भिजवून मोड आलेले वाल सोलून एक वाटी
ओले खोबरे अर्धा वाटी
लसूण 7-8पाकळ्या
हिरवी मिरची एक
1कांदा बारीक चिरून
गूळ आवडीनुसार
2 अमसुलं
जिरेधणे पूड
हिंग, कढिपत्ता, हळद, तिखट, मीठ, तेल, मीठ, कोथिंबीर
प्रथम ओलं खोबरं, मिरची, लसूण एकत्र वाटून घ्यावे.
पसरट भांडयात तेल तापवत ठेवावे, त्यात हिंग, कढिपत्ता टाकावा. लगेच चिरलेला कांदा टाकावा, लगेच वाल टाकावेत. त्यावर हळद, तिखट टाकून पाच सात मिनिटं सगळे परतावे. मग जिरेधणे पूड टाकून पुन्हा परतावे. आता त्यात वाल भिजतील इतके पाणी टाकून छान उकळू दयावे. आता आच बारीक करून झाकण ठेवावे. वाल शिजले की त्यात वाटण, अमसुलं, गुळ, मीठ, कोथिंबीर टाकावी. छान उकळी आली की झाकण ठेउन मंद आचेवर पाच मिनिटं ठेवावे. नंतर आच बंद करावी.
रंगासाठी फोडणीत थोडे तिखट घालावे. गुळ घातल्यावर वाल थोडे आक्रसतात. तेव्हा वाल नीट शिजल्यानंतरच गूळ, मीठ घालावे.
wow.. very tempting!!!
wow.. very tempting!!!
वा वा ! फोटो तोंपासू आहे
वा वा ! फोटो तोंपासू आहे .
वाल म्हणजे फेवरेट आहेत . आख्खी कढई संपवू शकेन . सोबत तांदूळाचि भाकरी !!!
अहाहा !
खायल येते ग कधी कर्तेस ते
खायल येते ग कधी कर्तेस ते सांग.
स्लर्प
अरे, कधीपण या. चला वाल गटग
अरे, कधीपण या. चला वाल गटग करुत
धन्यवाद
मस्तं पाककृती, अवल! फोटोपण
मस्तं पाककृती, अवल! फोटोपण कातिल आहे!
बिरडं वाटीत घेऊन दणादण खावंसं वाटतंय.
सुंदर! वाल फेव्हरीट.
सुंदर! वाल फेव्हरीट.
वा तों पा. सु. सुगरणबाई
वा तों पा. सु. सुगरणबाई
फोटो तोंपासु आहे!
फोटो तोंपासु आहे!
फर्मास पाककृती! शेवटचा फोटो
फर्मास पाककृती! शेवटचा फोटो तर क्लासच.
अवांतर - अलीकडेच पाहिलेला हा व्हिडिओ आठवला. 'विवा पश्चिमा'तल्या सीकेपी फेस्टिवलमध्ये चक्क मोहरी घालून केलेल्या वालाच्या बिरड्याचा किस्सा टिपिकल कणेकरी शैलीत -
https://www.facebook.com/photo.php?v=292893360889429&set=vb.168057540039...
अवल, सही फोटो! अगदी आजीच्या
अवल,
सही फोटो! अगदी आजीच्या हातच्या बिरड्याची आठवण आली.
वॉव फोटोवरूनच कल्पना येतेय
वॉव फोटोवरूनच कल्पना येतेय चवीची....स्लर्प्प्प्प्प्प
धन्यवाद सर्वांना. नंद्या,
धन्यवाद सर्वांना.
नंद्या, माझं मुगाचं बिरडं पण वाच रे
http://www.maayboli.com/node/16995
मस्तच दिसतंय बिरडं! मी अगदी
मस्तच दिसतंय बिरडं!
मी अगदी थोडं आल्या-लसणाचं वाटण लावते.
जबरी दिसत आहे. (वाल म्हणजेच
जबरी दिसत आहे.
