ववि२०१४-वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 27 July, 2014 - 13:05

वविकर्स्,धम्माल आली ना वविला. मग ववि२०१४ बद्द्लचे तुमचे वॄत्तांत आणि प्रतिक्रिया इथे लिहा पाहु.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वृत्तांत.. रीया टच खासच..
मायबोलीवरचे नवे संदर्भ आणि नवे चेहरे ह्यांच्यात मिसळताना काहीच प्रॉब्लेम आला नाही, खूप्प नव्या ओळखी झाल्या. देवकाका, श्यामली (मयुरेश, रुमा कायमच संपर्कात होते) असे जुने जाणते मायबोलीकरही भेटले. हिम्या बरोबर बोलताना युसपीजे, पुपुच्या आठवणी येऊन नॉस्टेल्जिक वाटलं पण ते तेवढ्यापुरतच. मुलानेही मस्त मजा केली वविला.. मोकाट होता Wink

पण एकूणात ववि लवकर संपल्यासारखा वाटला खरा प्रवासात वेळ बराच गेला म्हणून असेल पण बसमध्येही धमाल आलीच. संयोजकाकांचे आभार आहेतच पण कुठेही मायबोलीच्या बॅनर खाली आपण सार्वजनिक रीत्या एकत्र येतो तेव्हा अजय आणि समीर (अ‍ॅडमिनचे) यांचे जाहीर आभार आपण आवर्जून मानायला हवेत असं कायम वाटतं. आज त्यांनी माय्बोलीचं स्वप्न पाहिलं, प्रत्यक्शात उतरवलं आणि कैक वर्षे वाढता पसारा सांभाळण्याचं काम चालू आहे, त्यामुळे मराठी मनं आणि माणसं जोडण्याचं हक्काचं व्यासपीठ आपल्याला सहज मिळालय ह्यासाठी आपण कृतज्ञ आहोत.

राखी वादिहाशु (केक मिळाला असता तर लग्गेच दिल्या असत्या शुभेच्छा) काजू कतली खाताना दिल्या तशा Happy

सगळ्यांचे वृत्तांत मस्तच.. परत एकदा ववि डोळ्या समोरून गेला..

वविचं लोकेशन यावेळी खरोखरीच छान होतं आणि लहान मुलांच्या दृष्टीने तर उत्तमच.. निहिराने तर इतकी मस्ती केली पाण्यात की जेवण झाल्यावर तिथल्या तिथे डुलकी घेतली तिने.. Happy

मस्त फ्रेश वाटत आहे .. श्रावणाची सुरूवात एकदम उत्तम.. Happy

उपास,

>> कुठेही मायबोलीच्या बॅनर खाली आपण सार्वजनिक रीत्या एकत्र येतो तेव्हा अजय आणि समीर (अ‍ॅडमिनचे)
>> यांचे जाहीर आभार आपण आवर्जून मानायला हवेत

येस सर, यू आर राईट ! सोबत चिनूक्स आणि साजिरा यांचे पण मानायला हवेत.

आ.न.,
-गा.पै.

सगळ्यांचेच वृ मस्त Happy

अक्षता - मल्ल्याचं काही ऐकु नकोस गं Proud

राखीने मला दिला बाबा केक... लाडकी ना मी तीची ; ):फिदी:

राखी, पण तरीही आपल्याला भेटायला वविची वाट पहावी लागते हे काही बरे नाही Happy

वविला येऊ शकलो नाही Sad या कामामुळे Sad

पण वृ आणि प्रचि मस्तच Happy
सगळ्यांनी मस्त मज्जा केली ना Happy

पुढच्या वेळी मी नक्की Happy

ववि मुळे समजलेल्या नवीन गोष्टी
१. रियाचे सगळे भाव( दादा)
पण रिया ही सगळ्या लहान मुलान्ची लाडकी ताई आहे.जुनि. जम्बो ची रियाताईला पहिल्यान्दा भेटला पण प्रत्येक गोष्टीत त्याला ताईच हवी होती
२. आत्तापर्यन्त न वाचलेल्या पाकक्रुती
३.कल्पक उत्पादने
४. नाव गाव माहित नसताना सुद्धा केवळ आयडी च्या आधारे सगळ्या कुटुन्बाला सामावून घेणारे मायबोलीकर
५ ववि साठी खास सोलापूरहून येणारे माबोकर

या छान अनुभवान्साठी सन्योजकन्न प्रशासकान्ना धन्यवाद.

