फेसबूक ट्विटर वा व्हॉटसप सारख्या सोशल साईटसवर प्रत्येक सणासुदीला शुभेच्छापत्रांचा, घोषणांफलकांचा तसेच आचरट विनोदांचा पाऊस पडणे हे नवीन उरले नाहीये. मग यातून राष्ट्रीय सण तरी कसे वाचतील. देशप्रेम हि तर आपली सर्वात मोठी भावना. देशप्रेमाचा नक्की अर्थ कोणाला किती समजला आहे हा एक सर्व्हेचा विषय बनेल. पण आपल्यात देशप्रेम कसे ठासून भरलेय हे सिद्ध करायची बरेचदा चढाओढ लागते. अश्यातच सध्या १५ ऑगस्टच्या निमित्ताने व्हॉटसअप वर एक नवीन फॅड(?) आलेय. आपल्या प्रोफाईल फोटोच्या जागी भारताचा ध्वज लावणे. हा मेसेज दहा दिवस आधीपासूनच फिरतोय जेणेकरून १५ ऑगस्टपर्यंत सर्वांचे प्रोफाईल पिक्चर तिरंग्याच्या एकाच रंगात रंगलेले असतील. "आफ्टर ऑल वुई आर इंडियन्स यार..." म्हणत प्रत्येकाच्या देशप्रेम भावनेला पुकारले जातेय. गंमत म्हणजे सुरुवातीला जे भारतीय ध्वजाचे चित्र या मेसेजमध्ये फिरत होते, जे बरेच जणांनी पटापट आपल्या प्रोफाईलला लावलेही होते, त्यातील पहिला रंग हा केशरी नसून लाल रंगछटेत असल्याचा काही जणांना साक्षात्कार होताच बदलून नव्याने सुधारीत ध्वज फिरू लागला. त्यामुळे सध्या माझ्या कॉंटेक्ट लिस्टवर नजर टाकता दोन प्रकारचे तिरंगे फडकताना दिसत आहेत. या प्रकारावरून काही नेहमीसारखे विनोदी मेसेजही फिरत आहेत. उदाहरणार्थ - सर्वांचे प्रोफाईल पिक्चर एकसारखे झाल्याने प्रेयसीला पाठवायचा मेसेज बायकोला पाठवाल आणि १५ ऑगस्टच्या शुभमुहुर्तावर तुम्हीही स्वतंत्र व्हाल. वगैरे वगैरे.
असो, तर थोडक्यात "ईंडिपेंडन्स वीक"ला दणक्यात सुरुवात झाली आहे. तसे हे गैर मुळीच नाहीये. बरेचदा असे मोठ्या संख्येने एकत्र आणि एकसाथ राष्ट्रगीत गायनाचे विक्रम घडताना आपण पाहतो. कोणत्याही विक्रमापेक्षा राष्ट्रप्रेम हि भावनाच अश्यावेळी लोकांना एकत्र घेऊन येते. तसेच या प्रकारातूनही शक्य झाल्यास राष्ट्रीय एकात्मताच वाढीस लागेल यात मला शंका नाही. पण बरेचदा हे एवढेच करणे म्हणजे देशप्रेम आणि देशासाठी आपण आपले कर्तव्य निभावले असाही बरेच जणांचा समज होऊन जातो. तसेच ज्या कोणाच्या प्रोफाईल चित्रावर तिरंग्याच्या जागी स्वताचे छायाचित्र झळकत असेल त्याच्या देशप्रेमावरही लोकांना शंका येऊ लागते. तर काही जण आपल्या देशप्रेमावर लोकांनी शंका घेऊ नये केवळ या हेतूपोटी लागलीच आपले प्रोफाईल चित्र बदलतात. एकंदरीत आपल्या परिसरात स्वच्छता राखा, वा राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण करा, या प्रकारची देशप्रेमाची तत्वे न उमजणार्यांना या साध्यासोप्या प्रोफाईल चित्र बदलून देशप्रेम दाखवण्याच्या उपक्रमात हिरीरीने सहभागी होताना बघून `मेरा भारत महान' असे खचितच म्हणावेसे वाटत नाही.
तळटीप - इथे मी स्वता फार मोठा देशप्रेमी आहे आणि इतरांची ती ढोंगे असा दावा कुठेही करायचा नाहीये... ना मला ना आपल्याला !
जयहिंद,
ऋन्मेऽऽष
त्याचे काय आहे, निदान
त्याचे काय आहे, निदान त्यानिमित्ताने जरा आठवण जरी झाली तरी बरे. अगदीच भारताला विसरून कसे चालेल?
आता बाकीचे सगळे - एकंदरीत आपल्या परिसरात स्वच्छता राखा, वा राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण करा, या प्रकारची देशप्रेमाची तत्वे हे होईल हळू हळू.
याबरोबरच आणखी एक मेसेज नाही
याबरोबरच आणखी एक मेसेज नाही आला का ऋन्मेऽऽष? Act,1950 and the prevention of Insults to national honour Act, 1971 नुसार, भारतीय संविधान आपल्याल तिरंग्याचा अश्या प्रकारे वापर करण्याची अनुमती देत नाही असा?
