साहित्य :
साबुदाणा- १ वाटी ( हा ४८ तास आधी भिजत घालायचा आहे )
रताळी- २
बटाटे -२
दुध - १/२ लिटर
मिरच्या - ५-६
तिखट - रंगापुरते
तूप - २ मोठे चमचे
लिंबु - १
मिठ - चविपुरते
सर्वप्रथम साबुदाणे ४८ तास आधी भिजत घाला, २४ तासाने ते काढून स्वच्छ कपड्यात गुंडाळून टांगून ठेवा.
प्रत्येकी १ रताळे व बटाटा यांचा किस करून बाजूला ठेवा. एका भांड्यात दुध घेऊन त्यात लिंबु पिळा, त्यानंतर मिरच्या बारीक चिरून घ्या.
एका मोठ्या भांड्यात तूप घालुन ते मंद आचेवर ठेवा, तुप तापल्यानंतर त्यात हलक्या हाताने दुध घाला, त्यात मघाशी टांगून ठेवलेले साबुदाणे थेट कपड्यातूनच टाका. आता थोडावेळ वाट पहा.
मिश्रण उकळू लागले की त्यात रंगापुरते तिखट आणि बारिक चिरलेल्या मिरच्या घाला.
चविपुरते मिठ घालून मिश्रण ढवळा.
आता गॅस बंद करून भाजी थंड होण्याची वाट पहा,
तयार झालेली भाजी ही केवळ दिसण्यानेच नाही तर वासानेही महा भयानक असल्यानं ती खाण्याची इच्छा होणारच नाही.
अश्यावेळी मघाशी बाजूला किस करून बाजूला ठेवलेले एक रताळे आणि एक बटाटा यांना खाऊन आपली उपवासाची वेळ मारून न्या.
रताळे व बटाटा मिळून भाजीच्या २५ % म्हणजेच पाव भागाच्या आसपास होत असल्यानं या भाजीला पावभाजी असे म्हंटलेले आहे. उगीच उपवासाचे पाव पाककृतीत शोधू नका.
माहितीचा स्त्रोत : कुणी विचारू नका
लागणारा वेळ : फुकट जातो
रताळे व बटाटा मिळून भाजीच्या
रताळे व बटाटा मिळून भाजीच्या २५ % म्हणजेच पाव भागाच्या आसपास होत असल्यानं या भाजीला पावभाजी असे म्हंटलेले आहे. उगीच उपवासाचे पाव पाककृतीत शोधू नका. फिदीफिदी >>> !!! बेस्ट!!!
पाव - भाजी lol
पाव - भाजी lol
कवठीचाफा आणि कथा विभाग इतकं
कचाआआआआ हे तू लिहिलंस की
कचाआआआआ हे तू लिहिलंस की तुझ्या आयडिला कुणी अमानवीयाने ग्रासलंय
(No subject)
LOL
LOL
पाव भाजी मला वाटलं
पाव भाजी

मला वाटलं शिंगाड्याच्या पिठाचे पाव करायचेत की काय आता
पाऊलखुणा भारीयेत
(No subject)
दाण्याचे कूट टाकायचे का नाही
दाण्याचे कूट टाकायचे का नाही हा प्रश्नच आहे. म्हणून शब्द्खुणामध्ये "कूटप्रश्न" आहे.
फोटो?
फोटो?

कादंबरी भन्नाट पाकृ.. अजिबात
भन्नाट पाकृ.. अजिबात करणार नाही.. टांगुन ठेवलेले (पर्यायाने मेलेले) साबुदाणे उपासाला चालणार नाही
उपासाचे पाव मायबोलीवरच उपलब्ध
उपासाचे पाव मायबोलीवरच उपलब्ध आहे . http://www.maayboli.com/node/49879
(No subject)
(No subject)
(No subject)
रताळे व बटाटा मिळून भाजीच्या
रताळे व बटाटा मिळून भाजीच्या २५ % म्हणजेच पाव भागाच्या आसपास होत असल्यानं या भाजीला पावभाजी असे म्हंटलेले आहे. उगीच उपवासाचे पाव पाककृतीत शोधू नका.>>> हे भारीये!
(No subject)
(No subject)
केवळ उच्च पा़कॄ.
केवळ उच्च पा़कॄ.
कमाल रेसिपी चाफ्या!!
कमाल रेसिपी चाफ्या!!
(No subject)
katha vibhagatun kadh he
katha vibhagatun kadh he
अश्यावेळी मघाशी बाजूला "किस"
अश्यावेळी मघाशी बाजूला "किस" करून बाजूला ठेवलेले एक रताळे आणि एक बटाटा यांना खाऊन >>>>>
हुच्चभ्रु पाककृती..
हुच्चभ्रु पाककृती..
तुझी रेसिपी म्हणजे अंदाज
तुझी रेसिपी म्हणजे अंदाज होताच.

हे असले प्रयोग तुला घरी करुच कसे देतात रे?
:हहगलो:
आयला... भारीये
आयला... भारीये
(No subject)
कवठीचाफा, पाकृ, आणि कथा
कवठीचाफा, पाकृ, आणि कथा विभाग, ह्यावरुन काहीतरी धमाल असणार हा अंदाज आला होता.
कवठी एकदाशीला केली होतीस काय ही पाकृ?
(No subject)
Pages