Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43
मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.
1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप
मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?
नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?
यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.
तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक्स्पीरीआ एम | एसपी; विंडोज
एक्स्पीरीआ एम | एसपी; विंडोज फोन मध्ये लुमिआ आहेत पण जास्त अनुभव नाही. एच्टीसी मध्ये पण ऑप्शन्स असतीलच.
बाकी त्या दुसर्या कंसातल्या वाक्याला अनुमोदन!
नाहीतर दुसरा एक पर्याय म्हणजे
नाहीतर दुसरा एक पर्याय म्हणजे चांगले हेडफोन्स घ्यायचे, सेन्हायजर, स्कलकँडी, फिलिप्स, सोनी, बीट्स बाय डॉ. डीआरई, अजून वर हवे असतील तर बोस वगैरे आहेतच.
रीपीट पोस्ट
रीपीट पोस्ट
Xperia sp cha camera
Xperia sp cha camera apekshabhang karato. baaki phone mast aahe.
योकु, सोनी एसपी आणि सोनी सी
योकु, सोनी एसपी आणि सोनी सी मध्ये कुठला चांगला वाटतोय?
दणकट आहेत का ते?
दुसर्या हेडफोन्सचा पर्याय आवडला. ते घेतले तर कुठला मोबाइल घ्यावा?
Htc desire new बघा ६ इंच
Htc desire new बघा ६ इंच स्क्रीन डुअल सीम १ जीबी रँम इत्यादि आहे
माधव मी सजेस्ट करीन की
माधव मी सजेस्ट करीन की एक्स्पीरीआ एम + हेडफोन्स. यात ८जीबी मेमरी + कार्ड असा ऑप्शन आहे.
(एक्स्पीरीआ सीमध्ये ४च जीबी मेमरी आहे त्यामुळे बरेच रिस्ट्रिक्शन येतात) बाकी सोनीमध्ये तसा काही ईश्यू नाही.
जर फक्त 'गाणी ऐकण्याकरता काही हवं असेल अन दुसरं डेडिकेटेड डिवाईस बाळगण्याची तयारी असेल तर एम्पी३ प्लेअर्स चाही पर्याय आहे.
हेडफोन्स मध्ये कसा फिट तुला आवडतो ते जरा स्पेसीफाय करशील का? म्हणजे ईन ईअर, ईअर बडस, ऑन ईअर की ओवर ईअर वगैरे. कुठे वापरणार आहेस? ईन्डोअर/ आऊट डोर/ कम्यूट करतांना?
ह्यो पावना कंचा मोबाईल
ह्यो पावना कंचा मोबाईल वापरतोय त्ये बगा मंग आपापलं प्याकेज ठरवा... क्वॉय ?
घरात चप्पल घालुन नाही फिरणार
घरात चप्पल घालुन नाही फिरणार तर काय आदिदास नाईक रिबोक चे स्पोर्ट्स शुज घालुन फिरणार का ?
तेच ना. चप्पल! तीदेखिल घरात!!
तेच ना. चप्पल! तीदेखिल घरात!! आमच्यात नाही बुवा असलं काही करत.
शिवाय तो फोन फोटोशॉप केलेला स्पष्ट दिसतोय. अंगठा अन फोन मधे गॅप आहे.
रच्याकने:
दाढी करणे, भांग पाडणे या क्रीया न केल्यास माणूस महान होतो का?
शेवटी एकदाचा एक्सपेरीया सी
शेवटी एकदाचा एक्सपेरीया सी फायनल झाला.
आमचा ग्राहक प्रचंड गोंधळलेला होता. मग हा फोन घेऊ का तो घेऊ म्हणून मला भंडावून सोडले होते. मोबाईल अनेक सुविधा देतो, त्यातल्या आपल्याला कुठल्या उपयोगी आहेत हे ठरवून फोन घ्यायचा असतो आणि एकाच फोन मध्ये सगळीच फिचर्स उत्तम दर्जाची असू शकत नाहीत हे पटवून देताना नाकी नऊ आले माझ्या.
ऐनवेळेला 'मोठा स्क्रीन हवा' या स्पेक्सची भर पडली. 'गेम खेळायला पण चांगला हवा' हे मनात असणारच पण ते उघड बोलून दाखवले तर कदाचीत फोनच मिळणार नाही अशी भिती वाटल्याने तशी मागणी झाली नाही.
