Submitted by ववि_संयोजक on 27 July, 2014 - 13:05
वविकर्स्,धम्माल आली ना वविला. मग ववि२०१४ बद्द्लचे तुमचे वॄत्तांत आणि प्रतिक्रिया इथे लिहा पाहु.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज होती. वॉव. आज तर फुल्ल
आज होती. वॉव. आज तर फुल्ल पाऊस होता मुंबईत. मजा आली असेल. वाट बघतोय काय धम्माल केली याची
एकदम धमाल ववि !!! :) सा.सं.
एकदम धमाल ववि !!!

सा.सं. चे कार्यक्रम (विशेषतः मॅड अॅड्स अन हयग्रीव्/कर्माची फळं) अन पाण्यातली मस्ती दोन्हीही एकदम झकास.
कितीतरी नव्या ओळखी झाल्या अन आधीच्या ओळखीना उजाळा मिळाला .
अन येता जाता पुणे बसमधली धमाल Icing on the cake !!!
मस्त धमाल! पुण्याहून निघताना
मस्त धमाल! पुण्याहून निघताना इथले कोरडे रस्ते, किंचित ऊन व उकाडा वगैरे पाहून हा ववि होणार की उवि अशी धाकधूक होती. पण नंतर मग पावसाने जी झिम्मड लय धरली ती पेणला पोहोचेपर्यंत कायम होती. गारेगार हवा, हिरवीकंच सृष्टी, खाली उतरलेले धुके - ढग आणि पुण्याच्या बसमध्ये चाललेला अंताक्षरी व गाण्यांचा दंगा...
आज बऱ्याच माबोकरांना पहिल्यांदा भेटले. फार अपरिचित असे कोणी वाटलेच नाही. दिवसभर सर्वांचा दंगा, धुडगूस चालूच होते. पावसात सारखे भिजणे होतच होते. त्यामुळे वेगळ्या रेनडान्सची गरजच उरली नाही. भरपूर गप्पा, हशा, खिदळाखिदळी... अधून मधून पोटपूजा. खेळांच्या वेळेसही धमाल. येतानाचा प्रवास आणखी धमाल. बसची मूव्हिंग डान्स फ्लोअर झाली होती. त्या ढिक् च्यांग गाण्यांचे शब्द फारच कॉमेडी!
रिसॉर्टला आज खूप गर्दी होती. तरी माबोकरांनी धमाल केलीच! निघताना सर्व मुंबईकर व पुणेकरांनी एकमेकांचे हलक्या फुलक्या मनाने, हसत हसत निरोप घेतले. समस्त ठोकळेबाज उपमांना निकालात काढायचेच हा निग्रह नाश्त्यात उपमा नसल्याने आणखी पक्का झाला होताच! परिणामत: "निघताय ना आता?" अशी एकमेकांना लाडीक दटावणी करून झाली. मग अतीच प्रेमाने "जा, जा, लवकर जा!" म्हणत, कोणतेही हुंदके मनात न साठविता एकमेकांचे निरोप घेऊन झाले. ट्रकवाल्या भैय्या लोकांची आठवण काढून "फिर मिलेंगे" अशा शपथा - वचने घेतली गेली.
वर्षा-विहाराचे समस्त संयोजन, त्यासाठी घेतलेले परिश्रम या सर्वांतून मायबोलीकरांना वविबद्दल वाटणारे प्रेम, आत्मीयता दिसून येते. आणि ज्या उत्साहाने माबोकर त्यात सामील होतात व धमाल करतात तो माहौल, ते वातावरण खरेच अनुभवण्यासारखे असते!
या वेळचा ववि खरच खूप सुंदर
या वेळचा ववि खरच खूप सुंदर होता
बसचा घोळ सोडल्यास स्गळ अगदी व्यवस्थित झाल
पावसाची साथ असल्याने अजूनच मजा आली
नव्या जुन्या माबोकरांना भेटून आनंद झाला
मेरी गो राउंड विशेष उल्लेखनीय
बसमधला गाणी दंग्याने नेहमीप्रमाणे धमाल आणली
आज एकदम फ्रेश वाटतय
ववि संयोजकाचे मनापासून आभार
आणखी एक ! खेळामध्ये आमचा
आणखी एक !
