१. देवळांच्या देशा – "अंबरनाथचे शिवमंदिर"
२. देवळांच्या देशा - "मानस मंदिर"
३. देवळांच्या देशा - "शहाडचे बिर्ला मंदिर"
४. देवळांच्या देशा - "गोंदेश्वर मंदिर (सिन्नर)"
==============================================================================
==============================================================================
आषाढी वारीनिमित्त सासवडला भेट देण्याचा योग आला. कर्हा नदीच्या तीरावर वसलेल्या सासवड परीसरात भटकंतीसाठी मल्हारगड (सोनोरीचा किल्ला), पुरंदर-वज्रगड, परीसरातील पुरातन देवालय, पक्षीनिरीक्षणासाठी वीर धरण आणि परीसर, केतकावळीचे प्रति बालाजी मंदिर, साधारण १७ किमी अंतरावर वसलेली "जेजुरी", पुरातन वाडे, भुलेश्वर असा बराच खजिना आहे. सासवडवरून दरवर्षी जाणे येणे होते पण निवांत अशी भटकंती झाली नव्हती. वारीच्या निमित्ताने एक दिवस मुक्काम असल्याने जास्त भटकंती करता आली नाही. मात्र "संगमेश्वर" मंदिराबद्दल मायबोलीकर हर्पेन यांनी इथे फोटो प्रदर्शित केले होतेच तेंव्हा हे मंदिर आणि प्रतिसादात वरदा व गिरीकंद यांनी उल्लेख केलेला वटेश्वर अशी दोन ठिकाणे आवर्जुन पाहण्याचे ठरवले होते. वारीनिमित्त प्रचंड गर्दी असल्याने सोपानकाका समाधीमंदिर बाहेरूनच पाहिले.
श्री संगमेशवर मंदिर
सासवड एसटी स्थानकापासून साधारण १-१.५ किमी अंतरावर कर्हा आणि चांबळी (भोगावती) नदीच्या संगमावर हे मंदिर वसले आहे. दगडी बांधकामाचे हे मंदिर अतिशय सुंदर आहे. मंदिरात दोन नंदी असुन एक मुख्य मंदिराच्या थोड्या बाहेर आहे. आतील नंदीला रंगकाम केलंय. मंदीर परीसरात दिपमाळा, तुळशी वृंदावन आहेत. मंदिराबद्दल जास्त माहिती मिळाली नाही.
प्रचि ०१
जवळच असलेल्या कर्हाबाई मंदिरातील कर्हाबाईची मूर्ती
प्रचि ०२
मंदिरातील श्री गणेशमूर्ती
प्रचि ०३
प्रचि ०४
मंदिरातील पहिला नंदी
प्रचि ०५
प्रचि ०६
रंगवलेला नंदी
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
श्री चांग वटेश्वर मंदिर (चांगावटेश्वर)
सासवड एसटी स्थानकापासून साधारण ४-५ किमी अंतरावर सासवड-कापूरहोळ रस्त्यावर अतिशय निसर्गरम्य आणि शांत परीसरात चांगावटेश्वर मंदिर आहे.
या मंदिराची आख्यायिका:
चांगदेव पावसाळ्यातील चातुर्मासातले ४ महिने मौनव्रताने व अंधत्व धारण करून म्हणजेच डोळे मिटुनच सर्व व्यवहार करीत. त्यांचे नित्य पार्थिव लिंग पुजेचे असे. त्यांचा शिष्य काळ्या मातीने मळुन केलेले लिंग डाव्या हातावर घेऊन त्याची विधीयुक्त पुजा करीत असे. एक दिवशी सारख्या कोसळत असलेल्या पावसामुळे शिष्याने कंटाळुन एका मोठ्या पालथ्या वाटीवरच थोड्याशा मातीचे लिंपन तयार करून तेच पार्थिक लिंग म्हणुन तयार करून ठेवले. चांगदेवाने नित्यनियमाने स्नान उरकुन पार्थिव लिंगास आव्हानात्म मंत्रोक्षता वाहून ते उचलून हातावर घेण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ गेला. ते हलविले न जाणारे स्वयंभू लिंगच चांगदेवास दिसुन आले. त्याने छोटेसे मंदीर बांधून त्या स्वयंभू लिंगाची उपासना कायम ठेवली. यावरूनच या मंदिरास चांगावटेश्वर असे नाव पडले.