इश्श खरेच की, आलाय की असाही
इश्श खरेच की,
आलाय की असाही मेसेज,
आणि त्यामुळे आता गोंधळात गोंधळ चालू झालाय.
देशप्रेमही व्यक्त करायचेय आणि अपमानही नाही करायचाय.
मी माझ्या एकदोन नेटफ्रेंड वकील मित्रांना याबद्दल विचारलेय, पण समोरून अजून उत्तर नाही. मेले केट्या घेऊन पास झालेले दिसताहेत ..
ऋन्मेऽऽष यांच्या अगदी
ऋन्मेऽऽष यांच्या अगदी काहीच्या काही धाग्यांना शतकी प्रतिसाद मिळतात पण हा लेख इतका चांगला आहे तरीही प्रतिसादांचा दुष्काळ का? की शाहरुख खान आणि / अथवा गर्ल्फ्रेंड चा उल्लेख असल्याशिवाय प्रतिसाद द्यायचा नाही असं काही ठरलंय का?
असो. लेखाचा विषय अतिशय चांगला आहे आणि ऋन्मेऽऽष यांनी कुठलाही आवेश न आणता अगदी प्रामाणिकपणे व तळमळीने केलेला प्रयत्नांचा प्रत्यय येतोय.
<< तळटीप - इथे मी स्वता फार मोठा देशप्रेमी आहे आणि इतरांची ती ढोंगे असा दावा कुठेही करायचा नाहीये... ना मला ना आपल्याला ! >>
आता प्रजासत्ताक दिन जवळ येतोय त्यामुळे लेख पुन्हा वर चर्चेला घेऊयात.
माझे वैयक्तिक मत - निदान मला तरी लेख १०० टक्के पटलाय. ऋन्मेऽऽष यांचे मनापासून अभिनंदन. प्रतिसाद नाही मिळाले तरी चालतील पण तुम्ही असे लेख लिहीत चला.
चेतन लेख पटायला तुम्हाला फारच
चेतन लेख पटायला तुम्हाला फारच उशिर झालाय असं नाही वाटत?
कृपया घेणे.
२० दिवस अधीपासूनच झेंडे
२० दिवस अधीपासूनच झेंडे फडकवायला सूरूवात करायची काय?
धन्यवाद चेतनजी, >>> की शाहरुख
धन्यवाद चेतनजी,
>>> की शाहरुख खान आणि / अथवा गर्ल्फ्रेंड चा उल्लेख असल्याशिवाय प्रतिसाद द्यायचा नाही असं काही ठरलंय का? >>>
हे लेखात आणने कठीण नाही.
आयपीएलच्या दरम्यान शाहरूख खानने पाकिस्तानी खेळाडूंना घ्यायला हवे असे विधान करताच त्याच्या देशप्रेमावर शंका घेतली गेली. चित्रपटावर बहिष्कार टाकला गेला. मात्र जे कलाकार इन्कम टॅक्स बुडवत देशाचे नुकसान करतात अश्यांची यादी जाहीर होऊनही आपण चलता है बोलत इग्नोर मारतो. हेच भ्रष्टाचार्यांनाही लागू.
गर्लफ्रेंडबद्दल काय बोलू, आता २६ जानेवारीची चाहूल लागताच तिची तिरंगा काँबिनेशनमधील ड्रेस आणि अॅक्सेसरीजसाठी जुळवाजुळव सुरू होईल.
आणि गंमत म्हणजे २६ जानेवारीला सुट्टी असल्याने हा दिवस त्यांच्या तसेच आमच्याही ऑफिसमध्ये २५ जानेवारीला साजरा होणार आहे.
आणखी मोठी गंमत म्हणजे १५ ऑगस्ट हा असाच १४ ऑगस्टला साजरा केला जातो, जो पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन आहे.
>>गर्लफ्रेंडबद्दल काय बोलू,
>>गर्लफ्रेंडबद्दल काय बोलू,
१००० प्रतिसाद हवे असतील तर
१००० प्रतिसाद हवे असतील तर बोलायला सुरुवात कर
ऋन्मेऽऽष | 12 August, 2014 -
ऋन्मेऽऽष | 12 August, 2014 - 10:46
इश्श खरेच की,
>>>>>>>>>>चुकुन GF ने रिप्लाय दिला आहे का. (वाचल्यावर सहजच लक्षात आले म्हणून लिहित आहे. पण राग मानू नका.)
नविन वाचक, त्यातील इश्श हे
नविन वाचक,
त्यातील इश्श हे वरच्या आयडीचे नाव घेतलेय,
पण येस्स त्यामुळे तसे गंमतीदार झालेय खरे..
