माझी तू त्याची होताना

Submitted by शब्दमेघ on 20 February, 2008 - 11:44

माझी तू त्याची होताना

सांग ना सखे तूच आता
माझ्या पासून दूर जाताना
काय वाटते तुला आज
माझी तू त्याची होताना

मुक्त्त करुनि या बंधना
जोडुनी नवा अनु-बंध हा
काय वाटते तूला आज
माझी तू त्याची होताना ?

एकाच वाटेचे पक्शी आपण
पण मी या दिशेला अन
तू विरुद्ध दिशेला जाताना
काय वाटते तुला आज
माझी तू त्याची होताना ?

सांग ना सखे तूच आता
माझ्या पासून दूर जाताना
अर्धांग येथेच सोडून
काय वाटते तुला आज
त्याची अर्धांगीनी होताना ?

---------- गणेशा

गुलमोहर: 

रचना आणि शैली खुपच छान .......
................सांग ना सखे तूच आता
माझ्या पासून दूर जाताना
अर्धांग येथेच सोडून
काय वाटते तुला आज
त्याची अर्धांगीनी होताना ?

Just a Turaaficcccccccccccccccc

i like the way u have decribe thr feealings

will u write some more lines on this subject

खुपच छान! अगदि ह्रुदयस्पर्शि आहे.