Submitted by उडन खटोला on 22 July, 2014 - 15:12
आज एक धक्कादायक माहिती मिळाली. भारतात मोठ्या प्रमाणावर ओरल इन्शुलिन उपलब्ध आहे. पण ते विकायला बंदी आहे.
सस्तन प्राण्यांच्या दुधात इन्शुलिन असते पण ते जठरात गेल्यावर नष्ट होते. फक्त उंटीणीच्या दुधातील इन्शुलिन पोटात नष्ट न होता रक्तात मिसळते. म्हणू हे दुध पिणाऱ्या लोकांना मधुमेह होत नाही. पण या दुधावर विक्री बंदी आहे हे आज कळले. भारतातील काही डॉक्टर्स हे दुध हवाबंद पिशव्यातून विकण्याच्या प्रयत्नात असून त्या साठी दोन कोटी उंटांची गरज आहे असा त्यांचा अंदाज आहे.
आज जगभर ओरल इन्शुलिन बनवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. ते व्यर्थ जाऊ नयेत म्हणून भारतातील सर्वात स्वस्त दुध विकलेच जाणार नाही अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
सरकार आमच्या साठी आहे कि परदेशी औषध कंपन्यांसाठी आहे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला ही धक्कादायक माहिती
तुम्हाला ही धक्कादायक माहिती कुठे मिळाली त्याचे संदर्भ द्याल का?
मॉडर्न मेडिसीनमध्ये एखादा पदार्थं एखाद्या आजारावर उपलब्ध आहे असे कळताच सगळीकडे गाजावाजा करत ते औषध म्हणून वाटायला /विकायला सुरूवात करणे असा प्रकार नसतो.
उंटाचे दूध (सांडणीचे) नक्कीच रक्तातील साखर कमी करते.
पण सध्या भारतात याची क्लिनिकल ट्रायल फक्त एकच झाली आहे. ती पण टाईप वन डायबेटिसवर ती पण फक्त २४ पेशंटवर .
यापैकी १२ पेशंटना इन्स्युलिन सोबत(लक्षात घ्या , नॉट इन्स्टेड ऑफ तर अलाँग विथ) ५०० मिलि सांडणीचे दूधही दिले.
त्यातल्या बहुतेकांची साखर कमी झालि आणि तिघांचा इन्स्युलिन डोस बंद झाला असा हा स्ट्डी करणार्या अग्रवाल डॉक्टरांचा दावा आहे.
मात्र खरेच केवळ सांडणीच्या दूधामुळे, की त्यातल्या इन्स्युलिनमुळे की त्यातल्या इतर प्रथिनांमुळ हे झाले हे स्पष्ट नाहिझ
तसेच जर औषध म्हणून हे रेकमेंड करायचे असेल तर फार मोठ्या प्रमाणात रँडमाईज्ड कंट्रोल ट्रायल करावी लागेल.
टारगेट ग्रूप आणि योग्य डोस ठरवावा लागेल तसेच साईड इफेक्टही अभ्यासावे लागतील.
एखाद्या पायलट स्ट्डीच्या निष्कर्षावर मार्केटमध्ये औषध विकण्याइतके मॉडर्न मेडिसीन उतावळे नाही.
(मी भारतीय तसेच अमेरिकन डायबेटॉलॉजिस्ट असोसिएशनची सदस्या आहे. )
साती धन्यवाद. थोडा insulin
साती धन्यवाद. थोडा insulin inhaler, insulin cream इ. च्यावर प्रकाश टाकणार का?
वेळ मिळताच टाकेन प्रकाश.
वेळ मिळताच टाकेन प्रकाश.
हेच. हेच चुकतं तुमच्या मॉडर्न
हेच. हेच चुकतं तुमच्या मॉडर्न मेडिसिनचं.
त्या उंटाच्या दुधाला आयुर्वेदिक हर्बल रेमेडीचं लेबल लावून विकायचं दिलं सोडून! बस्लेत मल्टिसेंट्रिक रँडमाइज्ड क्लिनिकल ट्रायल्स विथ सिग्निफिकंट सँपलसाईझची वाट पहात..
जरा त्या रामदेव बाबांकडे बघा! आत्तापर्यंत दुधासाठी उंटपालन -आयमिन उंटीण पालन- सुरुही झालं असेल. लवकरच त्यांच्या त्या मल्टिनॅशनल दुकानांतून शुद्ध सात्विक डायबेटीक औषध - "सांडणीशक्करक्रशर"* येईल बाजारात.
मग तुम्ही बसा विचार करत तुमचे पेशंट कुठे गेले म्हणून
*सांडणी हे सांड-सांडीण असे नाही. उंटाचे स्त्रीरूप उंटीण होत नाही. सांडणी असे होते.
रामदेवबा डोंगरावर अडकले होते
रामदेवबा डोंगरावर अडकले होते ना ?
>>> so funny
>>> so funny
सांडणीचे दूधच कशाला, एका
सांडणीचे दूधच कशाला, एका महाभागाने गोमुत्र टॅबलेट स्वरुपात काढले आहे.
गोमुत्र टॅबलेट???
गोमुत्र टॅबलेट???
रामदेव ने एक बेट विकत
रामदेव ने एक बेट विकत घेतलेले आहे तिथे फक्त उंटाचे दुध काढण्यात येईल आणि जगभरातुन मधुमेह हा रोग कायमचा हद्दपार करण्यासाठी पंतजली इन्सोलिन दुध नावाचे प्रोडक्ट काढले जाईल..
आणि .. अर्थात ते आयुर्वैदिक असल्याने त्यावर टॅक्स देखील दिला जाणार नाही
@"सांडणीशक्करक्रशर"
@"सांडणीशक्करक्रशर"
मी भारतीय तसेच अमेरिकन
मी भारतीय तसेच अमेरिकन डायबेटॉलॉजिस्ट असोसिएशनची सदस्या आहे. >>>> म्हणुनतर एवढ्या घाईघाईत येउन, विषय ऑफ ट्रॅक केला.
इब्लिस +१०८७८६
ऑफ ट्रॅक म्हणजे?
ऑफ ट्रॅक म्हणजे?
मी काय म्हण्तो. इमुपालनचा
मी काय म्हण्तो.
इमुपालनचा धन्दा होता ना एक मल्टीलेव्हल तसा सांडणीपालनचा सुरु करु..
मधुमेहासाठी मला वाटतं इन्डियन नोनीचा धन्दा असाच फोफावला होता.
महाराष्ट्रात उंट पाळणे अवघड
महाराष्ट्रात उंट पाळणे अवघड आहे..अर्थात पावसाची ही स्थिती राहिली तर थोड्या दिवसांत होईलच महाराष्ट्राचा वाळवंट
डीविनिता, तुमची पोस्ट भयंकर
डीविनिता, तुमची पोस्ट भयंकर आशावादी आहे.
आवडली.
नाही हो! मीच पाऊस न पडल्याने
नाही हो! मीच पाऊस न पडल्याने प्रचंड निराश आहे.. चुभूदेघ्या.
शेवटच्या ३ पोष्टी वाचून क्षण
शेवटच्या ३ पोष्टी वाचून क्षण भर मला वाटले कि मी चुकून असंबद्ध गाप्पांच्या धाग्यावर आलोय की काय
नंतर नीट वाचल्यावर संदर्भ लक्षात आला.. असो