मदत हवी आहे

Submitted by सुधीर जी on 8 August, 2014 - 23:56

मि ४ महिन्यापुर्वि एका कम्पनित कामाला लागलो,
१५ दिवसापुर्वि कम्पनि मला दुसर्या शहरात बदलि करत होति.
मि जान्यास नकार दिला.
आता कम्पनि मला बोलते कि २ दिवसात राजिनामा द्या नाहितर तुम्हाला टर्मिनेट करण्यात येइल.
समजत नाहि काय करु??????

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेंव्हा कामाला लागलात त्यावेळेस ट्रान्सफ़र या विषयावर तुमची त्यांच्याशी चर्चा झाली होती का?... नसेल तर तुम्ही तिथे न जाण्या मागचे कारण त्यांना स्पष्टपणे सांगा... जर चर्चा आधी झाली असेल तर तुम्हाला पर्याय नाही, त्यांचे ऐकावेच लागेल... राजीनामा देण्याआधी ८-१५ दिवसांची वेळ त्यांचाकडून मागून घ्या, त्यात दुसरे काम शोधा व हि नोकरी सोडा... फ़क्त सोडताना तिथले संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या... एक्ष्पेरिएन्स सर्तिफ़िकिट घ्यायला विसरु नका...

बहुदा तूमच्या नेमणूक पत्रात, कंपनी कुठेही बदली करेल असे कलम असतेच. आणि ज्या अर्थी तूम्ही त्यावर सही केलीत त्या अर्थी ते कलम तूम्हाला ( तेव्हा ) मान्य होते.

नवीन जागी जाण्यात नेमक्या काय अडचणी आहेत त्याची घरच्यांशी चर्चा करा. खुपदा ते तितकेसे कठिण नसते.
तिथेही नाहीच जमले तर तूम्ही तिथे आलेल्या / येणार्‍या अडचणी व्य्वस्थापनाला लेखी कळवू शकता. त्यासाठी
कंपनी तूम्हाला मदत करेलच. तिथे जाऊनही तूम्ही नवी नोकरी शोधण्याचा प्रयत्न करू शकताच.

सध्या तरी हातात दुसरा पर्याय नसेल तर नोकरी सोडू नका.

सुधीर, हिम्मत हरु नकोस. तुझी स्किल्स/क्वालिफिकेशन्स काय आहेत ते पण धाग्यात लिहून ठेव. उपयोग होईल.

बदलीच्या ठिकाणी जाण्यास ठामपणे नकार दिलात तसंच नविन नोकरी लगेच मिळवायची हिंमत बाळगा. एसएपीचे दिवस अजुन पर्यंत तरी चांगले आहेत.

तुम्ही कंपनीचं काहीही वाकडं करु शकत नाहि. हल्ली सगळीकडे "अॅट विल" टर्मिनेशन क्लाॅज असतं...

दिनेश म्हणतात त्याप्रमाणे नियुक्तीपत्रातच हा मुद्दा नोंदवलेला असतो.

कंपनी तुमचा त्वरीत राजीनामा मागत आहे हे वाचून थोडे आश्चर्य वाटले. सहसा असे करत नाहीत, माणसाच्या प्राधान्यांना योग्य ते मोल देऊ करतात. कदाचित मुलाखतीत तरी त्यांनी तुम्हाला हे स्पष्ट केलेले असावे की नियुक्ती येथे झाली तरी नंतर लगेच तेथे जावे लागेल वगैरे!

काही असो, ह्या विषयावर एम्प्लॉयरशी वाद घालणे, केस करणे वगैरेचा काही एक उपयोग नसतो हे माहीत आहे.

राजीनामा मागतच असतील तर देऊनच टाका. रेकॉर्डवर एक 'ब्रेक' येईल ह्याचा विचार करू नका, त्याने आजकाल काही फरक पडत नसतो. त्या कंपनीचे स्पर्धक असले तर त्यांना अ‍ॅप्रोच होऊ शकताच.