खेळामध्ये आमचा कोंबडा ग्रुप जिंकल्याबद्दल संयोजकानी पर्क्स चोक्लेट्सचा डब्बा बक्षिस दिले
त्याबद्दल थान्कू
हँग्-ओव्हर.. एकदम मजा आला
हँग्-ओव्हर.. एकदम मजा आला
धन्यु मायबोली.. धन्यु ववि संयोजन समिती.. !
आता तरी संयोजकांची सचित्र ओ़़ळख करुन देणार का? :ड
नव्या लोकांनी जरा सविस्तर
नव्या लोकांनी जरा सविस्तर वृत्तांत लिहा.
...
...
धम्माल चालु होती काल आमचीही
धम्माल चालु होती काल
आमचीही एक धावती भेट झाली. 
(तटि: वरील प्रचिमध्ये असलेल्या कुणालाही परवानगीचा इश्यु नसणार याची खात्री असल्याने प्रचि प्रदर्शित केले आहे. जर वरील प्रचित असलेल्या कुणाचीही (यदाकदाचित) हरकत असेल तर लगेच कळवा. प्रचि ताबडतोब डिलीट करण्यात येईल.
)
मला इश्यू आहे जिप्सी.. आमचे
मला इश्यू आहे जिप्सी.. आमचे प्रचि न काढल्याबद्दल आणि न टाकल्याबद्दल.... तुझा निषेध...:फिदी:
योग्या तू कधी आलेलास? आणि
योग्या तू कधी आलेलास? आणि फोटो कधी काढलेस? आणि मला कस्काय दिसला नाहिस????
फोटो मस्तच.
मला इश्यू आहे जिप्सी.. आमचे
मला इश्यू आहे जिप्सी.. आमचे प्रचि न टाकल्याबद्दल.... तुझा निषेध
>>>>
माझा तर आमचे फोटो न काढल्याबद्दल निषॅढ निषेढ निषेढ :नाक मुरडणारी बाहुली :
फोटो छान आलेत जिप्सी तू कधी
फोटो छान आलेत जिप्सी
तू कधी येऊन गेलास ते कळल नाही
मयुरेश, शुभांगी शुभांगी,
मयुरेश, शुभांगी
शुभांगी, थोड्यावेळासाठी येऊन गेलो
जिप्स्या हळुच लपत छपत आलेला
जिप्स्या हळुच लपत छपत आलेला आणि तसाच लपुन छपुन गेला पण..
वाव्वा!! निळे टिशर्ट मस्त
वाव्वा!! निळे टिशर्ट मस्त दिसत आहेत.
सविस्तर वृत्तांताची वाट बघतोय...हजर आयडी, वविचा मेनू, करमणुकीचे कार्यक्रम इत्यादी इत्यादी..
हो.. डम्ब शेराड्जच्या गमती
हो.. डम्ब शेराड्जच्या गमती येऊद्या
फोटो मस्त फ्रेश दिसत आहेत. जरा निसर्गाचेही असतील तर टाका
अकु, थोडक्यात वृत्तांत मस्तच.
अकु, थोडक्यात वृत्तांत मस्तच.
सविस्तर वृत्तांताची वाट बघतोय...हजर आयडी, वविचा मेनू, करमणुकीचे कार्यक्रम इत्यादी इत्यादी..>>>>>>येस्स्स
जिप्स्या, मस्त फोटो
जिप्स्या, मस्त फोटो
ह्यावेळी पावसाने काल सकाळपासून जोमाने हजेरी लावली असल्यामुळे वविला अजून मजा आली असेल. लहान मुलांनी खूप एन्जॉय केलेलं दिसतंय.
निळे टी-शर्ट्स उठून दिसत आहेत. प्रत्यक्षापेक्षा फोटोत चांगला दिसतो.
ह्यावेळेस स्विमिंग पूलमध्ये दहिहंडी केली नाही का? घारु, इंद्रा, दगडू, मया, हिम्या वगैरे दिसत नाहीत फोटोत.
