एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतर रूम मध्ये बसतो तेव्हा पण आवाज इतका मोठा असतो कि काय सांगायचे .

हे आमच्याकडे पण आहे..शेवटी मी इअरफोन्स घालायला सुरुवात केली मला सासू हवीच्या वेळी. बरं झालं ती मालिका तरी लवकर संपली!

<< ओमच्या बाबांना मानसोपचाराची गरज पडली म्हणजे अति झालं. काहीतरीच! >> ओमच्या आईला बाबांबद्दल सहानुभूति निर्माण करुन त्याना एकत्र आणायला ईशाने ठोकलेली ती थाप तर नाही ना ! Wink

मानसोपचार चालू आहेत म्हणून ओमच्या बाबांची न आईची फिट्टंफाट नाही काही होत. बाबा स्वतःच्या हालकटपणासाठी ट्रीटमेंट घेतायत अन आई बिचारी तिच्यावर कोसळलेल्या संकटाशी सामना करण्यासाठी. मोठठा फरक आहे.

कालचा एपिसोड आवडला. Happy
समीर अजून चांगलाच असलेलं पाहून बरं वाटलं. अजून वीसेक दिवसांत मालिका संपेल. अजिबात कंटाळा न आणता मालिका वेळेत संपवल्याबद्दल खरंच अभिनंदन. (पण सजन रे झूठ मत बोलो सारखा फार्स यांना जमला नाही, मध्येच अति इमोशनल गचके खात होते!!)

ओम किती गोड आहे.

ओमचे बाबा हलकटपणासाठी ट्रीटमेंट घेत नसून त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येतात यासाठी घेत आहेत. पूर्वीही त्यांनी हे बोलून दाखवलेले आहे व इशाच्या बोलण्यात आत्तासुद्धा तो संदर्भ आलेला आहे.

ओमच्या आईनी आज दिलेले स्पष्टीकरण थोडसं संदर्भाला सोडून आहे. ती 'अजितच्या घरात कशी राहणार होते मी?' असं म्हणते. घर अजितचं कधीच नव्हतं . ते तिच्या सासूचं होतं. आणि त्या सासूचा तिला भक्कम आधार होता असं तिच सांगते. तिच्या डिप्रेशनच्या कंडीशनमुळे ती सोडून जाते हे मात्र अगदी पटले.

मालिका मात्र छान चाललेय. तिकडे ब्रॉडकास्ट झाली की नंतर सुमारे २ तासात ती ऑनलाईन येते. त्यावेळेला पुष्कळदा वाट पाहिली जाते. नक्कीच मिस होईल.

या मालिकेतील वाखाणण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे बर्‍याच जणांनी धडाधड वजन उतरवलं आहे. हे कुणाचं इन्स्पीरेशन आहे वगैरेवर जाहीर भाष्य केलेलं आवडेल.

घर अजितचं कधीच नव्हतं . ते तिच्या सासूचं होतं>>> नावावर जरी सासूच्या असलं तरी "नवर्‍याचंच" घर ना? आईने लेकाला घराबाहेर काढल्यावर त्या घरामध्ये ती सून म्हणून कशी राहिली असती? ज्याच्याशी लग्न केलं तोच सोडून गेल्यावर त्या घराशी संबंध भावनिकरीत्या तुटत जातो. नंतर ती ओमला "तुझ्या चेहर्‍यामध्ये त्याचा चेह्रा दिसायला लागला" म्हणते तेदेखील पटतंच.

अगदी काहीच संबंध नाही, पण ही पोस्ट लिहिताना केजोचा अर्जुन कपूरवाला एपिसोड आठवला, बोनी कपूरने दुसरा घरोबा केल्यावर अर्जुन आणी त्याची आई सासूकडेच एकत्र कुटुंबात राहिले होते. तेव्हाची आईच्या मनःस्थितीबद्दल अर्जुन बोलला होता. नंतर खूप वर्षांनी तिनं स्वतःचं घर घेतलं वगैरे. या प्रसंगाशी ते पटकन रिलेट होण्यासारखं वाटततंय.