तुम्ही दुसर्‍या शहरात जाण्याला नकार का दिलात ते लेखातून समजले नाही. सांगण्यासारखे असेल तर कृपया नोंदवाच! अनेकदा दुसर्‍या शहरात जाणे हे लाभदायकही असू शकते. Happy

पण खरे विचाराल तर अश्या गोष्टी जॉईन होतानाच बर्‍याच अंशी कल्पिलेल्या असतात. तुमच्याबाबतीत तसे का होऊ शकले नाही, बदलीचा प्रस्ताव एखाद्या सरप्राईझसारखा का आला हा प्रश्न पडत आहे.

दिनेशनी सांगितल्याप्रमाणे नेमणूक करताना क्लॉज असतो. आपल्याला बदलीच्या जागी नको असेल तर स्पष्ट नकार देण्याऐवजी बदली स्विकारुन नवी नोकरी शोधायची. तसेच कंपनीने टर्मिनेट करणे आणि आपण राजिनामा देणे यात एम्प्लॉयीच्या रेकॉर्डसाठी दुसरा पर्याय चांगला म्हणून दिला जातो.

मला जॉइन होन्याअगोदर अशि कोनतिहि अट सांगितलि नव्हति
त्यात मधे त्यानि मला त्याचे uk चे प्रोजेक्ट येनार आहे असे सागितले होते
आनि आता मि दुसर्या शहरात जाण्यास होकार दिला तरिहि मला राजिनामा देन्यास लावत आहेत

मि बदलि स्विकारत असुनहि कम्पनि मला टर्मिनेट करत आहे.
मला लिगलि काहिच करता येनार नाहि का

सुधीर जी - तुम्हाला सविस्तर मेल करते. पण आपल्याला काही करता येत नाही. अगदीच म्हणजे हातापाया पडून नोकरी टिकवायची आणि दुसरी नोकरी मिळाली की ही सोडायची हाच पर्याय आहे.

हातापाया पडूनही आता काहि उपयोग नाही
पण ही तर मनमानि झालि ना,
आपण ह्याच्यासाठि प्रामाणिकपने काम करायचे आणि ह्यानि केवळ अॅट विल टर्मिनेशन क्लॉज आहे म्हनुन काहिही कारण दाखवून टरमिनेट करावे
काहिच नाहि करता येनार का
असे असेल तर हि गुलामगिरि झालि ना

सुधीर, खूप त्रास करुन घेऊ नकोस. ह्यातून मार्ग कसा निघेल ते बघ. वेगवेगळ्या साईट्सवर CV अपलोड केला असशीलच ना?

सद्द्या लेटर घरि आहे, नक्कि काय होते ते लेटर बघुनच सांगु शकतो
पण company has right to terminate service on non perpormance असे वाचले होते

स्पष्ट सांगू का?
तुम्ही नकार देतांना काय म्हणालात यावर सर्व अवलंबून आहे.
जर खूप रफ वागला असाल तर कोणतीही कंपनी हे ऐकून घेत / घेणार नाही.
बदली साठी नकार - हे काही कारण नाही.
अन तुमची सर्व्हिस तरी किती? ४ च महिने त्यामुळे तशी इन्डिस्पेन्सिबिलिटी एस्टॅब्लिश़ झाली नसेल.आअणि म्हणूनच असला माणूस नको हा स्टँड त्यांनी घेतला असावा.

दुसरे म्हणजे दोन्ही पक्षी प्रोबेशन क्लॉज आहे का? प्रोबेशन मध्ये नोटिस पिरियेड बहुधा नसतो. कारण तुमचे ४ च महिने झालेत म्हणून.
पहिलाच जॉब आहे का?

मी रफ वागलो नाही
शांतपने माझ्या घरगुती अड़चनी सांगुन नकार दिला होता
आणि बदलीचे मला सांगताना ते असे बोलले नव्हते की बदली स्वीकारा नाहीतर राजीनामा दया
त्यानी फक्त एक ऑफर दिली जी मी नाकारली
पण आता बदली मान्य असूनहीं काडून टाकत आहेत

एकंदरीत काय तर मी काहीही करू शकत नाही
फक्त गाढवासारखे काम करायचे आणि
मालकाने मानत येइल तेव्हा ढूगानावार लाथ मारून हाकलून दयायचे

