शनिवारी नेरुळला एक जाहिरात नजरेला पडली, handwriting jobs, work from home, earn Rs 4800 per week.
जाहिरात वाचुन थोडी उत्सुकता वाटली, काँप्युटरच्या जमान्यात हस्तलिखिताच्या कामाला आठवडा ४८०० मिळताहेत याचे आश्चर्यही वाटले. लगेच फोन लावला. कसे लिहायचे त्याचे ट्रेनिंग देणार, दर आठवड्याला असायनमेंट मिळणार आणि मग पैसे असा सोप्पा रुट. याचे ४८०० मिळणार? कायतरी लोच्या आहे नक्की ही घंटी वाजली डोक्यात. फोनवरुन पत्ता घेतलेलाच. घराच्या जवळच होता. म्हटले इतके वर्षे स्कॅमबद्दल वाचतोय पण प्रत्यक्ष स्कॅम करणारी माणसे काही पाहिली नव्हती, आता लगे हाथ पाहुनही घेऊया.
काल गेलो दिलेल्या पत्त्यावर आणि माहिती घेऊन आलो. एका जुनाट इमारतीत तळमजल्यावरच्या गाळ्यात एक ऑफिस. आत दाराला लागुनच एक टेबल-खुर्ची आणि बसायला सोफा. त्याच्यापुढे एक पार्टिशन. आम्ही गेलो तेव्हा एक मुलगी खुर्चीत आमचीच वाट पाहात बसल्यासारखी बसलेली आणि एक मुलगा फोनवर बोलत असलेला. बोलण्यावरुन तो आमच्यासारख्याच कोणाशीतरी बोलत होता एवढे कळले. बोलता बोलता तो पार्टीशनाअड गडप झाला तो नंतर उगवलाच नाही.
खुर्चीवरच्या मुलीने लगेच माहिती द्यायला सुरवात केली. त्याचा गोषवारा खालीलप्रमाणे:
१. २०० रुपये भरुन रेजिस्ट्रएशन करायचे, मग आपली एक टेस्ट घेऊन आपण जॉबला लायक आहोत का ते ठरवणार.
२. लायक ठरलो तर ७०० रुपये भरुन ट्रेनिंग घ्यायचे.
३. ट्रेनिंगनंतर आपल्याला एका पुस्तकाची ७० पाने मिळणार. चारपाच पुस्तके पडलेली टेबलावर. पाने पुर्ण पिवळी पडलेली, अक्षरे १ मीमी आकाराची.
४. मी पुस्तक उघडुन पाहिले, इंग्रजीत होते. पाने दोन्ही बाजुला पांढरे पेपर लावुन स्टेपल केलेली होती. पुस्त्काचे नाव गाव काही पत्ता लागत नव्हता. ७० -७० पाने फाडुन स्टेपल केलेली. पाने फाडताना निदान जो भाग सुरू आहे तो तरी संपतोय का एवढे पाहायचेही कष्ट घेतले नव्हते. पुस्तकाचे नाव कुठेही सापडत नव्हते.
५. कॅपिटल लेटर्समध्ये पुस्तकाची पाने कॉपी करायची.
६. पहिला आठवडा गप्प बसायचे कारण आपला प्रोजेक्ट चेक करायला इतका वेळ जातो. एका बॅचमध्ये ३५-४० लोक असतात. त्यामुळॅही वेळ लागतो. नंतर लोक विविध कारणांनी सोडुन जातात आणि म्हणुन वेळ कमी लागतो प्रोजेक्ट अप्प्रुव व्हायला.
७. ६० शब्दापर्यंत चुकांना ठराविक रक्कम कापणार. त्याच्यापेक्षा जास्त चुका असतील तर मग गेलात कच-यात.
८. एकदा पहिली ७० पाने अप्रुव झालीत की मात्र तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रोजेक्टचे पैसे दोन दिवसात मिळणार.
९. दिवसा कमीतकमी ८ तास तरी लिखाणाला द्यावे लागणार एवढे लिखाण असते ७० पानांचे.
१०. एक प्रोजेक्टला दोन हस्ताक्षरे चालतात.म्हणजेच दोन माणसे करु शकतात.
११. हे सगळे लिखाण कोणासाठी? तर हे लिखाण वापरुन त्यावरुन संवाद बनवुन मग चित्रपट, मालिका इ.इ. कामासाठी वापरणार..
