कधी कधी अचानकच एखादा चपखल शब्द आपल्याला मिळतो. त्यात एक सूक्ष्म छटा असते. विचार केल्यावर त्याच्या आजूबाजूचे इतर शब्द दिसायला लागतात.
त्या दिवशी तसचं झालं. मी माझ्याकडे काम करणार्या विठाला सांगितले की स्वैपाकघरातलं सिंक तुंबतय तर ते जरा साफ कर. ती म्हणली की "ताई, मला ते किवी ड्रेनेक्स द्या, आज संध्याकाळी टाकते, उद्या सकाळी कचरा कसा 'उमळून' येईल." मला हा शब्द फारच योग्य वाटला. मी नक्कीच तो वापरला नसता. कचरा वर येईल वगैरे काही बोलले असते.
मग डोक्यात सुरुच झाले एक विचारावर्तन!
उमळून हा शब्द खरतरं आपण उलटीची जाणीव होणे अशा अर्थी वापरतो. (उदा. मेलेला उंदिर बघून मला एकदम उमळून आले.) पण ती भावना तीच असते ना. आतून काहितरी बाहेर येणं!
आणि फुलाचं उमलणं तरी काय वेगळं असतं? मग वादळात झाड उन्मळून पडत म्हणजे मुळांसकट जमिनीबाहेरच येतं ना?
शिवाय आपल्याला काहितरी उमगतं, ते काय असतं? ते समजण्यापेक्षा नक्कीचं वेगळं असतं..... आतुन समजलेलं म्हणजे उमगलेलं!
भावना व्यक्त करताना आपण म्हणतो, "मला उचंबळून आले." हेहि तसेच की!
अगदी हिंदी भाषेत सुध्दा "घटा उमड आयी" म्हणतात. नभाच्या पोकळीत काही घडामोड होऊन पावसाळी ढग जमून आले. हा शब्द पण याच माळेतला का?
हे मस्त धागा आहे हा
हे मस्त धागा आहे हा
छान धागा मामी , उलगणे , उकलणे
छान धागा मामी , उलगणे , उकलणे असेही नाजूक शब्द आठवले
आशिकाजी यांच्या 'मारणे'
आशिकाजी यांच्या 'मारणे' शब्दावरून सुचलेला संवाद -
बाबा- काखोटीला कसलं पुस्तक मारून उभा राहीलाहेस ?
मुलगा - बाबा, प्रगति पुस्तक आहे. सही मारून द्या ना.
बाबा- बाळा, 'सही करून द्या', म्हणावं.
मुलगा- पण तुम्ही मारूनच सही करणार ना !
बाबा - कां? असं काय घोडं मारलं आहेस तूं ?
मुलगा- बाबा, यावेळीं पेपरांत मास्तरानी जाम 'गुगली' मारले होते.
बाबा - मग प्रगतिपुस्तकांत तूं किती 'गोल' मारले आहेस ?
मुलगा- बाबा, 'मारणं' शब्द 'मरणा'वरून आला आहे का हो ?
बाबा - उगीच वेळ मारून नेवूं नकोस ! पुस्तक बघूं.
मुलगा- मुलांच्या जिज्ञासेवर अशी काट मारणं.......
बाबा - गप्पा मोठ्या मारतोस.. आण तें प्रगतिपुस्तक ...
मुलगा - बाबा, मुलांनीं मन मारून इतका अभ्यास करायचा ...
बाबा- मुलांचं नको सांगूस. तूं अभ्यासाला टांग मारत होतास तें बोल.
मुलगा - बाबा, 'टांग मारणें' व 'टांच मारणें' यांत काय फरक आहे ?
बाबा - अरे, तें कळण्यासाठींच बैठक मारून अभ्यास व वाचन कर असं सांगतो ना मीं तुला !
मुलगा [हंसून] - बाबा, उत्तर माहीत नाहीं म्हणून आतां कल्टी मारताय तुम्ही ...
बाबा - 'कल्टी' ?
मुलगा - जावूंदे तें बाबा. तुम्हाला नाही कळणार तें. पटकन सही मारा बघूं इथें.
मस्त संवाद लिहिलायंत भाऊ.
मस्त संवाद लिहिलायंत भाऊ.
अवलोकन संपादन शशिकांत ओक | 8
अवलोकन संपादन
शशिकांत ओक | 8 July, 2014 - 02:05
शब्द छटा
खडा
मित्रांनो,
टाईम पास चा हा विरंगुळा!
घाला भर शब्दांची, अर्थ होऊ द्या खुळा!!
भाताचा घास तोंडात जातो तोच गालावर हात ठेवून चेहरा रागिट झालेला पाहिला की समजावे, 'खडा' लागला आहे!
कधी कधी तरूणींच्या डोळ्यांची फडफड पाहिली की तरुणांना 'खडा ' टाकायची हुक्की येते.
ज्वेलरीच्या दुकानातून 'खडा' ऐटीत अंगठीत खुलताना दिसतो.