या मंदिराचा जिर्णोद्धार सरदार अंबाजीपंत पुरंदरे यांनी सन १७०० मध्ये केला. सध्या देवस्थान मालकी हक्क सरदार जयसाहेब राघवेंद्र पुरंदरे यांच्याकडे आहे.
(वरील माहिती मंदिरात असलेल्या माहिती फलकाच्या आधारे)
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
सोपानकाका समाधी मंदिर
प्रचि ३१
जुन महिना अर्धा संपला तरी पावसाने पाठ फिरवल्याने नदीपात्रात पाणी नव्हते. पावसाळ्यात हा सारा परीसर अजुनच देखणा असेल यात शंका नाही. येथील शांतता आणि निसर्ग अनुभवायचा असेल तर हाताशी थोडा वेळ राखुनच या.
नेहमीप्रमाणेच अप्रतिम फोटोज.
नेहमीप्रमाणेच अप्रतिम फोटोज. सासवडला खुप वेळा गेलो आहे पण ह्या मंदीरांबद्दल माहिती नव्हती आता मात्र गेलो तर आवर्जुन जाईन.
सुरेख!
सुरेख!
जिप्या बाहेरून हे मंदिर बरेच
जिप्या बाहेरून हे मंदिर बरेच वेळा पाहिले आहे, आज तुझ्यामुळे दर्शनही झाले
धन्यवाद
फोटो छान आहेत.... एकटाच
फोटो छान आहेत....
एकटाच नेहमी प्रमाणे ?>
मस्त मागच्याच महिन्यात
मस्त
मागच्याच महिन्यात सोपानकाका समाधी मंदीर पाहिले..पुढच्या वेळी आता ही दोन मंदीरे पाहणार.
केवळ सुंदर ....
केवळ सुंदर ....
(No subject)
मस्तच रे योगेश. मी पण अमित
मस्तच रे योगेश. मी पण अमित आणी आशीषसोबत हे मंदीर बघुन आले. सुरेख शिल्पकलेचा नमुना आहे.
मस्त.. या परिसरात
मस्त.. या परिसरात पावसाळ्यात भटकंती करायला मस्त वाटतं..
चांग वटेश्वर मंदिर >>> हे मंदिर हिवरे गावात आहे का?
इंद्रा चला मग जाऊया.
इंद्रा चला मग जाऊया.
सुरेख, जिप्सी. वटेश्वर आणि
सुरेख, जिप्सी.
वटेश्वर आणि सोपानकाकांची समाधी ही माझी अत्यंत आवडती ठिकाणं आहेत. तिथे फार छान मनःशांती मिळते असा (निदान माझ्यापुरता) अनुभव आहे. अतिशय निवांत परिसर..
वटेश्वराच्या शिखरालापण रंगकाम केलेलं पाहून वाईट वाटलं
सुन्दर!! वरदा +१
सुन्दर!!
वरदा +१
काय सुंदर मंदिरं आहेत.
काय सुंदर मंदिरं आहेत. (जिप्स्या सारखं सारखं सांगणार नाही, तू फोटो सुंदर काढलेस, त्यामुळेच ही सुंदर मंदिरं आम्हाला दिसलीत.)
खुप सुंदर... मी हे ठिकाण
खुप सुंदर... मी हे ठिकाण बघितल्यासारखे वाटतेय.
मस्त आहेत मंदिरे. पहिला फोटो
मस्त आहेत मंदिरे.
पहिला फोटो आवडला.
खुप सुंदर....
खुप सुंदर....