पण आता बदली मान्य असूनहीं काडून टाकत आहेत >> एकंदरीत तुम्ही दिलेल्या माहितीवरून असे वाटतेय की त्या UK च्या प्रोजेक्ट साठी तुम्हाला घेतले असावे. पण काही कारणाने ते प्रोजेक्ट येत नाहीये. त्यामुळे तुमच्यासाठी योग्य असे काम नसावे कंपनीकडे. सुरवातीला त्यांना बदलीच्या जागी काम मिळेल असे वाटले असेल पण अता तेही उपलब्ध नसेल. म्हणुन ते तुम्हाला राजीनामा देण्यास सांगत असावेत. तुम्ही आय टी ( वर कोणीतरी एसेपी म्हणलेय त्यामुळे तसे वाटते ) मधे काम करत असाल तर हे असे ले ऑफ्स आजकाल फारच कॉमन झाले आहेत. नविन नोकरी शोधायला लागा.

हे सर्व तुम्ही कंपनीच्या पी सी वरून करत आहात का?
ताबडतोब थांबवा.
सुधीर जी | 9 August, 2014 - 09:26

मि ४ महिन्यापुर्वि एका कम्पनित कामाला लागलो,
१५ दिवसापुर्वि कम्पनि मला दुसर्या शहरात बदलि करत होति.
मि जान्यास नकार दिला.
आता कम्पनि मला बोलते कि २ दिवसात राजिनामा द्या नाहितर तुम्हाला टर्मिनेट करण्यात येइल.

त्यानी राजिनाम्याचा उल्लेख केला होता ना?
एनी वे आता वाईट घेवू नका. टर्मिनेशन टाळता यायचे पहा.
सॅपला नोकर्‍या मिळतात. कोणते मॉड्युल आहे तुमचे. अन अशा पब्लिक फोरमवर जरा संयमित भाषा वापरा.

डेलियाला अनुमोदन. आयटी कंपनीत हे घडू शकतं. किंवा तुमची तयारी असेल तर दुसर्‍या स्किलमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. (जर तुमच्या स्किलचा प्रोजेक्ट उपलब्ध नसेल तर)

असो, दुसरा एक मुद्दा मला वाटतोय तो स्पष्ट लिहितेय राग मानू नका.
इथे सर्व तुमचीच बाजू कळतेय. कंपनीची ही बाजू असेलच काहीतरी. तुमच्या पोस्टवरून असं वाटतंय की तुम्ही अजूनही प्रोबेशन पिरियड मध्ये आहात. कन्फर्मेशनला काहीच दिवस उरले असल्याने आणि त्यासाठीचे कायदे कानून वेगळे असल्याने कंपनीने हे पाऊल उचलले असेल.
तुम्ही तुमच्या पर्फॉर्मन्स वर लक्ष केंद्रित केले आहे का? त्यामुळे काही होऊ शकते असं वाटतंय का?
चार महिन्यात कोणा सिनियरशी वगैरे काही वाद विवाद? अ‍ॅटिट्यूड प्रॉब्लेम वगैरे?
असो, अल्टिमेटली नोकरी सोडावीच लागणार असेल तर राजिनामा द्या आणि नविन नोकरी शोधा. कंपनीला ही टर्मिनेशन दाखवायला आवडत नाही. कंपनीच्या प्रोफाईलवर परिणाम होतो त्याने.

>>> एकंदरीत काय तर मी काहीही करू शकत नाही
फक्त गाढवासारखे काम करायचे आणि
मालकाने मानत येइल तेव्हा ढूगानावार लाथ मारून हाकलून दयायचे>>>>
तुम्ही पब्लिक फोरम वर हे लिहू शकता . पण आपल्या मॅनेजमेंटशी बोलतांना कसे बोलला असाल हा प्रश्न स्वतःच्या मनाला प्रांजलपणे विचारा. पुढील करियरसाठी ही धोक्याची घंटा आहे.

