Couscous - कुसकुस

Submitted by दिनेश. on 30 June, 2014 - 06:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांना नाश्ता म्हणून.
माहितीचा स्रोत: 
अगदी कॉमन प्रकार. पाकिटावर पण छापलेला होता.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त, दिनेशदा टिव्हीवर हे कुसकुस नाव ऐकल्यापासुन हे नक्की काय आहे हे पाहण्याची खुप उत्सुकता लागली होती. धन्यवाद Happy

धन्यवाद... लापशीचा रवा असा शिजणार नाही. पण तो नीट मोकळा शिजवून असा वापरता येईल.
( मुंबईत चौकशी केली तर मिळू शकेल. )

मी ही ही रेसीपी माबो वर टाकणार होते. माझा आवडता प्रकार.
ह्यात मी ड्राय हर्ब्ज घालते. मस्त फ्लेवर येतो. आणि वरुन डळिंबाचे दाणे.
नटी टेस्ट साठी अक्रोड चे बारीक बारीक तुकडे. संडे ब्रेकफस्ट ला बरेच वेळा करते.
वेरिएशनला भरपूर वाव आणि बिघडण्याला वावच नाही.

झीरो नं च्या साबुदाण्यासारखा दिसतोय.
आपल्याकडे गव्हाचा रवा म्ह्णून मिळतो तोच का ? म्हणजे तो घेतला तर चालतो का ?

पण दिसतेय मस्त ही डिश. Happy

फ्रान्स मधे विद्यापीठाच्या मेस मधे पहिल्यांदा कुसकुस खाल्लं (भाज्या + ग्रेव्ही घातलेलं) - आणि ती बेचव जेवण मिळणारी कंटाळवाणी मेस मला अचानक आपली वाटू लगली. Happy त्यांनी एक मिरचीचा पातळ सॉस पण ठेवला होता सोबत. व्वा. भारतात परत आल्यावर कुसकुस कुठे मिळतं ते शोधलं - पुण्यात गोदरेज नेचर्स बास्केट मधे मिळतं. आता दर एक-दोन आठवड्यांनी कुसकुस चा मेनू असतो.

भारतात कुसकुस फारच महाग होते मी एक-दोनदा खरेदी केली होती तेव्हा. का कोण जाणे कारण तसे काही कुसकुस करायला फार वेगळे लागत नसावे रव्यापेक्षा.

वरची रेस्पी कुसकुसची कोशिंबीरच आहे की! Happy

मी युरोपात कुसकुस बरेचदा मेन डिशमध्ये भाताचे सब्स्टिट्युट म्हणुन खाल्लेले आहे. म्हणजे फिश आणि कुसकुस, वेजीज आणि कुसकुस वगैरे

टण्या.. फॅन्सी फूड आहे ना भारतात, म्हणून महाग. एकदा मागणी वाढली तर भारतातच उत्पादन होऊ लागेल.
मग होईल स्वस्त. आपल्या वर्किंग विमेनना फार सोयीचे होईल.

बॅग्झ... आपल्याला खुप ओळखीची चव वाटते ही !

आपल्या वर्किंग विमेनना फार सोयीचे होईल. >> +१

(माझी रिक्षा: माझ्या लेखनस्पर्धेत लिहलेल्या लेखात नायिका कुसकुस बरेच वेळा करते त्याला हेच कारण. करायला अतिशय सोपे, पौष्टिक आणि अगदी अगदी झटपट! Happy )

छान रेसिपी.

बार्लीचा रवा मिळतो भारतात. त्याची चव कुसकुससारखीच लागते. खूप पटकन शिजतो तो.

अरे वा! धन्यवाद!!
कुसकुस बरोबर "भारतीय" पदार्थ कुठले करावे? काही आयडिया शेयर करा. बरेच वेळा कुणीतरी अचानक येणार म्हणून कुसकुस केला जातो. मग सोबत रायता करते पण इतर काही सूचना असतील तर आवडेल.

पकोडेवाली कढी, फ्लॉवरचा रस्सा, मटर पनीर बरोबर चांगली लागेल.
थोडा थंड झाल्यावर यात पिठिसाखर, खोबरे व वेलचीपूड घालूनही छान लागेल.

कुसकुस: माझा आवडता पदार्थ जो १५- २० मिनिटात तयार होतो.

दोन प्रकारचे कुस्कुस मिळतात, एक रव्या सारखा असतो (ह्याला ईस्त्रायली कुसकुस म्हणतात) तर दुसरा साबुदाण्यासारखा असतो. (लेबनिज ) दोन्ही चवीला चांगले लागतात.

रव्या सारखा कुस्कुस ला फोडणी करुन त्यात थोडे टोमटो परतुन, कुस्कुस मध्ये टाकले तर उपम्या सारखा सर्व करु शकतो ( कोथिंबिर वरुन टाकुन).

छान रेस्पी दिनेशदा.
कुसकुस माझेही कंफर्ट फूड राहीले आहे. मी कुसकुसचा उपमाच केला आहे नेहमी. पाण्याचं तंत्र सांभाळलं की झालं. झट्पट तयार होते ही डीश.

दिनेशदा, फारच जवळून फोटो दाखवलात Proud .. अगदी स्क्रीन पर्यंत हात नेऊन पाहिला.. हाती काहीच लागलं नाही Sad
आज पार ८-९ वर्ष मागे नेऊन सोडलंत.. फ्रांसमधे असताना जेवणालाच सबस्टिट्युट म्हणून असंख्य वेळा हाच प्रकार खात होते.. आता इथे आल्यावर तिथल्या अनेक गोष्टी पार विसरून गेले आहे.. जबरदस्त आवडायचं मला हे प्रकरण.. विकतच्या तयार कुसकुस मधे कणसाचे दाणे खाल्याचं आठवतं आणि पॅक्ड, रेडी टु इट प्रकारात आंबट पिकल्स चे पण तुकडे असायचे..

कुसकुस खूप आवडते.
सिमन्तिनी भरपूर टोमॅटो घालून केलेले किंचित आंबट चवीचे छोले आणि कुसकुस हे माझे आवडते कॉम्बो आहे.

Pages