हे शेवटचे ऐकुन मला धक्का बसला. आधीच कॅपिटलमधले लिहिलेले वाचायला त्रास होतो, त्यात दहा जणांनी वेगवेगळ्या अक्षरात लिहिलेले लिखाण वाचुन त्यावरुन चित्रपटाचे कथा-संवाद म्हणजे खुपच फारफेच्ड झाले... यापेक्षा फोटोकॉपी का नाही वापरत, तर म्हणे फोटोकॉपी नीट येत नाही, लेखकाच्या हक्काचा प्रश्न येतो इ.इ.
हे एवढे कशासाठी करायचे हे ऐकल्यावर हा स्कॅम असणारच याबद्दल खात्री झाली. पण काय प्रकारचा स्कॅम हे कळत नाही. माणशी ९०० रुपये गोळा करुनही कितीसे हाती लागतील??
कोणी ऐकलेय का या प्रकाराबद्दल? मी नेटवर सर्च केले पण हँडरायटींग जॉब स्कॅम म्हणुन काही सापडले नाही.
धन्य आहे! आणि इण्टरेस्टिंग
धन्य आहे!
आणि इण्टरेस्टिंग स्टिंग ऑपरेशन, हां, साधना...
कुठल्यातरी वर्तमानपत्राला पाठव हे...
स्कॅमच नो डाउट! पण पदरचा वेळ
स्कॅमच नो डाउट!
पण पदरचा वेळ खर्चून प्रत्यक्ष जाऊन, ही माहिती मिळवलीस त्याबद्दल कौतुक वाटलं तुझं.
दिवसाला २ लोक जरी आले तरी
दिवसाला २ लोक जरी आले तरी १८०० रु. दिवसाची कमाई होत असेल. तीही काही कमी नाही.
सकाळमधे तर व्यवसायधंदा मध्ये विविध प्रकारचे स्कॅम येतात नि सकाळ बिनदिक्कत छापत असते.
हाताने कॉपी केली म्हणजे
हाताने कॉपी केली म्हणजे कॉपीराईटचा प्रश्न येत नाही का ? खरे तर लोक लिहिण्याचा आळस करणार आणि काम पुर्ण करून पैसे मागायला येणार नाही, या आडाख्यावर हा धंदा चालत असणार.
शिवाय या जाळ्यात, ज्यांच्याकडे कॉम्प्यूटर नाही, चालवायचे ज्ञान नाही तेही अडकणार.
जून्या पुस्तकांंची सॉफ्ट कॉपी केली तर काहीतरी फायदा होईल ना !
scamच आहे . साधनाताई गुड जॉब
scamच आहे . साधनाताई गुड जॉब
मला हे सर्व वाचून शेरलॉक होम्सची रेड हेडेड लीग आठवली
पुण्यात माझी भाची आत्ता मे
पुण्यात माझी भाची आत्ता मे जून मधे उन्हाळ्याच्या सुट्टीत गेली होती अश्या जॉबला एक आठवडा सगळ्या मैत्रींणीसोबत, नंतर गेली नाही. माझ्यामते हे स्कॅम आहे. मुळात स्वतःचे पैसे आधी भरून मग कामाला जायचे ह्या कल्पनेतच लोचा आहे. पण भाची खूप मागे लागली म्हणून मग घरच्यांनी पाठवले.
मला हे टायटल वाचुनच शेरलॉक
मला हे टायटल वाचुनच शेरलॉक होम्सवाली 'रेड हेडेड लिग' ही कथा आठवली
जाई. तुझी पोस्ट आत्ता वाचली
जाई. तुझी पोस्ट आत्ता वाचली
पण पदरचा वेळ खर्चून प्रत्यक्ष
पण पदरचा वेळ खर्चून प्रत्यक्ष जाऊन, ही माहिती मिळवलीस त्याबद्दल कौतुक वाटलं तुझं.>>>>> +१
"मुळात स्वतःचे पैसे आधी भरून
"मुळात स्वतःचे पैसे आधी भरून मग कामाला जायचे ह्या कल्पनेतच लोचा आहे." - संपूर्ण सहमत!
मुळात स्वतःचे पैसे आधी भरून
मुळात स्वतःचे पैसे आधी भरून मग कामाला जायचे ह्या कल्पनेतच लोचा आहे." - रूनी + १
पण साधना, तुझं कौतुक. प्रकरण धसास लावलंस.