दूसरी बाजूच नाही आहे
सविस्तर सांगतो
मार्च मधे मी आणि अजुन एक असे आम्ही एकाच दिवशी कामावर रुजू झालो
पहिले 2 महिने ट्रेनिंग दोघानाही US चे
नन्तर ते US चे काम पूर्णपणे दुसर्याला दिले गेले
मी असाच बिन्कमाचा होतो. नंतर मला त्यानी काहि कामे दिली पण काही ख़ास अशी नाही
नन्तर मी बॉस ला विचारले की मला काम कधी देत आहे, तेव्हा त्यानी सांगितले की U K चे प्रोजेक्ट येत आहे. पण नाही 2 महीने काहीच काम आले नाही.
पुन्हा मी बॉस ला कामाबद्दल विचारले असता ते बोलले की तुला मी रोहा(जिथे कंपनीची फैक्ट्री आहे) तिथे ट्रेनिंग साठी पाठवतो तिथून आल्यावर तू ते काम इथून साभाळाय्चे. एक आठावड़ा ट्रेनिंग घेउन परत आलो तरीही काहीच काम दिले नाही
आणि जेव्हा मी पुन्हा विचारायला गेलो आणि त्यानी मला रोहा कायमचे जाण्यास सांगितले(ज्याचे ट्रेनिंग घेउन आलो ते काम वेगळे आणि हे काम वेगळे) .............
Atitude मज्यात कधीच नव्हता
आणि कामच नव्हते तर परफॉरमेंस चा संबन्धच येत नाही

ह्म्म.. कुठली कंपनी सांगता येईल का? एस ए पी मध्ये आहात म्हणुन विचारले.

माझ्या एका ओळखीच्यावर हल्लीच ही आपत्ती ओढवली. तो फ्रेशर म्हणुन कॅपजेमीनी कंपनीत लागला (एस ए पीत नाही तर आयटी रिलेटेड दुस-या फिल्डमध्ये). त्याआधी दोन तीन खासगी ठिकाणी काम केलेले. रुजू होताना फ्रेशर असल्याने जुन्या नोकरीच्या कागदपत्रांबद्दल काहीही विचारले गेले नाही. त्याने अर्जात जुन्या कंपन्या नमुद केलेल्या. ऑफर लेटरमध्ये स्वतंत्र एजेन्सीकडुन बॅकग्राऊंड चेकचे एक कलम होते. रुजू झाल्यावर एका जर्मन क्लायंटच्या प्रोजेक्टवर टाकले. चार महिन्यानी त्या क्लायंटसाठी बॅकग्राऊंड चेकचे काम सुरू झाले. याने त्यासाठी जुन्या नोकरीची अनुभव पत्र वगैरे सगळे दिले. ते अनुभव पत्र नकली आहे असे सांगुन याला सरळ काढुन टाकले. नकली म्हणजे ते एच आरने दिले नव्हते म्हणुन नकली, कंपनी लेटरहेडवर डिरेक्टर कॅपसिटीत असलेल्या माणसाने सही केलेले लेट्र होते. याला लेटर पाहुन कसे कळणार हे असली की नकली ते?

याने जुन्या कंपनीत लेटर देणा-यास विचारले तर तो म्हणाला की मी दिले पण कंपनीच्या हैदराबाद ऑफिसात अपडेट केले नव्हते. याने कंपनीला ही सगळी माहिती कळवल्यावरही कंपनीने "आता काही उपयोग नाही, आम्ही तुझे टर्मिनेशन प्रोसेस केले" म्हणुन सांगुन टर्मिनेशन लेटर पाठवुन दिले याला.

लेटरमध्ये "ऑफर लेटरमधल्या बॅकग्राऊण्ड चेकच्या कलमात तु फेल झालास. आम्ही तुला वेळ दिलेला पण तु तुझी केस प्रुव करु शकला नाहीस, त्यामुळे टर्मिनेशन करतोय" असे स्पष्ट लिहिलेय. पण प्रत्यक्षात अशी काहीही संधी त्याला मिळालीच नाही. मिटींग आहे म्हणुन बोलवले आणि टर्मिनेट केले ही बातमी देऊन घालवुन दिले.

आता परत फ्रेशर म्हणुन सुरू करणार असे म्हणतोय. ह्या साडेचार महिन्याचा अनुभव तो पुढे दाखवु शकत नाही.

सुधीर, बाकी काही कारण नसेल तर दुसरा जॉब मिळेपर्यंत रोह्याचे पोस्टींग घ्यावे असे मला वाटते. रोहा काही फार लांब नाही. तिथूनही नव्या जॉबसाठी प्रयत्न करता येतील.

साधना, वाईट केस आहे !

Back to top