'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली.
आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!!
ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे.
सध्या मिळालेली माहिती:
कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
महत्वाचे:
इथे भांडत बसू नये.
<< मुळात या मालिकेत ओमच्या
<< मुळात या मालिकेत ओमच्या आईवडिलांचं पुन्हा लग्न व्हावं हा अट्टाहास का आहे? >> तसा अट्टाहास नसावा ,असं वाटतं. ओमच्या लग्नापुरतं त्याचे खरे आई-वडील म्हणून त्यानी उपस्थित रहावं व त्यासाठीं तरी त्यांचं तात्पुरतं कां होईना पण समेट व्हावं, एवढाच आग्रह असावा.
ओमच्या आईचा आत्ताचा
ओमच्या आईचा आत्ताचा परफॉर्मन्स मला तरी आततायी वाट्ला. पूर्वी तिच्यावर अन्याय झाला. मान्य. त्यासाठी नवर्यावर चिडणे एकदम मान्य. पण आता ती चिडली आहे ते, तो ओमकडे रहातो, ओमचे त्याच्याशी संबंध बरे आहेत म्हणून. ह्याला तिचं ऑबजेक्शन आहे. थोडक्यात ओमने त्याच्याशी चांगले संबंध ठेवता कामा नये ही तिची इच्छा आहे. ओम सज्ञान आहे, त्याच्या गोष्टी तो ठरवेल, नव्हे तसंच असायला हवं, याचा पाचपोच तिला नाही. ती ओमला पण कंट्रोल करु पहातेय. म्हणून मला ती आततायी वाटली. ओमच्या बाबानी चुका मान्य करुन भविष्यकाळ सुधारु असा जो पॉझिटिव्ह अॅटीट्यूड दाखवला तो अजून तरी आईकडे नाही. असो.
शि. तु. चं अॅक्टींगही एवढं अपीलींग नाही वाटंत जेवढं तु. द. चं वाट्तं.
पण शुगोल जर आईची व्यक्तिरेखा
पण शुगोल जर आईची व्यक्तिरेखा तशीच मांडायची असेल तर मग वास्तवदर्शी वाटतेय. कारण खरी माणसंही साधी-सरळ असली तरी ती जिलबी सारखी साधी-सरळ असतात
पण शुगोल जर आईची व्यक्तिरेखा
पण शुगोल जर आईची व्यक्तिरेखा तशीच मांडायची असेल तर मग वास्तवदर्शी वाटतेय >> मॅक्स, अगदीच मान्य आहे. ती व्यक्तिरेखा तशीच आहे असं धरलं तर बर्याच गोष्टींची उकल होते, जसं की ओमचा बाबा दुसरीकडे इनव्हॉल्व्ह होणं, सोडून परदेशी जाणं, घर आणि पैसा असून देखील, आईने ओमला न सांभाळता बोर्डींगला ठेवणं, मोठा झाल्यावर देखील ओमला आईला भेटावसं न वाटणं, तसंच तिलाही ओमला भेटावसं न वाट्णं, वगैरे..
पण आपल्या समाजात सहसा आईचं चित्रं असं नसतं. त्यामुळे ते तसं लेखकाला दाखवायचं असेल असं वाटंत नाही. म्हणूनच तिची कॅरॅक्टर अजून व्यवस्थित जस्टिफाय व्हायला हवी असं वाट्तं. होईलही कदाचित पुढच्या भागांमधे.
<< पण आपल्या समाजात सहसा आईचं
<< पण आपल्या समाजात सहसा आईचं चित्रं असं नसतं. त्यामुळे ते तसं लेखकाला दाखवायचं असेल असं वाटंत नाही. >> कांहींसा 'सस्पेन्स' ठेवला असला तरीही माझी खात्री आहे कीं ओमच्या आईच्या [ खर्या] वागण्याचं कांहीं तरी भरीव समर्थन देवून तिला आईच्या प्रचलीत प्रतिमेत चपखलपणे बसवलं जाईलच. मोठ्या बाबांच्या शब्दांत ,'थोडा वेळ द्यायला हवा .. [लेखकाला ] ' !