योकू, प्राची एक्सपेरीया एसपी दुकानात तरी मिळत नाहीये आता. कधीच बंद झाले ते मॉडेल असे सांगण्यात आले.
माझा मायक्रोमॅक्स कॅन्वास HD
माझा मायक्रोमॅक्स कॅन्वास HD साफ गंडलाय. सहा महिन्यात दुसर्यांदा सारखं रिस्टार्ट होतोय आणि आत्ता तर कुठलंच नेटवर्क डिटेक्ट करत नाही, बॅटरी लगेच उतरते. वैताग आलाय. आत्ता हा दुरुस्त करून ठेवेन बाजूला. मार्च मध्ये कस्टमर सर्विस सेंटर मध्ये रिबूट करून आणला होता. आत्ता परत सुरु झालाय प्रॉब्लेम.
नवीन चांगल्या कंपनीचा एखादा फोन घेतलेला बरा. सॅमसंग गॅलॅक्सी S4 नाहीतर LG G2 घेईन असा विचार आहे. Sony Xperia Z चा अनुभव कसा आहे?
नेक्ससची बॅटरी आणि कॅमेरा तितके खास नाहीये, नाहीतर नेक्सस-५ घेतलो असतो.
थांबा रंगासेठ..........
थांबा रंगासेठ.......... एचटीसीचा नविन ड्युअल सीम चा ऑक्टा कोर प्रोसेसर तर आहेच त्याच बरोबर १ जीबी रॅम आणि १२ जीबी इंटरनल मेमरी देखील आहे.......
सॅमसंग उत्तम ...... सोनी मधे अॅप्लिकेशन मेमरीकार्ड वर ट्रान्स्फर करण्याची सुविधा नाही आहे...
http://www.htc.com/in/smartph
http://www.htc.com/in/smartphones/htc-desire-816/#/
हा बघा दुसरा
HTC 816 म्हणताय का? सॅमसंगचा
HTC 816 म्हणताय का? सॅमसंगचा अनुभव चांगला आहे.
धन्यवाद. पाहतो आत्ता.
धन्यवाद. पाहतो आत्ता.
मी सोनी झेड वापरतो... त्या
मी सोनी झेड वापरतो... त्या आधी एचटीसी होता........ सॅमसंग चा अनुभव नाही
वरील दिलेला एचटीसी माझा मित्र वापरत आहे चांगला आहे म्हणतोय
बजेट?
बजेट?
१६-१८ असेल
१६-१८ असेल
नाही, २५-३० पर्यंत घेतोय.
नाही, २५-३० पर्यंत घेतोय. स्वस्तात मस्त म्हणत मायक्रोमॅक्स घेऊन पस्तावलोय.
घ्या तर एचटीसी मधलाच घ्या
घ्या तर एचटीसी मधलाच घ्या
ही लिंक पहा बरं जरा... बरेच
ही लिंक पहा बरं जरा... बरेच पर्याय आहेत.
मी नुकताच वाढदिवसाला
मी नुकताच वाढदिवसाला मायक्रोमॅक्स युनाईट २ घेतला ७०००/- ला.
- १ जीबी रॅम
- १ जीबी रॉम
- ५ मेगापिक्सेल/ २ मेगापिक्सेल कॅमेरा
- अँड्रॉईड किटकॅट
- ४.७" स्क्रीन
सध्या तरी चांगला चालतोय पण टचस्क्रीनची सवय नसल्याने जरा वैतागलेय.
सोनी एक्सपिरीया टी २ कसा आहे
सोनी एक्सपिरीया टी २ कसा आहे ? मोठा स्क्रीन आणि चांगला कॅमेरा या अपेक्षा आहेत ...
आहे ऑफिसात एकीकडे... कॅम फार
आहे ऑफिसात एकीकडे... कॅम फार काही खास नाही. कॉन्फिगही फार काही ग्रेट नाही. म्हणूनतर २०के ला विकतायत... अन खरं सांगायचं तर ६'' स्क्रीन फारच मोठी होते रोजच्या वापराला.