ववि साठी खास सोलापूरहून येणारे माबोकर >> कोण आले होते???...>>>... ते मल्लीनाथने सोलापूर हुन बोलावलेलं मायबोलीकर होतं... Wink .... Proud
शनिवार संपुर्ण रात्रीचा (ट्रेन) प्रवास, रविवार पूर्ण वविचा प्रवास आणि वविला उपस्थिती (सोबत एक लहान मुलगी देखिल होती), आणि परत रविवार रात्रभर पुनः सोलापूरचा परतीचा प्रवास... नमस्कार सोलापूरकरांना...
Happy

मला कुणीतरी रूमचा रस्ता विचारला. त्या (प्रेमळ)टोन वरुनच मी ओळखले की ह्येनी पण सोलापूरचं दिसतयं....
मग नंतर कळालेच की तो मल्ली आहे म्हणून.... Happy

रिया, वविला आलेल्यांना फोटो इमेल वर शेअर केले आहेत. पैकी पुणेकर वविकरांना मल्ली इमेल धाडतोय. तुला मिळाले नसतील तर मल्लीला विचार किंवा मला इमेल आयडी दे "कायवर वर"

रीया,काल मल्ल्याने मेल केलीये की दोन ऑनलाईन ववि फोटो अल्बम्सच्या लिंकची. एक असुदेचा आणि एक राजू७६ चा. मेल मिळाली नाही का?

इथे नाहीच टाकणार का?>>>>>प्रचि वृत्तांत येऊ द्या कि. व्यक्तींचे फोटो नकोत पण रीसॉर्टचे, खादाडीचे, निसर्गाचे इ. इ.फोटो तरी टाका.

ववि साठी खास सोलापूरहून येणारे माबोकर >? आम्ही तिघे तिघे असताना सोलापुरी, ह्ये कोनं बे चौथं?

वविला आलेल्यांना फोटो इमेल वर शेअर केले आहेत. >> मला मेल मिळाला , पण एका लिंक ला परमिशन नाहिये , मी access request केलीये

आम्ही तिघे तिघे असताना सोलापुरी, ह्ये कोनं बे चौथं?>> तु नक्की कोणत्या तिघांबद्दल बोलत आहेस??

प्रचि वृत्तांत येऊ द्या कि. व्यक्तींचे फोटो नकोत पण रीसॉर्टचे, खादाडीचे, निसर्गाचे इ. इ.फोटो तरी टाका.>>++१११

सोलापूरकर मल्लीशी बसमध्ये मस्त धमासान कानडीत (कानडीच होती ना ती?) बोलत होते... एवढा प्रवास करून खास वविला आले होते. त्यांच्या उत्साहाची खरोखरी दाद द्यायला पाहिजे.

aru, are you talking about Teju?