दगडाचा छोटा कठीण तुकडा अनेक छटांनी सामोरा येतो. त्याला 'खडू' केला की सानेगुरूजींसारखा मवाळ होऊन होऊन सर्वांग झिजवत फळ्यावर जीव देतो.
ख नंतर 'ड' ला डा डकवला तर इतरांसाठी खणलेल्या खाईत कधी कधी आपल्याला कपाळ मोक्ष घडतो.
डी केले तर तोंड गोड करायची शर्करा मुखी येते.
पारशी बाबाजी मुंबईत उभा खडा राहीला आहे.
ख ला खा चा खो दिला तर कामाची गैरहजेरी सामोरी येते.
खा पुढे डी समुद्राशी सलगी करते.
खु शी डा ने जमवून घेतले तर फुलावर आफत येऊन झाडाशी नाते संपते.
डा मागे खो केले तर अडकाठी करून पडायची भिती वाटते.
अशी ही खड्याची शब्दार्थ छटा!
मेस चा खाडा राहिला सांगायचा.
मेस चा खाडा राहिला सांगायचा. खड्डाही
खरं तर खड्याशी खोडा, खाडी, खोडी इ. चा संबंध नाही.
मला एक प्रश्न पडला आहे. कुणी
मला एक प्रश्न पडला आहे. कुणी मदत करू शकेल काय?
'दोन ओळींची कविता' या अर्थाने 'द्वीपदी' हा शब्द बरोबर आहे की 'द्विपदी'?
हार्दीक हा शब्द जास्त बरोबर
हार्दीक हा शब्द जास्त बरोबर आहे की हार्दिक?
कुणी सांगू शकेल काय?
हार्दिक
हार्दिक
'पाश्चात्य' आणि 'पाश्चिमात्य'
'पाश्चात्य' आणि 'पाश्चिमात्य' हे दोन वेगळ्या अर्थाचे वेगळे शब्द आहेत की कसे?
दोन्ही शब्द बर्याच ठिकाणी 'पश्चिमेकडील' अशा एकाच अर्थाने वापरल्याचे दिसतात. पण काही ठिकाणी पाश्चात्य 'जुने/फार पूर्वीचे/गतकाळातील' अशा अर्थाने सुद्धा वापरलेला पाहिला आहे.
कृपया जाणकारांनी अधिक माहिती द्यावी.
पाश्चिमात्य
पाश्चिमात्य
वि. (पौर्वात्य शब्दाप्रमाणेंच हा चुकीचा प्रयोग आहे) पश्चिमेकडील.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%...
धन्यवाद कुमार, तुमच्या
धन्यवाद कुमार, तुमच्या प्रतिसादातून मला कळाले ते असे,
'पाश्चिमात्य' हा पश्चिमेकडील ह्या अर्थाने वापरण्यासाठी चुकीचा शब्दप्रयोग आहे आणि 'पाश्चात्य' हा शब्द पश्चिमेकडील आणि गतकाळातील अशा दोन्ही अर्थाने वापरायचा.
(असेच ना?)
मग पाश्चिमात्य असा शब्दच नाही की त्याला अजून काही वेगळा अर्थ आहे.
हा ब ,
हा ब ,
याबाबतीत जरा गंमतच आहे .मागे मी एकदा एका भाषातज्ञांचे अगदी या विरुद्ध मत वाचले होते. त्यांच्या मते पाश्चात्य हा संदिग्ध शब्द आहे, तर पाश्चिमात्य हा शब्द अर्थ अधिक स्पष्ट करतो !
??
“गोल्ड स्टॅंडर्ड” साठी मला
“गोल्ड स्टॅंडर्ड” साठी मला कुणी सुरेख अर्थवाही मराठी शब्द सुचवेल काय ?
संदर्भ सांगतो.
समजा, एखाद्या रोगनिदानाच्या चार चाचण्या आहेत. त्यातील जी सर्वोत्तम असते, ती 'गोल्ड स्टँडर्ड' धरली जाते. बाकीच्यांचा दर्जा तिच्याशी तुलना करून ठरवतात.
मागे एकदा एका धाग्यावर मी
मागे एकदा एका धाग्यावर मी गांधीवध हा शब्द वापरला होता. त्यावर मला चांगलाच ओरडा पडला. मी ज्या वातावरणात वाढलो त्याचे ते प्रतिबिंब होते. तेव्हा त्या वापराचे मी समर्थन करणार नाही. आज छावा चित्रपटाच्या धाग्यावर लेखिकेला 'संभाजी महाराजांची बदनामी' करू नका असे खडे बोल एकाने सुनावले. लेखिकेने लिहिलेल्या चित्रपट परिक्षणावरून हे नीट दिसत आहे की लेखिकेला संभाजी राज्यांबद्दल प्रेम, आदर, त्यांच्या झालेल्या पाशवी हत्येबद्दल चीड, हत्यार्याप्रती घृणा आहे. तरिही एका शब्दावरून थेट त्यांना सुनावले गेले. एकूण आंतरजालावर तसेच प्रत्यक्ष आयुष्यात लगेच तलवार काढून लढायला उतरायची वृत्ती वाढते आहे असे जाणवते (कोणीतरी आंतरजालावर चुकते आहे त्यांना दुरुस्त करून येतो :फिदी:)
तर या हत्या, वध, खून शब्दांसंदर्भात.