२० ला ?? सोनी च्या शोरुम मधे
२० ला ?? सोनी च्या शोरुम मधे २५ ला आहे
मोठी स्क्रिन, ड्युएल सिम , चांगला कॅमेरा ... काय पर्याय आहेत दुसरे ?
मोठी स्क्रिन, ड्युएल सिम ,
मोठी स्क्रिन, ड्युएल सिम , चांगला कॅमेरा >>> Lenovo P780. तुम्हाला हव्या असलेल्या फिचर्सबरोबर लय भारी बॅटरीपण आहे त्यात.
कृपया लिनोवो चुकुन सुध्दा घेउ
कृपया लिनोवो चुकुन सुध्दा घेउ नका..... इतका भंगार फोन आहे...भंगारात विकायला गेलात तरी भंगारवाला तुमच्या कडुन पैसे घेईल .. टच स्क्रिन बंडल वर फोन लिस्ट मधले नाव शोधताना एम कॅपिटल असेल आणि तुम्ही स्मॉल एम वापरले तर कॅपिटल वाला नाव दाखवतच नाही... मेस्सेज आणि गुगल टॉक इकत्रित होतात.. कैच्याकै बनवला आहे
माझा फोन झोपला/ वारला. मला तर
माझा फोन झोपला/ वारला.
मला तर काही कळेनासे झाले आहे.
माझा रिलायन्स सि डी एम ए आहे. रिलायन्स जी एस एम चांगले नाही म्हणे.
मला दुसरा फोन घ्यायचा तर आधी सि डी एम ए आहे टु जी एस एम बदलले पाहिजे.
आता चांगला service provider कोण असा धागा काढु का? का आहे आधीच. असल्यास लिंक द्या.
मला बॅटरी दणदणीत पाहिजे, फोन फार नाजुक नको. ३-४ तरी अॅप चालली पाहिजेत.
मोबाईल सर्विस प्रोवाडर बाबतीत
मोबाईल सर्विस प्रोवाडर बाबतीत वोडाफोन मुंबईत तरी बेश्टेश्ट बेश्ट आहे. गेले ५/६ वर्षे वोडाफोन चा कॉर्पोरेट प्लॅन वापरतोय. नो ईश्यूज. सुपिरीअर नेटवर्क. फास्ट ३जी. जरा महाग आहे पण कधीही डाऊन नाही होत.
लेकीने २च महिन्यात चांगला
लेकीने २च महिन्यात चांगला स्मार्टफोन हरवलाय. नवीन घ्यायलाच हवाय. कुठला घ्यावा?
सॅम्संग ची ऑडीओ क्वालीटी चांगली आहे. त्यामुळे तितकीच चांगली ऑ क्वालिटी हवीय.
व्हट्सअॅप, फेसबुक, जिमेल इ. हवे आहे.
कॅमेरा ठिकठाक चालेल. फार उत्तम असायची गरज नाही. स्क्रीनही लहान चालू शकेल.
स्वस्तात स्वस्त कोणता मिळेल? कारबन वगैरे नको..सअॅम्संग किंवा नोकीया वगैरे चांगला वाटतोय आत्ता.
पण तुच म्हणाला न योकु की
पण तुच म्हणाला न योकु की माझ्या घरी रेंज नाही ते. आणि सोलापुर पुणे इ. ठिकाणी रोमींग पडेल. ते एअर्टेल ला पडेल की नाही?
अनिवेज माझ्या कडे एक व्होडाफोन जी एस एम नं. आहे. फोन मोटो घ्यावा की परत दुसरा सॅमसंग?
कॅमेरा ठिकठाक चालेल. फार
कॅमेरा ठिकठाक चालेल. फार उत्तम असायची गरज नाही. स्क्रीनही लहान चालू शकेल.
स्वस्तात स्वस्त कोणता मिळेल>> स्वस्तात मस्त मध्ये सध्या मोटो ई ला तोड नाही.
अफलातुन फोन आहे.
७००० रुपयात.
मी नवरयाला मोटो जी--१३९९९/-
मी नवरयाला मोटो जी--१३९९९/- घेतला मस्त आहे..
दणदणीत config असलेला Xiaomi
दणदणीत config असलेला Xiaomi Mi3 हा चायनामेड मोबाईल फ्लीपकार्टवर रु. १३९९९ ला आला आहे.