हेडरच्या मजकुरात 'मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!' असं आत्ता वाचलं.
म्हणजे सुरू झाल्यावर वर्षभराच्या आत मालिका संपतेय म्हणजे कौतुकास्पदच!!

खूपच छान चालू आहे ही मालिका. मी हल्ली आवर्जून बघायला लागले आहे.
स्पृजो अत्यंत म्हणजे अत्यंत आवडू लागली आहे. एलदुगो, उंमाझो आणि आता एलतिगो... अभिनयाचे एक एक पुढचं पुढचं स्टेशन घेते आहे ती.
उ.का. फारच मस्त! बाकीही सगळी पात्रं खूप्च छान बेतली आहेत. सगळ्यांचे अभिनय टू गूड!

>>>>शेवटी मी इअरफोन्स घालायला सुरुवात केली मला सासू हवीच्या वेळी.
.
असे काहीतरी चुकून सुद्धा करू नका
तो आवाज लपविण्यासाठी इकडे आवाज वाढवाल आणि हिअरिंग लॉसेस होतील

चला, मालिका संपताना का होईना तिचे चाहते वाढले!

सगळी गोड ओमची कमाल आहे Wink

जोक्स अपार्ट, गेले काही दिवस फार छान झाले सगळे भाग.

समीर इनोसन्टली बोलून गेला. पण हुशारीने तोच भाग कट करून प्रोमोजमध्ये कसा दाखवत होते पाहिलं ना? हे हुशार मार्केटिंग! Happy आज आता तो बापाच्या कारनाम्यांचे गौप्यस्फोटही करणार आहे. बघता बघता शामळू पोरगं हीरो झालं की Proud

समीर चांगलाच आहे. तो फक्त रागाच्या भरात बोलून जातो बापाचा मार खातो म्हणुन >> येस येस राईट.. तो अजून चांगलाच आहे आणि भावनेच्या भरात बोललाय तो... मी पण उत्साहाच्या भरात बरेच गेस केले... Happy

घर अजितचं कधीच नव्हतं . ते तिच्या सासूचं होतं>>> नावावर जरी सासूच्या असलं तरी "नवर्‍याचंच" घर ना? आईने लेकाला घराबाहेर काढल्यावर त्या घरामध्ये ती सून म्हणून कशी राहिली असती? ज्याच्याशी लग्न केलं तोच सोडून गेल्यावर त्या घराशी संबंध भावनिकरीत्या तुटत जातो. नंतर ती ओमला "तुझ्या चेहर्‍यामध्ये त्याचा चेह्रा दिसायला लागला" म्हणते तेदेखील पटतंच.> अनुमोदन...

ओम (उ.का) खूपच क्युट आहे... Blush

स्वतः अफेअर्स करून बायकोला नको जीव करून कुटुंबाची वाताहात लावणे हा हालकटपणा नाही का? आता भानावर आल्यावर डॉ. ची ट्रीटमेंट घेतोय त्याचे कसले आलेय कौतुक?

तो समीर अविनाश नारकरचा मुलगा तर नाही ना? चेहरा बराचसा त्याच्यासारखा वाटतोय.

कौतुक कुणीच करत नाहीये. पण तिघांचीही झालेली होरपळ फरफट फार उत्तम रीत्या दाखवली आहे.

काल इशाच्या आईचा आणि ओमचा फोनवर बोलतानाचा सीन सही होता!! खासकरून वकिलबुवा "तुम्ही आमचं लग्न कसं अचानक ठरवलंत तसंच" म्हणतो ते... कुठेही कॅरेक्टरचा व्यवसाय निस्टू देत नाहीत. Happy

काल इशाच्या आईचा आणि ओमचा फोनवर बोलतानाचा सीन सही होता!!>>>
खरंच.. त्याने कसला सही पंच दिला.
कालचा एपिसोड छान होता...!! ते पहिल्यांदा एखाद्या कुटुंबासारखे एकत्र आले होते.

आणि नेहमीचं....उमेश खरंच गोsssड आहे!!

सुमेधा नाही तो अविनाश नारकरचा मुलगा नाही, त्याचा मुलगा १०वी ११वीत आहे बहुदा. ऐश्वर्या नारकर (माहेरची पल्लवी आठल्ये) माझ्या बहिणीची batch mate आणि आमच्याच एरियात राहायची त्यामुळे मला माहिती.