मोल्सवर्थ च्या शब्दकोषात या तीन शब्दांचे अर्थ खालीलप्रमाणे दिले आहेत.
वध - killing, ex. of comp. पितृ, मातृ, गोवध
हत्या - murder; killing (whether of man or animal) which is viewed as criminal
खून - murder, blood
वध हा राक्षसाचा, दैत्याचा, वाईट प्रवृत्तींचा आणि म्हणून न्याय्य
हत्या - थोर स्त्री पुरुष, राजे, नेते वगैरेंचा
खून - सर्वसामान्यांचा
अशा शब्दछटा या शब्दांना कधी प्राप्त झाल्या? मोल्सवर्थ शब्दकोशात आई-वडिल-गोवध असे उदाहरण दिले आहे म्हणजे बहुतेक तेव्हा वध हा चांगल्या माणसांच्या/जनावरांच्या खुनाला वापरत का?
वध आणि हत्या यांना वेगळा अर्थ
वध आणि हत्या यांना वेगळा अर्थ कदाचित कायद्यामध्ये culpable homicide, murder यांची हिंदी/मराठीत व्याख्या करताना झाला असेल का असे वाटले.
वाल्मिकींनी रामायणाचे मूळ नाव पौलस्त्यवध ठेवले होते, पुढे त्यात काण्डांची भर घातल्यावर रामायण नाव ठेवले. (संदर्भ: भांओरिइं. रावण पुलस्त्य ऋषींचा वंशज म्हणुन पौलस्त्य). तेव्हा तेवढ्या पूर्वी वध हा शब्द चांगल्या माणसांच्या/जनावरांच्या पुरता सीमित नसावा असे वाटते.
सर्वात आधी शब्दछटा धागा आवडला
सर्वात आधी शब्दछटा धागा आवडला... सर्व कॉमेंट्स ही हळू हळू वाचेन.
खूप जुने धागे मी शेवटकडून वाचत असल्यामुळे..
वध / हत्या ह्या शब्दांविषयी..
टवणे सर आणि मानव पृथ्वीवर धन्यवाद!
मी ह्या दोन शब्दातील फरकांसाठी (अर्थात) आंतरजालावर बऱ्यापैकी शोध घेतला, परंतु त्याचा अर्थ समानच दाखवलेले आढळले.
वर सांगितल्याप्रमाणे मलाही
गोवध, मातृवध, पितृवध सापडले..
वध - killing, ex. of comp. पितृ, मातृ, गोवध
हत्या - murder; killing (whether of man or animal) which is viewed as criminal
खून - murder, blood>>> ही माहिती quora वर आहे पण त्यांनी काहीच स्पष्टीकरण किंवा संदर्भ दिलेले नाहीत.
Quora वरती लोकमानसात प्रचलित/ लोकारुढ गोष्टी असतात , जिथपर्यंत त्याचे दाखले / प्रमाण दाखवले जात नाही..
-----
वर मिळालेली माहिती आणि खाली दिल्याप्रमाणे माधव देशपांडे यांच्याकडून आलेले उत्तर यांचा मेळ घातल्यावर मी काढलेले अनुमान,
हत्या आणि वध कधी कुठे वापरावेत असे संकेत कालांतराने लोकारुढ झाले असावेत विशेष करून गांधी वध की हत्या या वादानंतर. परंतु त्याला व्याकरणाचा आधार नाही किंवा तसे नेमके नियम नाहीत.
----
मी माधव देशपांडे ( हे संस्कृत पंडित आहेत. अर्थात मराठी भाषा तज्ञ ही आहेत/ असावेत. ते शिकागो University मध्ये काही दशके संस्कृतचे प्राध्यापक / scholar म्हणून कार्यरत होते) ह्यांना त्यासंदर्भात विचारले असता...
त्यांचे उत्तर
Madhav Deshpande: मराठीत हत्त्या आणि वध या शब्दांचे असे अर्थ झाले आहेत हे खरे आहे. पण संस्कृत प्रयोगांत असा अर्थभेद दिसत नाही. हन् धातूला काही ठिकाणी वध् असा आदेश [replacement] पाणिनीने सांगितला आहे. रामाने रावण मारला या अर्थी संस्कृतात हन् आणि वध् या दोन्ही धातूचा प्रयोग दिसतो. मराठीत विशेषत: गांधीवध की हत्त्या अशी चर्चा सुरू झाली आणि त्यात या दोन शब्दांत अर्थभेद गृहीत धरला आहे. पण हा भेद मराठीत आहे, संस्कृतात नाही.
वध/ हत्या भिन्न अर्थाना
संस्कृतव्याकरणाचा आणि प्रयोगांचा आधार नाही असे म्हणावे
Pages