पण पदरचा वेळ खर्चून प्रत्यक्ष
पण पदरचा वेळ खर्चून प्रत्यक्ष जाऊन, ही माहिती मिळवलीस त्याबद्दल कौतुक वाटलं तुझं.>>>>> +१००
असाच एक प्रकार इथे यु एस
असाच एक प्रकार इथे यु एस मधेहीबघितला. मॉर्गेज ब्रोकर म्हणुन आधी ट्रेनिंग घ्यायचं. अर्थात पैसे भरुन. मग आपण आपले गिराईकं गोळा करुन त्यांच्यासाठी काम करायच, कमिशनवर. असा काहीतरी प्लॉट होता.
एकंदरीत फारच फिशी वाटतेय.
एकंदरीत फारच फिशी वाटतेय. स्कॅम अर्थातच. तू जाऊन माहिती करून घेऊन आलीस तेही भारी. पण मला त्यांचं गाडं नक्की कसं चालतं, नक्की कसा वापर होतो याचा याबद्दल अजून कुतूहल आहे.
साधना, कौतुक वाटले खरंच
साधना, कौतुक वाटले खरंच
ललिता-प्रीति + १
अरे बापरे!! काय भारी डोकी
अरे बापरे!! काय भारी डोकी चालतात लोकांची...
साधना, तू अश्या जाहिरातीत दिलेल्या फोनवर फोन करण्याचं धाडस दाखवलंस त्याचं कौतुक वाटलं. कारण आपला नंबर त्यांना मिळाला म्हणजे ते मार्केटिंग कॉल करून करून भयंकर पिडतील असंच वाटतं.
मला तर त्यांचा ऑफिसचं भाडं, जाहिरात प्रिंटिंगचा खर्च, ऑफिसमधील माणसांचे पगार इत्यादी खर्च कसा भागत असेल ह्याचीही उत्सुकता असते, पण कशाला नसत्या भानगडीत डोकवायचं असं म्हणत सोडून देते झालं.
पण मला त्यांचं गाडं नक्की कसं
पण मला त्यांचं गाडं नक्की कसं चालतं, नक्की कसा वापर होतो याचा याबद्दल अजून कुतूहल आहे.
>> दोन प्रकाराचे स्कॅम्स असतात.. एकामध्ये दोन ते तीन महिन्यात अॅड करुन लोकांना फसवून गाशा गुंडाळयाचा. वरचे प्रकरण तसे वाटते... दुसरा - नेटवर्कीग.. एखाद्याची गुंतवूण घेउन त्याला अजून चार माणसे आणायला सांगियचे असे २ वर्षे करुन गाशा गुंडाळयाचा.. मग दुसरीकडे जायचे... जेथे लोकसंख्या कमी आणि इंटरनेट/ लोकल पेपर्स कमी आहेत तिकडे असे स्कॅम्स जास्त चालतात.
दोन-तीन वर्षांपूर्वी
दोन-तीन वर्षांपूर्वी लोकसत्तेत छोट्या जाहिरातींत एसबीआय, एचडीएफसी बँकेत कायमस्वरुपी नोकरी. वयाची अट नाही. फक्त पदवी हवी. अशा जाहिराती यायच्या.
मी फोन केल्यावर जर ग्रॅज्युएट असाल तर नोकरी पक्की, वयाची अट नाही हे ठामपणे सांगितले गेले. फक्त रुपये १००० व्हेरिफिकेशन फी म्हणून भरायचे.
माझी एक मैत्रीण या मोहाला बळी पडली. फोनवर सांगितलेल्या वरच्या लेखातल्याच वर्णनात फिट बसेल अशा ऑफिसात पोचली. दोन तरुणी, फोन , पावतीपुस्तक एवढ्यावर ऑफिस चालते.
सगळा तपशील आता आठवत नाही. पण ज्या बँकेचे नाव सांगितले त्याच बँकेत नोकरी (बॅकलॉग भरायला म्हणे), सब्सिडिअरीत नाही. काही दिवसांनी तुम्हाला इंटरव्ह्युचा कॉल येईल ती फक्त फॉर्मॅलिटी असेल. जर कॉल नाही आला तर ५०० रुपये परत.
मैत्रीण आणि तिला तिथे भेटलेली आणखी एक महिला या दोघींनी पैसे भरले. त्या महिलेला काही दिवसांनी इंटरव्ह्यु कॉल आला. पण ठरल्या जागी वाट बघण्यापलीकडे काही झाले नाही. इंटरव्ह्यु घेणारे अधिकारी अचानक येऊ शकले नाहीत. इंटर्व्ह्युची जागा बँकेशी संबंधित नव्हती पण अनेक ऑफिसेस असलेल्या इमारतीत होती.