या कंपनीचा कोणास अनुभव आहे कां?
संपला पण
संपला पण
चाळीस मिनिटात आउट ऑफ
चाळीस मिनिटात आउट ऑफ स्टॉक.
वर लिहीलय
intex aquacurve mini हा
intex aquacurve mini हा मोबाइल कसा आहे?
सुचा माझा मुलगा हा फोन वापरतो
सुचा माझा मुलगा हा फोन वापरतो आहे, चांगलाच आहे. मी intex aqua i5 hd घेतला तो ही मस्त आहे, शिवाय किंमत पण आवाक्यातील आहे.
धन्यवाद डीविनिता ...
धन्यवाद डीविनिता ...
http://www.scoopwhoop.com/ent
http://www.scoopwhoop.com/entertainment/new-phone/?ref=related_posts
मी नवरयाला मोटो जी--१३९९९/-
मी नवरयाला मोटो जी--१३९९९/- घेतला मस्त आहे..>>>>> गाणी एकण्यासाठी आणी गेम खेळ खेळण्यासाथी कसा आहे हा मोबाएअल?
वयाने ज्येष्ठ व्यक्तीसाठी फोन
वयाने ज्येष्ठ व्यक्तीसाठी फोन सुचवा.
माझ्या वडिलांकडे एक य जुना नुसता मेसेज व फोन पुरता असलेला, बेसिक कीपॅडवाला (क्वेर्टी पण नाही) असा फोन आहे. आता त्याची वाट लागलीये असे आमचे सगळ्यांचे मत झाल्याने (त्यांना तसे वाटत नाही ते सोडा!) ते कृपावंत होऊन फोन बदलणारेत. पण फोनसाठी ५-६ हजारापेक्षा जास्त खर्च करणार नाहीत (८ डोक्यावर पाणी).
फोन, मेसेज, अलार्म, टॉर्च, एवढ्या बेसिक गोष्टींपलिकडे फोनकडून काही अपेक्षा नाहीयेत. कॅमेरा असेल तर वा नसेल तरी वा.
मुळात बेसिक कीपॅडची आणि इंचभर स्क्रीनची सवय आहे त्यामुळे नवीन फोन वापरायला अवघड पडायला नको. नाहीतर परत जुनाच वापरायला लागतील.
माझा नोट २ त्यांना अचाट व अतर्क्य वाटतो.
टचपॅड जमेल नाही जमेल सांगता येत नाही. खरंतर अवघड काही नाही त्यात पण तरी....
सुचवा..
नी, आयबॉल चे ज्येनांकरता
नी, आयबॉल चे ज्येनांकरता विशेष फोन्स आहेत. मोठे बटन्स एसओएस वगैरे पण आहे त्यात. किंमतही फार नाही. ४/५ केत होईल काम.
हा फोन पहा
टिकण्याच्या बाबतीत आयबॉलचे
टिकण्याच्या बाबतीत आयबॉलचे कसे काय?
नी, माझ्या बाबांनी (ते ज्ये
नी, माझ्या बाबांनी (ते ज्ये ना नाहीत तरीही ) तू वर जे लिहीलयेस ते सगळं म्हणत म्हणत नोकिया आशा २२५ घेतला.
साडे ३ हजारच्या आसपास किंमत आहे आणि मला आवडला
http://www.gsmarena.com/nokia
http://www.gsmarena.com/nokia_225_dual_sim-6287.php
हे बघ
जेष्ठांना टचस्क्रिन ची सवय
जेष्ठांना टचस्क्रिन ची सवय नसल्याने त्यांना "बार" मोबाईलच घेउन द्यावे अथवा काही दिव्स टचस्क्रिन स्वतःचा वापरायला द्यावा... त्याना जमले तरच नविन घेउन द्यावा....
आमच्या जेष्ठ मॅनेजर ला टचस्क्रिन घेउन दिलेला.... १ महिन्यात परत केला..
बघते गं.
बघते गं.
मला tab घ्यायचा आहे. १२००० ते
मला tab घ्यायचा आहे. १२००० ते १५००० पर्यंत buget आहे. educational वापरा साठी घ्यायचा आहे.PDF वाचणे, video पाहणे ई. कुणी सुचवू शकेल का?
Pages