<< मुळात या मालिकेत ओमच्या
<< मुळात या मालिकेत ओमच्या आईवडिलांचं पुन्हा लग्न व्हावं हा अट्टाहास का आहे? >> तसा अट्टाहास नसावा ,असं वाटतं. ओमच्या लग्नापुरतं त्याचे खरे आई-वडील म्हणून त्यानी उपस्थित रहावं व त्यासाठीं तरी त्यांचं तात्पुरतं कां होईना पण समेट व्हावं, एवढाच आग्रह असावा.
नाही ते मध्ये ओमला पडलेलं स्वप्न वगैरे त्यावरुन मला असं वाटलं. तुम्ही म्हणता तसं असेल तर चांगलंच आहे.
ओमने त्याच्याशी चांगले संबंध
ओमने त्याच्याशी चांगले संबंध ठेवता कामा नये ही तिची इच्छा आहे. ओम सज्ञान आहे, त्याच्या गोष्टी तो ठरवेल, नव्हे तसंच असायला हवं, याचा पाचपोच तिला नाही. ती ओमला पण कंट्रोल करु पहातेय. म्हणून मला ती आततायी वाटली.<<< पण ती व्यक्तीरेखाच तशी असेल्तर तिला ठाकून ठोकून पारंपारिक वात्सल्यरूपी आईच्या चौकटीत बसवायलाच हवं ही अपेक्षा कशाला??
आठ वर्षाचा मुलगा तिनं हॉस्टेलवर सोडलेला आहे. त्यावेळी कदाचित तिला मुलगा आणी नवरा यापेक्षा स्वतःचं वेगळं अस्तित्व असणं गरजेचं वाटलं असेल. त्यावेळेला आपल्या या वागण्यानं मुलाच्या मानसिकतेवर नक्की काय परिणाम होतोय याचा त्यावेळेला दोघांनीही विचार केलेला नाही. नंतर पुढे कधेतरी ओमला अक्कल आल्यावर तो या दोघांचाही द्वेष करतो.दोघांनाही सारखाच गुन्हेगार मानतो. दोघांशीही त्याचे संबंध ठेवत नाही.
आणि आता इतक्या दिवसांनी अजित परत आल्यावर तिला या दोघांनी एकत्र येणं आवडत नाही. ओमने वडलांना माफ करणं आणि तिला माफ न करणं यामध्ये तिचा इगो परत एकदा हर्ट झालेला आहे. म्हणून तिला ओमचे आणी अजितचे संबंध तिला खटकतात. त्यात अजितने तिची माफी मागनं, चूक झाली हे कबूल करणं (त्याच्याकडे तसाही दुसरा काही ऑप्शन नाही. युएसमधून एकाकी परत आलाय) यामुळे ती परत दुखावतेय आणि आततायीपणे वागतेय.
गूड कॅरेक्टरायझेशन!!
<< पण ती व्यक्तीरेखाच तशी
<< पण ती व्यक्तीरेखाच तशी असेल्तर तिला ठाकून ठोकून पारंपारिक वात्सल्यरूपी आईच्या चौकटीत बसवायलाच हवं ही अपेक्षा कशाला?? >> माझ्यापुरतं बोलायचं तर माझी तशी अपेक्षा किंवा ईच्छा अजिबात नाही; पण इतकं व असलं वास्तव सिरीयलवाल्याना आवडत/ परवडत नाही हा पक्का अनुभव असल्याने मीं तसंच होणार हें भाकीत केलं, इतकंच. << गूड कॅरेक्टरायझेशन >>शीं मीं देखील बव्हंशी सहमत.
कालच्या भागात मोठे बाबा आणि
कालच्या भागात मोठे बाबा आणि इशा यांच्यातले संवाद अफलातून होते. काहीतरी शिकण्यासारखे होते त्यातून, पण 'अम्ही शिकवतोय' असे कुठेच जाणवले नाही.
श्रीरंग गोडबोलेंच्या सगळ्याच
श्रीरंग गोडबोलेंच्या सगळ्याच मालिका चांगल्या असतात गुंतता हृदय हे एका लग्नाची दुसरी आणि आता तिसरी गोष्ट . मुळात ह्यांचा शेवट आणि सुरवात ठरलेला असतो इतरांप्रमाणे पाणी ओतत बसत नाहीत हे लोक .
घना, +१ सुरुवात आणि शेवट
घना, +१ सुरुवात आणि शेवट पक्का असतो यासाठी पण मध्ये पाणी सगळेच घालतात. अग्निहोत्र पण चांगली मालिका होती.