Only Teju and malli were there who was talking in Kannada

तर आता माझा वृत्तांत ..
रविवार (२० जुलै) पासुन तब्येत बरी नसल्यामुळे टी-शर्ट घ्यायला आणि व.वि. चे पैसे द्यायला जायला जमले नाही. माझे पैसे राजु यांनी दिले. धन्यवाद राजु. बरे नाही म्हणत शेवटी मंगळवारी अ‍ॅडमिट केले. म्हटलं झाले आता ववि मिस होणार. पण इच्छाशक्ति खुप होती. शेवटी शुक्रवारपर्यंत बरे वाटले आणि फोनफोनी सुरु केली कोंण येणार आहे कोण नाही ह्यासाठी.
इतरांनी म्हट्ल्याप्रमाणे रात्री झोप न लागणे, लागली तरी झोपेत पण वविच दिसणे वगैरे माझ्या बाबतीत पण झाले.रोज अलार्म कमीत कमी ३-४ वेळा तरी snooze केलाच जातो. पण त्यादिवशी अलार्म वाजायची वेळच आली नाही. कन्यारत्नाला पण आदल्यादिवशीच सांगितले होते की पाण्यात खेळायला जायचे आहे म्हणून ती पण आमच्या बरोबरीने ६ वाजता उठली. आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत असतो ती सहज मिळाली तर कसली मजा?? त्याप्रमाणेच वाट बघत असलेल्या मला मुग्धानंद कडून कळाले की बस लेट आहे.
शेवटी आली एकदाची बस खारघरला. बसमध्ये केलेल्या दंग्या बद्दल मी काहिच बोलु शकत नाही कारण सर्वात शेवटी मी चढले तोपर्यंत निम्मे अंतर पार झाले होते आणि निम्मी धम्माल. पण आल्या आल्या राखीने केक दिला. S P Farm House आल्यावर पुणे-मुंबईकरांची गळाभेट पाहून आकाशालासुद्धा आनंदाआश्रु आवरता आले नाहीत. असो तर बच्चे कंपनीला समोर दिसणार्या राईड्स ची मजा घ्यायची होती तर पालकांना समोर दिसणार्या नाश्त्याची... Happy
रुम्स शोधायचा खेळ सुरु असतानाच अचानक जिप्सी भेटला. ह्या सगळ्या गडबडीनंतर फायनली आम्ही पाण्यात खेळायला गेलो.तिथे बराच धिंगाणा घातला. बच्चे कंपनीने पण एंजॉय केले खुप. नंतर मग मोर्चा मेरी गो राऊंड कडे वळवला. मेरी गो राऊंडमध्ये बसलेले सगळे ३-५ वयोगटातील वाट्ल्यामुळे फार्म हाऊसच्या मालकांनी त्यांचे ३५० रु कमी केले असावेत.(जाई आपल्याला ३५० परत मिळणार ग Wink ). मग जेवणाचा कार्यक्रम पार पडला. धो धो पावसात गरम गुलाबजामुन मस्त लागत होते. मग सुरु झाला most awaited कार्यक्रम म्हणजेच सां. स. चे कार्यक्रम .
सां. स. च्या गमती साठी बहुतेक एक नवीन धागा काढावा लागेल "एक धागा सांस च्या किश्यांचा". मालपुवा काय, हयग्रीव काय,,, हे सगळे कमी की काय दोई बेगुन??? आणि हे सगळे पण आमच्याच ग्रुपला यावेत??? निषेध निषेध निषेध , त्रिवार निषेध.... पुढच्या वर्षीच्या संयोजकाना विनंती की पुढ्च्या सां.स. ला फक्त ह्या एका वर्षात आलेल्या धाग्यांचा विचार करावा. Wink . शेवटी जे १० प्रश्न विचारण्यात आले त्याचा पेपर फुटला होता असे आम्हाला वाटले. (हलके घ्या सगळे जण) सगळे धम्माल करत होते. हे सगळे सुरु असताना बच्चे कंपनीचा पण खेळ सुरु होता. सर्वात जाणवलेली गोष्ट म्हणजे ह्यावेळेस मला कंपूबाजी जाणवली नाही रादर कमी जाणवली. भजी आणि चहाचा आस्वाद घेतल्यानंतर सगळे परतीच्या वाटेवर लागले.
खुप नवे मित्रमैत्रीणी मिळाल्या. मुलगी सुध्द्धा माबो फॅन झाली आहे. दुसर्यादिवशी मागे लागली होती परत मायबोली कडे चल म्हणून... धन्यवाद माबो...

वा! कांचे भारी लिहिलाय वृ..
हो. पोरगी माबोफॅन झालीच आहे तुझी.....पण बरेचसे माबोकर आणि ज्यु. माबोकर तिचे फॅन झाले आहेत त्याचे काय?

Pages