(वाल म्हणजेच बिरडे ना?)
वाल म्हणजे बिरडं नाही.
वाल म्हणजे बिरडं नाही.
http://www.maayboli.com/node/16995 इथे वाचा, बिरडं म्हणजे काय ते
आमच्या येथे काहीजण वालाच्या
आमच्या येथे काहीजण वालाच्या उसळीला बिरड्याची उसळ म्हणतात.
धन्यवाद वरील माहितीसाठी!
बिरडे = मोड आलेली / भिजवलेली
बिरडे = मोड आलेली / भिजवलेली धान्ये.
वालाच्या धान्यालाही बिरडं म्हणतात.
या धान्यांच्या उसळीलाच नंतर 'बिरडे' असं म्हटलं जाऊ लागलं.
धन्यवाद चिनूक्स
धन्यवाद चिनूक्स
सीकेपी लोकांच्यात धान्याच्या
सीकेपी लोकांच्यात धान्याच्या उसळीला उसळच म्हणतात. धान्य भिजवून, मोड आणून, त्याची सालं काढून, वाटण घालून केलेल्या रश्याला "बिरडं"म्हणतात. म्हणूनच नावात सीकेपी पद्धत असं मुद्दाहून लिहिलय.
ते सगळ जाऊ देत . मला आमंत्रण
ते सगळ जाऊ देत . मला आमंत्रण कधी आहे ते सांग .
सीकेपी पद्धतीचच खायचं असेल तर
सीकेपी पद्धतीचच खायचं असेल तर केव्हाही
आमच्याकडे डाळींब्या
आमच्याकडे डाळींब्या म्हणतात.
अवल माझी पद्धत पण थोडीफार अशीच आहे पण मी कांदा नाही घालत. जिरे-धने पुडऐवजी आमचा गोडा मसाला घालते. पण सी.के.पी पद्धती माहीत आहेत बर्याचशा कारण शेजारी दोन सी.के.पी रहायचे आणि माझ्या चुलतबहीणीचा नवरा पण सी.के.पी. आहे.
फोटो कातील, अशी उचलून खावीशी वाटते डाळींब्यांची उसळ (वालाचे बिरडं).
>>> प्रत्येक मूग सोललेलाच
>>> प्रत्येक मूग सोललेलाच असला पाहिजे. बिरड्यात साल तरंगताना दिसले तर आमची सी. के. पी. जात बुडते
--- हा हा, अगदी अगदी! मूग गिळून बसण्याऐवजी 'सोल' सर्चिंग करणे कधीही श्रेयस्कर
मुगाचं बिरडं शेजारच्या सबनीस
मुगाचं बिरडं शेजारच्या सबनीस काकु करायच्या पण मुग सोलणं डाळिंब्या सोलण्यापेक्षापण किचकट काम.
सी.के.पी. लोकांचे कानवले आणि निनावं पण फेमस आहे.
अवल, मस्त आहे बिरडं.. जोडीला
अवल, मस्त आहे बिरडं.. जोडीला उनउन भात व माशाची एक तरी तळलेली तुकडी ....आहा स्वर्गच!
एकदम तोंपासु
एकदम तोंपासु
अवल दी.....काल हे मॉम ने
अवल दी.....काल हे मॉम ने बनवलेलं....वॉव....ऑस्सम.... आणि आवडती स्मायली
मस्त फोटो!
मस्त फोटो!
वा ! अगदी घरचं बिरडं दिसतंय
वा ! अगदी घरचं बिरडं दिसतंय वालाचं.
मी एकच गोष्ट वेगळी करते, आमसुलाऐवजी चिंचेचा कोळ किंवा सिझनमध्ये कैरी घलते.
- एक सी. के. पी.
आहाहा.. मला पाहिजे. फोटो आधी
आहाहा.. मला पाहिजे. फोटो आधी पाहिलेला, एकदम कातील आहे. या आठवड्यात बिरडं खाणं एकदम मस्स्ट....
Pages