माझ्या मैत्रिणीने चिकाटीने फॉलोअप करून काही महिन्यांनंतर पैसे परत मिळवले. तिथेही तिला वेगवेगळ्या नंबरांवरून फोन करावा लागला. कारण एकदा नंबर ओळखीचा झाला की तो उचलला जात नसे. पैसे परत मिळाले हे आश्चर्यच.
ही जाहिरात काही दिवसांनी फोन नंबर बदलून बदलून पुन्हा पुन्हा येत असे.
अशीच घरी वर्क फ्रॉम होमची पॅम्फ्लेट्स येतात. यात बहुतेक स्कॅन्ड कागदांवरून टायपिंग करून द्यायचे असते. आधी फीही द्यायची असते. पैसे अर्थातच मिळत नाहीत अशी पत्रे वृत्तपत्रांत येतात.
नवीन पद्धत म्हणजे टाटा समूहातल्या कंपनीतील पदासाठी तुमची निवड होऊ शकेल. इंटर्व्ह्यु अर्थातच
तुम्ही राहता त्या शहरात नाही. त्यामुळे प्रवासखर्चासाठी तुम्हीच त्यांना पैसे पाठवायचे (नेटवरून) मग तुम्हाला तिकिटं बिकिटं मिळतील.
मी दिलेल्या पहिल्या उदाहरणातल्या स्कॅम्स्टरला रोज किमान दहा गिर्हाइकं मिळाली तरी दिवसाला १०००० (५०% परत केले तर ५००० रुपये). दहा दिवसांत ५०००० रुपये. तसंच किती लोक पैसे मागायला परत येणार? रोज अर्थातच बरीच गिर्हाईके मिळत असणार. पैसे परत केले तरी बिनव्याजी वापरायला मिळणार. लोक सोनाराकडून वगैरे अजूनही पैसे उसने घेतात त्याचा व्याजदर अव्वाच्या सव्वा असतो.
हँडरायटिंग जॉब हा नवीन प्रकार दिसतोय. संगणक साक्षर नसलेल्या/स्वतःचा संगणक नसलेल्या लोकांनाही आपला कृपाप्रसाद द्यावा या विचाराने काढला असावा.
"सरकारमान्य घरीच पॅकिंग करा,
"सरकारमान्य घरीच पॅकिंग करा, रोज २७००/ रु कमवा" अशी जाहिरात सकाळ मध्ये येत आहे, मित्र चौकशीला गेला असता, त्याने आणलेले माहिती पत्रक वाचले. तर त्यावर पॅकिंक नेमक काय आहे हे दिसल नाही. धान्याच्या साळीचा बेड करुन त्यावर काहितरी उगवायच आहे, (मशरुम ची आठवण झाली) कच्चा माल १०० रु किलो ने घ्यायचा आणि ८५० रु(कमी गुणवत्ता)-९५० रु (उत्त्म गुणवत्ता) (त्यांनाच) विकायचा. पत्रकावर 'फ्लोरिडा प्रॉडक्टस" असं लिहिलं होतं, जर रहिवासी पुरावा दिला तर कच्चा माल उधारीवर मिळणार आहे. सुरुवातिला ट्रेनिंग साठी १००० रु खर्च आहे. फ्रॉड/ स्कॅम तर वाटत आहे पण आंतरजालावर काही माहिती मिळत नाहीये, 'फ्लोरिडा प्रॉडक्ट" ही एक अमेरिकन कंपनी मिळाली नेटावर पण त्यांचा आणि ह्यांचा काही संबंध दिसत नाही.
इथे कोणाला ह्याबद्द्ल माहिती आहे का?
(ह्या निमित्ताने भारतीय स्कॅमस्टर्र्सचं डोकं किती भारी चालतं हे कळलं, जपानी गादी, स्वदेशी, मेडीकल ट्रान्सस्क्रिप्शन, मल्टी लेवल फसवणुक, मशरुम पिकवा लाखो कमवा इ इ)
साधना तुझे कौतुक वाटते. आपण
साधना तुझे कौतुक वाटते.
आपण ह्या असल्या संशयास्पद स्कीम्सचा धागा बनवायचा का?