वटेश्वराच्या शिखरालापण रंगकाम
वटेश्वराच्या शिखरालापण रंगकाम केलेलं पाहून वाईट वाटलं >>> +१
रंगकाम केल्यावर एखाद्या वास्तुची रया गेलेली पहिल्यांदाच पहातोय. पण पावसाळ्यात वटेश्वर मंदिर आणी आजुबाजुचा परीसर खुपच मस्त वाटतो.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!! हे
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
हे मंदिर हिवरे गावात आहे का?>>>>>बहुतेक नाही, इंद्रा.
तिथे फार छान मनःशांती मिळते असा (निदान माझ्यापुरता) अनुभव आहे. अतिशय निवांत परिसर..>>>वरदा, मलाही पहिल्या भेटीत अगदी हेच जाणवलं. पावसाळ्यात जेंव्हा नदी भरून वाहत असेल तर या परीसराचे सौंदर्य अजुनच खुलुन दिसत असेल ना?
वटेश्वराच्या शिखरालापण रंगकाम केलेलं पाहून वाईट वाटलं>>>>अगदी अगदी. खरंतर पुरातन कोणत्याही मंदीराला रंगकाम करण्यास मनाई केली पाहिजे. पाली येथील बल्लाळेश्वर मंदीराच रंगही आता काढुन टाकला आहे.
वेल
हे मंदिर हिवरे गावात आहे का?
हे मंदिर हिवरे गावात आहे का? - नाही सासवड मधे कचेरिच्या जवळ आहे.
हिवरे गावात आहे का? या गावात असेच एक शिव्मन्दिर आहे.
फोटो छान आहेत.... सासवड एसटी
फोटो छान आहेत....
सासवड एसटी स्थानकापासून साधारण ४-५ किमी अंतरावर सासवड-कापूरहोळ रस्त्यावर>>>>>>
वटेश्वर मंदिर हे सासवड एस टी स्थानकापासून ३ किमी आहे.
शेवटचा फोटो हा सासवडचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा बाहेरचा परिसर आहे
शेवटचा फोटो हा सासवडचे
शेवटचा फोटो हा सासवडचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा बाहेरचा परिसर आहे>>>>नाही राणी_३. शेवटचा फोटो हा सोपानकाका समाधी मंदिराचाच आहे.
मस्त फोटो रे. पहिला एक्दम
मस्त फोटो रे. पहिला एक्दम मस्त.
लै भारी जिप्शा!
लै भारी जिप्शा! संगमेश्वराच्या देवळातला रंगीत नंदी नवीन आहे का? आणि प्र चि ३० मधे २ समाध्या आहेत का, आणि असतील तर कोणाच्या?
पहिलाच फोटो काय खल्लास आहे.
पहिलाच फोटो काय खल्लास आहे. वेगळाच कोन त्या तीरावर गेलास तरी कसा, पार त्या रस्त्यावरच्या पुलावरूनच का?
चांगवटेश्वर अजूनही राहिलेच आहे जायचे, आता पुढच्या खेपेस सासवडला गेलो की नक्की जाणार
मस्तच!
मस्तच!
अप्रतिम.
अप्रतिम.
नाही सासवड मधे कचेरिच्या जवळ
नाही सासवड मधे कचेरिच्या जवळ आहे. >> धन्यवाद
केपी कधी जायच ते जिप्सीला विचार...
अप्रतिम! मला प्राचिन मंदीरं
अप्रतिम! मला प्राचिन मंदीरं खुप आवडतात...
मस्त प्रचि तो १४ वा खासच.
मस्त प्रचि तो १४ वा खासच.
प्रतिसादाबद्दल
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
आणि प्र चि ३० मधे २ समाध्या आहेत का, आणि असतील तर कोणाच्या?>>>>ज्योतिताई, हे माहित नाही.
पार त्या रस्त्यावरच्या पुलावरूनच का?>>>>हो हर्पेन तेथुनच. आणि तोच रस्ता पुढे वटेश्वर मंदिराकडे जातो. (अंतर अंदाजे १.५ ते २ किमी असेल).
केपी कधी जायच ते जिप्सीला विचार...>>>> ऑगस्टमध्ये कधीही. वीर धरण आणि परीसरही पहायचा आहे.
Pages