आजचा एपिसोडही अगदी सच्चा
आजचा एपिसोडही अगदी सच्चा वाटला. आणि गौरी (शितु) च्या भावनाही अगदी अश्याच. तिला उगाच उदात्तपणा दिलेला नाहीये. आवडेश.
शुभांगी गोखले बर्याचदा
शुभांगी गोखले बर्याचदा ओव्हरअॅक्टींग करतात असे वाटते मला..... बाकी सगळ्यांचे अभिनय मात्र मस्त!
मोठ्या बाबांचे कॅरेक्टर कमाल आहे.... मोहन आगाशेंचा वावर अगदी सहज!
आज शुभांगी गोखलेला डायलॉग
आज शुभांगी गोखलेला डायलॉग मस्त दिले होते. ती शेवटी गौरीशी बोलते तेव्हा.
हो. शुभांगी गोखलेचा आणि
हो. शुभांगी गोखलेचा आणि शिल्पाचा शेवटचा सीन खूपच गोड. शोभनाचं मनापासून प्रेम आहे ओमवर खरंतर तिचे आणि शिल्पाचे सर्वच सीन्स आवडले. या मालिकेत शुगोने फारच भारी काम केलं आहे. गोंधळाच्या वेळेचे तिचे एक्स्प्रेशन्स आणि गंभीर सीन्समधली संवादफेक फारच मस्त.
शिल्पा तुळसकरची भूमिकाही एक नंबर लिहिली आहे. नव-यावरचा पराकोटीचा राग आणि स्वतःचा झालेला अपमान यामुळे ती सारासार विचार करूच शकत नाही. त्यातून बाहेर ये असं सांगायलाही तिच्यापाशी कोणी नाही.
आमच्याकडे ज्येनांना इशा अजिबात आवडत नाही एक तर सारखी ओमकडे पडीक असते. बर असते तर असते वर सगळ्यांना ऑर्डरी देत असते. ती धना बिचारी या अवस्थेतही कामं करते. ही मात्र ढिम्म बसून असते, जरा म्हणून एक काम करत नाही.. आणि आरडाओरडा आणि हुकुमशाही तरी किती!
पण ओम मात्र गोड आहे हं
एक तर सारखी ओमकडे पडीक असते
एक तर सारखी ओमकडे पडीक असते >>> हो. कशाला लग्नाचा एवढा घोळ घालतात कळेना. त्यापेक्षा बॅग उचलून ये आणी रहा सरळ इकडे.
ओम परवा "तुम्ही या बायका असलयच" म्हणून चिडचिड करत होता, तो सीन फार मस्त लिहिला होता. त्याचे आणि मधुचे संवाद भारी होते.
ओम गोड आहे!!!
मलापण त्या धनाचे कळत नाही,
मलापण त्या धनाचे कळत नाही, बिचारी राब राब राबते अजूनही आणि ह्या साळकाया माळकाया (ईशा आणि ती मधु) आयतोबा आहेत नुसत्या. खरंच इशा इथेच पडलेली असते. मला नाहीच आवडत ती.
हो. कशाला लग्नाचा एवढा घोळ
हो. कशाला लग्नाचा एवढा घोळ घालतात कळेना. त्यापेक्षा बॅग उचलून ये आणी रहा सरळ इकडे.>>> अगदी!!
आता ओम आजारी आहे ह्या निमित्ताने तरी हे दोघं (तुषार-शिल्पा) समोरासमोर येतील असं वाटतंय.
खरंच ओम गोड आहे!!!
वेदिका, काही प्रमाणात मी हि
वेदिका, काही प्रमाणात मी हि तुझ्याशी सहमत आहे.
ती आततायी आई कशी?
मला नाही पटत हे मत.
आधीचे एपिसोड आठवा.
ओम म्हणाला होता कि त्याच्या आईने त्याला पढवून कोर्टात आणलं होत, कि तो डिव्होर्स नंतर त्याच्या आई बरोबर राहील. पण ओम कोर्टात बाबा बरोबर राहायचं म्हणाला. मग त्याने (आणि प्रेक्षकांनीही) अशी अपेक्षा का ठेवावी कि तिने ओमची जबाबदारी घ्यायला हवी ? तरी ओमची आई त्याच्या साठी लाडवाचे डबे घेऊन यायची त्याच्या घरी.