मुळात स्वतःचे पैसे आधी भरून
मुळात स्वतःचे पैसे आधी भरून मग कामाला जायचे ह्या कल्पनेतच लोचा आहे." - >>> +१
साधना, तू हे काय आहे ते शोधायच्या मागे गेलीस....धन्य आहेस
खूप गरजू लोक फसत असतील ह्या गोष्टींना.
आणखी एक नवा प्रकार, त्याच
आणखी एक नवा प्रकार, त्याच मैत्रिणीच्या बाबत नुकताच घडलेला.
एक इमेल येते. नामांकित कंपनीत मोठ्या पदाची नोकरी.तुमची पात्रता अनुभव पाहून निवड केली आहे. अमुक नंबरवर फोन करा.
फोनवाला सांगतो तमुक साइटवर रजिस्टर करा. तुम्हाला काही अडचण येऊ नये म्हणून मी फोनवरून तुम्हाला गाइड करत राहीन. साइटवर पोचलात की मला फोन करा.
रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली असते तेव्हा बाईंच्या खात्यातून वीस-बावीस हजार रुपये कमी झालेले असतात. पोलिसात जायचीही लाज वाटत असते. ते पैसे कसले तरी मेंबरशिप फी अशी माहिती फोनवरून कळते.
दुनिया में मूर्खों की कमी नहीं है
ग्रेट जॉब साधना... लोकल ट्रेन
ग्रेट जॉब साधना...
लोकल ट्रेन मध्ये पण अश्या बर्याच अॅड असतात. शिवाय तुम्ही आयपॅड जिंकला आहे, लॅपटॉप जिंकला वगैरे ई-मेल्स हि येत असतात.
दोन-तीन वर्षांपूर्वी
दोन-तीन वर्षांपूर्वी लोकसत्तेत छोट्या जाहिरातींत एसबीआय, एचडीएफसी बँकेत कायमस्वरुपी नोकरी. वयाची अट नाही. फक्त पदवी हवी. अशा जाहिराती यायच्या.
मी फोन केल्यावर जर ग्रॅज्युएट असाल तर नोकरी पक्की, वयाची अट नाही हे ठामपणे सांगितले गेले. फक्त रुपये १००० व्हेरिफिकेशन फी म्हणून भरायचे.
>>>>>>
मी आणि माझ्या मैत्रीणी बळी पडलीय ह्या स्कीम ला
नुकतच बी.कॉम झालेलं नोकरी साठी भटकत होतो b.com (banking & insurance) केल्यामुळे जॉब बँकेतच हवा होता. तेव्हा आमच्याकडुन १०००/- घेतलेले
सांगितल जॉब भेटला तुम्हाला HDFC मध्ये तिथे फक्त normal interview घेणार मग बॅक ऑफिस मध्ये सिलेक्ट होणार फक्त b.com 1st class पहिजे
ईथे आम्ही खुश होउन interview ला गेलो अंधेरी j.b nagar
तिथे गेल्यावर समजल की तिथे होम लोन च्या सेल्स साठी मुली हव्या होत्या मीन्स टेली कॉलींग
आम्ही एकदम शॉक
बरं आम्ही त्या ऑफिस मध्ये पुन्हा कॉल केला तर ती मॅड्म तर तिला काहीच माहिती नसल्या सारखं बोलत होती
आम्हाला समजलच चांगल तिने चांगलच गंड्वलय
आमच्या ग्रुप मधल्या एका मुलीला जॉबची खुप गरज होती
तिने पत्करला तो जॉब पण तिचे हाल झाले नंतर ते काही बघायलाच नको
सॅलरी वेळेवर नाही, ऑफिस सुटण्याचा टाईम फिक्स नाही
दुनिया झुकती है झुकानेवाला
दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये!
मागे एक किस्सा ऐकला होता. इंटरनेट वगैरेच्या आधीची गोष्ट. पत्राद्वारे बर्याच लोकांना निरोप आला की तुम्ही काहीतरी बक्षिस जिंकले आहात तर अमुक तमुक ठिकाणी अशा अशा वेळी या. तिथे सगळे एकत्र जमणार आहेत, मेळावा आहे, जेवणही आहे वगैरे वगैरे. म्हणजे ठराविक दिवशी ठराविक काळाकरता (३-४ तास) बरेच जणं घराबाहेर असणार होते याची खात्री. मग त्यातील अनेकांच्या घरी घरफोडी झाली होती.