बाकी मालिका सध्या सुंदर चाललीय. समीर आज बाबांचे प्रताप सांगणार काकाला. उमेश नेहेमीच क्युट.

>>>ओमचे बाबा हलकटपणासाठी ट्रीटमेंट घेत नसून त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येतात यासाठी घेत आहेत.<<<
त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभत नाही हे. ते "emotional fool" नव्हते. अमेरिकेतून परत येईपर्यंत त्याचं आयुष्य परफेक्ट चाललं होतं. संशोधन थोडं धीमे चालले होते आणि त्यामुळे दुसर्या बायकोबरोबरचे संबंध ताणले होते. पण म्हणून कुठलाही त्रास नव्हता. स्वतःच्याच मस्तीत जगत होते. पहिल्या बायकोचं अस्तित्वसुद्धा विसरून गेलेले होते. पहिल्या लग्नाबद्दल कसलाही वैषम्य, कुठलीही भावना नव्हती. इतकच काय ओमबद्दल देखील काही विशेष भावना नव्हत्या. केवळ दुसर्या बायकोबरोबर घटस्फोट घेताना आणि त्यातूनही तिने त्यांची सर्व बँक खाती फ्रीझ केल्यामुळे आणि केवळ त्यामुळे घरातल्या माणसांची गरज पडली. कदाचित तशी गरज पडली नसती तर "अपनी मस्तीमे" अॅटीट्युड तसाच राहिला असता. अशा माणसामध्ये इतका अमुलाग्र बदल नाही होत. झाला तरी तो काही काळापुरताच असू शकतो. स्वतःच्या विचारसरणीच्या चुका मान्य करून विचारसरणी बदलणे अशक्य नसले तरी सर्वसामान्य माणसांसाठी कठीण असेल असे मला वाटते.

समीरचे काय झाले? परवच्या प्रोमोस्मधे तो वडिलांना पिन मारताना दाखवला होता. म्हणजे तो वाईट्ट माणूस आहे असे वाटायला लागले होते...त्याचे काय झाले काल ?

नाही तो रागाच्या भरात बोलून जातो! अर्थात अजून त्याला आपली चूक कळलेली नाही पण तो आपल्याच बाजूचा आहे Happy
शिवाय सत्यजितने कोकणातली जमीन परस्पर विकल्याचं अजितला सांगून समीरने आपल्या बापाला अडचणीत आणलं आहे!

थँक्यू जिज्ञासा. तो आपल्याच बाजूने आहे हे बरेच. पण कोणावरच्या रागाने सांगतो तो हे सगळे?
परवा शिल्पा स्प्रुहाला जवळ घेऊन किती गोड आहे रे ही..कुठे सापडली ? असे विचारते ते पण फार गोड होते.

आपल्या बाजूने Happy किती गोड आहे हेही. आपण सगळे ओमच्या बाजूने! येऽऽऽऽ Proud

पण कोणावरच्या रागाने सांगतो तो हे सगळे?>> सत्यजितवरचाच राग. बापाने त्याला सतत हिडिसफिडिस केले होते. त्या पार्श्वभूमीवर ओमकडे सगळ्यांनी त्याला प्रेमाने वागवले, विश्वास ठेवला हे लक्षात आले त्याच्या.

कालचा भाग संपूर्णपणे मोहन आगाशेंचा.. अक्षरश: खाऊन टाकला त्यांनी त्या काकाला.. (अभिनयातही)

इशाच्या वडिलांचे काम करणारा नट मराठी सारेगमच्या एका पर्वात होता का? चाळीशी पुढच्या लोकांकरता असलेल्या पर्वात?

ते संगीत नाटकातही काम करत असत. हल्लीहल्लीच त्यांना फूटेज दिलं गायला. आधी गप्प होते Proud

संपत आली मालिका. प्रेडिक्टेबल असूनही बर्‍यापैकी पद्धतीने संपवत आहेत.

विल मिस गोऽऽड ओम Sad

नवीन मालिका 'का रे दुरावा' इन्टरेस्टिंग वाटतेय.

Pages

Back to top