एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो पोर्णिमा, संगीत नाटकांत पण काम करतात ईशाचे बाबा काम.

'का रे दुरावा', लिमिटेड एपिसोड असतील तर इंटरेस्टींग होईल नाहीतर प्रेक्षक आणि मालिका यांच्यात दुरावा निर्माण होईल.

आई नि काकूच्या कालच्या साड्या अतिच घाण होत्या नीट नेसल्याही नव्हत्या
शिवाय ईशाची मेंदी कुठूनही ब्रायडल वाटत नाही.

सत्यजित आणि शुभा खोटे यांच्यातला प्रसंग लईच फिल्मी बरं का... बेक्कार एकदम. कंटाळा आला.

>>>सत्यजित आणि शुभा खोटे यांच्यातला प्रसंग लईच फिल्मी बरं का... बेक्कार एकदम. कंटाळा आला
हा प्रसंग कधी होता? आम्हाला हा दिसलाच नाही Happy

सत्यजितकाकाचे इतक्या सहजी मतपरिवर्तन काही झेपले नाही! रणजीतकडून मारहाणीचे भविष्य दिसल्यावर माघार घेऊ शकेल पण अगदी रडूबाई होऊन माफी मागतो, मोठ्या बाबांना खरं सांगून घर सोडायला निघतो वगैरे जरा अतीच!
पण मालिका संपवायचीच म्हटल्यावर आता काय?!!
अजून ओम आणि मोठ्या बाबांची भेट राहिलीय.

कालचं ते खरं सांगणं प्रकरण आणि प्रतिक्रिया, मतपरिवर्तन फारचं गुंडाळलं असं मला वाटलं.. म्हणजे उमा काकू काहीतरी ऐकवेल, स्पष्टीकरण मागेल अशी अपेक्षा होती, इशाचे बाबा पण काहीही बोलले नाहीत...

ओमच्या घरच्यांचा इतर फाफटपसारा न लावता फक्त ओमिशा यांच्या लग्नाने मालिका संपवत आहेत हे चांगले आहे. इतर कोणी निर्माता असता तर घरातल्या प्रत्येकाचे पुनर्वसन झालेले दाखवत बसला असता. (सागर-मधुचे लग्न, धनाचे बाळंतपण इ.) संपुर्ण मालिकेत मोहन आगाशे यांचा अभिनय मस्तच होता. तो 'शोनु' मात्र एकदाही दाखवला नाही. Happy

<< तो 'शोनु' मात्र एकदाही दाखवला नाही. >> ईशाची मैत्रीण 'शोनू'शीं ज्या तर्‍हेने बोलते त्यावरून तो अजून ज्यु. किंवा सिनीयर के.जी.त असावा असा अंदाज मात्र बांधता येतो ! Wink

रक्ताची नाती जुळवायचा अट्टाहास समजू शकला. पण घटस्फोटित दांपत्याला एकत्र आणायचा अट्टाहास भयानक वाटला.

तो अट्टाहास घटस्फोटित दांपत्याला एकत्र आणायचा नसून ओमच्या मनातील आई वडीलांबद्द्लच्या रागाचा निचरा करण्याचा अट्टाहास होता. मोठे बाबा तसं बोलूनही दाखवतात.

मोठे बाबांचं सगळे संवाद जाम आवडले. तसंच ओमनी अगदी प्रामाणिकपणे मांडलेली त्याची बाजू, अभिनय सगळंच ग्रेट होतं.

एका खरंच चांगल्या मालिकेची आज सांगता झाली ! सर्व संबंधितांना- या धाग्यावर येवून रंगत वाढवणार्‍या माबोकरांसहित- मनःपूर्वक धन्यवाद.

अट्टाहास घटस्फोटित दांपत्याला एकत्र आणायचा नसून ओमच्या मनातील आई वडीलांबद्द्लच्या रागाचा निचरा करण्याचा अट्टाहास होता. मोठे बाबा तसं बोलूनही दाखवतात. <<< मालिकेतला सर्वात जास्त आवडलेला संवाद होता.

तुझ्या मनात जो राग आहे, तो कधीनाकधी तरीमाझ्या नातीवर निघाला असता म्हणून मला त्याचा निचरा करने आवश्यक वाटले अशा अर्थाचा संवाद काल्च्या एपिसोडमधे होता. तो खूप छान लिहिला होता. मोहन आगाशेंचं काम पण मस्त.

साड्या काय भयाण नेसल्या होत्या सर्व बायांनी!!! ब्लाऊजेस अगदीच बेक्कार. कपडेपटामध्ये अगदीच वाट लावून टाकली.

तुझ्या मनात जो राग आहे, तो कधीनाकधी तरीमाझ्या नातीवर निघाला असता म्हणून मला त्याचा निचरा करने आवश्यक वाटले अशा अर्थाचा संवाद काल्च्या एपिसोडमधे होता. तो खूप छान लिहिला होता. >>> अगदी अगदी!

नंदिनी, +१ साड्या आणि मेकप भयाण!! ईशाचा सर्वात वाईट!
पण आजचा भाग ईशाच्या आईचा! शिट्या मारल्या!! हहपुवा!
बाय बाय बाय बाय! एका सुंदर मालिकेची सांगता झाली! भाऊ, तुमची व्यंगचित्रं मिस करणार! थोडेसे तरी withdrawal symptoms येणार मला!

Pages