर देतो.
लुमिआ ६२० जुना विंडोझ ८ फोन
लुमिआ ६२० जुना विंडोझ ८ फोन आहे .त्याचे ८.१नुतनीकरण (किचकट)केले आहे का ?एप्रिल नंतर आलेले फोन ८.१चे आहेत .
मोटो जी, १६ जी बी केलाय ऑर्डर
मोटो जी, १६ जी बी केलाय ऑर्डर फ्लिपकार्ट वरुन मी, एकंदरीत रिव्यु मस्त आहेत सो तोच फायनल केला, ह्या आगोदर दिड वर्षं मायक्रोमॅक्स चा "कॅनवास २ (ए ११०)" वापरत होतो, अक्षरश: वाईट ताबडला तो फोन मी!!! एकदा दुसर्या मजल्यावरुन पडला (वाळु वर) एकदा सचैल अभ्यंग झाले, २४/७ ३जी ऑन असायचे, फ्री मोबाईल व्हीपीएन सारखी जडशीळ अॅप्स वापरायचो त्याच्या ५१२ एम बी रॅम वर मी!!!
आठवडाभर आगोदर, एकदाचाच आचका दिला (हँग झाला) अन कायम चा निवर्तला तो फोन!! आता मोटो जी मागवला आहे अन तो माणुसकीत वापरायची इच्छा ही आहे
Pages