सध्या मी US किंवा UK मध्ये नोकरी करण्याविषयी विचार करत आहे . Google वर search करून बऱ्यापैकी माहिती मिळाली . काही consultancy ला mail सुद्धा केला. पण तरीही अजून विचार करत आहे कारण निर्णय य्खुप मोठा आहे. इथे एवढ्यासाठी लिहितोय कि जेणेकरून तुम्ही तुमचे अनुभव सल्ले देवू शकता. मला काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे मिळाली तर निर्णय घ्यायला खूप मदत होईल.
प्रश्न :
१. साधारण सुरुवातीला किती खर्च येईल (VISA सकट)? म्हणजे मला किती hard cash बरोबर ठेवावी लागेल?
२. कमीतकमी किती पगार मिळाला तर फायद्याचं राहील US आणि UK दोन्ही देशात?
३. कोणत्या कोणत्या अडचणी येवू शकतात?
४. बायकोला लगेच न्यावे का नंतर स्थिर झाल्यावर?
५. चांगली consultancy कोणती आहे?
६. साधारण प्रोसेस ला किती दिवस जातात?
७. सुरक्षितते बाबत काही काळजी करण्यासारखे आहे का?
Note:
मी Mechanical Engineer आहे आणि सध्या एका MNC मध्ये काम करतो. विवाहित आहे पण मुल नाही.
अजून काही सल्ले असतील ते ते पण द्या खूप मदत होइल.
चेतन जाधव तुम्हि जर जोशी /
चेतन जाधव
तुम्हि जर जोशी / देशपांडे / कुलकर्णी आसता तर नक्कि भरभरुन प्रतिसाद मिलाला असता.
सुरेख, माफ करा पण तुमचा हा
सुरेख, माफ करा पण तुमचा हा प्रतिसाद अतिशय दुर्दैवी आहे.
चेतन जाधव यांनी अशा प्रकारचे लेखनाचे २ धागे काढले होते.
http://www.maayboli.com/node/49719
या धाग्यावर पाहिलेत तर लक्षात येईल की त्यांना काही मार्गदर्शनपर प्रतिसाद आलेले आहेत.
अर्थात त्यांचा प्रश्न विस्तारित नसल्याने, भरभरून प्रतिसाद आलेले नाहीत.
त्यांनी त्यांच्या कामाच्या अनुभव, क्षेत्रा बद्दल अजुन माहिती दिली तर माबोवरचे लोक नक्कीच योग्य ते प्रतिसाद आणि माहिती देतील.
आपण आपला प्रतिसाद संपादित कराल अशी आशा आहे. धन्यवाद !
इथले लोक माहिती देतील.
इथले लोक माहिती देतील. गुगलवर शोधा
लबाड एजंटापासुन सावध
लबाड एजंटापासुन सावध रहा.
अरेरे! का परदेशात जाताय? भारतातच रहा ... असे सांगणारे लोक तर महालबाड . लक्ष देऊ नका.
>>लबाड एजंटापासुन सावध
>>लबाड एजंटापासुन सावध रहा.
>>अरेरे! का परदेशात जाताय? भारतातच रहा ... असे सांगणारे लोक तर महालबाड . लक्ष देऊ नका.
अनुमोदन !
पण यासाठी एजन्ट लबाड आहे हे कसे ओळखायचे ?
महेशराव आणि आमचे एकमत ! डऑळे
महेशराव आणि आमचे एकमत ! डऑळे पाणावले.
लबाड एजंटापासुन सावध
लबाड एजंटापासुन सावध रहा.
अरेरे! का परदेशात जाताय? भारतातच रहा ... असे सांगणारे लोक तर महालबाड . लक्ष देऊ नका
हे बरोबर आहे.इथेCaste Certificate SC/ST/VJ/NT/SBC/MARATHA/OBC) आशि ओ ळख घेउन जगन्य पेक्ष परदेशात ndian एवढी ओळख पुरेशि आहे.
या धाग्यावर पाहिलेत तर लक्षात
या धाग्यावर पाहिलेत तर लक्षात येईल की त्यांना काही मार्गदर्शनपर प्रतिसाद आलेले आहेत.
ते प्रतिसाद त्यांना आवडले नसतील. विशेषतः का परदेशात जाताय? भारतातच रहा ... असले प्रतिसाद तर मुळीच आवडणार नाहीत.
त्यांना वाटत असेल की त्यांनी इथे लिहील्यावर इथे असलेले मायबोलीकर त्यांना लगेच लिहून कळवतील की आम्ही तुम्हाला व्हिसा पाठवतो व नोकरीहि देतो. किती पगार पाहिजे? न्यू जर्सीत रहायचे असेल (कारण तिथे बरेच इंडियन्स आहेत, नि इंडियन सगळे काही मिळते. तर इथे सहकुटुंब रहायला निदान सुरुवातीला महिना ८ ते ९ हजार पगार हवा, तुमच्यासाठी भारतातल्या कंपनी सारखे रहायला २ बी एच के फ्लॅट व शोफर वाली गाडी पण देतील.
आता असा आवडता प्रतिसाद मिळेस्तवर ते नवीन धागे उघडतच रहातील.
मला पण असेच वाटत होते इथे येइस्तवर. कारण भारतात माझे प्रचंड वशिले - कॉलेज अॅडमिशन, लठ्ठ पगाराची नोकरी वगैरे सगळे काही मिळाले. आरक्षण, मार्क, वगैरे काही आडवे आले नाही. इथे आल्यावर सगळीच बोंब!!