थोडक्यात काय, कोणीही काहीही फुकट देत असेल तर सावध रहा. जर खरंच पैसे १५ दिवसांत चौपट होणार असतील, बँकेत नोकरी मिळणार असेल, काहीही बक्षिस म्हणून फुकट मिळत असेल तर कोणीही दुसर्याला देणार नाही. सगळे गपचुप आपापली वर्णी लावतील. त्यामुळे जाहिरात करून दानशुरपणा दाखवत असतील तर त्या वाटेला चुकूनही फिरकू नका.
मामी एकदम करेक्ट
मामी एकदम करेक्ट
तुम्ही प्रत्यक्ष जाऊन माहिती
तुम्ही प्रत्यक्ष जाऊन माहिती मिळवलीत आणि ती आम्हाला दिलीत याबद्दल आभार.
अशा घोटाळ्यांना रोखणारे काही कायदे आहेत का हे माहिती नाही; त्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल करून फायदा होईल की तुम्हाला अधिक त्रास होईल हे सांगता येत नाही मला.
आजच मला हा एक मेसेज आलाय YOU
आजच मला हा एक मेसेज आलाय
YOU HAVE WON 3CRORE 14LAHKS IN THE ON GOING GOOGLE MOBILE AWARD FOR CLIAM SEND YOUR NAME, MOBILE NUMBER, ADDRES, OCCUPATION TO ******@gmail.com
खाली पिली 14 लाख देत आहेत
आता बोला
3CRORE 14LAHKS आहे गं.
3CRORE 14LAHKS आहे गं. नुसतेच १४ लाख नाही. मज्जा आहे ब्वा तुझी!
१४ लाख नव्हे... ३ कोटी १४ लाख
१४ लाख नव्हे... ३ कोटी १४ लाख !!!
अरे हो ! ठंकू मामी , लले तीन
अरे हो !
ठंकू मामी , लले
तीन करोड़ वाचलच नाही
आज मै उपर , आसमा नीचे
मला कोफी अन्नान सारखे
मला कोफी अन्नान सारखे युनायटेड नेशन्सकडून ग्रान्ट देत असतात.
मला पण सावलीसारखीच 'रेड हेडेड
मला पण सावलीसारखीच 'रेड हेडेड लीग' या गोष्टीची आठवण झाली
साधना, तुझे खरच कौतुक आहे हे
साधना, तुझे खरच कौतुक आहे हे सगळे शोधुन काढलेस. पण आत्ता भरत मयेकर आणि मऊ यांचे किस्से ऐकताना मला अजुन एक रिस्क फॅक्टर जाणवतोय. इंटरव्ह्यु साठी म्हणुन एखाद्या एकट्या जागी बोलावले असेल तर जाण्यात धोका आहे.
कुठल्यातरी वर्तमानपत्राला पाठव हे... >> हे ललिता चे पटतेय. खरोखरच पाठव.
बापरे.. प्रतिसादातले स्कॅम्स
बापरे.. प्रतिसादातले स्कॅम्स वाचुन अजुन अवाक...लोक पैशांसाठी काय काय करतात.. असले काही करण्यापेक्षा काहीतरी चांगले केले तरीही पैसा मिळेल. फक्त तो थोडा थोडा आणि हळू हळू मिळत राहिल. झटपट पाहिजे तर डोके लावा, लोकांना फसवा, पैसा कमवा आणि फरार व्हा....
मलाही रेड हेडेड लिगचीच आठवण झालेली.. म्हणुन पाठपुरावा केला.. की खरे काय आहे ते पाहुयाच एकदा. परत दोन महिन्यानी एकदा फेरी मारेन, ऑफिस आहे का गेले ते पाहायला..
ऐशुच्या एका मैत्रिणीला तात्पुरत्या जॉबची गरज आहे. ती मॅकडोनल्ड, सिसिडी इत्यादी ठिकाणि काम शोधतेय. जाहिरात वाचुन फोन केल्यावर क्षणभर वाटले की जर हे खरे असेल तर तिला मदत होईल. ती आणि तिचा आठवीतला भाऊ दोघे मिळून असाइनमेंट पुर्ण करुन थोडे पैसे मिळवु शकतील. पण तिथे जाऊन आल्यावर मात्र जो काही थोडाफार १ टक्का भ्रम होता तो फिटला. इथे पहिला प्रोजेक्ट लिहुन देईतो सगळे गोड असणार पण तो प्रोजेक्ट कधीच संमत होणार नाही आणि आपल्याला पहिले ४८०० कधीच मिळणार नाहीत.
