Submitted by लाल्या on 10 July, 2014 - 04:30
"लहु-माधव"नी (यातला माधव मी) "राजधानी एक्स्प्रेस" या हिंदी चित्रपटाला संगीत दिलं होतं. त्याच्यात आम्हाला एक अतिशय इंट्रेस्टिंग प्रयोग करायला मिळाला.
मिर्झा गालिब यांच्या गझलेला दोन वेगळ्या पद्धतीने स्वरबद्ध करण्याची कामगीरी आमच्याकडे आली. एक वेस्टर्न पद्धतीत आणि एक पारंपारीक गझलच्या वळणाने....
तरी माबोकरांनी दोन्हींबद्दल आपली प्रतिक्रिया द्यावी. वेस्टर्न च्या लिंकवर तुम्हाला आमच्याबद्दल थोडी माहिती पण मिळेल!
वेस्टर्न - http://www.youtube.com/watch?v=VqL_YdEfPp0
स्वर - हितेश प्रसाद.
इंडियन - http://www.youtube.com/watch?v=5BhnHJuHy04
स्वर - शाहीद मालिया.
धन्यवाद....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
घरी गेल्यावर ऐकुन प्रतिसाद
घरी गेल्यावर ऐकुन प्रतिसाद देते ; ऑफिसमध्ये ऐकायला जमणार नाही. छानच असणार.
नक्की सांगा कविताजी....दोन्ही
नक्की सांगा कविताजी....दोन्ही वेस्टर्न आणि भारतीय पद्धतीवर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच , मला तर दोन्ही पद्धती
छानच , मला तर दोन्ही पद्धती आवडल्या. गझलप्रेमींना भारतीय पद्धत आवडेल तर आत्ताच्या पीढीला वेस्टर्न , दोन्ही पद्धती छान...
धन्यवाद कविताजी.
धन्यवाद कविताजी.
(No subject)
अभिनव प्रयोग दिसतोय हा.
अभिनव प्रयोग दिसतोय हा. अभिनंदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
घरी जाऊनच ऐकावं लागेल. आज ऐकते.
नक्की ऐका,
नक्की ऐका, सईजी...प्रतिक्रियेची वाट पाहीन!
लाल्या, मला दोन्ही चाली
लाल्या, मला दोन्ही चाली आवडल्या...मी भारतीय शास्त्रीय संगीताचा चाहता असल्यामुळे, साहजिकच मला आपल्या पद्धतीची चाल जास्त भावली...पण पाश्चात्य पद्धतीची चालही चांगली जमलेय....दोन्ही गायक, वाद्यवृंद इत्यादिही सगळं रसायन, अगदी छान जुळून आलंय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लहु-माधव, तुम्हा द्वयीचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
तुमच्या जोडीचं भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे ह्याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाहीये....अशीच छान छान गाणी देत जा!
धन्यवाद,
धन्यवाद, प्रमोदजी....तुमच्यासारख्या शुभचिंतकांच्या शब्दांनी खरंच खूप हुरूप येतो!