कुणीतरी सविस्तर वृत्तांत लिहा रे. सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, जेवण, ववि आणि बसमधील वेचक/वेधक प्रसंग असं सगळं लिहा
किती वाजता परतलात पुणे आणि मुंबईकर?
हो.. डम्ब शेराड्जच्या गमती
हो.. डम्ब शेराड्जच्या गमती येऊद्या >>> +१ पूनम, मी पहिल्यांदाच हजेरी लावलेल्या वविच्या वेळी (मावळ सृष्टी) ह्या खेळात केप्याने "गाढवाला गुळाची चव काय?" ह्यावर जी अफाट अॅक्टिंग केली होती ती अजून विसरले नाहिये. मी त्याच्या अपोझिट टिममध्ये होते आणि त्याच्या दोन हातांनी डोक्याला कान लावून दुगाण्या झाडण्याच्या सरस अॅक्टिंगमुळे हसून हसून खुर्चीतून पडायच्या बेतात होते. त्याच्या टीमला हसण्याच्या नादात कळत नव्हतं म्हणून बिचारा पुन्हा पुन्हा करुन दाखवत होता
केश्विनी, आठवलं!!!! हल्ली
केश्विनी, आठवलं!!!!
हल्ली वृत्तांत नीट लिहिले जात नाहीत असे माझे निरीक्षण आहे!!! सविस्तर लिहाकी....
गेेल्या वर्षी वृ लिहायला पण
गेेल्या वर्षी वृ लिहायला पण पब्लिकने रूमाल टाकले होते. म्हणजे यंदा धमाल कमी आली का काय? नसेल तर सिद्ध करा बघू!
अश्विनी,हो.. लहान मुलांनीच
अश्विनी,हो.. लहान मुलांनीच मोठ्यांपेक्षा जास्त एंजॉय केलं गं.
घारु, इंद्रा, दगडू, मया, हिम्या वगैरे दिसत नाहीत फोटोत......>>> क्या बताऊ तुम्हे हमारी दुखभरी दास्तान केश्वे.. :(... असो.. :). इंद्रदेवांनी घरूनच आशीर्वाद दिले आणि वविला पाऊस पाड्ला.
दगडूने घरातच लावणी डान्स केला.. 
शेवटचे पुणेकर म्हणजे हिम्या आणि अस्मादिक पावणेदहा वाजता घरी पोहोचलो..
यावर्षी दहिहंडी नव्हती
यावर्षी दहिहंडी नव्हती पाण्यातला टप्पा व्हॉलीबॉल होता
आशू ,यू मिस्ड पुणे बस मज्जा..
आशू ,यू मिस्ड पुणे बस मज्जा.. टुकटुक.. आजपर्यंतच्या ववि पुणे बसच्या इतिहासात आत्तापर्यंत न झालेला कल्ला काल झाला आणि तेही परतीच्या वाटेवर...
त्यासाठी मंडळ रिया,मल्ल्या,मिसेस मल्ल्या आणि सायली(सौ. हिम्या) यांचे हार्दिक आभारी आहे 
यावेळी लहान माबोकरच जास्त
यावेळी लहान माबोकरच जास्त होते :स्मितः:
ओळख परेड मधे एक आढळुन आलं की कुलकर्णी आणि माबोकरणींबरोबर आलेली त्यांची अर्धांग यांची संख्या जास्त होती.
आणि या वविमधे आम्हाला पुनः
आणि या वविमधे आम्हाला पुनः दोन भावी ववि संयोजक मिळाले आणि तेही कुलकर्णीच
वा वा माझी आठवण काढली तर.
वा वा माझी आठवण काढली तर.
धमाल दिसतोय ववि.
नीलचा ओम आणि मुग्धाचा सिद्धेश
नीलचा ओम आणि मुग्धाचा सिद्धेश यात जबरदस्त फरक आहे
मयूरेश! यंदा तरी टुकटुक करू
मयूरेश! यंदा तरी टुकटुक करू नकोस.
रिया पेनड्राईव्ह आणणार म्हणजे बसमध्ये दंगा हवाच होता. 
Pages