त्या मैत्रिणिचे वडिल पोलिसात होते, तिच्याशी बोलुन तिला माहिती काढायला सांगितली आहे. जर काही असेल तर पोलिस बघतील.
वर उल्लेखलेल्या मेल्स मलाही येतात, मी तर त्या उघडतही नाही, तशाच डिलीट करते. अशा मेल्समधुन कॉम्प्युटर वायरसही येतात जे कॉम्प्युटरवरची आपली बँक, पासवर्ड वगैरे माहिती गोळा करुन पाठवतात असे वाचलेय नेटवर. त्यामुळे उगीच रिस्क नकोच.
साधना, ते ऑफिस नेमक कुठे आहे?
साधना, ते ऑफिस नेमक कुठे आहे?
माझ्या मित्राच्या वडिलांनी ते
माझ्या मित्राच्या वडिलांनी ते पॅकिंगवाले काम करुन बघितले होते. त्या धान्याच्या साळीच्या बेडवर मशरुम उगवत नाहीत, कारण योग्य कच्चा माल दिला जात नाही. तेव्हा हा पण एक स्कॅम आहे.
माहितीबद्द्ल धन्स पिंगू!
माहितीबद्द्ल धन्स पिंगू!
वर उल्लेखलेल्या मेल्स मलाही
वर उल्लेखलेल्या मेल्स मलाही येतात, मी तर त्या उघडतही नाही, तशाच डिलीट करते >> मला माझ्या अँटवर्प मधल्या पत्त्यावर स्पेनमधल्या एका वकीलाचे लेटरहेडवर पत्र आले होते ३ महिन्यापूर्वी (पोस्टेज वगैरे लावून). माझ्याच आडनावाचा एक स्पेनमधला एक्सपॅट ५ मिलियन डॉलर एका डिप्लोमॅटिक बोक्स मधे ठेवून अचानक अॅक्सिडेंटमधे गेला. त्याच्या मागेपुढे कोणि नाही. तर हा वकील मला त्याचा नातेवाइक दाखवून तो बॉक्स ताब्यात घेणार आणि मग आम्ही ते ५ मिलियन डॉलर वाटून घेणार.. मज्जाच मज्जा
साधना, कौतुक आहे हं तुझे, या
साधना, कौतुक आहे हं तुझे, या स्कॅमच्या अगदी मूळापर्यंत जाऊन माहिती काढलीस.
वर अनेक प्रतिसादकांनी लिहिल्याप्रमाणे कुठल्यातरी वृत्तपत्रात हे द्यावेस म्हणजे बरेच लोक या फसवणूकीला बळी पडणार नाहीत.
अमेरिकेत असताना एक जाहिरात
अमेरिकेत असताना एक जाहिरात वाचली होती..
आम्ही तुम्हाला मेलिंग मटेरीयल, पाकिटे , स्टँप सगळे काही पुरवु..तुम्ही फक्त ते पाकिटात भरुन ते मेल करायचे तुम्हाला प्रत्येक पाकिटामागे $२ मिळतील. मला लगेच मी घरी बसुन रात्रंदिवस पाकिटे भरुन मिल्यनेर व्हायची स्वप्ने दिसायला लागली पण त्यातच पुढे $३९ भरुन कसलीतरी मेंबरशिप घ्यायला सांगत होते तेव्हा कळले की माझ्यासारख्यांकडुन $३९ घेउन मिल्यनेर व्हायचे त्या माणसाचे स्वतःचे स्वप्न असेल ते नक्की पुरे होइल.:)
सीरीयसली,,,
जर सोपी कामे करुन इतके पैसे मिळत असते तर आपण काही पैसे घेउन दुसर्याला हा मार्ग दाखवला असता का? हा साधा प्रश्न स्वतःला विचारला की पुढचे सगळे श्रम वाचतात.
मी तरी असल्या ईमेल्स, टेक्स्ट
मी तरी असल्या ईमेल्स, टेक्स्ट मेसेजेस न पहाता सरळ डिलिट करतो.
अवांतराबद्दल क्षमस्व..
अवांतराबद्दल क्षमस्व.. मनस्मि, तुमची विपु/ संपर्क बघाल का? धन्यवाद..
साधना, >> पण तो प्रोजेक्ट
साधना,
>> पण तो प्रोजेक्ट कधीच संमत होणार नाही आणि आपल्याला पहिले ४८०० कधीच मिळणार नाहीत.