मला वाटत तिची काहीच चूक नाही. ती तर एक पिडीत स्त्री आहे, जिच्या नवऱ्याने बाहेर शेण खाल्ल. आणि तिचा संसार उद्धवस्त झाला.
आता ओम आजारी आहे ह्या
आता ओम आजारी आहे ह्या निमित्ताने तरी हे दोघं (तुषार-शिल्पा) समोरासमोर येतील असं वाटतंय.>>> हो काल तशी झलक दाखवली.
आई-वडीलाना एकत्र आणण्यासाठी
आई-वडीलाना एकत्र आणण्यासाठी ओमला आजारी पाडणं ही फारच बाळबोध कल्पना झाली; या सिरीयलकडून अधिक कल्पक कांहींतरी अपेक्षित होतं.
मधुरा, ती आई म्हणून चुकली
मधुरा, ती आई म्हणून चुकली आहेच गं! कारण नवरा कसाही वागला तरी लहान मुलाला तिने इतकं दूर करायला नको होतं. म्हणजे कोर्टात ओम काहीही बोलला तरी नंतर तो मोठा वकील होईपर्यंत तिच्याकडे संधी होती पुन्हा त्याला आपलंसं करायची.
पण तिने पुन्हा तो शेणखाऊ नवरा स्वीकारावा असा जो दबाव तिच्यावर येतोय किंवा ईशा व तिच्या कुटुंबियांचा जो आचरटपणा चाललाय तो खटकतो. जो माणूस तिला तरुणपणी एकटं टाकून दुसरीबरोबर निघून गेला- आता म्हातारपणी कशाला त्याची उस्तवार करत बसायचं तिने!
<< कांहींसा 'सस्पेन्स' ठेवला
<< कांहींसा 'सस्पेन्स' ठेवला असला तरीही माझी खात्री आहे कीं ओमच्या आईच्या [ खर्या] वागण्याचं कांहीं तरी भरीव समर्थन देवून तिला आईच्या प्रचलीत प्रतिमेत चपखलपणे बसवलं जाईलच >> चला, हें भाकीत काल खरं ठरलं !!
हा समीर कसा काय पचकतो?
हा समीर कसा काय पचकतो?
कालचा भाग मस्त होता... शिल्पा
कालचा भाग मस्त होता... शिल्पा तुळसकरने तिची बाजू मांडली पूर्णपणे, तिने ओमला का सोडलं हेही सांगितलं की...
तो समीर पचकला त्याच्या वडिलांसमोर.. म्हणजे तो जसा चांगला वगैरे दाखवलाय तसा बिलकुल नाहीये.. फक्त सोंग घेऊन वावरतोय माहिती मिळवायला आणि त्याच्या बाबांची मदत करायला...
का?का?का? हि मालिका माझी
का?का?का?
हि मालिका माझी फेवरेट होती , का संपतेय हि ?
घरी बघत नव्हते म्हणून अर्ध्या तासाची सुटका होती
आता ह्याच्या जागी नवी ब्याद चालू होणार
नवी डोकेदुखी येत आहे
<< ...आता ह्याच्या जागी नवी
<< ...आता ह्याच्या जागी नवी ब्याद चालू होणार...नवी डोकेदुखी येत आहे >> आणि डोकेदुखीवर इलाज म्हणून इथं त्यावर नवीन धागा !!!
<<घरी बघत नव्हते म्हणून
<<घरी बघत नव्हते म्हणून अर्ध्या तासाची सुटका होती
आता ह्याच्या जागी नवी ब्याद चालू होणार>>
तुम्ही घरी थांबूच नका या भयाण मालिका सुरु असताना. किंवा निदान त्या टीव्ही असलेल्या खोलीत थांबू नका.
>>>>>>>तुम्ही घरी थांबूच नका
>>>>>>>तुम्ही घरी थांबूच नका या भयाण मालिका सुरु असताना. किंवा निदान त्या टीव्ही असलेल्या खोलीत थांबू नका.
.
नाहीच थांबत
पण ८. ३० ते ९. १५ या काळात पोटात काहीतरी ढकलायला लागते
आणि तेव्हा मी यांच्या तावडीत सापडतो
इतर रूम मध्ये बसतो तेव्हा पण आवाज इतका मोठा असतो कि काय सांगायचे .
ओमच्या बाबांना मानसोपचाराची
ओमच्या बाबांना मानसोपचाराची गरज पडली म्हणजे अति झालं. काहीतरीच!
Pages