बाकी राग लोभ द्वेष मत्सर मोह माया छाया मनिषा यांच्यापासून मी फार दूर निघून आलोय
ऋन्म्या या छाया माया मनिषा
ऋन्म्या या छाया माया मनिषा जुन्या गफ्रे वाटतं
अगदी अगदी.. १५ ऑगस्ट किंवा २६
अगदी अगदी.. १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी जवळ आले कि खरच हे सो कॉल्ड देशप्रेमी फार उच्छाद आणतात हा.. जिकडे तिकडे ओरड असते प्रोफाईल फोटो बदला म्हणून.. आणि फोटो नाही बदलला की टोमणे मारणं सुरु..
इग्नोरास्त्र फार उपयोगी पडतं अशा वेळी.. बसा गळे काढत आम्ही फोटो बदलत नाही म्हणून.. आम्ही कुठे लक्ष देतोय...
आनंदिता, हो, जर हे फक्त हा
आनंदिता, हो, जर हे फक्त हा दिवस एकत्र येऊन एका पद्धतीने सेलिब्रेट करणे यानुसार बघितला तर त्यातून होणारा एकतेचा फायदा आणि मिळणारा आनंद कबूल आहे. ऑब्जेक्शन आहे ते हे करताना देशभक्तीचा आव आणण्याला आणि न करणार्यावर ठपका ठेवण्याला.
दक्षिणा, चोकस अंदाज हा, पण माया नाही फक्त छाया मनिषा .. दोघी बहिणी .. एकेक करत प्रेमात पडलो आणि दोघींनी एकेक करत नाही म्हटले.
जाऊ द्या जुनी गोष्टय फार, हाल्फ चड्डीत फिरायच्या वयातली.. तेव्हा नकार पचवायची मनाची तयारी करूनच प्रेमात पडायचो.. पुन्हा कधीतरी वेगळ्या धाग्यावर वा स्वतंत्र लेखमालेत घेऊ हि सारी अपयशी प्रकरणे..
<< आणि गंमत म्हणजे २६
<< आणि गंमत म्हणजे २६ जानेवारीला सुट्टी असल्याने हा दिवस त्यांच्या तसेच आमच्याही ऑफिसमध्ये २५ जानेवारीला साजरा होणार आहे. >>
२५ जानेवारीला रविवार आहे.
बाकी राग लोभ द्वेष मत्सर मोह
बाकी राग लोभ द्वेष मत्सर मोह माया छाया मनिषा यांच्यापासून मी फार दूर निघून आलोय>> "संत ऋन्मेष महाराज"
आठवत नसेल तर हा धागा अधिक माहितीसाठी http://www.maayboli.com/node/51617?page=4 पहावा
वरचा लेख पटला.परिसरात स्वच्छता राखा, वा राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण करा, या प्रकारची देशप्रेमाची तत्वांची खरी गरज आहे .देशप्रेम आणि देशभक्तीची जाणीव असली तर असं मोबाईलमधे चित्र लावण्याची गरज नसते .आणि लावायचच असेल तर झेंड्याचा मान राखुन लावावे चित्र.
>>>>>>ऑब्जेक्शन आहे ते हे
>>>>>>ऑब्जेक्शन आहे ते हे करताना देशभक्तीचा आव आणण्याला आणि न करणार्यावर ठपका ठेवण्याला. <<<<
True!!!!!!!!!!!!!!
२५ जानेवारीला रविवार आहे...
२५ जानेवारीला रविवार आहे... ओये माय गॉड !!! म्हणजे २४ ला शनिवार असणार.
म्हणजेच आमच्या ऑफिसला प्रजासत्ताक दिन यंदा २३ जानेवारीलाच साजरा होणार.. जिओ मेरी यमएनसी !!
प्रजासत्ताक दिन यंदा २३
प्रजासत्ताक दिन यंदा २३ जानेवारीलाच साजरा होणार>>>>>>>>> बापरे. नाही साजरा केलात ऑफीसात तर दंड वैगेरे असतो का??
नाही, कसला दंड, कोण कोणाला
नाही, कसला दंड, कोण कोणाला करणार.. ऑफिसतर्फेच साजरा होतो..
साजरा म्हणजे तिरंग्याच्या ड्रेसकोडनुसार वा व्हाईट रंगाचे कपडे घालायचे, ध्वजवंदन, मान्यवरांचे भाषण, एखाद्या हौशी कलाकाराचे देशभक्तीपर गाणे, ईतिहास आणि नागरीकशास्त्रावर प्रश्नमंजूषा, राष्ट्रगीताचे समूह गायन, सरतेशेवटी चहा स्नॅक्स वगैरे.. टोटल पाऊण ते एक तास
हो पण २३ लाच करावं लागेल ना
हो पण २३ लाच करावं लागेल ना म्हणुन म्हटलं.
कारण २६ ला सुट्टी असल्याने
कारण २६ ला सुट्टी असल्याने आदल्या दिवशी व्हायचा, मग आता आणखी २ दिवस आधी जाणार, कारण कोणत्याही परीस्थितीत २७ ला होणार नाही.
त्यामुळे केला तर २३ लाच .. आणि निव्वळ एकाच्या जागी ३ दिवस आधी जातोय म्हणून रद्द नाही होणार ना..