बरोबर आहे. अगदी हेच लिहायला आलो होतो. लेखात दिलेल्या ७ क्रमांकाच्या कलमाचा (६०+ चुकांचे पैसे पूर्ण कापणे) दुरूपयोग केला जाईल याची शंभर टक्के खात्री आहे.
अवांतर : तुम्ही ज्या जुनाट इमारतीत तळमजल्यावरच्या कोंदट गाळ्यात गेलात तशा ठिकाणाला इंथे इंग्लंडमध्ये बॉयलर रूम म्हणतात. फक्त तळमजला नसून तळघर असते. हा स्कॅम जर आर्थिक गुंतवणुकीचा असेल तर त्यास इंग्लंडमध्ये बॉयलर रूम स्कॅम म्हणतात.
आ.न.,
-गा.पै.
सक्सेसफुल स्कॅम्समधे एक
सक्सेसफुल स्कॅम्समधे एक मनिग्रोअर स्कीम राहिली. अन दुसरं ईमू पालन.
अरे त्या नाशिक च्या भाउसाहेब
अरे त्या नाशिक च्या भाउसाहेब चव्हाण साहेब यांचं केबीसी आणि औरंगाबादचं सुपर पॉवर या 'यशस्वी योजना ' राहिल्या ना !
हे सगळे स्कॅम खूप ऐकले आहेत.
हे सगळे स्कॅम खूप ऐकले आहेत. साधनाताई तुम्ही प्रत्यक्ष जाऊन आलात याबद्दल कौतुक वाटले.
मी मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन च्या जाळ्यात अशी अडकले होते. १०००० फी घेतली सुरवातीला. नंतर तिथेच नोकरी लावणार असे सांगितले. ३ महिने ट्रेनिंग. अगदी इतके स्कॅम प्रकरण वाटले नव्हते. कारण ट्रेनिंग वगैरे चांगले दिले होते. औंधसारख्या ठिकाणी जागा होती ही. ट्रेनिंग नंतर १ महिना बरा गेला. नंतर दोन महिने कधीही बोलवायचे. नाईट शिफ्टला वगैरे. पैसे तर दिले नाहीतच वर कोणाला तरी परस्पर हा धंदा विकला मग ती नवीन माणसे आमच्यावर बॉसगिरी करायला यायची. दिले सोडून शेवटी पगार बिगार न घेता. जुन्या मालकाला पगारासाठी फोन केला की म्हणायचे काय करू मीच सगळे दागिने, पैसाअडका गहाण ठेवून बसलोय. तुमचे पगार कुठुन देऊ? खखोदेजा.
सध्या डोंबिवलीत घरोघरी 'गैस
सध्या डोंबिवलीत घरोघरी 'गैस कार्ड' विकायला येत आहेत .गैसच्या तक्रारी केल्या की कंपनीचा मैकेनिक येवून वॉल्व /पाईप इ०बदलून साडेसातशेला रुपयांना फोडणी लावतो ।तसे होऊ नये म्हणून हे गैसकार्ड शंभर रुपयात घ्यायचं आणि मैकेनिक आला तर त्याच्यासमोर धरायचं की त्याचा ऱ्हुदय पालट/परिवर्तन का काय होतं म्हणे आणि तो निमूटपणे फुकटात काम करून देतो वगैरे अशी योजना आहे .
गैस दुकानदार पूर्वी पगारी मैकेनिक ठेवत ते लगेच येत नसत परंतू वॉल्व /बटण यातून गैस गळत असल्यास तो काढून साफ करून मेलिकोट ग्राफाईट ग्रीस लावून चालू करून द्यायचे .आता दुकानदारांनी हे काम आउटसोर्सवाल्यांना पंचवीसेक लाखांना ठेक्याने दिले आहे .त्यांचे मैकेनिक फोन केल्यावर पंधरा मिनीटात येतात आणि झटपट दोन्ही वॉल्वझ बदलूनच टाकतात .रोज अशा वीसतरी ऑर्डर (!)पुऱ्या करतात .हासुध्दा रीतसर स्कैमच आहे .
(बाफ क्र node 22818वर कॉपि पेस्ट केले .)
गॅससंदर्भातील अजून एका
गॅससंदर्भातील अजून एका स्कॅमबद्दल इथे वाचा.
मामी , त्याला स्कॅम नाही
मामी , त्याला स्कॅम नाही म्हणता येणार. Unfair Trade Practice म्हणता येईल.
Pages